गाभा:
कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी...........कामाचे ओझे जास्त असल्यास खालील आसनाचा प्रयोग करुन पहा....कामाचा ताण नक्की कमी झालेला जाणवेल
१) प्रथम टेबलावरील काम थोडे बाजुला करावे...
२) ते जमत नसल्यास तुमची खुर्ची टेबलापासुन थोडी मागे घ्या..
३) डोळे मिटा..हात डोक्या मागे घ्या
४) दीर्घ श्वास घ्या
५) श्वास हळू सोडा ( असे पाच वेळा करा)
६) पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या ( डोळे बंदच राहु द्या
७) या वेळी श्वास जोरात सोडा
८) श्वास सोडताना हात झटका
९) हात झटकताना तेव्हढ्याच त्वेशाने पुट्पुटा .............( खड्ड्यात जाउदे कंपनी.....)
कामाचा ताण नक्की कमी झालेला जाणवेल
सू्: हे आसन वरीष्ठ मुकदामासमोर करु नये........
प्रतिक्रिया
27 Mar 2008 - 4:56 pm | सन्जोप राव
आणि त्याच्या हातातली कुर्हाड आठवली.
सन्जोप राव
27 Mar 2008 - 8:02 pm | प्रमोद देव
की जॉर्ज वॉशिंग्टन?
27 Mar 2008 - 8:09 pm | llपुण्याचे पेशवेll
तसेच उत्तम appraisal व्हावे यासाठी पण काहीतरी उपाय सांगावा.
१. आपल्या वरीष्ठ मुकादमाची 'हाँ जी , हाँ जी ' करणे.
२. ते जमत नसल्यास आपण केलेल्या छोट्यात छोट्या कामाची मोठ्यात मोठी जाहीरात करणे.
३.कँटीन मधे आपला साहेब आजूबाजूला असताना (आपल्या बरोबर नव्हे इतर टेबलावर)आपल्या कामाचे मोठ्या आवाजात(बाजूच्या टेबलावरील मॅनेजरला ऐकू जाईल इतपत मोठ्या) विष्लेशण करणे. आणि आपल्या बरोबरच्या मित्राला म्हणायला सांगणे 'किती काम करतोस रे तू!'
आणि माझ्या मते सर्वात महत्वाचे म्हणजे "आपले स्वतःचे काम व्यवस्थित करणे"
पुण्याचे पेशवे
ता.क. इतर अनेक मार्ग उपलब्ध असतील तर सुचवावे.
27 Mar 2008 - 9:02 pm | वरदा
तेच खरं...त्यातून अप्रेझल ला फायदा झाला नाही झाला आपल्याला फायदा नक्की होतो रोज काम करताना.....
बाकी ते आसन सहीच्...मी करून पाहिलं.... मी इथे ओरडले कं जाऊदे खड्यात म्हणून तरी कुण्णाला काही कळत नाही.......तेव्हा वरीष्ठातील वरीष्ठ असला समोर म्हणून काय झालं.......
27 Mar 2008 - 10:32 pm | सुधीर कांदळकर
सोडला तर चालेल का?
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
27 Mar 2008 - 11:14 pm | सृष्टीलावण्या
श्वास कायमचा सोडला तर चालेल का?
खदखदून जास्त हसल्याने डोळ्यात पाणी आले आहे..
>
>
नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..
28 Mar 2008 - 2:08 am | सोम
भरपूर दिवसान॑तर मनापासून .... हसलो...
28 Mar 2008 - 3:44 am | अभय
फारच गमतिदार!
28 Mar 2008 - 4:14 am | मीनल
हे आसन घरच्या कामाचा ताणही हलका करेल का?
कुठल्या टेबलावरील काम थोडे बाजुला करावे?
कुठली खुर्ची टेबलापासुन थोडी मागे घ्यायची?
काय `खड्ड्यात जाउ दे` असे त्वेशाने पुट्पुटावे?
घरातले वरीष्ठ मुकदाम कोण?
मुकादम तर एकदमच खालची पातळी झाली .
माझा नवरा मलाच होम मिनिस्टर म्हणतो.
6 Dec 2014 - 11:45 am | विजुभाऊ
घरी प्रयोग करुन बघायला हरकत नाही.