गाभा:
गणपतीपुळे ला पुण्याहून जायचे आहे. पुढच्या आठवड्यात.
कसे जायचे म्हणजे प्रवास सोयीस्कर होईल?
तेथे किती दिवसांत बघून होते? आसपास अ़जून बघण्यासारखे आहे का?
मध्यमवर्गाला परवडण्यासारखे हॉटेल / गेस्ट हाऊस वगैरे याबद्दल माहिती हवी आहे.
इंटरनेटवर हे सर्च करुन माहिती मिळेल याची मला कल्पना आहे.
पण, जे मिसळपाव चे वाचक आधी जावून आलेले आहेत ते याबाबत अधिक माहिती सांगू शकतात म्हणून येथे धागा टाकतो आहे.
प्रतिक्रिया
29 May 2010 - 10:26 pm | babadi manjar
आम्ही काही वर्षाआधी गेलेलो गणपतीपुळ्याला .पुण्यावरून आमची ओम्नी मारुती कार होती ,प्रवास लांब आहे
१० तास लागले.तिथे गेल्यावर MTDC चे cottages मध्ये जागा मिळाली नाही.ते फार छान आहेत .तरी तुम्ही MTDC
चे cottages पुण्यावरून बुक केले तर बरे होईल.मंदिर सुरेख आहे.बाकी आम्हाला फार वेळ लागला हॉटेल बुक karaila ,
कारण जाम गर्दी.प्रचंड उकाडा आहे तिकडे .पण फार निसर्गरम्य आहे.तिथून आम्ही पावस ला गेलेलो.नंतर जंजिरा बघितला
रत्नागिरी पण जवळ आहे .आम्ही नंतर हरिहरेश्वरला गेलेलो.फार सुंदर आहे पण भयाण आहे असा एक माझा अनुभव .
मंदिर प्राचीन आहे .सगळीकडे rahaichi बर्या पैकी व्यवस्था आहे.एक आवर्जून सांगावेसे वाटते हे सगळे किनारे pohaila
योग्य नाही.आम्ही होतो तेव्हा हरिहरेश्वरला दुर्घटना zhali .सगळ्यांना वाटते पाणी deep नसेल पण तसे नाही आहे
तरी सोबत लहान किंवा तरुण उत्साही मंडळी असेल तर काळजी घ्यावी .बाकी इतके अप्रतिम सौंदर्य कुठेच नाही .
29 May 2010 - 10:54 pm | सुनिल पाटकर
गणपतीपुळे ला पुण्याहून जाण्यासाठी ताम्हानी घाट मार्गे माणगाव व गोवा हायवेने रत्नागिरीच्या अलिकडुन रस्ता आहे.प्रवास सोयीस्कर आहे रस्ता चांगला आहे.सुंदर समुद्र किनारा , किना-या लगत गणपती
मंदीर आहे, २ कि.मी वर केशवसुतांचे मालगुंड गाव आहे. प्राचीन कोकण भव्य जागेत उभारलेले आहे,ते पहाण्याजोगे आहे.MTDC चे cottages महागडे आहे. घरगुती राहण्याची सुविधा आहे. मंदीराचे भक्तनिवास राहण्यासाठी मिळते.गर्दीच्यावेळी गणपतीपुळे ला जाऊ नये.रत्नागिरी ,स्वामी स्वरुपानंदांचे पावस पाहून घ्यावे .स्वतःची गाडी असल्यास मार्लेश्वर .पर्शुराम्.डेरवण पाहता येइल.
30 May 2010 - 12:20 pm | अजय देशपांडे
HOTEL SIDDHI palace soy chan ahe magachay varshicha opnining zale ahe mala service chan mailali vishes manaje agadei chaturthi divashi mala ukadiche modak milale ratri 10.30 vajata sankshti sodatana phone no (02357) 235599/ 9422631199 Mr.Mahesh Kedar
ajay deshpande solapur
9890582788
30 May 2010 - 12:32 pm | अजय देशपांडे
30 May 2010 - 1:10 pm | ऋषिकेश
कोणाला माहित आहे का की दाभोळच्या फेरी बोटीतून १४ सीटर मिनी-बस नेता येते का?
आणि ही फेरी वर्षभर चालु असते का?
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
31 May 2010 - 12:21 pm | नितिन थत्ते
१४ सीटर बस नेता येते असे वाटते. आम्ही २००९ दिवाळीत गेलो होतो.
मी फोटो शोधत आहे. तो पाहून सांगेन.
नितिन थत्ते
31 May 2010 - 11:49 am | निमिष सोनार
धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल!
माझ्या ब्लॉगला जरुर भेट द्या-
http://nimishthinkcity.blogspot.com
4 Jun 2010 - 11:13 am | मड्डम
गणपतीपुळे आणि कोकण पर्यटनाबद्दल आपल्याला अधिक माहिती येथे पाहता येऊ शकेल.
मराठी आणि मायभूमीचा अभिमान असलेला मायभूमी
4 Jun 2010 - 9:29 am | दीपक साकुरे
MTDC चे कोन्कनी hut खुपच छान आहेत... बीच च्या अगदी समोर आहेत आनी नारळाच्या झाडान्च्या मधोमध... खुपच छान , पन बूकिन्ग लवकर करुन घ्यावी लागते...
4 Jun 2010 - 9:10 pm | संजीव नाईक
होय, काही काळजी करु नये,
श्री गणपतीला भेटण्यास निघण्या पुर्वी आपल्या गाडीची पूर्व तांत्रिक तपासनि करुन घ्यावी ही विनंती,
पुणे सोडताना कोणी कीतीही सांगीतले तरी लावासा "सीटी मार्गातून जाऊ नये. रोडचे काम सुरु आहे.
पुणेसोडल्या नंतर माणगावा पर्यंत मध्ये कोठेही आपणास कोणाचे सहकार्य मिळण्याची अपेक्षा नसावी कारण वर्दळ फ़ार कमी आहे.
सुट्टीच्या दिवशी वाहानाची वर्दळ असते. वाटेत जाताना निसर्ग सौदर्य फ़ार मनमोहक आहे. पण एक काळजी घ्यावी ती म्हणजे बुशी डॅमच्या तलावात उतरु नये. चिखल व सरपटणारे प्राणी , तसेच मगर/सुसर असण्याची संभावणा आहे. साधारण ७० कि.मी. पर्यंत पाण्याची /खाण्याची व्यवस्था तसेच ( गाडीच्या पेट्रोल ची व्यवस्था ) नाही. मध्ये कोठेतरी एखादी टपरी आहे.
माणगाव वरुन सुध्दा आतल्या रस्त्याने गणपती पुळ्याला जाता येते. वाटेतील निसर्ग सौदर्य फ़ार मनमोहक आहे. वरील प्रकारे काळजी घ्यावी ह्या रस्त्याला सुध्दा मदत मिळणे कठिण काम आहे. पण लोंकवस्ती आहे.
ह्या मार्गाने जात असताना आपणास १० हाताचा ( दशभुजा )गणपत्तीचे दर्शन होईल . तसेच फ़ार पुराण काळातील सुर्य मंदिर सुध्दा बघण्यास मिळेल.
कोकण दर्शन हे पुस्तक जरुर वाचावे. बरीच ठिकाणे व रस्ते ह्यांच्या विषयी माहीती मिळेल.
जर कोठे आपणस मद्दत हवी असल्यास जरुर संपर्क साधावा. हा रस्ता माझ्या आवडीचा आहे.
संपर्क क्रंमाक ९४२३०८६७६३ / ९८६९००८२६३
महत्वाची टिप :- सोबत पाणी, खाण्याचे पदार्थ, सोबत जरुर ठेवावे, न लागो दुस-या कोणाला तरी रस्त्यात मद्दत मिळेल.
संजीव
http://vastuclass.blogspot.com
4 Jun 2010 - 9:25 pm | मेघवेडा
ऋषीच्या प्रश्नाला उत्तर देताय नं.. मंग लवासा सिटी, भुशी डॅम कुठून आलं? का अंमळ गल्ली चुकलं राव? ;)
>> माणगाव वरुन सुध्दा आतल्या रस्त्याने गणपती पुळ्याला जाता येते.
आँ?? हे काय आता नवीन? माणगाव कुठे.. गणपतीपुळे कुठे? काय राव? आणि दशभुजा "गणपत्ती" कुठाय हा? हेदवीचा 'दशभुज लक्ष्मीगणेश' माहिती आहे, त्याबद्दलच बोलताय का?
>> हा रस्ता माझ्या आवडीचा आहे.
कुठला रस्ता तुमच्या आवडीचा आहे ते लिहिलंच नैये तुम्ही!!:D
>> महत्वाची टिप :- सोबत पाणी, खाण्याचे पदार्थ, सोबत जरुर ठेवावे, न लागो दुस-या कोणाला तरी रस्त्यात मद्दत मिळेल.
नुसता हसतोय हे वाचून!! अहो कुणीही ठेवतंच या गोष्टी!
असो. प्रतिसाद वाचून करमणूक झाली!! =)) =))
4 Jun 2010 - 9:24 pm | मेघवेडा
(प्रकाटाआ)
4 Jun 2010 - 9:23 pm | मेघवेडा
(प्रकाटाआ)
5 Jun 2010 - 2:12 am | jaypal
किना-यावर पोहायला जाताना खुप खुप खुप काळजी घ्या. खुप जणांनी अपघातात प्राण गमावले आहेत. :S प्रावासास शुबेच्छा
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/