महात्म्याची अखेर

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in काथ्याकूट
2 Jun 2010 - 12:23 am
गाभा: 

महात्म्याची अखेर हे जगन फडणीस यांचे अभ्यासपूर्ण पुसक. हे पुस्तक केवळ गांधीहत्या ह्या विषयाला वाहिलेले व ससंदर्भ दाखले असलेले पुस्तक आहे. 'घरगुती सावरकर' मधे ५५ कोटी साठी गांधीजींनी उपोषण केले का यावर अतिशय रोचक व अभ्यासपूर्ण चर्चा चालली आहे. यावर हे पुस्तक काय म्हणते हे दाखवण्यासाठी व त्यायोगे नव्या धाग्यात खंडन-मंडन करता यावे म्हणून हा काथ्याकूट चालु करत आहे. यातील पुढील परिच्छेद लेखकाच्या पूर्वपरवानगीविना मुळ पुस्तकातून जसेच्या तसे टंकत आहे (मिपाच्या धोरणात बसत नसल्यास, मला एकव्यनी पाठवून - म्हणजे ब्याकअप घेता येईल- धागा अप्रकाशित केला तरी हरकत नाहि):
पुस्तकातील लेखन निळ्या रंगात देत आहे
आधी गांधीजी फाळणीच्या विरोधात होते याचे ४ पुरावे लेखक पुस्तकात देतो. आणि नंतर शेवटाचा पुरावा देतो तो मला लास्त रोचक वाटल्याने तो इथे देत आहे:
फाळणीच्या योजनेला मान्यता देण्यासाठी काँग्रेस कार्यकारीणीची बैठक बोलावली होती. या बैठकीला जयप्रकाश नारायण, डॉ. लोहिया यांना खास निमंत्रित केले होते. डॉ. लिहियांनी ह्या भेटीचा तपशीलवार वृत्तांत गिल्टी मेन ऑफ पार्टीशन या पुस्तकात दिला आहे तो असा "गांधी, सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान, जयप्रकाश नारायण व मी अश्या चौघांनीच फाळणीला विरोध केला. इतर कोणीही फाळणीच्या योजनेविरूद्ध चकार शब्द काढला नाहि." असे नमुद करून लोहिया पुस्तकात पुढे म्हणतात "या बैठकीतील चर्चेत गांधींनी हस्तक्षेप केला तो महत्त्वाचा आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा विषेश विचार केला पाहिजे. फाळणीला मान्यता देण्यापूर्वी नेहरू व पटेल यांनी आपणास त्याची कल्पना दिली नव्हती असे गांधीजी काहिश्या तक्रारवजा भाषेत म्हणाले. गांधीजींना आपले म्हणणे पुरे करू न देताच नेहरू जरा आवेशाने म्हणाले की आपण वेळोवेळी गआंधीजींना सर्व कल्पना दिली आहे. मात्र जेव्हा गांधीजींनी पुन्हा सांगितले की आपणला माहिती नव्हती तेव्हा नेहरूंनी शब्द बदलून "गांधीजी त्यावेळी मोआखलीत होते त्यामुळे त्यांना तपशिल देण्यात आलेला नाहि""

हाच लोहियांच्या पुस्तकातील तपशील तेंडूलकरांच्या महात्मा: खंड७ मधे आहे.

याच्या शेवटी फडणीस टिप्पणी करतात की "भारताला प्रथम स्वातंत्र्य दिले तर ते फाळणीचा विचारच करणार नाहित अशी भीती जीनांना होती म्हणून त्यांना स्वातंत्र्यावेळीच दोन वेगळे देश हवे होते. तर भारताचे तुकडे टाळून स्वातंत्र्य मिळाल्यास आपण वेगळ्या राज्यासाठी जीनांची समजूत काढू शकू असा गांधींना विश्वास होता त्यामुळे त्यांनी इंग्रजांनी आधी देश सोडावा फाळणीचे आम्ही काय ते पाहून घेऊ अशी भुमिका घेतली होती. नेहरु पटेल मात्र, या वादात स्वातंत्र्य लांबणीवर पडेल या भीतीने गांधींना कल्पना न देताच फाळणीला मान्यता देण्याचे कबूल केले. त्यामूळे नाईलाजाने काँग्रेसचा शब्द पडू नये म्हणून गांधींनाही झुकावे लागले.

याव्यतीरिक्त हेच मत (गांधी फाळणीस जबाबदार नव्हते तर नेहरू-पटेल यांनी हंगामी सरकारच्या अनुभवांमुळे कंटाळून घाईत फाळणी मान्य केली) डॉ. लोहिया, डॉ. जयप्रकाश नारायण, डॉ. राजेंद्रप्रकाश व मौलाना अब्दूल कलाम आझाद यांच्या लेखांमधे मांडलेले आहे ते फडणीस दाखवतात.

आता ५५ कोटींकडे व़ळू या बाबतीत दिलेला तर्क श्री. थत्ते यांनी मांडला आहेच. तेव्हा द्वीरूक्ती करत नाहि..
१३ जानेवारी : उपोषण सुरू.
१५ जानेवारी : ५५ कोटी देण्याचा प्रस्ताव संमत
१८ जानेवारी : उपोषणाची समाप्ती.
मग मधला वेळ का? याला फडणीस उत्तर देतात कारण उपोषण ५५ कोटींसाठी नसून दिल्लीतील शांततेसाठी होते. याबद्दलचा पुस्तकात काहि पुरावे दिले आहेत त्यातील लेखकाच्या मते सर्वात महत्त्वाच्या पुराव्याचा हा वेचा:

शांततेसाठीच उपोषण होते यासाठी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली १३० जणांची शांतता समिती नेमण्यात आली होती. १७ जानेवारी रोजी दिल्लीत त्यांची जाहिर सभा झाली. त्यात पुढील ७ अटी मान्य करण्यात आल्या
१. हिंदू मुस्लिम, शीख व इतर धर्मिय दिल्लीत भावाभावाप्रमाणे आणि सौहार्दाने राहण्याची हमी देत आहोत. दिल्लीतील मुसलमानांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित राहील अशी प्रतिज्ञा करीत आहोत.
२. गेल्या वर्षी प्रमाणे ख्वाजा कुतुबुद्दीन मझचा उरूस होईल.
३. सब्जीमंडी, करोलबाग पहाडगंज व अन्य भागांत मुसलमानांना नेहमीप्रमाणे व्यवहार पार पाडता येतील
४. हिन्दुंनी व्यापलेल्या मशिदी मुसलमानांना परत केल्या जातील आणि दिल्लीत मुसलमानांना म्हणून ठेवलेला जो भाग मोकळा आहे त्याचा हिन्दु कब्जा करणार नाहीत.
५. जे दिल्लीतुन बाहेर गेलेले मुसलमान परत येऊ इच्छितात त्यांना हरकत असणार नाहि व त्यांना पूर्वीचे रोजगार करण्यास प्रतिबंध केला जाणार नाहि
६. हे सारे प्रयत्न वैयक्तीक रित्या करू. यात शासनाची अथवा लष्करची मदत घेतली जाणार नाहि.
७. महात्म्यानी आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा व आपले उपोषण संपवावे आणि आम्हास नेतृत्त्व व मार्गदर्शन करावे.

या अटी जाहिर सभेत १७ जानेवारीला मंजुर झाल्यानंतरच १८ जानेवारीला त्यांनी उपोषण सोडले. व या अटींमधे ५५ कोटींचा उल्लेखही नाहि. पाकीस्तानला ५५ कोटी द्यावेत हे गांधीजींचे मत जरूर होते. व ते त्यांनी उपोषणा आधी तसेच उपोषणादरम्यानही सांगितले आहे. मात्र हे उपोषण त्यासाठी नव्हते. उपोषणा दरम्यानही ते अनेकविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत मांडत मात्र याचा अर्थ ते उपोषण त्या मतांसाठी होते असा अर्थ होत नाहि.

आता चर्चेसाठी श्री इंद्रराज व श्री नितीन यांच्याबरोबरच इतर मान्यवरांना पाचारण करत आहे. :)

प्रतिक्रिया

अडाणि's picture

2 Jun 2010 - 7:11 am | अडाणि

अतिशय योग्य पुरावा ... नितीन ह्यांनी मागे दिलेल्या माहितीवरून सुद्धा हेच दिसून येत होते की गांधीजींच्या संपुर्ण धोरणात धार्मिक तेढ वाढू नये असाच प्रयत्न होता, दुर्दैवाने त्याचा उपयोग झाला नाही ....

ऋषिकेश , तुमचे गीतापठण वाया जाणार नाही अशी आशा करतो :)

-
अफाट जगातील एक अडाणि.

उपोषण संपवतानाचे टायमिंग "जरा" चुकलेले वाटते. आता ते जाणून बुजून चुकवले का अजून काही ते नंतर बघू. पण उपोषण सुरु करण्याचे टायमिंग कसे होते? ५५ कोटी रोखून धरू असे भारत सरकारने म्हणताच लगेच उपोषण सुरु केले का? तसे असेल तर तेही विचारात घेतले पाहिजे.

अर्थात मुस्लिमांनी आपल्याकरता वेगळा देश बनवला, तिथल्या बहुसंख्य हिंदूंच्या कत्तली केल्या, जागा बळकावल्या, स्त्रियांवर बलात्कार केले आणि असंख्य लोकांना देशोधडीला लावले. आता असल्या धर्मांध लोकांना वठणीवर आणायला वाकड्यात शिरणे आवश्यक होते हे गांधीविरोधी लोकांचे मत अगदीच हास्यास्पद म्हणता येणार नाही.
उलट विस्थापित हिंदूंच्या हालाबद्दल काही चकार न शब्द काढता केवळ मुस्लिमांच्या हिताच्या गोष्टी करणे याने हिंदुत्ववाद्यांना राग आला तर ते चूक आहे का? काट्याने काटा काढायचा हे अत्यंत व्यवहारी तत्त्व आहे. आपल्या साधनशुचितेच्या कल्पना अनेक हिंदूंचा घात करत आहेत हे लक्षात न घेता लादायच्या आणि हे सगळ्यांनी गोड मानून घ्यायचे हे पटण्यासारखे नाही.

नितिन थत्ते's picture

2 Jun 2010 - 8:32 am | नितिन थत्ते

>>तिथल्या बहुसंख्य हिंदूंच्या कत्तली केल्या, जागा बळकावल्या, स्त्रियांवर बलात्कार केले आणि असंख्य लोकांना देशोधडीला लावले.

असे खरेच घडले यात काही संशय नाही.
अशाच प्रकारच्या कथा तिकडच्या पु भा भाव्यांनीपण लिहिल्या असाव्यात.

>>आता असल्या धर्मांध लोकांना वठणीवर आणायला वाकड्यात शिरणे आवश्यक होते हे गांधीविरोधी लोकांचे मत अगदीच हास्यास्पद म्हणता येणार नाही.

ज्या लोकांनी वरच्या गोष्टी केल्या ते लोक दिल्लीत वेगळ्याच कुठल्यातरी मुसलमानांच्या कत्तली केल्याने कसे वठणीवर येणार होते?

असो. उपोषण सुरू करण्याचे टायमिंग फारच चुकले आहे. पैसे न देण्याचा निर्णय १ जानेवारीचा उपोषण १३ जानेवारीला.
अर्थात याचे ही जस्टिफिकेशन/एक्सप्लनेशन बिकांनी दिलेच आहे.

नितिन थत्ते

अप्पा जोगळेकर's picture

2 Jun 2010 - 10:00 am | अप्पा जोगळेकर

ज्या लोकांनी वरच्या गोष्टी केल्या ते लोक दिल्लीत वेगळ्याच कुठल्यातरी मुसलमानांच्या कत्तली केल्याने कसे वठणीवर येणार होते?
वेगळ्याच कुठल्यातरी असे म्हणण्याला काय अर्थ आहे ? हिंदूंना आपल्या बरोबरीचे अधिकार मिळावेत असं मुसलमानांना कधीच वाटलेलं नाही. आजही वाटत नाही. पाकिस्तानातला माणूस जे कुराण वाचतो तेच कुराण भारतातलाही मुस्लिम वाचतो. सगळे मुसलमान 'मुस्लिम धर्मीय' हे एक कुटुंब आहे असे मानतात. त्यामुळेच की काय इकडच्या मुसलमानांना अन्यधर्मीय भारतीयांपेक्षा पाकिस्तान किंवा तालिबान मधला मुस्लिम जवळचा वाटतो. हजारो वर्षे भारतात राहूनसुद्धा ते भारताला मातृभूमी मानत नाहीत. विजित भूमी मानतात.(दारुल हर्ब). झुरळ पाकिस्तानात असले काय किंवा भारतात असले काय त्याला हुरळाप्रमाणेच मारायला नको का ?

चिंतातुर जंतू's picture

2 Jun 2010 - 10:21 am | चिंतातुर जंतू

सगळे मुसलमान 'मुस्लिम धर्मीय' हे एक कुटुंब आहे असे मानतात.

'सगळे मुसलमान', 'सगळे हिंदू', 'सर्व पुरुष', 'सर्व स्त्रिया', वगैरे शब्द दिसले की पुढील विधानाच्या सत्यतेविषयी शंकाच उत्पन्न होते. पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या अहमदिया मशिदींवरच्या हल्ल्याच्या निमित्ताने आजच्याच 'हिंदू'मध्ये पाकिस्तानात अहमदिया पंथाच्या लोकांचा कसा छळ होतो आहे, त्या विषयी माहिती आहे. मी सश्रध्द अहमदिया असतो, मला किंचितशी अक्कल असती, तर मला तालिबान्यांविषयी प्रेम वाटले नसते. अर्थात, हा निव्वळ तर्क आहे, आणि हृदयांच्या एकाधिकारशाहीपुढे तर्काचे काही चालत नाही, हे खरेच.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

II विकास II's picture

2 Jun 2010 - 12:07 pm | II विकास II

>>'सगळे मुसलमान', 'सगळे हिंदू', 'सर्व पुरुष', 'सर्व स्त्रिया', वगैरे शब्द दिसले की पुढील विधानाच्या सत्यतेविषयी शंकाच उत्पन्न होते.
+१

असल्या विधानांना काही किंमत देउ नये.

अप्पा जोगळेकर's picture

2 Jun 2010 - 2:33 pm | अप्पा जोगळेकर

'सगळे मुसलमान', 'सगळे हिंदू', 'सर्व पुरुष', 'सर्व स्त्रिया', वगैरे शब्द दिसले की पुढील विधानाच्या सत्यतेविषयी शंकाच उत्पन्न होते.

१) का नाठाळ आहेत हो त्या वर्गातलि मुलं. एकजात उनाड. काट्यावर घेतलं पाहिजे सगळ्यांना एकदा.

२) सगळी लहान मुले खॉडकर असतात.

३) ती अमुक तमुक पोरगी पाहिलीस का ? कसला कडक आयटम आहे. असणारच ना बे. माल कुठला आहे शेवटी. टिळक नगरचा.

अशी शेकडो विधाने आपण व्यवहारात करतोच की. आता त्या वर्गात एक तरी नाठाळ नसणारा मुलगा असेलच. काही लहान मुलं तरी शांत असतीलच. आणि टिळक नगरच्या सगळ्याच पोरी काही सुंदर असतीलच याची काही हमी नाही. सगळे मुसलमान हे शब्द त्या अर्थी वापरले आहेत.

Dipankar's picture

2 Jun 2010 - 2:51 pm | Dipankar

अप्पा++

मदनबाण's picture

2 Jun 2010 - 12:05 pm | मदनबाण

जरा अवांतर :---

तिथल्या बहुसंख्य हिंदूंच्या कत्तली केल्या, जागा बळकावल्या, स्त्रियांवर बलात्कार केले आणि असंख्य लोकांना देशोधडीला लावले.
ह्म्म...मध्यंतरी या विषयावर यूट्युबवर हा व्हिडीयो माझ्या पाहण्यात आला होता...

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

II विकास II's picture

2 Jun 2010 - 8:23 am | II विकास II

ऋषिकेशचे आभार ही माहीती दिल्याबद्दल.

>> पाकीस्तानला ५५ कोटी द्यावेत हे गांधीजींचे मत जरूर होते.
पाकीस्तानला ते पैसे देणे योग्यच होते. पण त्यावेळी पाकीस्तानने हल्ला (काश्मीरी टोळीवाल्यांच्या स्वरुपात) केलेला असताना देणे अयोग्य होते.

गांधीजीचे उपोषण त्यासाठी नसावे.

The matter regarding release of Rs. 55 crores to Pakistan towards the second installment of arrears to be paid to it under the terms of division of assets and liabilities requires to be understood in the context of the events that took piece in the aftermath of partition. Of the 75 crore to be paid the first installment of Rs. 20crore was already released. Invasion of Kashmir by self-styled liberators with the covert support of the Pakistani Army took place before the second installment was paid. Government of India decided to withhold it Lord Mountbatten was of the opinion that it amounted to a violation of the mutually agreed conditions and he brought it to the notice of Gandhiji. To Gandhiji's ethical sense the policy of tit for tat was repugnant and he readily agreed with the Viceroy's point of view. However, linking his stand in this matter with his fast he undertook, as you will find in the following lines, is an intentional mix-up and distortion of facts of contemporary history. The fast was undertaken with a view to restoring communal amity in Delhi.

http://www.mkgandhi-sarvodaya.org/fact.htm

अशीच उपयुक्त माहीती: जवाहरलाल नेहरुंची भाषणे: पान ७१
http://books.google.co.in/books?id=qlbb11cLGVwC&pg=PA71&lpg=PA71&dq=spee...

त्याच पानावर खाली एक निवेदन सापडु शकेल.

थोडक्यात: गांधीजीचे उपोषण जरी ५५ कोटी द्यावेत ह्या साठी नसले तरी त्यांची इच्छा ते ५५ कोटी पाकीस्तानला ताबडतोब द्यावेत अशी होती. सरकारचे म्हणणे होते की ते पैसे पाकीस्तान काश्मीरमधील युध्दासाठी वापरेल. पण गांधीचे उपोषण संपवण्यासाठी चांगले वातावरण तयार करण्यासाठी सरकारने ते पैसे दिले.

आता प्रत्येकाने आपापले ठरवायचे गांधीजीचा ५५ कोटी देण्यात सहभाग किती?

अजुन एक नोंदः सयुंक्त राष्ट्रातर्फे युध्दबंदी २० जानेवारी १९४८ ला झाली. गांधीजीचे उपोषण १८ जानेवारीला संपले.

अप्पा जोगळेकर's picture

2 Jun 2010 - 9:49 am | अप्पा जोगळेकर

जरासे अवांतर -
नरहर कुरुंदकर यांचे असे म्हणणे होते की हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींचा खून केल्यामुळे या देशामध्ये भडकत चाललेल्या मुस्लिमविरोधी भावना अचानक शांत झाल्या. जर महात्माजींचा खून झाला नसता तर महात्माजी लोकांच्या मनातून उतरले असते. ते मुस्लिमधार्जिणे होत चालले आहेत असा समज पसरायला ऑलरेडीच सुरुवात झाली होती. त्यांचे लोकमानसातील स्थान एवढे मोठे होते आणि त्यांच्या हौतात्म्याचा कडकडाट एवढा प्रचंड होता की त्यांच्या खूनामुळे सारा देश हतबुद्ध झाला आणि जागोजाग सुरू असलेल्या दंगली क्षणार्धात बंद पडल्या. ते पुढे म्हणतात की गांधीजींची हत्या झाली याचे कारण हे होते की मुस्लिमांची कत्तल होऊ नये यासाठी गांधीजी वारंवार उपोषण करतील आणि त्यामुळे फाळणीच्या वेळी हिंदूंच्या ज्या कत्तली झाल्या त्यांचा सूड घेता येणार नाही या एकाच कारणासाठी गांधीजींचा खून झाला. त्यांच्या मते हिंदुत्ववाद्यांचा हा तर्कच चुकीचा होता कारण एकटे गांधीजी दंगली शमविण्यासाठी कुठेकुठे जाणार होते? गांधीजींची हत्या करुन त्यांनी स्वतःच्याच उद्दिष्टाची हानी करुन घेतली. हे म्हणणे कुठवर खरे आहे हे ठरवण्यासाठी अनेक पुस्तकांची छाननी करावी लागेल. पण कुरुंदकर लिहितात ते निदान तर्काच्या कसोटीस उतरणारे आहेच आहे हे निश्चित.

इन्द्र्राज पवार's picture

2 Jun 2010 - 10:22 am | इन्द्र्राज पवार

ऋषिकेश जी....उत्तर देत आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jun 2010 - 12:35 pm | परिकथेतील राजकुमार

पाकीस्तानला ५५ कोटी द्यावेत हे गांधीजींचे मत जरूर होते. व ते त्यांनी उपोषणा आधी तसेच उपोषणादरम्यानही सांगितले आहे. मात्र हे उपोषण त्यासाठी नव्हते. उपोषणा दरम्यानही ते अनेकविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत मांडत मात्र याचा अर्थ ते उपोषण त्या मतांसाठी होते असा अर्थ होत नाहि.

"गांधी हत्या आणि मी " मध्ये गोपाळ गोडसे म्हणतात :-

पुढे, म्हणजे गांधीहीचा उपवास चालु असताना, भारतशासनाने एक पत्रक काढले. "गांधीजींनी देशाला जे निवेदन केले आहे त्याला अनुसरून, (हिंदुस्तान आणि पाकिस्तान या) दोन राष्ट्रातील संदेहाचे आणि संघर्षाचे एक कारण दूर करण्याचे हिंदुस्तान शासनाने ठरवले आहे. राष्ट्रीय सन्मान आणि राष्ट्रीय हित यांशी असे करणे सुसंगत आहे आणि ते शासनाच्या कक्षेत आहे,

"या उस्फुर्त भावनेच्या बुडाशी शासनाची अशी तळमळ आहे की, यातील सदभावना ओळखली जावी आणि परस्परप्रेमसंबंधाचे वातावरण निर्माण व्हावे . या स्नेहबंधासाठी गांधीजी आज यज्ञवेदीवर देह झिजवत आहेत, या सदभावनेने त्यांचा उपवास थांबावा आणि त्यांना हिंदुस्थानच्या त्यांच्या सेवेत आणखी भर घालण्याची संधी मिळावी.
'उरलेल्या पैशांच्या भागाचे कार्यवाहन त्वरित करण्याचे हिंदुस्थान शासनाने ठरविले आहे...'

'हा निर्णय म्हणजे, या देशाच्या दैदिप्यमान परंपरेला अनुसरून शांती आणि सदिच्छा टिकविण्याकरीता गांधीजींच्या अहिंसक आणि उदात्त प्रयत्नाला हिंदुस्थान शासनाची मनःपूर्वक देणगी आहे. (Indian Information dated : 2-2-1948)

पंतप्रधानांनी काढलेल्या पत्रकातही, ' हिंदुस्थान शासनाचा हा निर्णय लक्षपूर्वक विचारा नंतर आणि गांधीजींशी केलेल्या विचारविनिमयानंतर घेतला गेला आहे' असे म्हटले आहे. (Indian Information dated : 2-2-1948)

------------
माझे (परा) मत :-

यावरुन हे स्पष्ट होते की ह्या पाकिस्तान धार्जिण्या सोकॉल्ड महात्म्याचे उपोषण ५५ कोटींसाठी सुद्धा होतेच होते.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

ऋषिकेश's picture

2 Jun 2010 - 1:43 pm | ऋषिकेश

वा! एका वेगळया संदर्भाबद्दल आभार..
आता वाक्ये लक्षपूर्वक पाहु

या स्नेहबंधासाठी गांधीजी आज यज्ञवेदीवर देह झिजवत आहेत,

इथे गांधीचे प्रयत्न स्नेहबंधासाठी असल्याचे म्हटले आहे. नाहितर या पत्रकात पाकिस्तानला त्याचा वाटा मिळावा यासाठी गांधीजी आज यज्ञवेदीवर देह झिजवत असे नसते का म्हटले?!

'हा निर्णय म्हणजे, या देशाच्या दैदिप्यमान परंपरेला अनुसरून शांती आणि सदिच्छा टिकविण्याकरीता गांधीजींच्या अहिंसक आणि उदात्त प्रयत्नाला हिंदुस्थान शासनाची मनःपूर्वक देणगी आहे.

इथे गांधीजी जो प्रयत्न करत आहेत त्याला पूरक व स्नेहबंध वाढवण्यासाठी म्हणून शासनाने उचलेले ते पाऊल आहे. गांधींचा आग्रह केवळ दंगल थांबावी इतकाच होता.

हिंदुस्थान शासनाचा हा निर्णय लक्षपूर्वक विचारा नंतर आणि गांधीजींशी केलेल्या विचारविनिमयानंतर घेतला गेला आहे' असे म्हटले आहे.

बरोबर आहे. वर म्हटल्याप्रमाणे "पाकीस्तानला ५५ कोटी द्यावेत हे गांधीजींचे मत जरूर होते. व ते त्यांनी उपोषणा आधी तसेच उपोषणादरम्यानही सांगितले आहे."

*अवांतरः (या अवांतराबद्द्ल चर्चा करायची असल्यास खरडीतून / वेगळा धागा उघडून करावी ही प्रार्थना)
पुस्तक पहिल्यांदा हातात पडले व जेव्हा गांधींबद्द्ल केवळ विरूद्धमते कानी येत होती त्याकाळात गोपाळ गोडसे देखील "गांधी हत्या" म्हणत असलेले पाहून आश्चर्य वाटाले होते आणि नंतर आता थोडे फार वाचन झाल्यावर ते योग्य वाटते.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 5:11 am | मिसळभोक्ता

१. ह्या संदर्भात गोपाळ गोडसे ह्यांचे अवतरण किती न्यूट्रल म्हणून घ्यावे ? माझ्यामते शून्य.

२. सरकारी पत्रके गांधीजींच्या निधनानंतर ३ दिवसांनी का आली ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

हे मान्य करा.
त्यामुळे ते ही सर्व करत होते ते बरोबर होते किंवा त्यानी आयुष्यात कोणतीच चुक केली नाही असा गैरसमज सगळीकडे आहे.
तसेच त्याचे विरोधक एकजात मुर्ख होते,त्याची वैचारिक पातळी खुप उथळ होती हे मानणे देखिल योग्य नाही.

वेताळ

ऋषिकेश's picture

2 Jun 2010 - 1:49 pm | ऋषिकेश

महात्मा गांधी हे देव नव्हते......

हे मान्यच आहे. ते एक माणूस होते व त्यांच्याही चुका झाल्या.. काहि तर त्यांनी स्वतःच लिहून ठेवल्या आहेत.
त्यांनी अगदी चोरी करण्यापासून मोठ्या राजकीय चुका केल्या आहेत / असतील पण म्हणून त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट चूक आहे किंवा मूर्खपणाची आहे असा सूर दिसला (जो ह्या तसेच घरगुती सावरकर या चर्चेत सुदैवाने फारसा दिसलेला नाहि. ) की वाईट वाटते इतकेच.

तसेच अशी लवचिकता प्रत्येक महामानवाच्या अनुयायांनी/समर्थकांनी दाखवली पाहिजे अशी तुमची रास्त अपेक्षा आहे असे मी समजतो.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

Dipankar's picture

2 Jun 2010 - 2:13 pm | Dipankar

त्यांनी प्रत्येक गोष्ट चुक केली असती तर त्यांच्या हत्येनंतर देशामध्ये भडकत चाललेल्या मुस्लिमविरोधी भावना अचानक शांत झाल्या नसत्या. त्या भावना शांत झाल्या कारण लोकांमधे असलेला त्यांच्या विषयीचा आदर.

पण हत्या होण्याआधी त्यांचा कल हा मुस्लिमधाजिर्णा बनला होता व हीच चुक आहे हे लोकांना वाटत आहे.

satish kulkarni's picture

2 Jun 2010 - 2:27 pm | satish kulkarni

ज्या गान्धीनी आयुष्यभर अहिन्सेचा पुरस्कार केला.... त्यान्च्याच अनुयायानी त्यान्च्या वधा नन्तर सरसकट ब्राम्हणान्ची घरे जाळली व हत्येचा प्रयत्न केला. हा त्यान्च्या शिकवणुकीचा (अहिन्सेच्या) सर्वात मोठा पराभव नाहि काय?

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jun 2010 - 2:35 pm | परिकथेतील राजकुमार

ज्या गान्धीनी आयुष्यभर अहिन्सेचा पुरस्कार केला.... त्यान्च्याच अनुयायानी त्यान्च्या वधा नन्तर सरसकट ब्राम्हणान्ची घरे जाळली व हत्येचा प्रयत्न केला. हा त्यान्च्या शिकवणुकीचा (अहिन्सेच्या) सर्वात मोठा पराभव नाहि काय?

हॅ हॅ हॅ अहो ते प्रक्षोभक जमावाचे कृत्य आणी गांधीहत्या म्हणजे माथेफिरु हिंदु ब्राम्हणाने केलेली हिंसा.

बाकी आदरणीय नथुराम गोडसेंचे मतपरिवर्तन करण्याचा कुठलाच प्रयत्न कोणत्याही गांधीवाद्याने का केला नाही हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

शिल्पा ब's picture

2 Jun 2010 - 10:31 pm | शिल्पा ब

नथुराम गोडसे एकदम माथेफिरू का? गांधींमुळे अजून देशाचे तुकडे होऊ नयेत म्हणून त्याने हत्या केली असावी...त्यात काय चूक? व्यक्तीपेक्षा देश मोठा..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

3 Jun 2010 - 2:08 am | पंगा

(फाळणी गांधींमुळे झाली की नाही झाली हा वाद तूर्तास बाजूस ठेवू, पण...)

गांधींमुळे अजून देशाचे तुकडे होऊ नयेत म्हणून त्याने हत्या केली असावी...

गांधींमुळे देशाचे अजून किती तुकडे होऊ घातले होते याबद्दल काही माहिती देऊ शकाल काय?

उदाहरणार्थ, गांधींमुळे महाराष्ट्र उर्वरित भारतापासून - खास करून उत्तरप्रदेश-बिहारपासून - वेगळा होऊ घातला होता काय? आणि समजा असता, तर त्यात गोळी घालण्यासारखे नेमके काय होते ते सांगू शकाल काय? उलट तुमचा लाडका भय्या-प्रॉब्लेम निर्माण होण्यापूर्वीच आपोआप सुटला असता, म्हणून त्या परिस्थितीत गांधींचे आभारच मानणे प्राप्त नसते काय?

नथुरामास दूरदृष्टी असती, तर उलट देशाची आणखी एक फाळणी होऊन महाराष्ट्र स्वतंत्र व्हावाच, या आग्रहानिशी त्याने गांधींबरोबर स्वतः उपोषणास बसावयास नको होते काय? पण त्यास ही दूरदृष्टी नव्हती, म्हणून त्याने उलट गांधींचीच हत्या केली, सबब त्यास 'माथेफिरु'च का, 'कृतघ्न'ही म्हणावयास हवा!

असला कसला 'मराठी माणूस'??????

- पंडित गागाभट्ट.

(डिस्क्लेमर: हा प्रतिसाद, 'आस्क अ स्टुपिड क्वेश्चन, गेट अ स्टुपिड आन्सर' या तत्त्वास अनुसरून वाचावा.)

शिल्पा ब's picture

3 Jun 2010 - 2:29 am | शिल्पा ब

thank you for your stupid answer...NOT =)) =)) ...

तुम्हाला मुस्लीम आणि भैय्या लोकांचे भल्तेच प्रेम आहे....तुम्च्यापुर्तेच ठेवा

भुंगा
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

3 Jun 2010 - 2:42 am | पंगा

तुम्हाला मुस्लीम आणि भैय्या लोकांचे भल्तेच प्रेम आहे....

बाय द वे, हिंदुस्थानी ही भारताची राष्ट्रभाषा असावी याचा पुरस्कार गांधीजी करत.

हिंदुस्थानी म्हणजे हिंदी आणि उर्दूचे मिश्रण. आणि ते दोन्ही लिप्यांसहित अंगीकारावे असे त्यांचे मत होते.

हिंदी आणि उर्दूचे मिश्रण! आणि तेही दोन्ही लिप्यांसहित!! मज्जा!!! =D> =))

- पंडित गागाभट्ट.

शिल्पा ब's picture

3 Jun 2010 - 2:49 am | शिल्पा ब

बाय द वे

बाबौ!!! यकदम विंग्रजी का? 8}
अदुगर हिंदी मंग विंग्रजी पुढाल्ली भाषा कुठाल्ली? :?

हिंदुस्थानी ही भारताची राष्ट्रभाषा असावी याचा पुरस्कार गांधीजी करत.

तेबी एक कारण असाव ... ;) =)) =)) =))

चुन्गा
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

3 Jun 2010 - 3:57 am | पंगा

बाय द वे

बाबौ!!! यकदम विंग्रजी का? 8}

हो मग? त्यात 'बाबौ' काय? 'बाय द वे' हा काही एकदम हायफंडू, 'उच्च' इंग्रजी वाक्प्रचार नाही. कोणालाही येतो आजकाल! अगदी मलासुद्धा!

कोकाटेसरांनी नुकताच फाडायला शिकवला वाट्टं... :?

अदुगर हिंदी मंग विंग्रजी पुढाल्ली भाषा कुठाल्ली?

पुढाल्ली भाषा वापरली तर मग हितं कुणालाबी कळत नाय. मग प्रतिसाद काऊ नेतो. (अनुभव! :()

हिंदुस्थानी ही भारताची राष्ट्रभाषा असावी याचा पुरस्कार गांधीजी करत.

तेबी एक कारण असाव ... ;) =)) =)) =))

म्हणजे मराठी माणसाचा भाषिक न्यूनगंड हा गांधीजींच्या हत्येस कारणीभूत ठरला, असे आपले म्हणणे आहे काय?

हल्लीसारखाच माहौल तेव्हाही असला, तर हे सहज शक्य वाटते.

- पंडित गागाभट्ट.

शिल्पा ब's picture

3 Jun 2010 - 8:33 am | शिल्पा ब

म्हणजे मराठी माणसाचा भाषिक न्यूनगंड हा गांधीजींच्या हत्येस कारणीभूत ठरला

सगळ्यांनाच तुमच्यासारखा न्यूनगंड नसतो....म्हणूनच तुम्ही मराठी सोडून इतर भाषांच्या मागे लागलात वाटतं
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

आंबोळी's picture

2 Jun 2010 - 3:28 pm | आंबोळी

"आम्ही ५५ कोटींना गांधीजींचे प्राण विकत घेतले" अश्या अर्थाचे वाक्य पाकिस्तानला पैसे दिल्यावर नेहरूंनी म्हणल्याचे कुठेतरी वाचल्याचे स्मरते... पण संदर्भ देता येत नाहिये....
कुणाला माहिती आहे का?

आंबोळी

इन्द्र्राज पवार's picture

2 Jun 2010 - 7:00 pm | इन्द्र्राज पवार

यापूर्वीच्या धाग्यात सांगितल्याप्रमाणे माझे अद्यापही हेच मत आहे की, व्यक्ती असो वा देशातील सामाजिक, राजकीय उलाढालीचे चित्रण असो, ते संतुलीतरित्या लोकांच्यासमोर मांडणे इतिहासाच्या दृष्टीने फार महत्वाचे असते. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले, भिंत चालविली, तुकाराम सदेह स्वर्गाला गेले, शिवाजी महाराजांना भवानीने प्रकट होऊन "तलवार" दिली या गोष्टी आपण स्वीकारतो तो काही "इतिहास" म्हणून नव्हे तर त्या त्या व्यक्तीविषयी एक भक्ती भाव, आदर म्हणून. इतिहासाला असे "चमत्कार" सर्वस्वी अमान्य आहेत. गांधी असो, नेहरू, पटेल व सावरकर असोत, यांची चरित्रे वाचणे म्हणजे 'अमुक' याने ते लिहिले म्हणून त्यातील बाबी मला मान्य, आणि 'तमुक' याने लिहिले म्हणून तो मला अमान्य, असे म्हणणे म्हणजे आपण सत्यशोधन न करता केवळ आपल्या मनाला ज्या गोष्टी भावल्या त्याच तेवढ्या मी घेणार, मानणार, असे होते... बाकीच्या बाबींविषयी मला काही घेणेदेणे नाही. इतिहासातील प्रत्येक घटनेचे विश्लेषण आणि त्याचे अनुकूल-प्रतिकूल परिणामांचे मूल्यमापन करणे हीच अभ्यासकाची निकड असते. "महात्मा" हे खर्‍या अर्थाने महात्मा होतेच पण तेही तुम्हा आम्हा सारखे हाडामासाचा देह असलेले, भावनाप्रधान व्यक्ती होतेच ना? १५० वर्षाच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ ला सारा देश "स्वातंत्र्य"च्या रंगात रंगला असताना, गांधी त्याबद्दल बोलताना म्हणाले, "या उत्सवात भाग घेणे मला शक्य नाहे. हा दुखद प्रसंग आहे." ~ आता इथे आपल्यातील कुणी गांधींच्या या भावनेला दोष देईल का हा प्रश्न आहे.....बहुतेक आपण सर्वच त्यांच्या त्या विचाराशी सहमत होऊ.

स्वातंत्र्य आले खरे पण रक्ताचे पाट घेऊनच. दिल्लीवर तर प्रेतकळा आली होती. गांधी म्हणतात, "स्वातंत्र्यात निर्वासितांचा प्रश्न निर्माण होणे ही आपल्या राष्ट्राला लाज आणणारी गोष्ट आहे...." २७ सप्टेंबर १९४७ च्या संध्याकाळच्या प्रार्थनेत ते म्हणतात, "हिंदुस्थानात आम्ही एकाही मुसलमानाला राहू देणार नाही, याशिवाय दिल्लीत मला दुसरी भाषाच अलीकडे ऐकू येत नाही.".....

२ ऑक्टोबर.... स्वतंत्र हिंदुस्तानातील "महात्मा गांधी" यांचा पहिला वाढदिवस....आणि ते आता ७८ वर्षाचे. या दिवशीही त्यांनी उपास केला, सूत कातले, आणि सायंकाळी शुभेच्छा द्यायला जमलेल्यांना प्रार्थनेतच सांगितले की, "माझी प्रार्थना आहे की, सध्याचा जातीय संघर्ष संपणार नसेल, तर परमेश्वराने मला आता न्यावे हे बरे. हिंदुस्थान पेटलेला आहे अशा स्थितीत मला आणखी एखादा वाढदिवस पाहण्याची इच्छा नाही. (थोडेसे अवांतर : काय विलक्षण योगायोग....खरेच, स्वतंत्र भारतातील त्यांचा पहिला वाढदिवस हा त्यांचा शेवटचाच वाढदिवस ठरला...!)

विषयांतराचा धोका पत्करून सांगत आहे की, मी जाणीवपूर्वक गांधीजींच्या सुप्रसिद्ध "सांय प्रार्थनेचे" संदर्भ देत आहे कारण हा मौल्यवान ऐवज ~ अगदी गांधीजींच्या आवाजात ~ तसेच लिखित स्वरूपात "गांधी मेमोरिअल सेंटर, साबरमती आश्रम, अहमदाबाद, गुजरात" इथे पाहण्यास मिळतो. इच्छुकांनी जरूर एकदा भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. असो.

इकडे दिल्ली दंगलीने पेटली असता तिकडे जिनांच्या मिलिटरी व घुसखोरांनी काश्मीरमध्ये थैमान मांडले होते आणि सरदार हे "पोलादी पुरुष" म्हणून ओळखले जात होते त्यामुळे त्यांच्यासारख्या व्यक्तीला पाकिस्तानचे हे लाड खपवून घेणे परवडणारे नव्हतेच. त्यांनी दिनांक १२ जानेवारी १९४८ रोजी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत (याचा वृत्तांत त्या वेळेच्या सर्वच इंग्लिश आणि हिंदी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला आहे...) हिंदुस्तानची या बाबतीतील भूमिका अतिशय स्पष्ट शब्दात मांडली आहे. ती थोडक्यात अशी, : "पाकिस्तानची काश्मीरमधील घुसखोरी ही दोन देशांच्या फाळणीमधील कराराचा सरळ सरळ भंग करणारी बाब आहे, त्यामुळे त्यांच्याशी करावयाच्या आर्थिक व्यवहारचे कार्यावहन विलंबिले यात आम्ही न्यायोचित व्यवहार केला आहे. पैसे देण्यासाठी नियत अवधीचे बंधन त्या संधीत आम्हावर नाही. सध्या पाकिस्तानने आपल्या सैन्यानिशी आमच्याशी सशस्त्र संघर्ष चालविला आहे त्याची व्याप्ती पाहता त्या आर्थिक बाबीचा पायाच उध्वस्त होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत उरलेले पैसे द्यावेत असा वाद आमच्याशी पाकिस्तानला कोणत्याही न्यायाने घालता येणार नाही...." ~~ (याचा पूर्ण स्वरूपातील इंग्रजी तर्जुमा जेएनयू दिल्ली येथील गव्हर्न्मेंट गॅझेटमध्ये उपलब्ध आहे.). पटेल यांना तर आपण "जहाल" नेते म्हणून ओळखते, पण नेहरू मंत्रीमंडळातील मवाळ समजले जाणारे अर्थमंत्री श्री. षण्मुख चेट्टी, तसेच गांधीचे कट्टर अनुयायी कन्हैय्यालाल मुन्शी यांचेदेखील या आर्थिक व्यवहाराबद्दल मत काही वेगळे नव्हते.

इकडे दिल्लीतील दोन्ही गटातील दंगलीचा मर्क्युरी वाढत असताना दोन्ही समाजातील तेढ नाहीशी व्हावी म्हणून गांधी जमेल ते प्रयत्न करीतच होते.... आता तशात १२ जानेवारीचा पत्रकार परिषदेतील पटेलांचा ५५ कोटी बाबतचा ठाम निर्धार गांधीजींच्या कानावर गेला. साहजिकच त्यांना वेदना झाल्या आणि आपण पाकिस्तानची अशी कोंडी करताना अहिंसा या तत्वापासून घसरत आहोत अशी त्यांची धारणा झाली.

आणि आता दिनांक १३ जानेवारी १९४८ च्या सांयप्रार्थनेतील गांधीजींची ही घोषणा... (जी हिंदी मध्ये मी मुद्दाम देत आहे, कारण याची टेप साबरमती आश्रमात उपलब्ध आहे....तसेच महात्मा गांधी यांचे समग्र जीवन चरित्र ज्यांनी प्रकाशित केले आहे त्या अहमदाबादच्या "नवजीवन प्रकाशन मंदिर" यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातदेखील आहे....)

"...मगर ऐसा मौका भी आता ही जब अहिंसा का पुजारी समाज के किसी अन्याय के सामने विरोध प्रकट करणे के लिय उपवास करनेपर मजबूर हो जाता है ! वह ऐसा तभी कर पाता है जब अहिंसा के पुजारी की हैसियात से उसके सामने दुसरा कोई रास्ता खुला नही रह जाता ! ऐसा मौका मेरे लिये आ गया है...!" प्रकट केलेल्या विचाराप्रमाणे गांधीजींनी उपोषणाला आरंभ केला. १२ ला ५५ कोटी अडविले जातात आणि त्या पाठोपाठ गांधीजी उपोषण सुरु करतात....दोनच दिवसात (१५ जानेवारीला) नेहरू पाकिस्तानला ५५ कोटी दिल्याची घोषणा करतात... आणि मग उरलेल्या मुद्द्यासाठी विविध संघटनांच्या नेत्यांच्या सह्या गोळा करण्याची मोहीम... व नंतर गांधींचा उपोषण सोडण्याचा निर्णय.....

या सर्व गोष्टी आता या संस्थळावरील जवळपास सर्वांनाच चांगल्याच माहित झाल्या आहेत.... त्यामुळे दूर करूया ती सर्व पुस्तके (मग ती गांधींच्या बाजूने लिहिलेली असो वा सावरकर यांच्या बाजूने..... य. दि. फडके, जगन फडणीस, शेषराव मोरे, धनंजय कीर आदी ठळक नावे तर आपल्या राज्यातील झाली.... मी आणि तुमच्यापैकी कित्येकांनी दुर्गा दास, शंकर घोष, महादेव देसाई, प्यारेलाल नायर, ही भारतीय लेखक मंडळी तसेच अनेक युरोपियन लेखक यांची पुस्तके वाचलेली आहेत...हजारो पुस्तकांचा सागर आहे "गांधी" या विषयावर... मग कुठली प्रमाण मानणार आहोत आपण?) आणि आपल्यातील "मॅच्युअर" आहेत...कुणीही शाळेला जाणारे विद्यार्थी नाही, की ज्याला पुस्तकातील ओळ अन ओळ समजावून सांगणे गरजेचे आहे. फक्त आपली सारासार विचार करण्याची बुद्धी लक्षात घेऊन फक्त इतकेच पहा (ज्याला गणिती भाषेत "डीडक्शन" काढणे असे म्हणतात....) की १२ जानेवारीला सरदार पटेल ५५ कोटी पाकिस्तानला देणार नाही म्हणतात आणि १३ जानेवारीला गांधी उपोषणाला बसतात आणि दोनच दिवसांनी नेहरू ते ५५ कोटी पाकिस्तानला तत्काळ देऊन टाकतात..... काहीतरी संगती आहे कि नाही या घटना क्रमात?....आता १८ ला गांधीनी उपोषण सोडले हा मुद्दा इथे किती महत्वाचा आहे? १६ व १७ ला दिल्लीतील दंगली थंडावल्या होत्या का? की, गांधीनी १८ ला उपोषण समाप्त केल्यानंतर दिल्लीतील "राम आणि रहीम" लागलीच कुठे चांदनी चौकात नूरजहानचा चित्रपट बघायला जोडीने गेले? केवळ त्या हमीपत्रावर ५५ कोटीचा उल्लेख नाही म्हणून उपोषणाचा आणि देणे रकमेचा काही संबंध नव्हता ही समजूत स्वत:शीच फसवणूक केल्यासारखे आहे. "हमीपत्र" म्हणजे "दंगली होणार नाहीत, मुसलमानांच्या मालमत्तेचा हिंदू ताबा घेणार नाही......गुण्यागोविंदाने राहू..." अशा बिनकण्याचा बाबींनी भरलेला मजकूर ज्याला दिल्लीतील गटाराच्या कडेला बसलेल्या पोराने देखील किंमत दिली नसेल... कारण देणे रक्कम त्या अगोदरच देऊन आम्ही पाकिस्तानपुढे झुकतोय हे तर नेहरूंनी दाखवूनच दिले होते....

......तीच परंपरा आजही चालू आहेच ना?

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

चतुरंग's picture

2 Jun 2010 - 7:54 pm | चतुरंग

वैयक्तिक 'मूल्यांची' जपणूक करण्याकरता आणि दूरगामी विचार न करता तात्कालिक प्रश्नांमधून सोडवणूक करण्याकरता राष्ट्राची अस्मिता ज्यावेळी पणाला लावली जाते त्यावेळी राष्ट्र म्हणून आपला पराभव झालेला असतो!

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jun 2010 - 8:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

संपूर्ण अवांतर आहेच पण 'नाझी भस्मासुराचा उदयास्त'मधे वि.ग.कानिटकरांनी हेच विधान इंग्लंडचे तत्कालिन पंतप्रधान नेव्हील चेंबर्लेन यांच्याबद्दल केलं आहे. रक्ताचा थेंबही न सांडता हिटलरने ऑस्ट्रीया आणि (तत्कालिन) झेकोस्लोवाकिया घशात घेतला याचा त्या विधानाला संदर्भ आहे.

अदिती

रामपुरी's picture

2 Jun 2010 - 8:55 pm | रामपुरी

स्वतंत्र भारतातील त्यांचा पहिला वाढदिवस हा त्यांचा शेवटचाच वाढदिवस ठरला
Better an end with horror than horror without end...
रोज रोजची ती मुसलमानधार्जीणी उपोषणे तरी बंद झाली.

समंजस's picture

2 Jun 2010 - 7:51 pm | समंजस

तुमच्या म्हणण्यात बरचसं तथ्य आहे इन्द्रराजसाहेब.

तुमच्या आतापर्यंतच्या प्रतिसादातून देण्यात आलेल्या संदर्भांवरून तसेच इतर ठिकाणी वाचण्यात आलेल्या माहितीवरून, महात्मा गांधींच्या या १२ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यानच्या उपोषणामागे प्रथमदर्शनी प्रमुख दोन कारणे दिसून येतात.
१)पाकिस्तानला दिल्या जाणार्‍या एकूण ७५ कोटीं पैकी उर्वरीत ५५ कोटी हि रक्कम भारत सरकारने थांबवून न ठेवता ती लवकरात लवकर द्यावी.
२) दिल्लीत मुस्लीम-हिंदू/शिख याच्यांत होत असलेल्या दंगली थांबवणे.

अर्थातच त्या ७-८ दिवसांमधे घडलेल्या घटनांचा क्रम लावता, त्या ७-८ दिवसांमधे वर्तमानपत्रांमधे आलेल्या भारत सरकारच्या वक्तव्यांचा (१२ जानेवारीचं पटेलांचं वक्तव्य, १५ जानेवारीचं नेहरूंचं वक्तव्य) लक्षात घेता हे दिसून येतं की, भारत सरकारचा जो १२ जानेवारीला निर्णय होता उर्वरीत ५५ कोटी पाकिस्तानला न देण्याचा(काश्मिरातून त्यांच्या सैन्याने पुर्ण माघार घेइ पर्यंत) तो निर्णय भारत सरकारने १५ जानेवारीला बदलला. का???.....या ३-४ दिवसात असं काय विशेष घडलं की भारत सरकारला आपला निर्णय बदलावा लागला?? जर महात्मा गांधींचं उपोषण या निर्णयबदला मागे कारणीभूत नव्हतं तर दुसरं काय कारण असू शकतं ??? कोणाला हे दुसरं कारण माहीत असल्यास कृपया काही संदर्भ द्यावेत ही विनंती.

महात्मा गांधींच्या उपोषणामागे असलेल्या दुसर्‍या कारणाबाबतीत तरी कोणताच मतभेद आढळून येत नाहीय.

सोम्यागोम्या's picture

3 Jun 2010 - 1:19 am | सोम्यागोम्या

>>या ३-४ दिवसात असं काय विशेष घडलं की भारत सरकारला आपला निर्णय बदलावा लागला??
+१
अगदी पटेश.

नितिन थत्ते's picture

2 Jun 2010 - 9:03 pm | नितिन थत्ते

त्या धाग्यावरील इंद्रराज पवार यांच्या प्रतिसादात खालील प्रमाणे माहिती आहे.

५५ कोटी..... खरे खोटे !!!
प्रेषक इन्द्र्राज पवार ( मंगळ, 06/01/2010 - 10:47) .
"....आता खरे खोटे कसे सिद्ध करणार?...."

ज्यावेळी एखादा चरित्रकार त्याच्या मनी असलेल्या व्यक्तीबद्दल लिहिण्यास घेतो त्यावेळी "त्याला" जे वाटत असते त्याचेच प्रतिबिंब त्याच्या लिखाणात उमटते. आपण "खरे खोटे कसे सिद्ध करणार?" असे म्हटले आहे. त्यासाठी आपणास (शक्य असल्यास....)"टाईम्स ऑफ इंडिया" मुंबईच्या लायब्ररीत जावे लागेल व खालील तारखेचे अंक पाहावे लागतील.... (ही सोय तिथे उपलब्ध आहे...). या तारखेच्या या बातम्या अंकाच्या मुखपृष्ठावर ८ कॉलमरितीने प्रकाशीत झाल्या आहेत. ::

१. गुरुवार दि. १ जानेवारी १९४८

NO PAYMENT TO PAKISTAN
Supply of Military Stores Stopped
India against implementation of financial settlement. Demand to give up Kashmir Adventure.

२. मंगळवार दि. १३ जानेवारी १९४८
MAHATAMA GANDHI STARTING FAST FROM TODAY

इंद्रराज यांनीच पूर्वी दिलेल्या माहितीतून पैसे न देण्याचा निर्णय १२ जानेवारीला घेतलेला नसून १ जानेवारीला घेतला होता हे दिसते.

त्यामुळे १२ जाने ला पटेलांनी घोषणा केली ....१३ जानेवारीला उपोषण..... हे लॉजिक टिकत नाही.

असो. लखनौ करार करणारे टिळक मुत्सद्दी आणि मुस्लिम लीगशी कोणताही करार न करणारे गांधी-नेहरू मुस्लीम लांगूलचलन करणारे अशी झापड एकदा डोळ्यावर लावली की मग पुढे नीट काही दिसेनासे होते हे खरे.

नितिन थत्ते

सोम्यागोम्या's picture

3 Jun 2010 - 1:26 am | सोम्यागोम्या

सारासार विचार करायचा की वाक्यांचे कीस पाडण्यात धन्यता मानायची हे ज्याचे त्याने ठरवावे.

झोपलेल्याला उठवता येते झोपेचे सोंग घेणा-याला कसे उठवणार, तेव्हा पवार साहेब जे म्हणतात त्यात तथ्य आहे, गांधीचे उपोषण ५५ कोटीसाठी नव्हते यावर विश्वास बसण्या सारखी एकही ठळक गोष्ट समोर आलेली नाही.

काय घडले ह्यावर प्रकाश टाकताना तारखा , कात्रणे, ध्वनिफिती फॅक्ट्स या सोबत व्यक्तिच्या स्वभावाची बाजू लक्षात घ्यावी म्हणजे सगळा ताळमेळ लागतो. गांधीचा लांगूलचालनाचा स्वभाव पाहता उपोषण कशासाठी होते हे सहज कळेल.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Jun 2010 - 3:14 pm | llपुण्याचे पेशवेll

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

शिल्पा ब's picture

2 Jun 2010 - 10:51 pm | शिल्पा ब

गांधींच्या मुस्लीमधार्जीणेपणामुळे आणि जिनाच्या सत्तेच्या लालचेमुळे देशाचे तुकडे झाले...आता जीनापेक्षा गांधींचे महत्व केव्हाही जास्तच होते, आहे...त्यामुळेच गांधीनी राष्ट्र्विभाजानाला विरोध केला असता तरी चालले असते...दुर्दैवाने असे झाले नाही...त्याची फळे आपण अजूनही भोगतो आहोत...काश्मीरचा नरक केला आहे पाकिस्तानने....काश्मीर प्रश्न जवळच्या भविष्यात सुटेल असे वाटत नाही कारण अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ चालू आहे...पाकिस्तानबरोबर चर्चा हा उपाय नाही...कारण एकीकडे ते चर्चा करतात आणि त्याचवेळी दुसरीकडे काश्मिरात थैमान घालतात...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

इन्द्र्राज पवार's picture

2 Jun 2010 - 11:30 pm | इन्द्र्राज पवार

"...त्यामुळे १२ जाने ला पटेलांनी घोषणा केली ....१३ जानेवारीला उपोषण..... हे लॉजिक टिकत नाही.....

श्री . नितीन जी ... तुमच्यासारख्या अभ्यासकाने अशा प्रकारच्या शंकांचा काथ्याकुट करावा याबद्दल सखेद आश्चर्य वाटते. अहो .... ४० कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेला हा देश होता त्यावेळी , सार्‍या जगाचे लक्ष लागले होते त्या काळात हिंदुस्थानातील या घटनाकडे. युनोचे अधिवेशनही या भारत-पाक ताणावर बोलाविण्यात आले होते. एक तारखेला नकार दिला म्हणजे त्यासाठी पाकिस्तानने लगेच माऊंटबॅटनकडे धाव घेतली आणि "मला माझ्या वाटणीचा पिझ्झा दिल नाही.." म्हणून भोकांड पसरले असे नाही. असे राजनैतिक पातळीवर होत नसते. तो आठवडा वेगवेगळ्या घटनांनी गजबजलेला असणारच... गृह खात्याच्या त्या घोषणेनंतर "डिप्लोमॅटिक" पातळीवर काहीतरी बोलणी, मधला मार्ग काढणे ही बोलणी चालू असतीलच ना. एक लक्षात घ्या, गांधीजी सरकारच्या दैनंदिन व्यवहारात लक्ष घालत नसत. मात्र सरकारची ती घोषणा त्यांच्या कानावर जाताच त्यांनी नेहरूंच्याकडे याबद्दल विचारणा केली असणार यात संदेह नाही. आता नेहरूंनी पटेल यांना गांधींचे मत सांगितल्यावर त्यांची मनस्थिती काय झाली असेल हे सांगायला नको. त्यांनी तर नेहरूंचे ऐकले नसणारच, कारण भारताचे गृहमंत्री म्हणून त्यांच्यासमोर दिल्लीशिवाय अनेक प्रश्न आ वासून पुढे होतेच. त्याही स्थितीत घाटीतील संघर्ष चिघळल्यावर आणि तशातच पाकिस्तानचे प्रतिनिधी लॉर्ड माऊंटबॅटन यांना करारासंदर्भात भेटायला आल्यावर त्या संदर्भात त्यांनी १२ जानेवारीला "ती" पत्रकार परिषद घेतली व देण्याघेण्याबाबातच आपला ठाम निर्धार व्यक्त केला.... मग मात्र आता इथे गांधीनी आपले उपोषणाचे अखेरचे अस्त्र बाहेर काढले.....!!

तुम्हाला त्यांच्या उपोषणाच्या तारखेने गोंधळात टाकले आहे... कारणाने नाही....हे मान्य करूया.... मग त्यांना "दिल्लीतील दंगली संपाव्यात" यासाठी १३ जानेवारी हीच तारीख का सापडावी, असें मी विचारले तर? हे मी या साठी म्हणत आहे की, १ सप्टेंबर १९४७ ला कलकत्यातील दंगल शमावी म्हणून गांधीजीनी तेथे उपोषण सुरु केले. ४ सप्टेम्बरला दोन्ही धर्माच्या नेत्याकडून "शांततेचे" आश्वासन घेऊन त्यांनी ते उपोषण सोडले. कलकत्त्याहून ८ सप्टेंबर १९४७ ला गांधी पंजाबला जायला निघाले. पण ते दिल्लीपर्यंत पोचतात तोच दिल्ली पेटली....आणि दिल्लीतील तो आगडोंब शमावा यासाठी गांधीजींनी पंजाबचा दौरा रद्द केला व दिल्लीतच पुनश्च दोन्ही जातीच्या शांततेसाठी प्रयत्न करायचे निश्चित केले. इथे पहा...८ सप्टेंबरला गांधी "पेटलेली दिल्ली शांत व्हावी" म्हणून काम सुरु करतात आणि ती थंड होत नाही म्हणून नेमके १३ जानेवारीला "उपोषण" करणार असे सांगतात.... याचा अर्थ सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या चार महिन्यात दिल्लीत काय २०-२० च्या मॅचेस चालू होत्या काय? या चार महीन्यांच्या दीर्घ काळात त्यांना नाही वाटले की आपण आता दंगली, जाळपोळी, हत्या थांबाव्यात म्हणून "उपोषण" सुरू केले पाहिजे?

बाकी इतिहास...? त्याची परत परत उजळणी नको.

घोषणा...सर्व शासकीय पातळीवर होत असलेल्या घोषणा या कासवाच्या गतीनेच चाललेल्या हालचाली असतात.... ज्या आज जाहीर केल्या म्हणजे उद्या लगेच अंमलात आली असे होत नसते. अहो, सरकारने साधा महागाई भत्ता २ टक्के वाढविण्याची घोषणा केली, तर तो कर्मचार्‍याच्या पगारात "अ‍ॅड" व्हायला तीन महिने लागतात...आणि ती वरील बाब तर दोन देशातील धुमसत असलेला प्रश्न !!

जाता जाता.... ~~ "सावरकर धाग्यात" तुम्हीच असा शेरा मारला होता कि, "धागा सावरकर यांच्यावर.... मात्र चर्चा चालू आहे गांधी-नेहरू यांच्यावर..."
तुमच्याच पावलावर पाऊल टाकून आता मी असे म्हणतो की... "धागा महात्मा गांधीवर.... मग त्यात त्या बिचार्‍या बळवंतरावांना कशाला लखनौला नेत आहात...?"
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 5:30 am | मिसळभोक्ता

मुळात तुम्ही म्हटले की १२ जानेवारीला ५५ कोटी न देण्याचा निर्णय जाहीर झाला.

नितीन रावांनी पुरावे देऊन ती तारीख १ जानेवारीपर्यंत मागे नेली.

ही चूक कृपया प्रांजळपणे कबूल करावी.

ज्या विद्याचे विश्लेषण करून आपण एका निर्णयाप्रत पोहोचला आहात, तो विदाच चूक दाखवून दिला असल्याने, आपल्या निर्णयाप्रत शंका निर्माण होते.

आता, १ जानेवारी ते १३ जानेवारी काय झाले, ह्याबद्दल संशोधन करावे ही विनंती.

वरील प्रतिसादात "दिल्लीत २०-२० च्या मॅचेस" असे शब्द वापरल्यामुळे, तुम्हाला इतिहासाचे अभ्यासक म्हणवता येत नाही. तुमच्या आधीच्या प्रतिसादात इतिहासाचे अभ्यासक असल्याचा आभास निर्माण करण्यात आपण यशस्वी झालात, हे कबूल करतो.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

आवशीचो घोव्'s picture

3 Jun 2010 - 8:37 am | आवशीचो घोव्

@मिसळभोक्ता

....आता, १ जानेवारी ते १३ जानेवारी काय झाले, ह्याबद्दल संशोधन करावे ही विनंती.....

यावरील प्रतिक्रीया इंद्राजींनी आधीच दिली आहे, नितीनरावांना उत्तर म्हणून.

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 8:43 am | मिसळभोक्ता

@आवशीचाघोव,

माफ करा, मी इंद्ररावांची प्रतिक्रिया सुमारे १५ वेळा वाचली. त्यात गांधीजींनी १ जानेवारी १९४८ ते १२ जानेवारी १९४८ च्या दरम्यान ५५ कोटींविषयी काय विचार व्यक्त केलेत ते लिहिलेले नाही.

तुम्हाला काय सापडले ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

आवशीचो घोव्'s picture

3 Jun 2010 - 3:44 pm | आवशीचो घोव्

@मिसळभोक्ता

एक तारखेला नकार दिला म्हणजे त्यासाठी पाकिस्तानने लगेच माऊंटबॅटनकडे धाव घेतली आणि "मला माझ्या वाटणीचा पिझ्झा दिल नाही.." म्हणून भोकांड पसरले असे नाही. असे राजनैतिक पातळीवर होत नसते. तो आठवडा वेगवेगळ्या घटनांनी गजबजलेला असणारच... गृह खात्याच्या त्या घोषणेनंतर "डिप्लोमॅटिक" पातळीवर काहीतरी बोलणी, मधला मार्ग काढणे ही बोलणी चालू असतीलच ना. एक लक्षात घ्या, गांधीजी सरकारच्या दैनंदिन व्यवहारात लक्ष घालत नसत. मात्र सरकारची ती घोषणा त्यांच्या कानावर जाताच त्यांनी नेहरूंच्याकडे याबद्दल विचारणा केली असणार यात संदेह नाही. आता नेहरूंनी पटेल यांना गांधींचे मत सांगितल्यावर त्यांची मनस्थिती काय झाली असेल हे सांगायला नको. त्यांनी तर नेहरूंचे ऐकले नसणारच, कारण भारताचे गृहमंत्री म्हणून त्यांच्यासमोर दिल्लीशिवाय अनेक प्रश्न आ वासून पुढे होतेच. त्याही स्थितीत घाटीतील संघर्ष चिघळल्यावर आणि तशातच पाकिस्तानचे प्रतिनिधी लॉर्ड माऊंटबॅटन यांना करारासंदर्भात भेटायला आल्यावर त्या संदर्भात त्यांनी १२ जानेवारीला "ती" पत्रकार परिषद घेतली व देण्याघेण्याबाबातच आपला ठाम निर्धार व्यक्त केला.... मग मात्र आता इथे गांधीनी आपले उपोषणाचे अखेरचे अस्त्र बाहेर काढले.....!!

१ जाने. ते १३ जाने. या काळात गांधीजींनी काय विचार व्यक्त केले याबाबतीत इंद्राजींनी माहिती दिली नाही हे खरे आहे. पण तुम्ही "या काळात काय घटना घडल्या?" असा प्रश्न उपस्थित केला होता, ज्याचे उत्तर वर दिलेले आहे.

शेखर काळे's picture

3 Jun 2010 - 12:51 am | शेखर काळे

दंगली अगदी ताबडतोब थांबल्या का ?

गांधीजींनी उपोषण संपविण्याचा निर्णय घेतला तो दंगली थांबविण्याचे आश्वासन मिळाले म्हणून. मग तसे झाले का ? नसेल तर मग उपोषण का संपविले ?

टारझन's picture

3 Jun 2010 - 12:54 am | टारझन

नसेल तर मग उपोषण का संपविले ?

असं काय ? भुक लागली असेल नं त्यांना ? ;) कितीही मोठे असले तरी "माणुस" होते ते :)

मी तर रोज इनामे इतबारे सकाळी ९ ते दुपारी १ ह्या काळात उपोषण करतो !!

- टारझनदास पांदी

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Jun 2010 - 3:19 pm | llपुण्याचे पेशवेll

=)) =)) =))
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 6:00 am | मिसळभोक्ता

मिपावर (आणि त्या आधी मनोगतावर) गांधी हा विषय बरेचदा चघळला गेला आहे. गांधींनी भगतसिंगाला फाशीवर चढवले, ह्याचे पुरावे अडीच वर्षापूर्वी सर्किटने मगितले होते, ते अद्याप मिळालेले नाहीत, असे कळते. असो. इतिहास संशोधनाला मास-मीडिया च्या चष्म्यातून पाहणे ही हल्ली फ्याशन आहे.

पण मला ह्याव्यतिरीक्त खटकणारी बाब अशी, की गांधी म्हटले, की हमखास "गांधी-नेहरू" असा उल्लेख होतो. जणू दोघेही एकच होते. हे चूक आहे, हे मास-मीडिया वाले देखील मान्य करतील. पण तरी देखील, सो कॉल्ड इतिहास संशोधक अजूनही "गांधी-नेहरू" म्ह्णतात.

२५ डिसेंबर १९४७ ला गांधींनी प्रार्थना सभेत केलेल्या भाषणाची सुरुवात सदर "संशोधकांना" मनोरंजक वाटेल. त्याचा माझ्या अल्पमतीने केलेला अनुवाद.

---

बंधु भगिनींनो,

काश्मिरात जे काही घडते आहे, त्यासंबंधी तुम्हाला थोडीफार तरी माहिती असेल. पण मला तुमचे लक्ष काश्मिरविषयक एका प्रस्तावाकडे वेधायचे आहे. भारत आणि पाकिस्तान ह्या देशांत काश्मिर झगड्यावर मध्यस्थी करण्यासाठी तिसर्‍याच कुठल्यातरी संस्थेला विनंती करण्यात यावी असे बोलले जात आहे, आणि वर्तमानपत्रेदेखील ह्या कल्पनेला पाठिंबा देत आहेत. असे का ? असे किती दिवस चालणार ? ह्या समस्येचे समाधान होण्याऐवजी, आत आणखी एक तिसरी बाजू उघडणार. आपण हे आपल्यातच सोडवू शकत नाही का ?

----

नेहरू (ज्यांचा कल काश्मिरप्रश्न संयुक्त राष्ट्रसंघामार्फत सोडवण्याकडे होता) आणि गांधी स्वतंत्र विचार करायचे, हेच इथून सिद्ध होत नाही का ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

नितिन थत्ते's picture

3 Jun 2010 - 7:45 am | नितिन थत्ते

'पुरावे' म्हणून सांगितलेल्या गोष्टी टिकत नाहीत असे पाहून शाब्दिक कीस वगैरे म्हटले जात आहे.

अवांतर: टिळकांना यात ओढणे हे अवांतर नाही कारण बरीच चर्चा मुस्लिम लांगूलचालन या विषयाभोवती फिरत आहे. म्हणून तशाच प्रकारचे लांगूलचालन- नुसते बोलके नव्हे, प्रत्यक्ष लेखी कराराद्वारे- करणार्‍या एका 'आपल्याला रिस्पेक्टेड असलेल्या' आणि कोलू न पिसलेल्या ;) आणखी एका नेत्याचे नाव सांगितले.

नितिन थत्ते

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Jun 2010 - 3:25 pm | llपुण्याचे पेशवेll

'आपल्याला रिस्पेक्टेड असलेल्या'
थोडेसे अधिक.
रीस्पेक्टेड असलेल्या आणि ३ वेळा राजद्रोहाचा खटला भरला गेलेल्या आणि त्यातल्या १ दा डोंगरीच्या तुरुंगात साधारण ८-१० महीने काढलेल्या आणि १ दा मंडालेच्या तुरुंगात ६ वर्षे काढलेल्या (आगाखान पॅलेसात नव्हे) एका नेत्याचे नाव.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

सुमीत भातखंडे's picture

3 Jun 2010 - 6:07 pm | सुमीत भातखंडे

हा हा हा!
सहमत

भारद्वाज's picture

3 Jun 2010 - 11:04 pm | भारद्वाज

आगाखान पॅलेसात नव्हे

जबरदस्त हाणला... =D>

अप्पा जोगळेकर's picture

3 Jun 2010 - 8:04 am | अप्पा जोगळेकर

सावरकर असोत किंवा गांधीजी असोत त्यांच्या चुकांची किंवा उत्कृष्ट कॄत्यांची छाननी करण्याचा आपणा भारतीय नागरिकांना पूर्ण अधिकार आहे.
स्वातंत्र्य मिळवताना काय टाळावे आणि काय करावे यासंदर्भातील दोघांचे मार्ग भिन्न होते हे उघडच आहे. परंतु इथे प्रतिक्रिया देण्यापलीकडे कोणतेही कर्तृत्व न गाजवलेल्या तुमच्या आमच्या सारख्या लोकांना या महनीय व्यक्तींवर चिखलफेक करण्याचा किंवा अकारण त्यांचा एकेरी उल्लेख करण्याचा नैतिक अधिकार नाही असे माझे स्पष्ट मत आहे. या धाग्यावर काही जणांकडून गांधीजींचा अनादराने उल्लेख होताना दिसतो आहे. सुदैवाने सावरकर यातून बचावले आहेत असं वाटतय.

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 8:38 am | मिसळभोक्ता

आणखीन एक नमूद करण्याजोगी गोष्ट म्हणजे इथे काही परदेशी नागरिक वटवट करताहेत अशी मला शंका आहे. निदान त्यांना तरी आमच्या भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांवर टीका करण्याचा अधिकार नाही. कोणीतरी त्यांना थोबडवलं पाहिजे. ज्यांनी भारतीय राज्यघटना मान्य केली आहे निदान त्यांना तरी हे रुचलं पाहिजे की भारतीय मूळ असणं आणि भारतीय नागरिक असणं या दोन निराळ्या गोष्टी आहेत.

मी कबूल करतो, की गेले ७ महिने मी परदेशी नागरीक आहे (माझ्या आयुष्यातील ४२ वर्षांपैकी सात महिने परदेशी नागरीक, उरलेली ४१ वर्षे आणि ५ महिने भारतीय नागरीक, हे महत्त्वाचे आहे का?). गांधींविषयी बोलल्यमुळे मला थोबाडवणे योग्य आहे की नाही, हे मी जागतिक जनतेवर सोपवतो. गांधीजी हे आपल्या सर्वांसारखेच जगाचे नागरीक आहेत, असे मला वाटते.

मात्र, समजा मिपाकरांनी असे ठरवले, की गांधी अणि सावरकरांविषयी बोलण्याचा आणि मते व्यक्त करण्याचा अधिकार फक्त भारतीय नागरीकांचा आहे, तर प्रत्येक संदर्भ देताना सदर संदर्भ भारतीय नागरीकाचा आहे की नाही, हे स्पष्ट करावे.

सुरुवात तुमच्यापासून करावी. अप्पाजोगळेकर हा भारतीय नागरीक आहे, ह्याचा पुरावा द्यावा. रेशनकार्ड देखील चालेल. पासपोर्ट असल्यास उत्तम.

तसेच ओव्हरसीज सिटिझन इंडिया, ह्या भारतमान्य (१७५ डॉलर्स भरून) बहिर्भारतीयांना गांधीजी आणि सावरकरांविषयी बोलण्याचा अधिकार आहे की नाही, हे देखील स्पष्ट करावे.

धन्यवाद.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

शिल्पा ब's picture

3 Jun 2010 - 8:40 am | शिल्पा ब

+१
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 10:06 am | मिसळभोक्ता

प्रा डॉ संपादक,

आपण नागरीकत्त्वाचा मुद्दा अवांतर म्हणून सदर प्रतिसादानुषंगाने आलेले सर्व उपप्रतिसाद खारीज केले. पण ह्या यड*व्या अप्पाचा मूळ प्रतिसाद मात्र तसाच ?

झोपलात काय ? नाही, बपोरिया ह्या शब्दाच्या विविध छटा रामदासांनी व्यक्त केल्या, म्हणून अंमळ संशय. दुसरे काही नाही.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

आनंदयात्री's picture

3 Jun 2010 - 10:14 am | आनंदयात्री

हॅ हॅ हॅ !!
अभ्यासाची कमतरता अजून काय !

ऋषिकेश's picture

3 Jun 2010 - 8:56 am | ऋषिकेश

सध्या काहि वैयक्तीक गडबडीत असल्याने विस्ताराने उत्तर देणे कठीण आहे. मात्र केवळ मला किंवा कोणालाहि 'काय वाटते' या पेक्षा जवळचे पुरावे, विविध लेख, लेखांतील उल्लेख, तत्कालिन बातम्या, दस्तऐवज यावरून जो निष्कर्ष निघतो तो खरा असण्याची शक्यता मी अधिक मानतो.

एक पटेल व गांधींमधील 'त्या' उपोषणा दरम्यानची चर्चा देऊन पुढचा १२ जानेवारीसारखा (जो श्री.थत्ते यांनी आधीच चुकीचा आहे हे दाखवले आहे) पुरावा समोर येइपर्यंत थांबतो आहे.
पटेल गांधींना भेटायला गेले होते तेव्हा गांधी म्हणाले "सरदार, मी चीन मधे नाहि, दिल्लीत आहे. माझे कान व डोळे शाबुत आहेत. मी डोळ्याने पाहिलेल्या व कानाने ऐकलेल्या पुराव्यांवर विश्वास ठेऊ नये व मुसलमानांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करावे असे जर सांगणे असेल तर ते शक्य नाहि. हिंदु व शीख माझे बांधव आहेत. त्यांच्यात व माझ्यात एकच रक्त आहे. आज ते संतप्त असतील तर त्यांनाही मी दोष देणार नाहि. त्यांच्याकडून घडलेल्या हत्येचे क्षालन मी स्वतः प्रायश्चित्त घेऊन केले पाहिजे. माझ्या उपोषणाने तरी सगळ्या समाजांचे डोळे उघडतील व दंगल थांबेल अशी मला आशा आहे."

इथे देखील कुठेही ५५ कोटींचा उल्लेख नाहि.. उपोषणादरम्यान कोणी विचारल्याशिवाय त्यांनी ५५ कोटींबद्दल ते बोललेले नाहित. आणि विचारल्यास त्यांनी त्यांचे मत दिले जे आपल्याला माहित आहे.

माझ्यामते इथे सगळ्यांची (माझ्यासकट) मते बरीचशी स्थिर आहेत. किंबहूना ह्या चर्चेचा फायदा असा की यानंतर ती अधिक बळकट झाली आहेत (कारण दोन्ही मताच्या लोकांसमोर आपापल्या मतांना पुष्टी देणारे नवनवीन पुरावे मिळाले आहेत) चर्चेतून आपली मते बदलतील ही शक्यता दोघांपैकी कुणी नवा व दमदार पुरावा दिल्याशिवाय शुन्यवत आहे.

तेव्हा मी तुर्तास इथेच थांबतो.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 9:01 am | मिसळभोक्ता

सहा डिसेंबर १९४७ ते ३० जानेवारी १९४८ ह्या काळात महात्मा गांधींनी लिहिलेल्या पत्रांचे आणि दिलेल्या भाषणांचे वृत्तांत येथे उपलब्ध आहेत (पीडीएफ स्वरूपात). त्यात ५५ कोटींविषयी गांधीजींनी लिहिलेला एकही संदर्भ आढळत नाही.

जानेवारी १, १९४८ ला वर्तमान पत्रांत आलेल्या ५५ कोटींच्या उल्लेखाविषयी, गांधीजींनी त्यांच्या मृत्यूपर्यंत कुणालाही काहीही लिहिलेले नाही, किंवा त्याविषयी ते कुठेही बोलले नाही, ह्याविषयी आश्चर्य वाटते. (खादी, काश्मिर, स्न्हेह्यांचे आजार, धान्याच्या किमती, लोकशाहीचे अपेक्षित स्वरूप, आणि ह्यापेक्षाही लहानसहान सर्व विषयांचा उल्लेख त्यांच्या लिखाणात आढळतो.)

वल्लभ भाई पटेलांचे पत्रकार परिषदेतील वक्तव्य देखील ह्या दुव्यावर उपलब्ध आहे. त्यांचा मुख्य दावा असा, की ३० डिसेंबरला लाहोरला श्री अर्चिबाल्ड रोलँड्स ह्याच्या समोर लियाकत अली खान ह्यांनी वीस कोटी मगितले होते, आणि आम्ही ते तात्काळ मंजूर केले होते. आता ते ५५ कोटी मागताहेत. परंतु, अतिरीक्त ३५ कोटींसाठी श्री. रोलँड्स सोबत पाकिस्तान आणि भारताच्या अर्थमंत्र्यांची पुन्हा बैठक आवश्यक आहे.

आता, प्रत्यक्ष लोहपुरुष ५५ कोटींचा दावा १२ डिसेंबर १९४८ ला पूर्णपणे खारीज करत नाहीये, तर तिथे गांधीजींच्या उपोषणाचा काय संबंध ?

(ता. क. प्रतिसादलेखकाचे वय ४२ वर्षे. गेले ७ महिने सदर लेखक अमेरिकेचा नागरीक आहे.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jun 2010 - 9:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नागरीकत्व व त्यावरील चर्चा इथे अवांतर होत आहे असे वाटते. त्यावर काही आक्षेप असतील तर वेगळ्या धाग्यावर त्याची चर्चा करावी इथे नको. कृपया सहकार्य करावे........!

-दिलीप बिरुटे
[संपादक]

अप्पा जोगळेकर's picture

3 Jun 2010 - 10:04 am | अप्पा जोगळेकर

जरुर सहकार्य करु. पण माझे काही प्रतिसाद उडवले गेले आहेत. आता हा तरी किती टिकतो देव जाणे.

भडकमकर मास्तर's picture

3 Jun 2010 - 9:44 am | भडकमकर मास्तर

वा ! आत्ता कुठे गांधी नेहरु सावरकर धाग्यावर आल्यासारखं वाटलं...
...

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 10:24 am | मिसळभोक्ता

सर्वसाक्षी सध्या ममीप्रेमात आहेत. पण ते त्यांचे खरे प्रेम नव्हे. ते लवकरच इकडे येतील. मग बघू.

पुराव्यांविषयी पूर्णपणे नैराश्य, हे मराठी संकेतस्थळांवरील सदस्यांचे वैशिष्ट्य.

विशेष म्हणजे जे स्वतःला "इतिहास तज्ञ" म्हणवून घेतात, ते सदस्य. पुरावा आहे असे छातीठोकपणे सांगतात, आणि मग गप्प बसतात आणि इजिप्तचे फोटो टाकतात.

पुरावे काढा, साहेब. मग पुढे बोलू.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विकास's picture

3 Jun 2010 - 4:47 pm | विकास

पुरावा आहे असे छातीठोकपणे सांगतात, आणि मग गप्प बसतात आणि इजिप्तचे फोटो टाकतात.

मला वाटते त्या फोटोंमधून (इजिप्शियन) ममी कसा पुरावा हे समजते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

इन्द्र्राज पवार's picture

3 Jun 2010 - 10:37 am | इन्द्र्राज पवार

श्री. मिसळभोक्ता यांचे सर्व प्रतिसाद मी अगदी मनःपूर्वक वाचले. त्याबद्दल मी त्यांना एकच विनंती करीत आहे की, त्यांनी "इन्द्रराज, इतिहासाचे अभ्यासक आहेत" हा भ्रम सर्वप्रथम आपल्या मनातून काढून टाकावा. मी कुठल्याही लिखाणात त्या पध्द्तीचा आव आणलेला नाही.... आणूच शकत नाही, इतका क्षुल्लक प्राणी आहे मी. .... हां, हे मी निश्चित म्हणू शकतो की, माझे वाचन बर्‍यापैकी आहे, सततच्या प्रवासामुळे देशाच्या विविध भागात या ना त्या निमित्ताने वेगवेगळ्या लेव्हलच्या लोकांसमवेत अनेकविध विषवावर चर्चा झडत असतात.... आणि त्या कारणानेच ज्ञानाचे दोनचार शिंतोडे अंगावर उडतात त्यांची जपणूक मी करतो.... आणि शक्य तर त्यांची अधिकृत पुराव्यासोबत तुलनाही करतो.

त्यामुळे तुम्हाला मला विशेषण द्यायचे असेलच तर नगर वाचन मंदिरात एका कार्डावर एकापेक्षा दोन पुस्तके कशी मिळतील या प्रयत्नात असणारा एक किरकोळ वाचक असे म्हटले तर ते जास्त सयुक्तीक होईल. "अभ्यासक" "संशोधक" हे शब्ददेखील मला नीटपणे टंकीत करता येत नाही. असो.

प्लीज आणखीन एक ~~ ज्यावेळी मी किंवा अन्य कुणीही टिळक, सावरकर, भगतसिंग, नेताजी, पटेल या सारख्या जहाल विचारसरणीच्या नेत्यावर लिहितो (मग लिहिणारा कालचा असो वा आजचा...) त्यावेळी असा अर्थ बिलकुल नसतो की, त्याने गांधीजी, नेहरू, गोखले यांच्या नावावर फुल्या मारलेल्या आहेत. या प्रत्येकाचे भारताच्या इतिहासातील स्थान तेजस्वी तार्‍यासारखे आहेत आणि मला तर ही सर्व नावे देवाचे नाव घेण्याइतपत प्रिय व आदरणीय आहेत. एकाद्या दुसर्‍या प्रसंगातील त्यांची भूमिका आगेमागे झाली म्हणून माझ्या मनातील त्यांच्या स्थानाला धक्का कदापिही लागणार नाही इतपत मला विश्वास आहे.

असो. माझ्यापुरता तरी हा विषय इथे संपला असे मी म्हणतो...धन्यवाद !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 11:05 am | मिसळभोक्ता

"इतिहासाचा किरकोळ वाचक" ह्या व्यक्तीशी वाद घालण्यात मला अजीबात इंटरेस्ट नाही.

थत्त्यांची देखील माफी माग. त्यांनी तुला सीरियस अभ्यासक समजले, आणि पुरावे दाखवले. त्यांच नक्की बराच वेळ गेला असणार. असा इतरांचा वेळ घालवणे बरोबर नाही.

धन्यवाद.

तुझ्यासारखी "सेल्फ-असेसमेंटची" अनेकांना बुद्धी मिळावी, अशा अपेक्षेत.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

समंजस's picture

3 Jun 2010 - 11:14 am | समंजस

इन्द्र्राजसाहेब मला स्वत: ला तरी वाटतयं की भारतीय स्वातंत्र्य इतिहास संबंधात तुमचं फक्त वाचनच नाही तर अभ्यास सुद्धा ईतरांपेक्षा जास्त आहे(या चर्चेत भाग घेणार्‍यांमधे).

आतापर्यंत तुमच्या कडून मुद्दाला धरूनच प्रतिसाद आलेत आणि ते सुद्धा नविन संदर्भांसहित. या विषयावर चर्चा करणार्‍या ईतरांनी स्वतः किती कष्ट घेतलेत संशोधन करण्याचे ते आवर्जून पाहावे लागेल(सध्या तरी काही विशेष दिसत नाहीय). किती जणांनी स्वतः त्या काळातील भारतीय/परदेशीय वर्तमानपत्रे वाचलीत, किंवा आकाशवाणीवरच्या बातम्या ऐकण्याची तसदी घेतली ते सुद्धा बघावं लागेल. आणि मुख्य म्हणजे दुसरी बाजू उचलून ठेवणार्‍यांनी फक्त तुटक संदर्भ न देता किंवा तुमच्याच संदर्भांवरून ते कसे विरोधाभासी आहेत फक्त हे बघण्याचा प्रयत्न न करता, स्वतः जर काही नविन पुरावे/संदर्भ दिलेत तर बरं होईल. विशेषकरून, उर्वरीत ५५ कोटी पाकिस्तनला देण्याचा निर्णय भारत सरकारने १५ जानेवारीला घेतला त्या मागे उपोषण हे कारण नसून, दुसरंच कारण होतं हे दाखवून द्दायला हवं आणि ते कारण तसेच त्या कारणासंबंधीत काही पुरावा/संदर्भ द्दावा.
हे शक्य नसेल तर मग परिस्थितीजन्य पुरावा म्हणून ज्या काही घटना घडल्यात(पैसे न देण्याची घोषणा ते पैसे तात्काळ दिले जाणार ही घोषणा या दरम्यान) त्या वरून हा निष्कर्ष सहज काढता येतो की महात्मा गांधींचं उपोषण हे कारणीभूत होतं उर्वरीत ५५ कोटी तात्काळ द्यायला कुठल्याही पुर्वअटी शिवाय.

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 11:30 am | मिसळभोक्ता

विशेषकरून, उर्वरीत ५५ कोटी पाकिस्तनला देण्याचा निर्णय भारत सरकारने १५ जानेवारीला घेतला त्या मागे उपोषण हे कारण नसून, दुसरंच कारण होतं हे दाखवून द्दायला हवं आणि ते कारण तसेच त्या कारणासंबंधीत काही पुरावा/संदर्भ द्दावा.

का रे बॉ ? इथे प्लेंटिफ कोण आणि डिफेंडण्ट कोण ?

इद्रराज पवार नावाचा सदस्य नितीन थत्ते नावाच्या सदस्याला विरोध करतो. म्हणून इंद्रराज प्लेंटिफ. नितीन थत्ते हा डिफेंडंट. मी पुरावे देऊन फ्रेंड ऑफ द कोर्ट ब्रिफ फाईल करतो नितीन च्या बाजूने.

आता, तू समजा फेंड ऑफ द कोर्ट ब्रिफ फाईल करत असशील तर ते बघू दे जरा. प्लेंटिफ ला काय सपोर्ट ऑफर करतोस तू, ते जरा तरी बघू दे.

बघणे, हे महत्त्वाचे. ऐनवेळी कोर्टात सरप्राईज म्हणून एव्हिडन्स देणे, (न्यायालयात ऐनवेळी चमत्कारिक पुरावा देणे) हे चुकीचे आहे, आणि त्यामुळे ही केस खारिज होऊ शकते.

थोडक्यात. "पुरावा दे ना भाऊ!"

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

समंजस's picture

3 Jun 2010 - 12:34 pm | समंजस

साहेब आपण चुकून न्यायालया ऐवजी मिपावरच्या चर्चेत आला वाटतं :?

माझ्यापुरतं बोलायचं झाल्यास, मी मिपावरच्या चर्चेत सहभागी आहे. ते मला पडलेल्या प्रश्नांना/शंकांना उत्तरे मिळवण्याकरीता. आपल्या सहभागा मागे काय कारण आहे हे मला ठाउक नाही. जाणुन घेणे मला आवश्यक नाही.

मिपाच्या नियमांप्रमाणे माझा सहभाग अनावश्यक असेल तर मिपा व्यवस्थापक आणि संपादक मंडळ काय ते ठरवतील. आपणांस काही हरकत असल्यास आपण अर्थातच त्यांच्याकडे नोंदवू शकता.

(गैरसोईच्या मुद्द्यांना बगल देण्याचा आपला हा प्रयत्न स्तुत्य आहे. ) :)

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 12:42 pm | मिसळभोक्ता

पुरावा दे ना भाऊ !!!

तुझ्यासारखे अनेक वाद घालून गेले. आता ते पिरॅमिड्स बघतात.

मूळ मुद्दा घे मनात. पुरावा दे ना भाऊ !!!!

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

समंजस's picture

3 Jun 2010 - 10:35 am | समंजस

कृपया या चर्चेत सहभागी होणार्‍यांनी, प्रतिसाद टाकणार्‍यांनी चर्चेला मुख्य विषय/मुद्दा या पासून भरकटू देउ नये. इतर मुद्दांवर चर्चा गेल्यास हि चर्चा अपुर्ण राहणार आणि या चर्चेचा उद्देश पुर्ण होणार नाही तसेच अपुर्णावस्थेत ही चर्चा बंद पडल्यास परत काही काळाने(महिने/वर्ष) ही चर्चा सुरू होणार(अनावश्यक).
----------------------------------------------------------

सध्या मुख्य वादाचा मुद्दा हा आहे की, उर्वरीत ५५ कोटी पाकिस्तनला न देण्याचा जो निर्णय भारत सरकारने घेतला (१ जानेवारीच्या वर्तमानपत्रांनुसार), आणि त्या निर्णयाचा जो पुनरूच्चार सरदार पटेलांनी केला (१२ जानेवारीच्या वर्तमानपत्रांनुसार) तो निर्णय भारत सरकारने का फिरवला?? (१५ जानेवारीच्या वर्तमानपत्रांनुसार). या निर्णय फिरवण्या मागे महात्मा गांधींचं उपोषण कारणीभूत होतं का??? आणि नव्हतं तर मग खरं कारण काय होतं????

कृपया चर्चा ही या मुद्दाशी संबंधीत असू द्यावी.......धन्यवाद... :)

भोचक's picture

3 Jun 2010 - 10:51 am | भोचक

गांधीजींचे उपोषण नेमके कशासाठी होते? यासंदर्भात मी फाळणी ते फाळणी, अवघड अफगाणिस्तान आणि याच स्वरूपाची पुस्तके लिहिणार्‍या प्रतिभा रानडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मते ''गांधीजींच्या उपोषणाचा मूळ उद्देश दिल्ली आणि देशात शांतता नांदावी हाच होता. विशेषतः दिल्ली पेटलेली होती. त्यामुळे तिथे शांतता नांदणे गरजेचे होते. त्यामुळेच त्यांनी उपोषण केले. परंतु, त्याचवेळी पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा प्रश्नही उपटला. पाकिस्तानने लॉर्ड माऊंटबॅटन यांना मध्यस्थीची विनंती केली. त्यावर माऊंटबॅटन यांनी गांधीजींना सुनावले, की तुम्ही तत्वाची, नैतिकतेची भाषा करता आणि दुसरीकडे पाकिस्तानचे ठरलेले ५५ कोटी देणेही बाकी आहे. त्यावर गांधीजींनी हे पैसे देण्यास आपली हरकत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यांची हे पैसे देण्यास हरकत नव्हतीच. पण उपोषणाचा मूळ उद्देश मात्र ५५ कोटी देण्यासाठी नव्हता.''

(भोचक)
जाणे अज मी अजर

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 11:11 am | मिसळभोक्ता

परंतु, त्याचवेळी पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा प्रश्नही उपटला.

अर्थातच. हा प्रश्न ३० डिसेंबरला २० कोटींचा होता. ३१ डिसेंबरला ५५ कोटींचा झाला. १ जानेवारीला ला भारत सरकार ह्या विषयी विचार करत आहे, असे सांगण्यात आले. १२ जानेवारीला भारतीय गृह मंत्र्यांनी ५५ कोटी मंजूर न करण्याची कारणे सांगितली.

सर्वांना उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक पुराव्यांनुसार हे स्पष्ट आहे.

श्री/सौ/कु रानडे, ह्यांनी वेगळे काय सांगितले ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

समंजस's picture

3 Jun 2010 - 11:29 am | समंजस

अर्थातच, ५५ कोटि पाकिस्तानला कुठल्याही पुर्वअटीशिवाय देण्यात यावे फक्त हा उद्देश महात्मा गांधींच्या उपोषणामागे नव्हताच. दिल्लीत होत असलेल्या मुस्लिम-हिंदू-सिख या दंगली थांबवणे हा सुद्धा होता.

उर्वरीत ५५ कोटी पाकिस्तनला देण्याकरीता जी अट भारत सरकारने घातली होती, ती अ‍ट पाकिस्तानने १५ जानेवारीच्या आत पुर्ण केली का????????
नाही केली तर भारत सरकारने का निर्णय फिरवला???? स्वतः चे हसे करून घ्यायला????? कुठलं कारण होतं त्या निर्णया मागे ?????
या बद्दल काही माहिती आहे का?????????? कुठे मिळेल??????

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 11:34 am | मिसळभोक्ता

अर्थातच, ५५ कोटि पाकिस्तानला कुठल्याही पुर्वअटीशिवाय देण्यात यावे फक्त हा उद्देश महात्मा गांधींच्या उपोषणामागे नव्हताच. दिल्लीत होत असलेल्या मुस्लिम-हिंदू-सिख या दंगली थांबवणे हा सुद्धा होता.

ओके. आता पहिल्यांदा तुमचा "उपोषण हे ५५ कोटी च्या व्यतिरीक्त" ह्या मुद्द्याला होकार आला.

दुसरा आरोप काय आहे ? कृपया, सभ्य शब्दांत सांगावा. एकाहून अधिक प्रश्नार्थक चिन्हे हे सभ्यतेचे लक्षण नाही.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

समंजस's picture

3 Jun 2010 - 12:11 pm | समंजस

मला वाटतं मी माझ्या कुठल्याही प्रतिसादात कोणावरही आरोप केलेले नाहीत आपणांस तसे आढळे असल्यास कृपया सांगावे, योग्य ती दुरुस्ती करण्यात येईल :)
----------

ओके. आता पहिल्यांदा तुमचा "उपोषण हे ५५ कोटी च्या व्यतिरीक्त" ह्या मुद्द्याला होकार आला.

मी हा मुद्दा सुरूवातीलाच मान्य केलेला आहे. त्यामुळे होकार/नकार चा प्रश्न येत नाही.
-------------------------

दुसरा आरोप काय आहे ?
दुसरा आरोप काय आहे?? माझ्या प्रतिसादातल्या कुठल्या वाक्या वरून असं दिसून येतयं?? जाणून घ्यायला आवडेल :)
प्रश्न विचारणे हे केव्हा पासून आरोप करण्यात आला या प्रकारात यायला लागलायं?? तरी सुद्धा तुमच्या सोईकरीता परत तो प्रश्न खाली देत आहे, कृपया उत्तर द्दावे.
"उर्वरीत ५५ कोटी पाकिस्तनला देण्याकरीता जी अट भारत सरकारने घातली होती, ती अ‍ट पाकिस्तानने १५ जानेवारीच्या आत पुर्ण केली का??
नाही केली तर भारत सरकारने का निर्णय फिरवला?? स्वतः चे हसे करून घ्यायला?? कुठलं कारण होतं त्या निर्णया मागे ??
या बद्दल काही माहिती आहे का??कुठे मिळेल??"

--------------------------------------------

कृपया, सभ्य शब्दांत सांगावा. एकाहून अधिक प्रश्नार्थक चिन्हे हे सभ्यतेचे लक्षण नाही.
सभ्य शब्दांत सांगणे तसेच एकाहून अधिक प्रश्नार्थक चिन्हे हे सभ्यतेचे लक्षण नाही यावर बोलणे हे अवांतर होइल आणि मुख्य चर्चे पासून दुर जाणे होइल. ते मला नकोय. त्यामुळे या वर नंतर बोलता येइल.
-----------------------------------------------

आणि हो, माझा प्रतिसाद हा भोचक यांना उद्देशून होता, तुम्हाला नाही. तो प्रतिसाद फक्त तुमच्या प्रतिसादाच्या खाली आला एवढचं.
तरी पण तुम्ही आपणहून विचारणा केल्या मुळे, माझ्या प्रश्नास तुम्ही सुद्धा उत्तर दिल्यास आनंदच आहे.

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 12:26 pm | मिसळभोक्ता

श्री/सौ/कु समंजस,

आपल्याला खरेच आपल्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत का ?

मला खरेच कमी वेळ आहे, आणि आपण विचारलेले प्रश्न इतके मूलभूत आहेत, की आपल्याला स्वतःला देखील त्या प्रश्नांची उत्तरे लगेच सापडतील.

त्यामुळे, खरेच सांगा, आपल्याला असलेल्या प्रश्नांची उत्तरे मीच देणे आवश्यक आहेत का ?

श्री/सौ/कु अप्पा जोगळेकरांना दिलेल्या उत्तरात मी ६ डिसेंबर १९४७ ते ३० जानेवारी १९४८ पर्यंत श्री. मोहनदास करमचंद गांधी ह्यांनी लिहिलेली सर्व पत्रे, सर्व भाषणे, ह्यांचे संदर्भ दिलेले आहेत.

आपल्याला त्यापेक्षा जास्त संदर्भ हवे आहेत काय ? का ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

पक्या's picture

3 Jun 2010 - 12:44 pm | पक्या

मर्यादेपेक्षा जास्त विरजण पडलं की दह्याची चव जाउन ते जास्तच आंबट होतं.
आरोप काय? श्री ,सौ ,कु. काय? प्रत्येक वेळी वाकड्यातच शिरायला हवयं का?
जय महाराष्ट्र , जय मराठी !

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 1:12 pm | मिसळभोक्ता

यूसलेस पक्या, समंजसला दर वेळी छोट्या छोट्या प्रश्नांना दिलेली उत्तरे बघ, आणि मग नंतर मला हा प्रश्न विचार. खरच सांगतो, अशा छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मला हजार हजार डॉलर्स मिळतात. तुम्हा लोकांना उत्तरे देतोय भाड्यांनो, मला मिसळपाव आवडते म्हणून, फक्त.

खरच, समंजस आणि पक्या, ह्या दोघ्यांनी मला उगाच उत्तरे मागितलीत, तर मी त्यांना कोर्टात खेचीन. सँटा क्लॅरा काउंटीच्या नियमांनुसार कमाल ७५०० डॉलर्स मागता येतात, आणि अगदी "दिलेली उत्तरे पुन्हा मागितली" तरी.

आणि हो, "लॅटिट्यूड्स डीलिंग विथ सूडोनिम्स" क्लॉज मला माहिती आहे.

समंजस, पक्या, तुम्ही "कोर्टातील नियम माहिती नसल्याने कोर्टात नजर राहू शकलो नाही'" अशा प्रकारचे विरोध केलेत, तरी देखील, वरचे क्लाउज बघा. ७५०० डॉलर नक्की. आणि तुमच्याविरुद्ध केस नक्की. एकदा केस नक्की झाली, की क्रेडिट हिस्टरी भोकात. बेस्ट लक.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

पक्या's picture

3 Jun 2010 - 1:32 pm | पक्या

यूसलेस मिसळभोक्ता, तुला प्रतिसादच कळला नाही बघ.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

समंजस's picture

3 Jun 2010 - 12:45 pm | समंजस

धन्यवाद साहेब.
आपण दिलेल्या दुव्या वर जाउन माझ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो(१५ जानेवारीच्या भारत सरकारच्या निर्णयामागची कारणे शोधण्याचा). उत्तर मिळाल्यास परत तुम्हाला धन्यवाद देईनच, उत्तर नाही मिळाल्यास परत प्रश्न करेन :)

समंजस's picture

3 Jun 2010 - 4:47 pm | समंजस

धन्यवाद मिसळभोक्ता साहेब :)

तुम्ही दिलेल्या दुव्यावर माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं...
हा पुरावा/संदर्भ जर आधीच सापडला असता तर माझ्यापुरती तरी का होईना ही चर्चा (वाद नाही) संपुष्टात आली असती.

संक्षेपात सांगायचं तर;
महात्मा गांधीचं उपोषण हे प्रमुख दोन कारणांकरीता होतं.
१. दिल्लीतील दंगल थांबवणे (हिंदू-मुस्लिम-शिख) यांच्यात सलोखा निर्माण करणे, मुस्लिमांना दिल्लीत पुर्वी सारखी वागणूक-सुरक्षा मिळेल ही हमी घेणे.
२. उर्वरीत ५५ कोटी पाकिस्तानला तात्काळ देणे (घातलेल्या अटी विसरून) .

नेमकं तसंच झालं. पहिलं कारण विविध गटांनी/नेत्यांनी दुर केलं(१८ तारखेला हमीपत्र देउन).
आणि दुसरं कारण भारत सरकारनी दुर केलं १५ तारखेला निर्णय घोषीत करून.
------------------------------------------
आता या पत्रांच्या सत्यते बद्दल जर कोणाला शंका असेल तर ही त्यांची समस्या मला मात्र सत्यते बद्दल काहीच शंका नाही :)

नितिन थत्ते's picture

3 Jun 2010 - 4:52 pm | नितिन थत्ते

मिभो यंनी दिलेल्या दुव्यावर तुम्हाला ही माहिती कोठे आढळली त्याचा संदर्भ....उदा. पान नं/ अमुक तारखेचे भाषण/तमुक यांना लिहिलेले पत्र वगैरे दिला तर खूप बरे होईल.

नितिन थत्ते

समंजस's picture

4 Jun 2010 - 10:25 am | समंजस

नितिनसाहेब मला वाटलं तुम्ही ही चर्चा थांबवली आहे त्यामुळे तुम्हाला आता जास्तीच्या संदर्भांची गरज नसावी :)

माझ्या प्रश्नाचं उत्तर मला पान ४६५-४६६ वर सापडलं.....
[वैधतेबद्दल मला संशय नाही. हे भारत सरकारचं जाहिर निवेदन. या निवेदनाचं खंडन करणारं दुसरं कुठलही पत्र/निवेदन(तत्कालीन) माझ्या वाचण्यात आता पर्यंत आलेलं नाही]
तुम्हाला आणि इन्द्रराजसाहेबांना धन्यवाद. तुमच्या दोघांमुळे ही चर्चा एवढी लांबली आणि मुद्देसुद झाली तसेच बरेचसे नवे संदर्भ/माहिती मिळाली. शालेय पुस्तकांमधून शिकलेल्या इतिहासा पेक्षा बराचसा इतिहास या मुळे कळला.

इन्द्र्राज पवार's picture

3 Jun 2010 - 1:03 pm | इन्द्र्राज पवार

श्री. मिभो यांना त्यातल्या त्यात श्रीमती प्रतिभा रानडे यांनी दिलेली कारणमीमांसा काही प्रमाणात पटली असेल असे मी गृहीत धरतो.... (त्यात "त्यावर माऊंटबॅटन यांनी गांधीजींना सुनावले, की तुम्ही तत्वाची, नैतिकतेची भाषा करता आणि दुसरीकडे पाकिस्तानचे ठरलेले ५५ कोटी देणेही बाकी आहे. त्यावर गांधीजींनी हे पैसे देण्यास आपली हरकत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यांची हे पैसे देण्यास हरकत नव्हतीच. पण उपोषणाचा मूळ उद्देश मात्र ५५ कोटी देण्यासाठी नव्हता.") अशी टिपणी आहे....!!

चला इथपर्यंत तर आलो आहोतच की...."गांधीजींनी हे पैसे देण्यास आपली हरकत नसल्याचे सांगितले..." ~~ या बिंदूवर थोडी "जर-तर" ची भाषा वापरली तर चालेल का, भाऊ? ~ समजा तो विविध समाजाच्या १३० नेत्यांनी सही करून आणलेला एकात्मतेच्या "हमीपत्रा" चा कागद गांधीजींच्यासमोर ठेवला आणि त्याचवेळी नेहरू आणि पटेल यांनी सांगितले असते की, जोपर्यंत पाक आपले घुसखोर सैन्य काश्मिर घाटीतून काढून घेत नाही तोपर्यंत आम्ही ते ५५ कोटी रुपये अडवून ठेवणारच ! अशावेळी तुम्हाला का वाटते गांधीजी असे म्हटले असते, "ठिक आहे, तुम्हाला वाटेल ते करा.... मला फक्त दिल्लीतील दंगलीची काळजी वाटत आहे, ती आता या हमीपत्रामुळे मिटली....मी आता उपोषण सोडतो."

याला जर तुमचे उत्तर "होय. असे नक्कीच झाले असते..." तर मग हा वादच संपला.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नितिन थत्ते's picture

3 Jun 2010 - 1:19 pm | नितिन थत्ते

हो. आता वाद संपवूनच टाका.

एक दुसरी घटना सांगतो. (गांधी चित्रपटाच्या स्क्रीनप्ले मध्ये आहे. त्याच्या सत्यतेबाबत इतर पुरावा आत्ता माझ्याकडे नाही).

द. आफ्रिकेतील आंदोलनानंतर सरकारने कायदा मागे घेतला. त्यावेळी "पण यापुढील दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकांच्या देशांतरावर - इमिग्रेशन- कडक निर्बंध घालण्याचा सरकार विचार करेल" अशी धमकी जनरल स्मट्स यांनी दिली. त्यावेळी गांधींनी दिलेले उत्तर असे. "इमिग्रेशन हा आमचा मुद्दा कधीच नव्हता. आता आम्ही वरचढ स्थितीत आहोत - पोझिशन ऑफ अ‍ॅडव्हान्टेज- म्हणून तो मुद्दा बनवण्याची आमची इच्छा नाही".

(बैठकीनंतर गांधी तेथून निघून जात असताना जनरल स्मट्स आपल्या सहकार्‍याला - चित्रपटात- म्हणतात, "ही इज आयदर अ ग्रेट मॅन ऑर अ कोलोसल फ्रॉड")

हे पाहता ज्या मुद्द्यासाठी उपोषण केले नाही त्याचा आग्रह गांधींनी उपोषण सोडण्यासाठी घेतला नसता असे दिसते.

नितिन थत्ते

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 1:27 pm | मिसळभोक्ता

आपल्या लिखाणात इतके "जर तर", इतकी गृहीतके, आहेत की आपल्याला नक्की म्हणायचे आहे ते मला कळत नाही. तुम्हाला तरी नक्की कळते आहे का ?

पण तरी देखील तुम्हाला, का कुणास ठावूक, मदत करावीसी वाटते आहे. (एक विनंती. सर्वसाक्षी, अथवा समंजस किंवा असेच इतर सदस्य आपापल्या छात्या फुगवून पुढे आलेत, तर त्यांना इतिहासाबद्दल आठवण करून द्याल का?)

सो, नाऊ, मिष्टर इंद्र, मला कृपया दोन पत्रे दाखवा. एकः दिल्लीतील दंगल मिटली म्हणून गांधीजींनी उपोषण मिटवले असा पुरावा (तुम्ही सांगितले त्याप्रमाणे सौ. प्रतिभा रानडे ह्यांचे पत्र). दुसरे: श्री/सौ/कु इंद्र ह्यांनी छातीठोकपणे सांगितलेले हमीपत्र.

(ही दोन्ही पत्रे तुमच्याकडे नाहीत, हे मला माहिती आहे. कारण... दोन्ही दाखवा मग सांगीन.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मी ऋचा's picture

3 Jun 2010 - 2:56 pm | मी ऋचा

अवांतरः मिभो काका, तुमचे मुद्दे जर तुम्च्यापुरते स्पष्ट अहेत आणि ते इतरांनी समजुन घ्यावे अशी आपली इच्छा असेल तर तुम्ही ते योग्य शब्दात आणि इतरंच्या मुद्द्यांचा आणि इतरांचा योग्य मान राखुन सांगावे,तर तुमचे मुद्दे जास्त seriously विचारात घेतले जातील अन्यथा शायरीपेक्षा अन्दाज-ए-बयाँ जास्त लक्ष वेधतो आहे आणि चर्चेचे उद्दिष्ट गाठण्यापासुन आपण भटकतो आहे. इंद्रराज दादांचे मुद्दे निश्चितच अभ्यासपूर्ण आहेत पण त्याही पेक्षा त्यांची मुद्दे मांडण्याची पद्धत अतिशय सोबर आहे. त्यामुळे please let's try to maintain mutual dignity.

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

ज्ञानेश...'s picture

3 Jun 2010 - 3:11 pm | ज्ञानेश...

(कठीण आहे, पण तरी...) या मिभोला आवरा रे कोणीतरी !!

बाकी इन्द्रा द टायगर यांच्या संयमाचे कौतुक वाटते.
(त्यांनीही संयम सोडला, तर अजून मजा येईल.) ;)

मी ऋचा's picture

3 Jun 2010 - 3:53 pm | मी ऋचा

=))

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

इन्द्र्राज पवार's picture

3 Jun 2010 - 4:18 pm | इन्द्र्राज पवार

श्री. नितिन थत्ते म्हणतात ~~~ "हो. आता वाद संपवूनच टाका."... तर मी हे इथे मान्य करीत आहे.... कारण दोन्ही धाग्यात ("सावरकर" आणि "महात्मा") चर्चेची जी काय घागर घुमली आहे ती आम्हा दोघांमुळे असे मी व्यक्तीशः मानतो, त्यामुळे श्री.थत्ते यांनी या क्षणापर्यंत दाखविलेल्या संयमाचा आदर राखून इथे पूर्णविराम घेत आहे.

धन्यवाद...!!

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

कानडाऊ योगेशु's picture

3 Jun 2010 - 5:19 pm | कानडाऊ योगेशु

भावे - अत्रे वाद..
अत्रे-फडके वाद..
अत्रे-ठाकरे वाद..
ठाकरे-पु.ल वाद
अश्या एकसेबढकर एक वाद इतिहास असलेल्या मराठी साहित्यक्षेत्रातला थत्ते-पवार हा अजून एक वाद संपला.. ;)

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

आंबोळी's picture

3 Jun 2010 - 5:42 pm | आंबोळी

मराठी साहित्यक्षेत्रातला थत्ते-पवार हा अजून एक वाद संपला.

अरेरे.... म्हणजे आता परत नव्या झाडाच्या शोधात निघावे लागणार....
दुर्बिणीतून अशी लांबची झाडे लगेच दिसतात म्हणे... कुणाला दिसले तर कळवा रे....

आंबोळी

वेताळ's picture

3 Jun 2010 - 5:46 pm | वेताळ

बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल,हा त्याचा बाणा आवडला.
मिभो काकांच्या लिखाणातुन स्पष्ट होते आहे कि त्याना अमेरिकेतील कोर्टकचेर्‍याचा खुप अनुभव आहे व त्याच्या अश्या विरजण घालण्याचा फटका देखिल पडला असावा असे वाटते. :\
त्यामुळे इतरानी संभाळुन राहवे.

वेताळ

नितिन थत्ते's picture

3 Jun 2010 - 5:49 pm | नितिन थत्ते

थत्ते-पवार असा काहीच वाद नव्हता असे वाटते.

नितिन थत्ते

रामपुरी's picture

4 Jun 2010 - 2:48 am | रामपुरी

तो थत्ते-पवार वाद नव्हता तर "७ महिने अमेरीकन नागरीक" - पवार वाद होता :) :). प्रतिसाद गुणिले १००० $ (की आणखीन जास्त???) एवढं प्रचंड नुकसान झालंय या वादातून.

आनंद's picture

3 Jun 2010 - 6:33 pm | आनंद

खालच्या साइट वर व्ही. कल्याणम , पर्सनल सेक्रेट्र्री महात्मा गांधी यांनी
गांधीजीच्या शेवटच्या दिवसा विषयी लिहीतात...

http://www.mkgandhi-sarvodaya.org/last%20days/glastday.htm

Bomb Explodes at Gandhiji’s Prayer Meeting
There was a bomb explosion at the prayer meeting on 20 January. Madan Lal, the Punjabi refugee had thrown a bomb, but it didn’t hit him. A wall was broken that’s all and Gdhi never thought somebody had come to kill him. Gandhiji had undertaken a fast against the Government of India’s decision to hold back payment of Pakistan’s share of the cash balances (Rs. 50 Cr) due to them on the ground that Pakistan had connived with the Afridi tribesmen to invade and occupy Kashmir. To save Gandhiji’s life, the government relented and released the amount. Fundamentalist Hindus were infuriated by Gandhiji’s tactics and felt that he was appeasing Muslims to the detriment of the Hindu community. The bomb incident referred to was a consequence of this

बाकी काही बोलायसारख राहयलच नाहीय.

--आनंद

अहो आनंद साहेब,
हा प्रतिसाद आधीच नाही का देवून टाकायचा? उगाचच मजा बघत बसता का राव?

तरी सुद्धा,

कल्याणम हे जरी गांधीजींचे पर्सनल सेक्रेट्र्री असले (पुरावा काय?) तरी गांधीजी त्यांच्याशी सहमत असतीलच असे नाही ... =))

नितिन थत्ते's picture

3 Jun 2010 - 10:06 pm | नितिन थत्ते

=)) =)) =))

अहो ती सगळी कल्याणम यांनी सांगितलेली The bomb incident referred to was a consequence of this
या वाक्याची पार्श्वभूमी आहे.

असो.
१. कल्याणम हे गांधींचे सेक्रेटरी होते हे खरे आहे.
२. पुन्हा एकदा...... गांधींचे म्हणणे काय याविषयी सेक्रेटरींचे म्हणणे आणि गांधींचे स्वतःचे म्हणणे यात तफावत असेल तर कोणाचे म्हणणे ग्राह्य?

(अवांतर: जब बच्चा बच्चा जानता है की ते ५५ कोटी रुपये होते...श्री. कल्याणम ५० कोटी का म्हणताहेत बरे? त्यांच्या स्मरणात काही चूक असेल का?)

नितिन थत्ते

ऋषिकेश's picture

3 Jun 2010 - 11:40 pm | ऋषिकेश

जरी दोन्ही मुद्दे ग्राह्य धरले तरी हा नवा पुरावा मला अचंबीत तर करतोच शिवाय पुन्हा एकदा माझ्या मतावर विचार करायला भाग पाडतोय.

याबद्दल शंकानिरसन करण्यासाठी मी त्या वेबसाईटवर दिलेल्या पत्त्यावर इमेल केला आहे. बघु काय प्रतिसाद येतो ते.

तो पर्यंत ह्या पुराव्यामुळे मी तुर्तास माझे जुने मत सोडून तटस्थते पर्यंत येत आहे.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

आनंद's picture

4 Jun 2010 - 12:22 am | आनंद

श्री कल्याणम् ८८ वर्षाचे असुन अजुन एक्टीव आहेत.(मार्च २०१० पर्यंतचा रेफ.)
त्याच्यांशी संपर्क साधता येतोय का ते बघतोय.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Jun 2010 - 11:56 am | llपुण्याचे पेशवेll

+१.
मी पण माझं मत पुरून पुढे येणार्‍या पुराव्याची नवीन मत बनविण्यासाठी वाट पाहत आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

मी_ओंकार's picture

4 Jun 2010 - 10:41 am | मी_ओंकार

सदर संकेतस्थळ नजरेखालून घातल्यावर ही माहिती देखील मिळाली.

http://www.mkgandhi-sarvodaya.org/fact.htm

The following facts dissolve this much touted thesis that Gandhiji had fasted to bring moral pressure on government of India to relent.:

1.

Dr. Sushila Nair, as soon as she heard Gandhiji proclaim his decision, rushed to her brother Pyarelal and informed him in a huff that Gandhiji had decided to undertake fast till the madness in Delhi ceased. Even in those moments of inadvertence the mention of 55 crore of rupees was not made which clearly proves that it was not intended by Gandhiji.
2.

Gandhiji's own announcement about his resolve on 12th January in the evening prayer meeting did not contain any reference to it. Had it been a condition, he would have certainly mentioned it as that.
3.

Similarly, there was no reference to it in his discourse on 13th January.
4.

Gandhiji's reply on the 15th January, to a specific question regarding the purpose of his fast did not mention it.
5.

The press release Of the government of India did not have any mention thereof.
6.

The list of assurances given by the committee headed by Dr. Rajendra Prasad to persuade Gandhiji to give up his fast did not include it.

We hope these facts should put at rest the 55 crore concoction at rest.

याच्या वरचे दोन परिच्छेदही या संबधात आहेत.