अरे कोणीतरी भीती दाखवाल का?

sagarparadkar's picture
sagarparadkar in काथ्याकूट
28 May 2010 - 4:25 pm
गाभा: 

गेली कित्येक वर्ष मी असा एखादा तरी अनुभव, कथा, किंवा चित्रपटाच्या शोधात आहे ज्यामुळे जरा तरी भीती वाटेल.

८वी-९वीत असेपर्यंत जरा भीती वाटेल असे सिनेमे निदान इन्ग्लिश्मधे तरी येत असत, जसे की Exorcist, Omen, Evil Dead वगैरे वगैरे.

माझ्या आत्त्याची एक मैत्रीण तेव्हा पुण्यात ओब्झर्वेट्रीत नोकरीला होती. एका शनिवारी हाफ्-डे नंतर ती ऑफिसच्या समोरच्याच 'राहूल' ला 'The Exorcist' बघायला गेली. संध्याकाळी घरी गेल्यावर तिला आपल्याच घरातील बाजूच्या खोलीत जायची पण भीती वाटत होती ...

पण नंतर हॉलिवूड्ला पण माण्साच्या भीती आणि किळस या दोन वेगवेगळ्या भावना असतात याचा विसर पडू लागला बहुतेक Poltergeist, Mummy etc. इथे "पण" असे म्हणायचं कारण असं की हिन्दी फिल्म्स बद्दल माझं हेच मत अगदी ५वी-६वीतच नक्की झालं होतं.
तर सांगायचा मुद्दा हा कि चित्रपट बघून भीती वाटणं कधीचच थांबून गेलं.

बरं एखाद्याचा भुताटकीचा अनुभव किंवा गोष्टी ऐकाव्यात म्हणलं तर त्यांतील फोलपणा लगेचच जाणवू लागला. बरं कोणीही 'मी स्वतः असा अनुभव घेतलाय' असं सांगणारं भेटलंच नाही. प्रत्येक जण सांगत असे ते "आमच्यायेथील अमुक तमुक चे गावाकडील नातेवाइक सांगत होते" अश्या प्रकारचे अनुभव कथन असे. आणि जे छातीठोकपणे स्वतःचा अनुभव म्हणून सांगत तो आधीच कोणाकडून तरी ऐकलेला असे किंवा मग बहुतेक वेळेला अशा व्यक्तीला कोणते ना कोणते व्यसन तरी असणारच. मग हा अशाच कुठल्या तरी "तारेत" असताना त्याला हा असा अनुभव आला असेल असं वाटत राही.

हेच सर्व विचार एखादी भयकथा ( 'पिवळ्या दारापलीकडे' वाचलंय का कोणी?) वाचताना मनात येणार. तात्पर्य काय की आता 'हॉरर' ही भावनाच एन्जॉय करता येत नाहीये.

हा सर्व वयाचा परिणाम ( ४०+) कि माझंच कुठे काही चुकतंय? कारण हल्ली भुतापेक्षा माणूस प्राण्याचीच जास्त भीती (जर वाटली तर) वाटते ...

तुम्हाला पण असंच वाटतं का?

प्रतिक्रिया

गणपा's picture

28 May 2010 - 5:23 pm | गणपा

१ मिस्ड कॉल पहा.

नितिन थत्ते's picture

28 May 2010 - 5:28 pm | नितिन थत्ते

तुम्ही ४०+ म्हणजे गहराई (लागू, कोल्हापुरे, नाग) पाहिला असावा.

तो पाहताना मला थोडी भीती वाटली होती.

नितिन थत्ते

पक्या's picture

28 May 2010 - 10:05 pm | पक्या

+१
खूप भिती नव्हती वाटली पण सिनेमा चांगला वाटला होता. सिनेमाने भितीदायक वातावरण निर्मिती चांगली केली होती.
'वो कौन थी ' मध्ये मनोज कुमार हॉस्पीटल च्या बेड वर असतो, त्या खोलीत त्यावेळी कोणीच नसते आणि त्याचे लक्ष सहज वरच्या बाजू कडील खिडकी कडे जाते आणि क्षणात तिथे त्याला साधनाचा चेहरा दिसतो. त्याक्षणी तो टरकतो. आणि त्या एका क्षणी मला देखील टरकायला झाले होते
जय महाराष्ट्र , जय मराठी !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 May 2010 - 5:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"रामू की आग" पहा, नक्की भीती वाटेल!

झालंच तर 'भूत' पहा, भीती नाही वाटली तर पिच्चर नक्की आवडेल. पार्श्वसंगीत खत्तरनाक आहे.

अदिती

सुचेल तसं's picture

28 May 2010 - 5:35 pm | सुचेल तसं

डिसेंट, राँग टर्न, हिल्स हॅव आईज वगैरे बर्‍यापैकी भितीदायक आहेत.

भूत/पिशाच्च/हडळींनो - वाटते का हो तुम्हांस स्वतःची भिती , मध्यरात्री?

पंगा's picture

28 May 2010 - 5:48 pm | पंगा

भूत/पिशाच्च/हडळींनो - वाटते का हो तुम्हांस स्वतःची भिती , मध्यरात्री?

याचीच प्रतीक्षा होती! =))

धन्यवाद!

- पंडित गागाभट्ट.

अप्पा जोगळेकर's picture

30 May 2010 - 11:55 am | अप्पा जोगळेकर

राँग टर्न पाहिलाय. भाजी चिरतो तशी माणसं चिरली आहेत. नुसता रक्तामांसाचा चिखल . सिनेमाच्या सुरुवातीलाच एका बाईला उभं कापून तिच्या शरीराच्या दोन चिरफाळ्या करतात. त्यानंतर मेलेलं जनावर ओढत न्यावं तशा त्या दोन चिरफाळ्या ओढून घेऊन जातात खाण्यासाठी. हा सिनेमा पाहिल्यानंतर या बाबतीतल्या माझ्या सगळ्या संवेदनाच मरुन गेल्या. आणि तेच व्हायला नको. कारण मनाच्या संवेदना जाग्या असणं हेच तर माणूसपणाचं लक्षण आहे. असे सिनेमे बॅनच केले पाहिजेत.

भडकमकर मास्तर's picture

28 May 2010 - 5:40 pm | भडकमकर मास्तर

" सरीवर सरी" हा मराठी सिनेमा पहा. खूप भीती वाटली होती मला हा सिनेमा पाहताना...( हा जर अ‍ॅवॉर्डविनिन्ग सिनेमा असेल तर कसं होणार मराठी सिनेमाचं?" अशी ती भीती) :)

सहज's picture

28 May 2010 - 6:35 pm | सहज

=))

पंगा's picture

28 May 2010 - 5:50 pm | पंगा

आरशात पहा.

प्रतिबिंब दिसले नाही, तर भीतीदायक. दिसले, तरीही...

(दोन्हीकडून विन-विन...)

- पंडित गागाभट्ट.

पांथस्थ's picture

28 May 2010 - 11:15 pm | पांथस्थ

मै भी येईच बोलनेवाला था!

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

राजेश घासकडवी's picture

28 May 2010 - 6:04 pm | राजेश घासकडवी

रुचिकाच्या जागी स्वत:ला कल्पून बघा...

भारद्वाज's picture

28 May 2010 - 6:44 pm | भारद्वाज

हे पाहा आणि घाबरण्याचा आनंद लुटा...
http://www.iam-she.com/contestantsdetails.php?id=2

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 May 2010 - 6:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"I am she" हे इंग्लिश वाचूनच मला भीती वाटली.

अदिती

भारद्वाज's picture

28 May 2010 - 6:58 pm | भारद्वाज

त्याचे मराठी भाषांतर 'मी शीssss आहे' असे (घाबरवण्याच्या दृष्टीने) करता येईल का? =)) =)) =))
जय महाराष्ट्र

स्वप्निल..'s picture

28 May 2010 - 7:36 pm | स्वप्निल..

"द ब्लेअरविच प्रोजेक्ट" म्हणून एक सिनेमा आहे .. बघा ..

पांथस्थ's picture

28 May 2010 - 11:18 pm | पांथस्थ

मला पण आवडला होता. आणि ज्या पद्धतीने तो चित्रित केला आहे, दर्शक पण गुंतत जातो आणि भीतीचा थोडाफार तरी अंमल होतो.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

संताजी धनाजी's picture

1 Jun 2010 - 4:55 pm | संताजी धनाजी

त्याच्यात क्यामेरा सतत हलत असतो त्यामुळे माझे डोके [भितीने नाही] गरगरायला लागले होते.
- संताजी धनाजी

परिकथेतील राजकुमार's picture

28 May 2010 - 7:55 pm | परिकथेतील राजकुमार

कोदाचे लेख वाचा.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

28 May 2010 - 10:32 pm | टारझन

मपला प्रतिसाद चोरला :(

Pain's picture

28 May 2010 - 11:50 pm | Pain

कोदा म्हणजे कोण ?

अविनाशकुलकर्णी's picture

28 May 2010 - 8:04 pm | अविनाशकुलकर्णी

मला कुठलाहि हिंदि सिनेमा बघायची खुप भिति वाटते

ज्ञानेश...'s picture

28 May 2010 - 8:47 pm | ज्ञानेश...

रामगोपाल वर्माचा 'भूत' पाहतांना शेवटचे घाबरल्याचे स्मरते.

jaypal's picture

28 May 2010 - 9:21 pm | jaypal

जालिंद्र बाबांच्या पट्ट शिष्या " शरदिनी ताइंच्या" कविता वाचा
नाही दोळे फिरली आणि घाम फुटला तर सांगा
*******************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

डावखुरा's picture

29 May 2010 - 10:15 pm | डावखुरा

जयपाल मला तुमची स्मायली आवडली कृपया दुवा द्या...अजुन कुथे भेटतील...?

----------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

ऋषिकेश's picture

28 May 2010 - 9:36 pm | ऋषिकेश

exorsist बघुन घाबरलात? का? त्यात फक्त किळस आहे हिरव्या उलट्या- पिळलेली मान वगैरे
त्यापेक्षा श्यामलन नाईट बरा (आपला)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

सुचेल तसं's picture

28 May 2010 - 10:11 pm | सुचेल तसं

रात हा एक सुंदर पिक्चर होता... ओम पुरी आणि रेवतीचा मित्र जेव्हा तळघरात उतरतात तेव्हा थोडं पुढं गेल्यावर लाल साडीत एक बाई बसलेली असते.. तो सीन मला अजूनही भितीदायक वाटतो...

तसेच, रेवती आणि तिचा मित्र एकदा हिंडायला जातात आणि बाईक पंक्चर होते. तेव्हा तो मित्र पंक्चर काढून जेव्हा परत येतो तेव्हाचा सीन पण अफाट आहे.

जेव्हा रेवती लग्नघरी गच्चीवर तिच्या मैत्रीणीची मान मोडते तो पण सीन क्लासिक!!!

एकंदरीतच 'रात' मधे असे अनेक सुंदर (भितीदायक) प्रसंग आहेत.

भूत/पिशाच्च/हडळींनो - वाटते का हो तुम्हांस स्वतःची भिती , मध्यरात्री?

पांथस्थ's picture

28 May 2010 - 11:21 pm | पांथस्थ

रात बघुन आपलीबी तंतरली होती.

बर्‍याच वर्षांनी तसा अनुभव The Grudge 1 बघितल्यावर आला होता.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

हर्षद आनंदी's picture

29 May 2010 - 2:55 am | हर्षद आनंदी

ह्यांच्या पलिकडे भीतीदायक चित्रपट नाही पाहीला..

किळसवाणे प्रकार जास्त असतात..आणि बर्‍याच सीनवर हसायला येते.

भूत ह सिनेमा पहाताना मंगला मध्ये मार खाण्याची वेळ आली होती!!
हाऊसफुल्ल शो... सगळे चित्रपटात गुंतलेले आणि आम्ही प्रत्येक सीनला टाळ्या देऊन हसत होतो.. खास करुन तो आरसा आणि डोअर बेलचा सीन... तेव्हा कहर झाला होता :D :D :D
EVIL DEAD मध्ये सांगाडा नाचायला लागतो तेव्हा मी धबधब्या सारखा कोसळलो होतो... that is most fantastic comedy scene I have ever seen

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jun 2010 - 9:23 am | llपुण्याचे पेशवेll

खरे आहे.. आम्ही मंगला मधे भूत पहायला गेलो होतो तेव्हा असंच झालं होतं. तो आरशाचा वगैरे सिन चालू होता तेव्हा आमचा एक मित्र जोरात ओरडला "कुबड्या मी आलोय". सग्ळं थेटर हसत सुटलं.
ते आठवलं.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

सुमीत भातखंडे's picture

29 May 2010 - 12:44 pm | सुमीत भातखंडे

सहमत.
रात मलापण आवडला होता.

भारद्वाज's picture

29 May 2010 - 12:49 pm | भारद्वाज

'रात'ने खूप फाडली होती. 'भूत'ने सुद्धा.
(नंतर जमेना म्हणून रामू 'फूंका'यला लागला.)
जय महाराष्ट्र

प्रियाली's picture

28 May 2010 - 11:18 pm | प्रियाली

इतके घाबराल की पुढला कोणताही रामसेपट बघणार नाही. :)

भिती जरी नाही वाटली तरी प्रचंड अस्वस्थता वाटते..
वेगळाच अनुभव आहे.

-एक

पांथस्थ's picture

28 May 2010 - 11:24 pm | पांथस्थ

कॅनिबल होलोकॉस्ट बघा अजुन अस्वस्थ वाटेल.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

मदनबाण's picture

28 May 2010 - 11:22 pm | मदनबाण

कारण हल्ली भुतापेक्षा माणूस प्राण्याचीच जास्त भीती (जर वाटली तर) वाटते ...

एकदा उत्तरप्रदेशला भेट द्या...बहुतेक भिती वाटेल !!! का ? कारण...
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांची संपत्ती ८८ कोटी आहे... मला इतक्या वेगाने प्रगती करणार्‍या लोकांची फार भिती वाटते. :S
संदर्भ :---
http://epaper.esakal.com/esakal/20100527/5654747046681324965.htm
महिन्याला १ कोटी असा या प्रगतीचा अफाट वेग आहे, मी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम जरी केले तरी माझा पगार या वेगाने वाढेल काय याचा विचार करतोय सध्या !!! :?

(हत्तीचे पुतळे बांधुन खरचं लाभ होत असेल काय ? ):?
मदनबाण.....

Jealousy is nothing more than a fear of abandonment.

पुष्करिणी's picture

29 May 2010 - 4:23 am | पुष्करिणी

मला उर्मिलाचा 'कौन' बघताना वाटली होती थोडी भीती
आणि व्हॉट लाइज बिनिथ मध्ये १-२ दृष्यात पण ...

पुष्करिणी

अप्पा जोगळेकर's picture

30 May 2010 - 11:58 am | अप्पा जोगळेकर

उर्मिलेचा 'कोन'??????

सुमीत भातखंडे's picture

29 May 2010 - 12:49 pm | सुमीत भातखंडे

मला पण भयपट खूप आवडतात.
काही चित्रपट, जे मला बर्यापैकी हॉरर वाटले होते:
१) द शायनिंग
२) सेशन ९
३) हिल्स हॅव आईज (२००६)
४) द ब्लेअर विच प्रोजेक्ट
५) पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिविटी
६) REC

शानबा५१२'s picture

29 May 2010 - 1:00 pm | शानबा५१२

झोपेच्या गोळ्या जास्त खा "मी मरणार" अशी भीती वाटायची शक्यता आहे........

*************************************************

टारझन's picture

29 May 2010 - 10:06 pm | टारझन

=)) ... =)) .............. =)) .... .... =)) ........................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ........................... =)) =)) ... =)) .................. =)) .... .... =)) ......................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ........................... =)) =)) ... =)) .................... =)) .... ...... =)) ....................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ........................... =)) =)) ... =)) .............. =)) .... ........ =)) ........................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ......................... =)) =)) ... =)) .............. =)) .... ......... =)) .......................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ........................ =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ......................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ......................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ........................................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ............................. =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ........................... =)) =)) ... =)) .............. =)) .... .... =)) ........................... =))
लै भारी शाणबा५१२

- जोजोबा१११

भाग्यश्री कुलकर्णी's picture

29 May 2010 - 1:02 pm | भाग्यश्री कुलकर्णी

सायकोच्या एका भागात तो पिपहोल मधुन बाहेर बघत असताना दुसर्‍या बाजुनेही एक निळा डोळा त्याला बघत असतो . हे बघताना मला जाम भिती वाटली होती.अन "रात"चे अनुभव वर दिल्याप्रमाणेच भितीदायक होते.

बाळकराम's picture

29 May 2010 - 7:14 pm | बाळकराम

जेन्युइनली घाबरायचं असेल तर रात, द रिंग १ व २ बघा विशेषकरुन द रिंग १- जाम मजा येते. भूतही छान होता.

बाळकराम

:D मस्त मटणाच्या जेवणाचा बेत करा. जवळच्या स्मशानात रात्री एक दोन ला जेवायला जा.भिती पळुन जाईल.

वेताळ

Pain's picture

30 May 2010 - 1:17 am | Pain

मिसळपाववर प्रसिद्ध झालेल्या सर्व भयकथांची यादी मिळेल का ?

मिसळभोक्ता's picture

1 Jun 2010 - 9:12 am | मिसळभोक्ता

सर्च फॉर तात्या अभ्यंकर..

हल्ली, इथले लोक भयकथा तशाच शोधतात म्हणे.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

दादा कोंडके's picture

30 May 2010 - 12:17 pm | दादा कोंडके

भयपटांमध्ये बर्‍याचवेळा प्रेक्षकांना दचकवतात किंवा काहीतरी किळसवाणं दाखवतात. जेन्युन भयपट खूपच कमी असतात.
मला आवडलेले काही भयपट,
१. क्वारंटाईन
२. डिसेंट
३. ड्रॅग मी टू हेल
४. राँग टर्न
५. डे ऑफ द डेड

कानडाऊ योगेशु's picture

31 May 2010 - 5:09 pm | कानडाऊ योगेशु

डर्टी मूव्ही नावाचा सिनेमा पाहीला आहे का कुणी?
एकसे एक किळसवाणे प्रकार आहेत.
एकदुसर्यांच्या ओकार्या पिणारी माणसे..व्याSSSSSSSक..!!!

फ्राय डे द १३ चित्रपट सिरीज ही अशीच किळसवाणी आहे.
नेल गनने डोळ्यात घुसणारे खिळे..
करवतीने कापाकापी... पुन्हा व्याSSSSSSक !!!!

ब्रेनडेड.. व्याSSSSSSSक..व्याSSSSSSSक.!
मुंडके मिक्सरमध्ये घालुन मिक्सर फिरवीणे.. ग्रास कटरने झोंबीं (zombie)ची कापाकापी..
डोळे लोंबत असलेल्या..हातापायाचे मास बाहेर आलेल्या झोंबींचा सेक्स.. व्याSSSSSSSक..व्याSSSSSSSक...व्याSSSSSSSक..व्याSSSSSSSक.!

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jun 2010 - 9:27 am | llपुण्याचे पेशवेll

होस्टेल नावाचा असाच एक किळसवाणा सिनेमा होता. मानवी अवयवांचे छिन्नविछिन्न अवशेष बघून फारशी किळस वाटत नसल्याने फार त्रास नंतर झाला नाही.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

मस्त कलंदर's picture

31 May 2010 - 6:12 pm | मस्त कलंदर

मी सहसा भयपट पाहात नाही.. भूत पाहताना आधीच इतकी मानसिक तयारी झाली होती की मूव्ही पाहताना आम्ही एकमेकींना जोक्स सांगून खदखदा हसत होतो... नि अर्थातच शेजारचं पब्लिक वैतागलं होतं.. आमच्या एका मैत्रिणीला यांच्याकडं इतका सारखा पाऊस पडतो तर यांच्या घरातले कपडे कसे वाळत असतील हा प्रश्न पडला होता.. अजूनही तिला आम्ही यावरून छळतो..

ब्लेअर विच.. च्या बाबतीत पण हेच घडलं.. घरी काहीतरी काम चालू होतं नि घरी थांबणं भाग होतं.. आजवर या सिनेमाबद्दल ऐकलं होतं.. म्हणून अ‍ॅन्टीसिपेशनमध्ये घाबरून एका मित्राला बोलावलं.. त्याला आधीच अस्स्सला भयानक पिक्चर आहे म्हणून सांगू.. असं म्हणून आधीच घाबरवलं.. आणि आम्ही दोघे बसलो आता भीती वाटतेय, मग भीती वाटतेय याची वाट बघत.. शेवटी कळलं.... पिक्चर संपला!!!!!! मोठ्या पडद्यावर पाहिला असता तर कदाचित भीती वाटली असती..

ओन मिस्ड कॉल नि सिक्स्थ सेन्स बघताना मात्र भीती वाटली होती!!! ;;)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!