दुर्ग आणि ढाकोबा संदर्भातील काही क्वेरीज

अप्पा जोगळेकर's picture
अप्पा जोगळेकर in काथ्याकूट
1 Jun 2010 - 9:03 am
गाभा: 

दुर्ग आणि ढाकोबा यांच्यातले अंतर किती आहे? (म्हणजे किती वेळ लागतो चालत ?) दुर्गला जाण्यासाठी डोणेदार आणि खुटेदार असे दोन घाटरस्ते आहेत असे कळले. ते कितपत अवघड आहेत? म्हणजे क्लाईम्ब आहे की नुसतीच दमछाक करणारी वाट आहे. (खुटेदार ला सहा सहा फूटाच्या अंतरावर खिळे मारलेत असं ऐकलंय म्हणून विचारतो आहे.) ढाकोबाहून दार्‍या घाटातून कोकणात उतरण्यासाठी किती वेळ लागतो ? आणि तो घाटरस्ता कितपत अवघड आहे ? दुर्गजवळ्चे मंदिर मुक्कामास योग्य आहे का ?
('डोंगरयात्रा' चाळून पाहिलं पण त्यात वाट कितपत अवघड आहे ते दिलेले नाही. ) ढाकोबा ते आंबोली हे अंतर किती आहे ?
-माहितगारांनी मार्गदर्शन करावे.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 Jun 2010 - 9:53 am | प्रचेतस

दुर्ग ते ढाकोबा यांमधील अंतर ४ ते ५ किमी आहे. अंदाजे २.५ ते ३ तास लागतात. दुर्गवरील मंदिर मुक्कामास अति सुंदर आहे. आजुबाजूला घनदाट झाडी, निरव शांतता आहे. डोणीदारालाच तिरंगी घाट अथवा त्रिगुणधारी घाट असेही म्हणतात. घाट तसा सोपा आहे. पण पावसाळ्यात इथून जरूर जा. मध्ये एक अतिभव्य सुंदर धबधबा येतो. खुटेदाराची वाट अवघड आहे. दोराची तशी गरज नाही पण असलेला बरा.
डोणीदार आणी दार्‍या घाट हे दोघेही नाळेतून असल्याने सुरुवातीला अतिशय खडी उतरण आहे. कोकणात उतरायला २ ते ३ तास लागतातच. अर्थात घाटावरून कोकणात उतरायचे म्हणजे जवळजवळ ३५०० फूट उतरतांना कुठल्याही घाटांतून तेव्हडा वेळ लागतोच.
पावसाळ्यात मात्र दार्‍या घाट आणी खुटेदार टाळा.

अवांतरः आनंद पाळंदे यांचेच चढाई उतराई सह्याद्रीतील घाटांची हे पुस्तक विकत घ्याच. सह्याद्रीतील घाटवाटांची यात भरपुर माहिती मिळेल.