माझी व्ही. आर. एस.
वयाच्या तेह्तीसाव्या वर्षी व्ही. आर. एस. म्हणजे जरा अतीच. लोकांची करिअरला सुरवात झालेली असते आणि आमचं करिअर संपल.
मुंबईतल्या एका नामांकित चार्टर्ड अकाऊटंट कंपनीमध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी म्हणजे १९९६ ला नोकरीला लागलो तेव्हा आपण आता ईक्डनच रिटायर होणार अशी आशा होती. सुरवातीची दहा वर्ष व्यवस्थित गेली. पुढे आमची कंपनी एका मल्टीनॅशनल कंपनी बरोबर मर्ज झाली आणि पुढ्ची लक्षण दिसायला लागली. बरं आम्ही पड्लो कॉम्यूटर ऑपरेटर, नवीन कंपनीला आमची गरज नव्ह्ती, त्यांना गरज होती ती सी.ए., कन्सलटंट ई. प्रोफेशनल स्टाफची, त्या लोकांना त्यांनी सामावून घेतलं. आम्ही अर्थातच लटकलो. पगार, रजा, बाकीचे अलाऊन्सेस ई. व्यवस्थित चालू होत, पण कामाचा काहीच पत्ता नाही. काम सगळं नवीन कंपनीला ट्रान्सफर केलेलं. काम परत आणण्यासाठी कोर्टात केसेस चालु, पगारवाढीच्या अॅग्रीमेंट्साठी कोर्टात केसेस चालु. अर्थात युनीयन असल्यामुळेच आमच्या नोकर्या टिकुन होत्या. पण आता तीन वर्ष झाली कशातच काही प्रगती होत न्हवती.
मुंबईत सगळ्यात जास्त रजा आम्हाला असाव्यात बहुदा. आमच्या नाक्यावरचे सगळे लोक माझ्या रजाच मोजायचे. सगळे शनिवार, रविवार, बँक हॉलीडे, पी.एल., सीक लीव्ह आणि कॅज्युअल लीव्ह सगळे मिळुन १६५ दिवस रजा होत्या. मज्जाच मज्जा. काम नाही, दिवसभर ऑफिस मध्ये पिक्चर बघायचो, नेट असल्यामुळे शेअर मार्केट बघायचो त्यामुळे वेळ चांगला जायचा. मधल्या काळात का कुणास ठाऊक मी पौरोहीत्य शिकून घेतलं होत. आगामी संकटाची चाहुल का काय म्हणतांत ती लागली असावी एखाद वेळेस. तीन वर्षाच्या काळात पौरोहीत्यात आता चांगला जम बसला होता. आणि अचानक मागच्या वर्षी कंपनीने व्ही. आर. एस. लावली. ३ महीन्याचा पगार प्रत्येक नोकरी झालेल्या वर्षासाठी देत होते. युनीयनने आणि आम्ही अर्थातच विरोध केला. आमची एकच मागणी होती आम्हाला काम द्या. पण मॅनेजमेंट काही ऐकायला तयार न्हवती. दरम्यानच्या काळात ३.५ ची व्ही. आर. एस. येऊन गेली होती. या गड्बडीत एक वर्ष गेलं आणि मागच्या महिन्यात पुन्हा कंपनीने व्ही. आर. एस. लावली ४.५ महीन्याची. आता मात्र लोकांचा धीर सुटायला लागला. व्ही. आर. एस. कॉम्पेनसेशन देखील बर्यापैकी मिळ्त होतं.
व्ही.आर.एस. चा दुसरा अर्थ म्हणजे व्हायरल रिटायरमेंट स्कीम. एकाने घेतली की दुसर्याला सुध्दा घ्यावशी वाटते. त्यात अजुन एक मजा म्हणजे आता मिळतय ते पदरात पाडून घ्या पुढे काहीच मिळाल नाही तर ? ही एक भिती सगळ्यांनाच वाटत असते. असो !! एकूण ३८ पैकी ३३ जणांनी व्ही.आर.एस. घेतली.
आईशी आणि बायकोशी बोलुन आणि सगळ्या गोष्टींचा विचार करुन मी देखील व्ही. आर. एस. घ्यायचा निर्णय पक्का केला आणि १७ एप्रील ला फॉर्म भरुन दिला. ३१ मे शेवट्ची तारीख. ३१ मे ला सकाळी आमच्या ०८.०८. च्या ठाणा फास्ट गाडीतल्या लोकांना भेटुन घेतलं, ऊद्यापासुन कोणीही भेट्णार न्हवतं. ऑफीसला पोचलो. आवरा आवरी करण्यात दिवस निघुन गेला. ४.३० वाजले तसे वातावरण गंभीर व्हायला लागलं, कोपर्या कोपर्यातुन गटा-गटाने कलीग एकमेकांच सांत्वन करीत होते, रिटायरमेंट्च्या जवळ आलेले लोक सुध्दा रडायला लागले होते. चला चला आपली आता महाप्रयाणाची वेळ होत आली आहे असे बोलुन मी वातावरण जरा हलंक करायचा प्रयत्न केला पण त्याचा विशेष काही ऊपयोग झाला नाही. शेवटी ५.३० ला आम्ही निघालो ते पुन्हा क्धीही ऑफीसला न जाण्यासाठी.
असो आता ३-४ दिवस झाले आहेत. शेअर मार्केट आणि पौरोहित्य चालु आहेच. दिवस कसा जाईल याची चिंता वाटत होती आता ते काही कठीण वाटत नाहिये. व्ही. आर. एस. कॉम्पेनसेशन देखील बर्यापैकी मिळालयं.
परवाच दांडेकर (ऊर्फ दांडु) नावाचा एक कॉलेजमधला मित्र भेटला होता. त्याला म्ह्ट्ल व्ही. आर. एस. घेतली आणि आता आराम करतोय तरं हसायला लागला. बोलला, सम्या साल्या तुझी सवय गेली नाही अजुन, मला काय चु** बनवतोय ? हे काय तुझं वय आहे का व्ही. आर. एस.च.
असो लोकांना खरंच वाट्त नाही हो आणि कधी कधी मला सुध्दा.
ता. क. : कुठे पुजा वगैरे करायची असेल तर कळवा हो अवश्य.
नुकताच व्ही. आर. एस. घेतलेला आणि आता भरपुर वेळ असलेला
बज्जु गुरुजी.
प्रतिक्रिया
5 Jun 2010 - 3:58 pm | इंटरनेटस्नेही
वयाच्या ३३ व्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती म्हणजे कठीणच की.. पण तुम्ही धीर सोडू नका, सर्व काही ठीक होईल. एक सूचना, तुम्हाला काही पौरोहित्य असल्यास जरूर कळवू पण त्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक इथे द्यावा..
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
5 Jun 2010 - 4:03 pm | परिकथेतील राजकुमार
छान !
एक छोटीसी व्हिआरएस स्टोरी आवडली.
अवांतर :- आमच्या एक मित्राला त्याच्या सायटीसाठी संपादक हवेच आहेत, त्याला पाठवतो तुमच्याकडे.
तुमचे मानधान काय रोज दोन केळी आणी एक डिश खिचडीत भागुन जाईल.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
5 Jun 2010 - 4:06 pm | अवलिया
+१
बाकी संपादकांचे काम म्हणजे *संपादित - प्रत्येक ठिकाणी संपादकांची खिल्ली उडवु नये.*
--अवलिया
5 Jun 2010 - 4:10 pm | टारझन
=)) अगदी !! आवडली !!
बाकी
टारझन या सभासदाच्या प्रतिसादांचे संपादन करुन करून मी थकलो आहे , टारझनला तंबी देन्यात येत आहे पर्याच्या प्रतिसादांवर हास्यपताका फडकवु नये.
- यो_मनीचा पुरस्कर्ता
5 Jun 2010 - 8:55 pm | संजा
बज्जु महाराज, तुमची पहिली ईनिंग संपलीय. जरा आराम करा आणि सेकंड ईनिंग चालु करा बर !
आल दि बेस्ट
संजा
5 Jun 2010 - 11:25 pm | शुचि
पण दुसरीकडे नोकरी शोधता येते ना? आय मीन - एका कंपनीने व्ही आर एस दिली तर नंतर नोकरीच नाही मिळत का? काय नियम आहेत?
मला वाटतं काहीतरी मठ्ठ प्रश्न विचारतेय मी .... पण मला खरच माहीती नाहीये.
6 Jun 2010 - 12:12 am | नितिन थत्ते
वाचून दु:ख झाले. ३३ व्या वर्षी व्ही आर एस म्हणजे काहीतरीच.
व्ही आर एस यातला आर प्रथम विसरून जा.
कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणजे तुम्ही काय काम करीत होतात हे नीटसे कळले नाही. पण दुसरी नोकरी मिळणारच नाही असे नाही. प्रयत्न करीत रहा. खरेतर कंपनी बंद होण्याचे वारे वाहू लागताच हे करायला हवे होते. कारण हातात नोकरी नसताना नोकरी शोधणे हा जरा केविलवाणा प्रकार असतो.
पौरोहित्य करा असा सल्ला मी तरी देणार नाही पण तोही एक बर्यापैकी पैसा देणारा व्यवसाय आहे.
डेटा एण्ट्रीची कामे मिळू शकतात.
को ऑपरेटिव्ह सोसायट्यांचे हिशेब ठेवण्याची कामे मिळू शकतात. एकाचवेळी दहा बारा सोसायट्यांची कामे केली तर बराच पैका मिळू शकतो. :)
फार फार महत्त्वाचे म्हणजे आत्ता एकदम मिळालेल्या पैशाने हुरळून जाऊ नका. घर (स्वतःला राहण्यासाठी) घेण्यासाठी मुळीच वापरू नका. तसेच शेअरबाजारात हा पैसा गुंतवण्याचा मोह आवरा. (गरजा भागल्यावरसुद्धा जो पैसा सरप्लस असतो तोच शेअरबाजारात गुंतवायचा असतो).
थंड डोक्याने हिशोब करा. म्हणजे हा मिळालेला पैसा चारपाच वर्षेही पुरणार नाही हे लक्षात येईल. :(
कोणत्याही कंपनीत रिटायर होईपर्यंत काम करण्याचा विचार मनात ठेवू नका. ;)
ठाण्याला (बहुधा शाहू मार्केटमध्ये) मिटकॉन या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेचे कार्यालय आहे. तेथे स्वयंरोजगारविषयक अनेक छोटे कोर्सेस माफक फी मध्ये चालतात. त्यातला एखादा कोर्स करून उद्योगधंदाही करता येऊ शकेल. :)
(सडेतोड)नितिन थत्ते
7 Jun 2010 - 1:54 am | योगी९००
एकदम योग्य सल्ला..
फार फार महत्त्वाचे म्हणजे आत्ता एकदम मिळालेल्या पैशाने हुरळून जाऊ नका. घर (स्वतःला राहण्यासाठी) घेण्यासाठी मुळीच वापरू नका. तसेच शेअरबाजारात हा पैसा गुंतवण्याचा मोह आवरा. (गरजा भागल्यावरसुद्धा जो पैसा सरप्लस असतो तोच शेअरबाजारात गुंतवायचा असतो).
++१
खादाडमाऊ
7 Jun 2010 - 9:38 pm | चतुरंग
रोख मिळालेला हा पैसा बघता बघता उडनछू होतो आणि लोकं रस्त्यावर येतात!! :( काळजी घ्या. काम सुरु ठेवा. पैसा येत राहणे महत्त्वाचे आहे.
माझ्या माहितीत आत्तापर्यंत एकच व्यक्ती अशी आहे की जी स्टेट बँकेतून वीआरएस घेऊन आता अतिशय उत्तम आर्थिक स्थितीत स्वतःचे योग्य प्रमाणात बिझी लाईफ चालू ठेवून आहे. स्वकष्टार्जित कमाईवर दोन मोठी घरे आहेत. पैकी एक भाड्याने दिले आहे. पण अशा व्यक्ती फारच कमी. बाकी सगळे काही वर्षातच डोक्याला हात लावून बसतात.
चतुरंग
6 Jun 2010 - 11:14 am | अप्पा जोगळेकर
नितिन थत्ते ++
6 Jun 2010 - 5:03 pm | प्रकाश घाटपांडे
आपली सीआरएस वाटते.
आमची खर्या अर्थाने स्वेच्छानिवृत्ती. २३ वर्षे सेवा करुन बाहेर पडलो. कारण आम्हाला कुणी खात्यातुन जा असे सांगितले नव्हते.
(पेन्शनर)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
6 Jun 2010 - 5:10 pm | इन्द्र्राज पवार
"....तसेच शेअरबाजारात हा पैसा गुंतवण्याचा मोह आवरा. (गरजा भागल्यावरसुद्धा जो पैसा सरप्लस असतो तोच शेअरबाजारात गुंतवायचा असतो)....."
हा खरा लाख मोलाचा सल्ला आहे. इथे कोल्हापुरातील आमच्या अगदी घरगुती परिचयातील व्यक्तीने असेच एकाच्या "गुलाबी स्वप्ना" ला भुलून रिटायरमेंटमुळे आलेला पैसा (शेअरबाजारात जरी नसला तरी...तत्सम ठिकाणी) गुंतविला आणि आता त्याला दोन्ही हातानी शंख करायची वेळ आली आहे...करत आहेच.
फार मोठी विचित्र आणि तितकीच दयनीय सत्यकथा आहे ही. पुस्तकात आपण वाचतो ना की, कालच्या वाघाचा आज झिंगलेले कोंबडे झाले आहे, नेमके तसेच.
(या निमित्ताने या प्रकरणाबद्दल सविस्तर स्वतंत्र धागा लिहावा, असे वाटू लागले आहे...)
तेव्हा थोडक्यात श्री. बज्जु जी.... रिलॅक्स फॉर समटाईम अॅन्ड देन चॉकआऊट अ फिजीबल प्लॅन वुईथ युवर हार्ड अर्नींग मनी.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
7 Jun 2010 - 5:24 pm | कानडाऊ योगेशु
(या निमित्ताने या प्रकरणाबद्दल सविस्तर स्वतंत्र धागा लिहावा, असे वाटू लागले आहे...)
लिहाच इंद्रराजसाहेब.
तुमच्याकडे नेहेमीच बरेच काही ऐकण्यासारखे/वाचण्यासारखे असते.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
6 Jun 2010 - 5:17 pm | वेताळ
ठाण्याला (बहुधा शाहू मार्केटमध्ये) मिटकॉन या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेचे कार्यालय आहे. तेथे स्वयंरोजगारविषयक अनेक छोटे कोर्सेस माफक फी मध्ये चालतात. त्यातला एखादा कोर्स करून उद्योगधंदाही करता येऊ शकेल.
पौरोहित्य करणे हा व्यवसाय नव्हे तर काय आहे?
अहो मालक पौरोहित्य करायला पण शिक्षण घ्यावे लागतेच ना?
आणि हो इंटरनेटप्रेम्या त्याना पुजा शोधायच्या नादात अभ्यासात दुर्लक्ष नको रे बाबा. नाहीतर तर परत एक धागा.
वेताळ
7 Jun 2010 - 1:31 am | इंटरनेटस्नेही
ह्म्म.... तुम्ही म्हणताय ते खरं आहे. पण नुकतेच माझ्या एका मैत्रीणीने सक्त ताकीद दिल्यामुळे आम्ही इंटरनेट आणि अन्य बाबींवरच प्रेम कमी केल आहे!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
6 Jun 2010 - 9:35 pm | अरुंधती
अनुभव संयतपणे मांडलाय!
अचानक घ्याव्या लागलेल्या व्ही आर एस मुळे तुम्हाला आता खूप वेगवेगळ्या करीयर संधी आहेत. अगदी आवडत्या विषयात करीयर करण्यापासून ते, आहे त्या ज्ञानाचा वापर करून व त्यात अजून अपग्रेडेशन करून. तेहतीस हे काही फार वय नाही. आणि सध्या तातडीची आर्थिक विवंचना नसल्यामुळे तुम्हाला काही शिक्षण घ्यावयाचे असल्यास त्यालाही स्कोप आहे. पौरोहित्याच्या जोडीने करता येण्यासारख्याही अनेक व्यवसायाच्या सुसंधी आहेत. नव्या उत्पन्नस्रोताचा पाठपुरावा सोडू नका.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
7 Jun 2010 - 1:31 am | इंटरनेटस्नेही
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
6 Jun 2010 - 10:15 pm | पुष्करिणी
आत्ता कठीण वाटणारी परिस्थिती आपल्या भविष्यासाठी सुवर्णसंधी ठरो!
पुष्करिणी
7 Jun 2010 - 5:28 pm | कानडाऊ योगेशु
आत्ता कठीण वाटणारी परिस्थिती आपल्या भविष्यासाठी सुवर्णसंधी ठरो!
अगदी हेच म्हणतो.
ही आपत्ती तुमच्यासाठी इष्टापत्ती ठरो.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
9 Jun 2010 - 12:03 am | बज्जु
सर्व प्रतिसाद आणि सल्ल्यांबद्द्ल मनापासुन धन्यवाद !!