गुरुविण कोण दाखविल वाट ?
संवेदनाशील व्यक्तिमत्वच चाकोरीबाहेरील जीवनाचा विचार करु शकते. प्राप्त जीवनात काहीतरी करायचे आहे या ध्येयवादाने पछाडले गेलेले असे व्यक्तिमत्व मग गुरुच्या शोधास लागते.
एकदा खात्री झाली की आपणाला याच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे की मग नकळत गुरु-शिष्यांचे नाते निर्माण होते. प्रेम व भक्ति जागृत होते. श्रध्दा बसते. श्रध्देमध्ये जबरदस्त शक्ति असते. आत्म-विश्वास निर्माण होतो. आणि नकळत शिष्याची मजल गुरुच्याही पुढे जाते.
गुरुपासून ज्ञानप्राप्ती करुन घेत असता शिष्याची अभ्यासू वृत्ती वृध्दिंगत होते. पर्यायाने इच्छित ज्ञानाबरोबरच तदानुषंगिक इतर ज्ञानांचा फुलोरा फुलत जातो. शिष्याचे व्यक्तिमत्व बहरले जाते आणि मग नकळत जिज्ञासूंमध्ये चर्चा सुरु होते की, श्री रामकृष्ण परमहंस मोठे की स्वामी विवेकानंद..................
जनार्दनस्वामी श्रेष्ठ की संत एकनाथ ! गुरु निवृत्तिनाथाची महती मोठी की संत ज्ञानेश्वर माऊलीची ?
खरे म्हणजे या प्रश्नाचे उत्त्तर आधी बी, का आधी झाड... एवढे अवघड आहे. गुरु आणि शिष्य यांचा मोठे पणा मोजायला कोणतेही व्यावहारिक परिमाण उपयोगी पडत नाही. पण त्यातील महत्त्वाचा मुद्दा एकच गुरुशिवाय ध्येयवादी व्यक्तिमत्वाला पर्याय नाही. मग असा गुरु भेटतो केव्हा? कोठे? कसा? वगैरे वगैरे.
याचे उत्तर अगदी सोपे आहे. तुमच्या घरातही तुम्हास आईच्या रुपाने, भाऊ अगर वडिलांच्या मार्गदर्शनाने, शिक्षकांच्या ममतेने गुरुछत्र लाभू शकते. क्रीडांगणावरील अगर रंगभूमीवरील अनुभवी कलाकार, हेही त्या क्षेत्रातील गुरुच होत. लो. टिळक, म. गांधी, स्वा. सावरकर हे आजच्या अनेक राजकीय पुढार्यांचे गुरुच होते. म्हणजे गुरु हा फक्त आध्यात्मिक क्षेत्रापुरताच मर्यादित नाही. तर जीवनाच्या प्रत्येक प्रक्रियेशी त्याचा निकटचा संबंध असू शकतो.
यासाठी संवेदनाशील व्यक्तिमत्वाला जरुरी आहे मनोनिग्रहाची, श्रद्धेची , भक्तिची, प्रेमाची .त्याच बरोबर आवश्यकता आहे चिकाटी व प्रामाणिकपणाची. या गुणांसह डोळस व अभ्यासू दृष्टीने वाटचाल केल्यास योग्य गुरु लाभू शकेल. आणि मग ध्येयप्राप्ती दृष्टिपथात येऊ शकेल. आज समाजातील कोणत्याही क्षेत्रात र्कीर्तिशिखरावर विराजमान झालेल्या व्यक्तिचा इतिहास पडताळून पाहता त्याच्या यशाचे रहस्य हे, हे त्याच्या अचूक गुरुप्राप्तीत असल्याचे आढळून येईल. आणि म्हणुनच हे सत्य आहे की ...........
गुरुविण कोण दाखविल वाट ?
संजिव
प्रतिक्रिया
28 Mar 2008 - 8:27 am | प्राजु
गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णु गुरूर्देवो महेश्वरः।
गुरू: साक्षात परःब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥
- (सर्वव्यापी)प्राजु
28 Mar 2008 - 8:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संजिव साहेब,
आयुष्याच्या वाटेवर प्रवास करतांना मार्गदर्शकाची गरज असते. आपण म्हणता त्या प्रमाणे जीवनाच्या प्रत्येक प्रक्रियेशी त्याचा निकटचा संबध असु शकतो नव्हे, असतोच.
शिक्षक व गुरु याच्यात फरक असतो. शिक्षक पोट भरण्याची कला शिकवतो. तर गुरु हात धरुन जीवनाच्या अंगणात घेऊन जातो व जीवन जगणयाची कला शिकवतो. गुरुकुलातील जीवन केवढे अद्भुत असेल. आपल्या लेखनाने आम्हाला गुरु सांदिपनि आणि त्याचा शिष्य श्रीकृष्णाची आठवण झाली. असो,
भाग लहान झाला आहे, असे वाटले. गुरु कोण ? गुरुचे वैशिष्टे ? गुरु करणे ? असेही चिंतन आले असते तर, या लेखनाची उंची अधिक वाढली असती असे वाटते. पुढील लेखनास शुभेच्छा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
28 Mar 2008 - 8:39 am | विसोबा खेचर
संजिवराव, आपला छोटेखानी लेख चांगला आहे!
गुरुशिश्य परंपरा आम्हीही खूप मानतो. आम्ही वैयक्तिरित्या काही व्यक्तिंना आमचे गुरू मानले आहे आणि आजपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खूप काही मिळालेले आहे..
परंतु..
आपल्या वैभवशाली गुरुशिष्य परंपरेमध्ये एक गोष्ट मात्र (अर्थात, ती खरी असेल तर!) खूप खटकते. ती म्हणजे ज्या एकल्व्याने द्रोणाचार्याला मनोमन गुरू मानले आणि साधना केली त्याच हलकट द्रोणाचार्याने एकलव्याकडे धनुष्यबाण चालवण्याकरता ज्याची अत्यंत गरज असते असा आंगठाच कापून मागितला! आता बोला..!
अवांतर - व्यास हा जगत्गुरू आहे अश्या अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे. मी मात्र व्यक्तिश: त्या आठ आठ दिवस साधी अंघोळही न करणार्या गोसावड्याला माझा गुरू मानत नाही! :)
धन्यवाद,
आपला,
(अण्णा, बाबूजी आणि भाईकाकांचा मानसशिष्य) तात्या.
28 Mar 2008 - 8:46 am | सन्जोप राव
मध्ये एका मराठी संकेतस्थळावर एका महिलेने (किंवा महिलेच्या नावाने लिहिणार्याने) दारुबंदी, दारुची दुकाने फोडणे, व्यसनमुक्ती अशा विषयांवरील लेखांची बरसात केली होती. तंतोतंत त्याची आठवण झाली. लेख फारच आवडला. आपण अशाच जोशाने लिहीत रहाल अशी आशा आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
(तेवढं ते 'संजिव' मधलं 'जी' दीर्घ करता येतं का पहा. एक शैली म्हणून असेल तर ठीक आहे. विषय जरा घरचा आहे.)
सन्जोप राव
28 Mar 2008 - 9:41 am | आर्य
गुरु हा फक्त आध्यात्मिक क्षेत्रापुरताच मर्यादित नाही..................मग विविध क्षेत्रात /वेगवेगळ्या प्रयोजना करीता अनेक गुरु असू शकतात नही का?...........मग तुमच्या निष्ठेचे कय ?
गुरु या शब्दा खरा अर्थ जणुन घेण्याची गरज आहे ....................सद्य स्थितीत हा अर्थ /व्यप्ती फक्त आध्यात्मिक क्षेत्रापुरताच मर्यादित आहे. तुम्ही दिलेले दखले हि हेच सांगतायत........
ध्येयप्राप्ती दृष्टिपथात येऊ शकेल...........ध्येय कोण ठरवणार ? गुरु की शिष्य ?
मार्गदर्शनाची आवश्यकता - गुरु-शिष्यांचे नाते - प्रेम व भक्ति - श्रध्दा बसते- आत्म-विश्वास आणि मग गुरुला ओव्हरटेक........तदानुषंगिक इतर ज्ञानांचा फुलोरा फुलत जातो.........न पटण्या जोगा सिद्धांत आहे.
श्रध्दा नसेल तर भक्ति करणे फार कठिण आहे. नात्यातून प्रेम / स्नेह ठिक आहे पण तुम्ही ती थेट भक्तीच केलीत.
आणि हा फार मोठा टप्पा जो कि आपण ऐका दमात गठलाय...........काय हा आपला अनूभव आहे? कि ग्रंथ हे गुरु....
पण हे मान्य कि गुरु ची ऊंची हि शिष्या वरुन ठरवतात ............पण गुरुची विद्या गुरुला फळली तर ???
आपल्या मागील लेखातील "गुरुविण कोण लाविल वाट " या माझ्या प्रश्ण आद्याप अनुत्तरीत आहे ?
28 Mar 2008 - 10:03 am | विजुभाऊ
चांगला गुरु मिळाला तर ठीक आहे अन्यथा गुरुवीण कोण लावील वाट असे होते.
बर्याचदा हेच खरे असते... पहा तारे जमीन पर........
28 Mar 2008 - 9:20 pm | मनापासुन
गुरुवीण कोण लावील वाट ...........हे पटले....
"पुर्ष्या शिंच्या.......ती शीडी आडवी का काढलीस् " बघताँय ह मी बघताँय तो डुक्कर त्या गाढवाच्या कानात काय सांगतोय ते बघताँय मी "
मनापसुन पटले