गाभा:
परवा एका मित्राच्या विवाहानिमित्त श्री गजानन महाराज शेगांव चे दर्शन घडले..
त्यातून च एका उत्तम व्यवस्थापनाची ओळख पटली..
१) माफक दरात,सुन्दर आणि तत्पर, दर्शन, भोजन, वाहतुक व्यवस्था
२)तथाकथित पुजारी, बडवे, दुकानदार , दलाल यांचा सुळसुळाट नाही
३) वाजवी स्वच्छता
४) आनंद सागर ची महत्वाकांक्षी निर्मिती
महाराष्ट्रातील पहिलेच देवस्थान, जेथे स्वच्छता आणि माफक दर यांचा सुरेख मेळ घातला आहे..
बाकी देवस्थान ट्र्स्ट नी आदर्श घ्यावा असे व्यवस्थापन...खुपच छान अनुभव आला.. ( कड्कडीत उन सोड्ता )
गजानन महाराज की जय!!!
- योको
प्रतिक्रिया
26 May 2010 - 5:43 pm | मीनल
हे माझे श्रध्दास्थान.
दरवर्षी त्या स्थानावर जाअयचा योग येतो त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते.
पूर्वी जागेची कमतरता होती तरीही शिस्त पाळली जात असे. आता तिथे सुव्य्वस्था आहे. मंदिताच्या परिसरात स्वच्छता आहे.
बाहेरचे गाव मात्र अजून सुधारणेच्या प्रतिक्षेत आहे. पाण्याची, पैशाची टंचाई हे काही कारणे असावित.
आम्ही गावातून पायी फिरतो आणि महाराज जिथे जिथे राहिले तिथल्या स्थानांना भेटी देतो.
आनंद सागर बाग तर छानच आहे. तिथे ही जाणा येण्यासाठी विनामूल्य बस सेवा आहे.
पुन्हा शेगावाला कधी जायला मिअळते आहे या प्रतिक्षेत आहे
मीनल
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
26 May 2010 - 5:51 pm | विंजिनेर
स्वरूपानंदांच्या पावसलासुद्धा दर्शन घेताना असंच मन प्रसन्न होतं
विंजिनेर(देसाई)
26 May 2010 - 6:01 pm | सुखदा राव
वरिल प्रतीसादान्शी सहमत आहे. मी शेगावला वर्शातून एकदा तरी जातेच. खरच खूपच चान्गली व्यवस्था आहे.
26 May 2010 - 7:16 pm | स्वप्निल..
>>बाहेरचे गाव मात्र अजून सुधारणेच्या प्रतिक्षेत आहे. पाण्याची, पैशाची टंचाई हे काही कारणे असावित.
याचेच वाईट वाटते .. संस्थानपण त्याबाबत बरच उदासिन दिसते .. पैशाची टंचाई खुप असेल अस वाटत नाही कारण संस्थानाकडे तो आहे ..
बाकी देवस्थान आवडते .. प्रत्येक बाबतीत व्यवस्था चांगली आहे ..
26 May 2010 - 8:47 pm | पक्या
मागे बर्याच वर्षापूर्वी मी ती बाग पाहिली होती. छान वाटले होते. देवस्थान पण छान आहे.
फोटो काढले असतील तर टाका की राव.
- जय महाराष्ट्र , जय मराठी !
26 May 2010 - 9:17 pm | मदनबाण
शेगाव हे स्वच्छ,सुंदर आणि प्रसन्न वातावरण असलेले देवस्थान आहे.
मदनबाण.....
Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
26 May 2010 - 10:54 pm | शिल्पा ब
गोंदवल्यालासुद्धा अशीच चांगली व्यवस्था आहे...गाव साधारणच आहे...कारण नेहेमीचेच...पाणी नाही, वीज नाही ...बाकी शेगावला खूप लहानपणी गेले होते...फारसं काही आठवत नाही..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
27 May 2010 - 8:04 am | निरन्जन वहालेकर
खरच ! गोंदवल्याला जेवणाची व्यवस्था शेगाव पेक्षा चांगली आहे मी दोन्ही मंदिरांना वर्षातून एकदा तरी भेट देतो अर्थात शेगाव चे व्यवस्थापन अतिशय उत्कृस्ट आहेच वादच नाही. पण गाव मात्र अतिशय बकाल आहे " गण गण गणात बोते " जय गजानन ! ! !
26 May 2010 - 11:23 pm | babadi manjar
आम्ही लहानपणापासून shegeon ला जातो.तेव्हापासून मंदिरात नेहमीच नवीन काहीतरी baghaila मिळते
मंदिराच्या परिसर clean असतो .तसेच बाजूला एक दळण ची machine आहे.ती दिवसरात्र पीठ काडते
कितीही गर्दी zhali तरी सगळ्यांना रांगेत लागून प्रसाद मिळतो तोही निशुल्क सणासुदीला तर पकवान पण असतात
कधीही भ्रष्टाचार नाही.सगळे प्रेमाने आणि श्रद्धेने काम करतात.संस्थान च्या काही गोष्टी कौतुकास्पद आहे.
फिरता दवाखाना ,engineering college ,धर्मशाळा ,आळंदी आणि पंढरपूर येथे धर्मशाळा ,पाण्याचा दुष्काळ असूनही
आनंदसागर सारखा भव्य प्रकल्प ,आणि jaila yaila मोफत सेवा .देणगीचा योग्य वापर आणि शिस्तीत पंगतीत जेवण
खरच विदर्भातल्या साध्या लोकांची गजाजन महाराज आणि shegeon hi पंढरीच आहे.असा अनुभव भारतातल्या धनाढ्य
देवस्थान मध्ये पण नाही याची खंत वाटते.
sadguru गजाजन महाराज की जय.
28 May 2010 - 2:31 am | पाषाणभेद
शेगावच्या जवळच नागझरी येथे कुंड आहे. ते ठिकाणही बघण्यासारखे आहे.
तेथे जातांना स्टेशनवर काही मंडळी 'राहण्याचे ठिकाण, धर्मशाळा फुल आहेत. आमच्याकडे चला' असे सांगतात. ते ऐकू नये. सरळ देवस्थानात यावे.
भक्तीविजय ग्रंथ ही वाचनिय आहे.
गजानन महाराज की जय.

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
27 May 2010 - 10:48 am | नितिन थत्ते
चालू द्या.
मी १९८१ मध्ये शिर्डीला गेलो होतो. त्यानंतर कुठल्याही बाबांच्या स्थानी जायचे नाही असे ठरवले.
२००३ मध्ये गोंदवल्याला जावे लागले - सहलीतील इतर लोकांमुळे. तेव्हाही बाहेरच थांबलो. :)
नितिन थत्ते
30 May 2010 - 1:54 pm | छोटा डॉन
>>त्यानंतर कुठल्याही बाबांच्या स्थानी जायचे नाही असे ठरवले.
भगवंताच्या लीलेने आमचे आयुष्यच अशा पवित्र ठिकाणी गेले की तिथल्या सगळ्या लीला पाहुन पुन्हा निदान महाराष्ट्रातल्यातरी कुठल्याच तिर्थक्षेत्राला जायचे नाही असे ठरवले आहे.
अजुन तरी ते पाळतो आहे :)
बाकी आमच्या गावातली एक गजानन महाराजांचे एक भव्य-दिव्य आणि शाही मंदिर आहे बरं !
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
27 May 2010 - 11:30 am | दत्ता काळे
ह्या उत्तम व्यवस्थापनाची उदाहरणे म्हणजे -
१. दर्शनासाठी भाविक जिथून रांग ( क्यू ) धरतात, तिथे "दर्शनासाठी लागणारा वेळ" अशी पाटी असते. त्यावर वेळेचे आकडे लिहीलेले असतात - उदा. अडीच तास किंवा तीन तास, इ. आणि विशेष म्हणजे तुम्ही दर्शन घेऊन बाहेर पडता त्यावेळी तुमच्या लक्षात येते कि, बरोबर लिहीला होता तेवढाच वेळ लागला आहे.
२.दुसरे, सगळ्यांना रांग एकच - कुणी कितीही पैसेवाला असो किंवा अगदी गरीब असो - सगळ्यांना एकाच रांगेमधून यावे लागते. 'जास्त पैसे देऊन लवकर दर्शन' हि व्यवस्थाच नाही.
३. रांगेच्या बाजूला पिण्याचे थंड पाणी हातात आणून मिळेल अशी व्यवस्था.
४. रांगेत उभ्या असलेल्या भाविकाला स्वच्छतागृहात जायचे असेल, तर त्याला पास मिळतो. आल्यानंतर तो पास दाखवल्याबरोबर त्याला त्याच्या मूळ जागेवर परत रांगेत उभे राहता येते. रांगेतला नंबर जात नाही.
५. तिथल्या भक्तनिवासात आणि मंदिरात अतिशय स्वच्छता राखण्यात येते. दोन्ही ठिकाणी फिनाईलने लाद्या पुसण्याचे काम अव्याहतपणे चालू असते.
अश्याप्रकारच्या कित्येक व्यवस्था शेगाव संस्थानने भाविकांच्या सोयीसाठी केलेल्या आहेत.
27 May 2010 - 11:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी शेगावला फार लहानपणी गेले होते. नुकतीच राजीव गांधींवर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे सगळंच सूनसान होतं. म्हणून का होईना तिथली शांतता मला फारच आवडली. तिथली बाग वगैरे चांगली होती, तिथेच पॅरलल बारवर खेळायलाही थोडं शिकले. पण आता फारसं आठवत नाही. मंदीरात आत गेल्याचंही आठवत नाही. शेगाव गाव, आजूबाजूचा परिसर आता आठवत नाही.
नंतर दोनच वर्षांनी पंढरपूरच्या देवळात जावं लागलं ... त्यानंतर मंदीरांना, गावातल्या बकालपणाला आणि तिथल्या गर्दीला लांबूनच नमस्कार बरा वाटू लागला.
अदिती
27 May 2010 - 11:28 pm | मुक्तसुनीत
गजानन महाराजांचा संबंध दत्ताच्या भक्तीशी/दत्त संप्रदायाशी येतो काय ? येथील भाविकांपैकी कुणी प्रकाश टाकू शकेल काय ?
29 May 2010 - 11:43 pm | राघव
माझ्या माहितीप्रमाणे त्यांना समर्थ असेच म्हणतात. पण कोणता संप्रदाय अशी निश्चित माहिती मला नाही.
महाराष्ट्रातील काही देवस्थानं मला खूप आवडलीत.
१. श्री गोंदवलेकर महाराज संस्थान, गोंदवले.
२. श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव.
३. श्री क्षेत्र कारंजा.
मन अतिशय प्रसन्न होतं अशा ठिकाणी. सर्वात भावणारी गोष्ट म्हणजे या तीनही ठिकाणी अविरत अन्नदान होत असतं.
बाकी सुव्यवस्था अन् भक्तांची सोय यासंदर्भात श्रीमहाराजांची एक गोष्ट आहे -
एकदा काही लोकं महाराष्ट्रातील मुख्य तीर्थस्थानांच्या दर्शनासाठी निघालेली. त्या प्रवासात त्यांचा मुक्काम गोंदवल्यालाही झाला. तेथे श्रीमहाराजांच्या दर्शनास गेले असतां त्यांनी प्रवासाची विचारपुस केली. भक्तांनी सांगितले की काही ठिकाणी मनास खूप प्रसन्न वाटले. पण इतरत्र शक्यतो सगळीकडे गलिच्छपणाच आहे. ज्याठिकाणी त्यांची नीट सोय झाली नाही त्या तीर्थस्थानांबद्दल त्यांच्या मनांत विकल्प आला. ते ओळखून श्रीमहाराज म्हणाले, "आपण अशा ठिकाणी का जातो? भगवंताच्या दर्शनासाठी. आपल्या साधनेला तेथे मदत मिळते. संताचे मुख्य कार्य हे लोकांची वृत्ती उन्नत करणे हे आहे. त्यातून ते भक्तांची शक्य तेवढी सोय बघतात. तरिही काही गैरसोय झालीच तर त्याला ते काय करणार? त्यात त्यांना दोष देण्यात अर्थ नाही." आपल्या मायबापाच्या राहत्या ठिकाणी इतरांनी काही गलिच्छपणा केलेला असल्यास, तो आपण स्वच्छ करणार की मायबापांना सांगणार- "आम्हाला हा गलिच्छपणा चालत नाही. तेव्हा स्वच्छता राखणे. अन्यथा आम्ही यापुढे येणार नाही."?
आपण कशासाठी जातोय ते सगळ्यात महत्त्वाचे. जर स्वच्छतेची आस घेऊन जायचे असेल तर मुख्यतः गलिच्छपणा दिसेल. जर भक्तीची आस घेऊन जाणार असू तर दर्शनाने आनंद लाभेल. अन् जर भक्ती अन् स्वच्छता दोन्हींची आस असेल तर दर्शनाच्या आनंदासमवेत आपण स्वतः स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू करू. ज्याचा त्याचा मार्ग. :)
राघव
30 May 2010 - 11:11 am | स्वप्निल..
३. श्री क्षेत्र कारंजा.
हे ठीकाण मला पण आवडते .. छान वाटते तीथे गेल्यावर
27 May 2010 - 11:36 pm | ऋषिकेश
ह्या संस्थानाने वित्तीय नियोजनासाठी आता एस ए पी (SAP) प्रणालीचा वापर सूरू करून नवा पायंडा (आणि आयटी कंपन्यांसाठी नवा सेक्टर) सूरू केला आहे.
अर्थातच इतक्या महागड्या प्रणाल्या त्यांना कशा परवडल्या वगैरे प्रश्न मनात येणं पाप आहे
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
27 May 2010 - 11:43 pm | प्रभो
विजूभाऊ होते त्या प्रोजेक्ट वर..त्यांना विचारा... ;)
28 May 2010 - 12:00 am | ऋषिकेश
अरेच्या तेकसे काय होते?
हे प्रोजेक्ट तर आमच्या कंपनीने केलं आहे :P
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
1 Jun 2010 - 8:47 am | मिसळभोक्ता
तरीच साला हा विजू तात्याचा जवळचा म्हणून समजला जातो.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
30 May 2010 - 2:08 pm | llपुण्याचे पेशवेll
आहो ते आमच्या सारख्या श्रीमंत शिष्यांचे गुरु असल्याने त्यांना मोठ्या मोठ्या देणग्या मिळतात म्हणून परवडते सॅप सारखी प्रणाली. आणि ज्यांना परवडते ते वापरतात सॅप सारखी प्रणाली. फार आनंद वाटला वाचून.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
30 May 2010 - 1:08 am | Pain
अक्कलकोटलाही असेच असते तर किती बरे झाले असते :(
30 May 2010 - 10:24 am | मितभाषी
तेथे जातांना स्टेशनवर काही मंडळी 'राहण्याचे ठिकाण, धर्मशाळा फुल आहेत. आमच्याकडे चला' असे सांगतात. ते ऐकू नये. सरळ देवस्थानात यावे
>>>>>>
अगदी अगदी. देवस्थानने त्याकरीता अशा अफवांवर विश्वास ठेवु नये असे जाहीर केले आहे.
शेगाव संस्थानचे संपर्क भ्रमणध्वनी.
०१. ९८५०८५०८९१
०२. ९४२२०६४३१८
०३ ९४२२०६४३१९
०४. ९०११२२९०७८.
आनन्दसागर.
०१. ०७२६५-२५२०१८
०२. ०७२६५-२५२२५१.
31 May 2010 - 11:19 am | विसोबा खेचर
गण गण गणात बोते..!