नासाच्या कालच्या बातमीप्रमाणे गुरूवरचा एक पट्टा गायब आहे.
ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँथनी वेस्ले यांनी काढलेला फोटो (नासाच्या संकेतस्थळावरून)
गुरू हा ग्रह वायूंचा गोळा आहे. अर्थात गुरूचं परिवलन पृथ्वीप्रमाणे, घनपदार्थाप्रमाणे होत नाही; याला डिफरन्शियल रोटेशन (मराठी शब्द?) असं म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या अक्षांशांना स्वत:भोवती फिरण्याचा कोनीय वेग वेगवेगळा असतो. किंवा धृव भागातला दिवस विषुववृत्तीय भागापेक्षा मोठा/लांब असतो. पृथ्वीवर सगळीकडेच २४ तासांचा दिवस असतो. गुरूकडे साध्या दुर्बिणीतूनही पाहिल्यास या पट्ट्यांचं अस्तित्त्व जाणवतं. गुरूवरचा लाल ठिपका गॅलिलेओनेही पाहिल्याची नोंद आहे. शूमेकर लेव्ही ९ हा धूमकेतू आदळला होता तेव्हाचे 'डाग' काही दिवस दृश्यमान होते.
विषुववृत्ताच्या भागात असणारा हा पट्टा काल गायब झाल्याचे दिसले. त्याबद्दल एक अंदाज असा आहे की गुरूच्या वातावरणातल्या अमोनियाच्या ढगांमुळे हा पट्टा सध्या झाकला गेला आहे.
प्रतिक्रिया
21 May 2010 - 9:51 am | भारद्वाज
६ महिन्यांत वजन कमी करण्याच्या जाहिरातीत 'before' & 'after' असते तसे वाटले !
21 May 2010 - 10:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
६ महिन्यांत वजन कमी करण्याच्या जाहिरातीत 'before' & 'after' असते तसे वाटले !
मस्त हं...!
गुरुवर पट्टा असला काय आणि नसला काय आपल्याला काय फरक पडत नाही.
माहितीबद्दल आभार....!
स्वगत : च्यायला, मागच्या वर्षी दुर्बिणीतून गुरुला पाहिलं होतं तेव्हा एक पट्टा होता की दोन आठवत नाही. दुर्बिणीतून गुरु ग्रह दिसला त्याचाच खूप आनंद झाला होता. असो, जेव्हा जमेल तेव्हा पाहू त्याचा एक पट्टा आहे की नाही. ती 'अत्यावश्यक' बाब नाही.
-दिलीप बिरुटे
21 May 2010 - 9:58 am | सहज
गुरुंनी आपली नाडी पट्टी पुसली.
नासावाल्यांनी घेतलेला अनुभव आवडला.
21 May 2010 - 1:53 pm | भडकमकर मास्तर
नासावाल्यांनी घेतलेला अनुभव आवडला.
=))
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
21 May 2010 - 10:01 am | वेताळ
ऑगस्ट ऋषीच्या नाडशास्त्रावरील अविश्वासाने किंवा एसी गुरुंवरील टिकेमुळे व्यतित होऊन गुरुने आपली पट्टी पुसुन घेतली असावी.
आता ह्यामुळे गुरु कुंडलीत बलवान असणार्याना काही त्रास होईल का?
वेताळ
21 May 2010 - 10:11 am | मनिष
माझाही पट्टा काही दिवसांपासून गायब झालाय खरा आणि त्यामुळे पँट जरा अंमळ ढिली होतेय! ;)
21 May 2010 - 10:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
इथे उलटा प्रकार झालाय ... वरून कपडे चढवल्यामुळे पट्टा लपला आहे (म्हणे!). जाऊ दे, तू शोध तुझा पट्टा! :P
अदिती
21 May 2010 - 10:27 am | मनिष
हा गुरू अंमळ सुपरमॅन सारखा दिसतोय...आतुन काय घालायचे, बाहेरून काय घालायचे, याबाबत अंमळ गोंधळलाय हा...असो!. तुम्ही बिचार्याला त्याचा पट्टा शोधून द्या. :)
21 May 2010 - 10:47 am | llपुण्याचे पेशवेll
कैच्याकैच मनिषराव. त्यांनी सांगितलं ना वरती कपडे घातले म्हणून पट्टा आतमधे लपला. मग आता काय आतमधे जाऊन पट्टा शोधणार का?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
21 May 2010 - 11:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मनीष मला टी.ए.-डी.ए देणार असेल तर मी जायला तयार आहे. ;-)
(सर्कारी) अदिती
21 May 2010 - 10:26 am | टिउ
हे पट्टे निर्माण कसे होतात यावर अजुनपर्यंत शास्त्रज्ञांचं एकमत झालं नाहीये...तितक्यात एक पट्टा गायब सुद्धा झाला!
मला तर खालचा पट्टा वरती सरकल्यासारखा वाटतोय...वरच्या पट्ट्याची जाडी बघा.
21 May 2010 - 10:34 am | भारद्वाज
अरे हो, खरंच की !
-
खगोलनिरीक्षक (की फोटोनिरीक्षक?) टिउ यांना खगोलमंडळातर्फे शनीचे एक कडे मोफत
21 May 2010 - 8:26 pm | टिउ
धन्यवाद! :)
पट्टे आणि कडे एक एक करुन कसे काय गायब होत चाललेत आत्ता समजलं...
21 May 2010 - 12:04 pm | Dipankar
यात मला लादेन चा हात दिसतो आहे
आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो
21 May 2010 - 12:27 pm | विजुभाऊ
त्याबद्दल एक अंदाज असा आहे की गुरूच्या वातावरणातल्या अमोनियाच्या ढगांमुळे हा पट्टा सध्या झाकला गेला आहे.
च्यामारी तिथेही प्र॑दूषण?
अवांतर : गुरूच्या वातावरणातल्या अमोनियाच्या ढगांमुळे हा पट्टा सध्या झाकला गेला हा रीकरिंग इफेक्ट असायला हवा. त्यामुळे तो पट्टा अधूनमधून गायब व्हायला हवा.. अर्थात गुरुची परिवलन वेळ ही भलतीच मोठी आहे त्यामुळे कदाचित ही गोष्ट अगोदर लक्षात आली नसावी.
21 May 2010 - 8:39 pm | टिउ
इथे दिलेल्या माहितीनुसार याआधी किमान दोनदा गुरुचा पटटा नाहीसा झाल्याचं निरीक्षणात आढळुन आलं आहे. त्यावरुन असं वाटतं की दर १५ ते २० वर्षांनी ही घटना घडत असावी...
22 May 2010 - 11:01 pm | मिहिर
अर्थात गुरुची परिवलन वेळ ही भलतीच मोठी आहे
माझ्या माहितीप्रमाणे गुरुची परिवलन (rotation) वेळ सूर्यमालेत सर्वात कमी सुमारे १० तास आहे.
21 May 2010 - 12:42 pm | मी_ओंकार
गुरू वरचा पट्टा गायब
अच्छा असे आहे होय. मला वाटले गुरुवारचा पट्टा गायब. म्हणून कालच्या उपासानंतर पट्टा कसा गायब झाला अशा अंमळ चिंतेनेच हा धागा उघडला.
बाकी चित्रे मस्त.
- ओंकार.
21 May 2010 - 1:44 pm | गणपा
=)) चला. असा गोंधळ झालेला मी एकटाच नाही.
21 May 2010 - 3:59 pm | वाहीदा
=)) =)) =))
कधी काय गायब होईल सांगता येत नाही ;-)
जादूऊऊउ जादु !! :B
~ वाहीदा
21 May 2010 - 12:43 pm | नि३
गुरूवरचा पट्टा गायब
बरं मग??.. आमच्या कडुन काय अपेक्षीत आहे? तो पट्टा वापीस आणुन देने???
---(४_२० अलिप्त फजीती) नि३.
21 May 2010 - 12:52 pm | आंबोळी
अहो इथे केंद्रातून पट्ट्या गायब होतात.... सापडत नाहित..(अनुभवः घाटपांडे काका ) आणि इतक्या दुरच्या गुरूच्या पट्ट्याचे काय घेउन बसलात?
आंबोळी
21 May 2010 - 1:06 pm | परिकथेतील राजकुमार
=)) =))
कोणाला कशाचे आणी आंबोळीला पट्ट्यांचे...
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
21 May 2010 - 1:26 pm | हिटलरचा डुप्लिकेट
मी ऐकलं आहे कि हि बातमी प्रसिध्ध झाल्यानंतर लष्कर-ए-तोयबा ने याची जबाबदारी घेतली आहे म्हणे...
21 May 2010 - 2:00 pm | भडकमकर मास्तर
हा अॅन्थनी वेस्ली ७ मे ला माझ्याकडे येऊन फोटोशॉप्मध्ये काही फोटो तयार करून घेऊन गेला आहे....
( त्याला शनि नेपच्यून आनि शुक्रावरही काही रंगीबेरंगी पट्टे मारून हवे होते...वेळ नव्हता मला म्हणून खट्टू होऊन गेला..पुढल्या महिन्यात नवीन मज्जा बघा... )
अवांतर : गडबडीत अॅन्थनी फी न देता पळाला... कोठे सापडला तर सांगा
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
21 May 2010 - 2:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आयला, म्हणजे या टोनीला मानसशास्त्रीय मदतीची, आधाराची गरज आहे तर! ;-)
अदिती
21 May 2010 - 2:06 pm | सहज
>माझ्याकडे येऊन फोटोशॉप्मध्ये काही फोटो तयार करून घेऊन गेला आहे
हे खरे रंगकर्मी!
फोटोशॉपचा क्लास होउन जाउ दे मास्तर!
21 May 2010 - 2:08 pm | निखिल देशपांडे
फोटोशॉपचा क्लास होउन जाउ दे मास्तर!
+१ सहमत..
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
22 May 2010 - 12:34 pm | मी-सौरभ
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
ते नासा वाले फुकट वैतागले .......
-----
सौरभ :)
21 May 2010 - 2:04 pm | विनायक प्रभू
कमालच आहे.
21 May 2010 - 2:55 pm | Pain
चला, जाउन बघू.
21 May 2010 - 3:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
टिऊ, हा पट्टा सरकला असेल असं वाटत नाही. एवढं अंतर जायला गॅसला प्रचंड वेळ लागेल (माझा अंदाजपंचे अंदाज किमान काहीशे वर्ष). शिवाय तो पट्टा अगदीच गायब नाही झाला आहे, थोड्याफार प्रमाणात दिसतो आहे.
अदिती
21 May 2010 - 4:09 pm | सहज
बाकी पट्टा निघाल्यामुळेच गॅस बाहेर की गॅस खूपच बाहेर म्हणुन पट्टा निघाला?
छे हे तर कोंबडी आधी की अंडे प्रकार झाला की :-)
22 May 2010 - 12:20 am | बिपिन कार्यकर्ते
बाकी पट्टा निघाल्यामुळेच गॅस बाहेर की गॅस खूपच बाहेर म्हणुन पट्टा निघाला?
म्हणजे तिथेही गॅस ट्रबल का? इनोचा खप तिथेही वाढला असेल. ;)
बिपिन कार्यकर्ते
21 May 2010 - 4:09 pm | आंबोळी
>>शिवाय तो पट्टा अगदीच गायब नाही झाला आहे, थोड्याफार प्रमाणात दिसतो आहे.
तसे मास्तर फोटोशॉप मधे अजून कच्चेच आहेत.....
आंबोळी
21 May 2010 - 4:20 pm | वाहीदा
तसे मास्तर फोटोशॉप मधे अजून कच्चेच आहेत.....
=)) =))
~ वाहीदा
21 May 2010 - 4:25 pm | ज्ञानोबाचे पैजार
गॅस लवकर पास होण्या साठी गुरुवर एक क्षेपणास्त्र मारले पाहीजे. ज्या मधे हवाबाण हरडे, कायमचुर्ण, धौतीयोग समप्रमाणात मिसळुन ठासुन भरलेले असले पाहिजेत.
पैजारबुवा,
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
21 May 2010 - 4:20 pm | अजय देशपांडे
साधि दुर्बिण मह्णजे काय हे सांगा
21 May 2010 - 4:31 pm | विकास
या धाग्यात गुरूचा पट्टा गायब झाला हे समजले पण आता आपण काय काळजी घ्यावी हे सांगितलेच नाही! :S त्याबद्दलही थोडी माहीती घ्यावी. ह्याचा संबंध पण पर्यावरण बदलाशी असावा असे वाटते... शास्त्रज्ञमॅडमनी खुलासा करावा.
अवांतरः लहानपणी हवामान खात्याचे कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा वगैरे आलटून पालटून कसे होते ते समजायचे नाही... पण नंतर जसजसे व्यायाम कधी कमी कधी जास्त होऊ लागला, तेंव्हा कमी दाबाचा पट्टाच जास्त दाबाचा कसा होऊ शकतो आणि उलट, ह्याचा अनुभव घेतला :-)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
21 May 2010 - 5:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
च्यायला, सगळ्या धाग्याचा खफ केलाच आहे तर आता नाड्या आणि पट्टे काढून नाहीतर बांधून घालून टाका धुमाकूळ!
अदिती
21 May 2010 - 5:12 pm | विकास
अहो तसे समजू नका...
माहीती खरेच मस्त आहे. फक्त येथे एक शास्त्रज्ञ आणि इतर (या) शास्त्रात अज्ञ अशी काहीशी विभागणी असल्याने काय लिहायचे ते समजत नाही.
शिवाय, या महत्वाच्या विषयावर जर लिहीले नाही तर उद्या आपले पुस्तक कोण छापणार हा प्रश्न! म्हणून जो तो, आम्ही पण या विषयावरील चर्चेत भाग घेतला असे सांगायला स्वतःची सीव्ही तयार करत आहे. ;)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
21 May 2010 - 5:21 pm | पंगा
वाचतोय. पचवतोय.
- पंडित गागाभट्ट
21 May 2010 - 6:18 pm | पंगा
इथपर्यंत समजले. पटण्यासारखे आहे. ठीक.
हे नीटसे समजले नाही. म्हणजे डिफरंशियल रोटेशनमुळे वेगवेगळ्या अक्षांशांच्या पट्ट्यांमधल्या मॅटरचा कोनीय वेग वेगवेगळा असू शकेल हे ठीक, पण कोणत्या पट्ट्यातल्या मॅटरचा वेग कमी आणि कोणत्या पट्ट्यातल्या मॅटरचा जास्त, याला काही कार्यकारणभाव आहे काय?
हे जक्स्टापोझिशन गडबडीचे आहे. पृथ्वीवर पण ध्रुवीय प्रदेशात सहा महिन्यांचा दिवस आणि सहा महिन्यांची रात्र असतेच की! पृथ्वीवर कोठे डिफरंशियल रोटेशन आहे? ;)
(ठीकाय ठीकाय... 'पृथ्वीचा स्वतःभोवतीचा एक फेरा' या अर्थाने २४ तासांचाच दिवस असतो, बाकी 'उजेडाअंधाराचा खेळ' सहासहा महिन्यांचा असतो, आणि त्याचा डिफरंशियल रोटेशन असण्यानसण्याशी संबंध नसून पृथ्वीच्या आसाच्या कलाशी आहे, हे ठीक. त्याउलट गुरूवर ध्रुवीय पट्ट्यातला दिवस हा 'गुरूचा स्वतःभोवतीचा एक फेरा' या अर्थाने विषुववृत्तीय पट्ट्यातील दिवसापेक्षा वेगळ्या लांबीचा असतो, आणि त्याचा डिफरंशियल रोटेशनशी संबंध आहे, हेही ठीक. पण मग तसे स्पष्ट म्हणा की! उगाच अर्थ बदलतो आणि कन्फ्यूजन वाढते, आणि आम्हाला पंगा घ्यायला चान्स मिळतो... ;))
- पंडित गागाभट्ट.
=======================================================
To the man-in-the-street, who, I'm sorry to say,
Is a keen observer of life,
The word "Intellectual" suggests straight away
A man who's untrue to his wife.
- W.H. Auden (New Year Letter).
"विज्ञान आम्हाला जितपत समजते तितपत रुचते. त्यापुढे दुसर्याने लादलेल्या 'वैज्ञानिक दृष्टिकोना'वर अंधश्रद्धा ठेवण्यापेक्षा आमच्या स्वतःच्या 'कॉमन सेन्स'वर अवलंबून राहणे आम्ही पसंत करतो. दुसर्याच्या गळी मारलेल्यापेक्षा आमच्या जितपत आहे तेवढ्या बुद्धीला जे पटते, त्याला आम्ही प्रमाण मानतो, एवढ्याच मर्यादित अर्थाने आम्ही 'बुद्धिप्रामाण्यवादी' आहोत." - पंडित गागाभट्ट.
21 May 2010 - 6:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
दिवस हा शब्द थोडी गडबड उडवत आहे; दिवस म्हणजे आकाशात जेवढा वेळ सूर्य असतो तो काळ नसून इथे दिवस याचा अर्थ ग्रहावरील एका बिंदूला एक प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा त्याच ठिकाणी येण्यास लागलेला काळ असा आहे.
मला मराठीत आणि मिपावर "कसं" हे नीट समजावून सांगता येणार नाही. पण धृवावरचा कोनीय वेग कमी असतो आणि विषुववृत्तावर जास्त असतो.
अदिती
22 May 2010 - 6:47 am | सुधीर काळे
मला वाटतं कीं पृथ्वीवरील रेखांश नेहमी 'न विस्कटता' एका रेघेत फिरतात कारण ती घन आहे, तसे गुरू वायुरूपात असल्यामुळे वेगवेगळे पापुद्रे Differential rotation मुळे व वेगवेगळ्या कोनीय गतीमुळे (angular rotational speed) एकत्र फिरत नाहींत असा त्याचा अर्थ आहे असे वाटते. आपल्याकडे जशी GMT चा रेखांश सलग असतो व विस्कटत नाही, तसा गुरू घन नसल्यामुळे सगळे रेखांश जरा 'मोकाट' सुटले आहेत व विस्कटतात. ("कोणाचा पायपोस कोणाचे पायात नाहीं"ची गत!)
मला वाटते हे स्पष्टीकरण जनता भाषेत (layman's language) फिट बसावे!
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
22 May 2010 - 6:50 am | मिसळभोक्ता
जनता भाषा..
म्हणजे आपण जनतेत नाही की काय ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
22 May 2010 - 8:32 am | विंजिनेर
ते तसं नव्हे. ती पूर्वी जन्ता बस असायची ना ते खेड्यातले लोक वापरायचे ती? आपण उच्चभ्रू मात्र एशियाड ने प्रवास करायचो... तसंच हे पण - जनता भाषा = बौद्धिक गरीबी असलेल्यांची भाषा इ... इ..
(लंगडं वासरु) विंजिनेर
22 May 2010 - 6:18 pm | सुधीर काळे
तसे नव्हे हो! जनता भाषा म्हणजे layman's language चे मराठी रूप.
मी कांहीं खगोल शास्त्रज्ञ नाहीं, पण अदितीने जे लिहिले होते ते मला थोडेसे कळले असा माझा (गैर)समज झाला व म्हणून मी ते सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला.
Layman's language मधला layman हा शब्द खुपत नाही, पण जनता हा शब्द खुपतो हेही एक दुर्दैवच!
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
22 May 2010 - 9:01 am | पंगा
प्रश्न तो नाही. प्रश्न हा आहे की कुठल्या पट्ट्याची कोनीय गती जास्त आणि कोठल्याची कमी, हे कोणत्या घटकांवरून ठरते? है कोई जवाब, हँय गुरु?
- पंडित गागाभट्ट
22 May 2010 - 10:14 pm | सुधीर काळे
पुन्हा रोजच्या भाषेत जे मला कळलं आहे त्यानुसार मला असे वाटते कीं कोनीय गती (angular rotational speed) वेगवेगळी असण्याची कारणें बरीच असतात, पण माझ्या अंदाजाने खालील कारणे तपासून पहावी.
१. मुख्य कारण गुरूचे वायुरूप. त्यामुळे seggregation of layers होऊ शकते. आमच्या धंद्यात पोलादासारख्या जड पदार्थाचेही द्रवस्वरूपात असताना असे seggregation होते व त्याला पुन्हा एकजीव करण्यासाठी आम्ही अर्गॉन वायू वापरून ते ढवळून काढतो! (non-homogeneity is removed by argon stirring through a porous refractory)
२. तपमान व त्यामुळे आलेली वेगळी-वेगळी घनता
३. वेगवेगळ्या थरातले वेगवेगळे घर्षण
अदितीच यावर जास्त विस्ताराने लिहू शकेल! व तिने लिहावे ही विनंती.
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
22 May 2010 - 10:46 pm | पंगा
वायुरूपामुळे segregation of layers, तापमानामुळे आलेली वेगवेगळी घनता, वेगवेगळ्या थरांतले वेगवेगळे घर्षण, आणि या सर्वांमुळे वेगवेगळी कोनीय गती वगैरे सगळे मुद्दे मान्य. माझा साधासुधा प्रश्न एवढाच आहे, की विषुववृत्तापाशी कोनीय गती जास्त आणि ध्रुवापाशी कमी, असेच का होते? उलट का होत नाही? म्हणजे ध्रुवापाशी कोनीय गती जास्त आणि विषुववृत्तापाशी कमी असे? यामागे काय मेकॅनिझ्म किंवा गणित आहे?
- पंडित गागाभट्ट
23 May 2010 - 9:42 am | सुधीर काळे
हे मला माहीत नाहीं. अदितीच्या मूळ लेखात याचे कारण दिलेले नाहीं.
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
21 May 2010 - 7:03 pm | हेरंब
या महत्वाच्या माहितीवर चांगली चर्चा अपेक्षित होती. पण ३_१४ शिवाय इथे कोणीच शास्त्रज्ञ दिसत नाही.
21 May 2010 - 11:52 pm | झिन्ग
>>...पण ३_१४ शिवाय इथे कोणीच शास्त्रज्ञ दिसत नाही.
=))
अहो त्याच इथे शास्त्रज्ञ आहेत..
22 May 2010 - 6:52 am | मिसळभोक्ता
त्यांचे नाव शशिकांत ओक आहे. पण ते सध्या बिजी आहेत.
मिपावरच नाही, तर जगातील सर्व संस्थळांवर तेच एकमेव शास्त्रज्ञ आहेत.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
21 May 2010 - 10:01 pm | हुप्प्या
पट्टा गायब आहे हे कळले. पण तो लाल ठिपका का लाल डोळा दिसत नाही तो?
आणि गुरुलाही एक कडे आहे हे ऐकून आहे. हे खरे असेल तर ते का दिसत नाही फोटोत? विरळ आहे म्हणून का?
एवढा धट्टाकट्टा गडी असले फुसके कडे घालून बसतो? ;-)
22 May 2010 - 6:17 am | चित्रा
हे सर्व कसे पाहतात, निरीक्षणे कोण आणि कशी करतात असे सगळे जरा अधिक विस्ताराने लिहावे ही अदितीला विनंती.
माहिती आवडली.
22 May 2010 - 8:45 am | पाषाणभेद
साक्षात गुरूबद्दल अशा विनोदी प्रतिक्रीया वाचून गुरू आता तापले आहेत. अशी अपेक्षा नव्हती. अरे पट्टा गायब झाला म्हणजे काय चेष्टा आहे काय? अन तो ही केवढा भला मोठा आहे. शास्त्रज्ञ लवकरच शोध लावतीलच.
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
22 May 2010 - 9:57 am | शिल्पा ब
शेवटी पट्टाच तो...खाली वर व्हायचाच... :>
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
22 May 2010 - 12:57 pm | मी-सौरभ
=))
-----
सौरभ :)
22 May 2010 - 8:13 pm | धनंजय
छान माहिती
27 May 2010 - 1:14 am | साडेसाती
बहुतेक पट्टा माग्च्या बाजुने असावा ???!!!!!!
असे नाही का वाट्त तुम्हाला..???!!!
21 Jul 2010 - 9:20 pm | दिनेश
आज बुधवार् तसेच आषाढी एकादशी आहे...बरेच जण उपास करत आहेत...म्हणजे उद्या गुरुचा आणखी एक पट्टा गायब होणार का?