भारताची लोकशाही किती दिवस तग धरू शकेल ?

Manoj Katwe's picture
Manoj Katwe in काथ्याकूट
18 May 2010 - 7:33 am
गाभा: 

http://www.esakal.com/esakal/20100517/5121804310460583483.htm
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5942667.cms

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5942654.cms (हि यादी वाढतच जाणार आहे. )

एकीकडून अतिरेकी, दुसरीकडून नक्षली, तिसरी कडून भ्रष्ट राजकारणी, आणि कमीत भरती म्हणजे जातीयवाद , विविध प्रांतिक वाद , गरिबी, विषमता.
आता कुठे ६० वर्ष होत आली आहे स्वातंत्र्य मिळून तर एवढ्या बाजूने भारत वेढला गेला आहे.

मला देशाबद्दल नितांत प्रेम आहे पण हे कुठ पर्यंत मी सहन करू, मी स्वतः काय करू सुद्धा शकत नाही,
जर माझ्या हातात असते तर मी ह्या सर्व राजकारण्यांचा एका क्षणात खात्मा केला असता.
हे हिंदू, मुस्लीम, मराठी, बिहारी etc असलं काही चालू दिले नसते, केवळ आणि केवळ भारतीय हीच ओळख करण्यास सर्वांना भाग पडले असते.

पण मी एक सामान्य माणूस, ५ वर्षांनी एकदा मत देणार आणि पुढील ५ वर्ष सगळा खेळ बघणार.
आपण किती दिवस हे खेळ पाहणार आहोत ?. मला हा खेळ पाहवत नाही.
अरे घुसवा न मिलिटरी आणि उडवून टाका ना ते नक्षली, आणि ते अतिरेकी.
फार फार तर काय होईल थोडे फार नुकसान च होईल ना ?
पण हे रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच काय तो निकाल लागून जाईल.

मला बोलवा हवा तर त्या मिलिटरी मध्ये.
ह्या लढ्यात जरी मी मेलो तर निदान माझी मुलांना तरी कमीत कमी ह्या नक्षली आणि अतिरेक्यांचा त्रास नसेल (?).

एका सामान्य माणसाला आपला काय सल्ला असेल. त्याने भारत सोडून जावा काय ? काय इथेच राहून सडावे ?
(सिनेमा मधील "नायक" हि सिनेमातच शोभून दिसतो)
प्रत्यक्षात जर कोणी असं काय करायला गेला तर त्याचा मुडदा पडल्याशिवाय हे राजकारणी (गुंड) लोक राहणार नाहीत हेच सत्य.

राजकारणी लोक जी प्रगतीची गणिते मांडत आहे ती सगळी थोतांडे आहेत.
भारत प्रगती करीत नसून अधोगती करत आहे. लवकरच भारत एक मागासलेला , भ्रष्ट ,
आणि स्वतावर राज्य करण्याची लायकी नसलेला देश म्हणून पुढे येईल.

आपणांस काय वाटते कि किती दिवस आपली लोकशाही ह्या पुढे तग धरू शकेल ?
माझ्या मते जास्तीत जास्त २०२५ पर्यंतच आपण तग धरून राहू शकू.
तो पर्यंत हा भारत देश, (अतिरेकी आणि नक्षली ह्यांचातून वाचला तर)
ह्या राजकारण्यांनी विकून खाल्ला असेल .

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

18 May 2010 - 8:30 am | नितिन थत्ते

हॅ हॅ हॅ.
१९४६ मध्ये वैग्रे चर्चिल वैग्रे लोकं सुद्धा असाच प्रश्न विचारीत असत.

नितिन थत्ते

गोगोल's picture

18 May 2010 - 8:34 am | गोगोल

गम्भीर आहे. असच चालू राहील तर लोकशाहीच काय, फार दिवस भारतच टिकणार नाही.

नितिन थत्ते's picture

18 May 2010 - 8:48 am | नितिन थत्ते

>>फार दिवस भारतच टिकणार नाही.

हे पण चर्चिल वगैरे म्हणत असत. १९४६ मध्ये.
नंतर ७५-७८ च्या आणिबाणी आणि आसपासच्या काळात
८४ मध्ये इंदिराहत्येनंतर
८९-८९ आणि ९२ मध्ये बाबरी काळात
हा आणि असे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले गेले आहेत.

नितिन थत्ते

गोगोल's picture

18 May 2010 - 9:05 am | गोगोल

ठीक आहे .. काय शे दोनशे हजार मेले तर मेले .. अतिरेकी येऊन गोळ्या घालून गेले तर गेले...
श्रीम्नत आणि गरीबातील दरी वाढत राहिली तर राहिली... केवळ आधी पण असे प्रश्न विचारले गेले होते आणि त्यावेळी भारत फुटला नाही म्हणून याहीवेळी फुट्णार नाही असच समजून चालत राहू.

त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती ह्यात फरक आहे हे अक्कल गहाण टाकून विसरून जाऊ. केवळ आन्धळा अभिनिवेश आणि सार काही आलबेल आहे असा समज करून घेऊन, भारत फुट्णार नाही असे म्हणून मी किती देशप्रेमी याचे सर्टिफिकेट घेऊन टाकु ... कदाचित अंतर्गत दुही ची शक्यता आहे म्हणून सावधगिरीने पावल टाका ऐवजी केवळ आधी असा कधी झाला नाही म्हणून आताही असा होणार नाही म्हणून आनंदात राहू.

नितिन थत्ते's picture

18 May 2010 - 9:42 am | नितिन थत्ते

>>कदाचित अंतर्गत दुही ची शक्यता आहे म्हणून सावधगिरीने पावल टाका ऐवजी केवळ आधी असा कधी झाला नाही म्हणून आताही असा होणार नाही म्हणून आनंदात राहू.

सावधगिरीने पावले (जाहीर किंवा गुप्तपणाने) टाकली जात नाहीयेत असा विचार करण्याला कोणता आधार आहे?

कोणती विशिष्ट पावले टाकायला हवीत आणि ती जाहीरपणे किंवा गुप्तपणे टाकली जात नाहियेत याबद्दल सांगितले तर बरे.

नितिन थत्ते

Manoj Katwe's picture

18 May 2010 - 12:51 pm | Manoj Katwe

सावधगिरीने, जाहीर किंवा गुप्तपणाने
नितिन राव तुम्ही तर निव्वळ शब्दांचा खेळ मांडलेला दिसतोय.
अहो परिस्थिती काय आणि हे चाललंय काय ?

आज ते नक्षलि कधी दारात येतील ते सांगता येत नाही,
अतिरेकी कधी बॉंब टाकून जातील माहित नाही,
राजकारणी फक्त आश्वासने देतात , करत तर काहीच नाही.

मरसपर्यंत फक्त जगायचे आणि प्रगत प्रगत म्हणून ओरडता राहायचे. हे किती दिवस चालणार ?
आज जरा तुम्हाला खरच आपण टाकत असलेली पावले योग्य दिशेने आहेत असा वाटते तर जरा एकदा जे शेतकरी आत्महत्या करून मेलेले आहेत त्यांच्या घरी जाऊन भेटा,
मग कळेल , मेलेल्याच्या टाळू वरचे लोणी खाणे कशाला म्हणतात ते.

ज्यांनी गेल्या निवडणुकीत मतदान केलेले आहे त्यांनाच प्रतिसाद लिहायचा हक्क दिला व तो प्रामाणिकपणे जपला गेला तर यातले किती प्रतिसाद टिकतील व किती रद्द होतील?
माझाही रद्द होईल कारण मी जकार्ताला होतो.
आपण असे भांडण्यापेक्षा मतं द्यायला गेलो तर?
पुण्यात फक्त ४४ टक्के मतदान झाले!
आपल्याला ’आपल्यासारखे सरकार’ तेंव्हांच मिळेल जेंव्हां आपण मतं द्यायला जाऊ!
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.

नितिन थत्ते's picture

22 May 2010 - 2:20 pm | नितिन थत्ते

तुमचा मूळ प्रश्न अतिरेकी /नक्षलवादाविषयी वगैरे होता. त्याविषयी पावले उचलली जातच नाहियेत असा दावा कशाच्या जोरावर केला? उचललेली पावले परिणामकारक ठरत नाहीयेत हे कदाचित खरे असेल.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या वगैरे प्रश्न आहेत हे मलाही मान्य आहे. पण नक्षली लोकांना मिलिटरी घुसवून मारले तर हा शेतकर्‍यांचा प्रश्न त्यांच्या टाळूवरील लोणी खाणार्‍यांचा प्रश्न कसा सुटणार आहे?

असो. या मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यातूनच नक्षलवादासारखे प्रश्न उभे राहतात हे सर्वश्रुत आहे. पण यावरचा उपाय मिलिटरी घालून नक्षलींना मारणे हा कसा काय?

नितिन थत्ते

ऋषिकेश's picture

18 May 2010 - 8:43 am | ऋषिकेश

जोपर्यंत जनतेने दिलेल्या मतांवर जनतेसारखेच प्रतिनिधी निवडून येत आहेत तोपर्यंत लोकशाहि जिवंत राहिल काळजी नसावी. एकदा प्रतिनीधी व जनता यांच्यातील दरी रुंदावली की मग संघर्ष अटळ असतो

सध्या जशी जनता भ्रष्ट आहे तसेच नेते (हातातील शक्तीनूसार प्रमाण वेगळे.. उद्या जनतेतील कोणाही १० लोकांना रॅंडमली निवडून तितकी सत्ता दिली तर त्यातीलही तित्केच लोक भ्रष्टाचार करतील) त्यामुळे सध्या (नजीकच्या भविष्यात) लोकशाहीला मरण नाहि असे भाकित वर्तवतो :)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

Manoj Katwe's picture

18 May 2010 - 9:36 am | Manoj Katwe

अहो हि सडलेली लोकशाहीच तर भारतास मारक ठरणार आहे.
एकतर हि लोकशाहीची पद्धत तरी बदलावयास हवी किंवा त्यातील हे सर्व भ्रष्ट नेते तरी संपवायला हवे.
पण हे कोण करणार आणि केव्हा ?

हे काही नजीकच्या काळात हे शक्य दिसत नाही.
आपले मनमोहनसिंग 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट ला मस्तपने
"विविधतेतुन एकता" हे असली फडतुस भाषाने देतात.

लोकांना भ्रष्ट रहाण्याची सवय लागली आहे. जर हि सवय वेलेवरच मोडून काढली नाही तर भारताचा विनाश अटळ आणि नजीकच आहे असे समजावे .

ऋषिकेश's picture

18 May 2010 - 1:22 pm | ऋषिकेश

पण हे कोण करणार आणि केव्हा ?

तुम्ही आणि आम्ही.. भ्रष्टाचार संपवण्याचा सर्वोत्तम उपाय त्यात सहभागी न होणे.

नेते तेव्हाच बदलतील जेव्हा समाज कारण ते समाजातूनच येतात व लोकशाहीत सरकार नेहेमी समाजाच्या लायकी प्रमाणे असते.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

विशाल कुलकर्णी's picture

20 May 2010 - 5:47 pm | विशाल कुलकर्णी

अहो हि सडलेली लोकशाहीच तर भारतास मारक ठरणार आहे.
एकतर हि लोकशाहीची पद्धत तरी बदलावयास हवी किंवा त्यातील हे सर्व भ्रष्ट नेते तरी संपवायला हवे.>>>>

जिथे जिथे लोकशाही आहे, तिथे तिथे ही समस्या असणारच. यात केवळ भारतच नव्हे तर जगातील सर्वच लोकशाहीवादी देश मोडतात. पण अशाने ना लोकशाही संपणार आहे ना भारत.

<<<जर हि सवय वेलेवरच मोडून काढली नाही तर भारताचा विनाश अटळ आणि नजीकच आहे असे समजावे .>>>>

काहीही विधाने करु नका. कुठलीही सिस्टीम ही फक्त नितीमत्ता आणि प्रामाणिकपणा यावर टिकून राहूच शकत नाही. खरेतर भ्रष्टाचार हा देखील इकॉनॉमीचाच एक भाग आहे असे म्हणायला हरकत नाही. आणि भ्रष्टाचार कितीही वाढला तरी तो एक राष्ट्र नष्ट करु शकत नाही. कारण खर्‍याचे साथीदार हे नेहमीच खोट्याच्या साथीदारांपेक्षा कमी शक्तीशाली असतात. जर भ्रष्टाचार भारतास नष्ट करण्यास समर्थ असता तर आतापर्यंत पाकिस्तान, नायजेरीया, मलेशिया सारखी राष्ट्रे नामशेष व्हायला हवी होती. पण ती नाही झाली कारण त्याच्या भ्रष्टाचारात सामील असणार्‍यांना ते परवडणारे नाहीये.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

पंगा's picture

20 May 2010 - 6:14 pm | पंगा

जर भ्रष्टाचार भारतास नष्ट करण्यास समर्थ असता तर आतापर्यंत पाकिस्तान, नायजेरीया, मलेशिया सारखी राष्ट्रे नामशेष व्हायला हवी होती.

हा हा हा... बरोबर पकडले! +१.

पण ती नाही झाली कारण त्याच्या भ्रष्टाचारात सामील असणार्‍यांना ते परवडणारे नाहीये.

त्यांचा भ्रष्टाचारात सामील असणार्‍यांनाच का, बहुतेक कोणालाच ते परवडण्यासारखे असेल असे वाटत नाही. पाकिस्तानच्या बाबतीत, भारत पाकिस्तानच्या भ्रष्टाचारात सामील थोडाच आहे? मला नाही वाटत! पण उद्या समजा पाकिस्तान फुटलेच, तर भारतालाही ते परवडेल असे वाटत नाही. समजा पाकिस्तानचे दहा तुकडे झाले, तर आजच्या एका डोकेदुखीच्या जागी दहा डोकेदुख्या निर्माण होतील, एवढेच. (बांग्लादेशची गोष्ट थोडी वेगळी होती असे वाटते.)

- पंडित गागाभट्ट.

पंगा's picture

18 May 2010 - 9:49 pm | पंगा

प्रत्येक समस्येवर ऊठसूट 'मिलिटरी घुसवावी' म्हणणारे लोक प्रबळ होऊन प्रत्यक्षात जोपर्यंत लष्करात जाऊ लागणार नाहीत, तोपर्यंत भारताच्या लोकशाहीला काहीही धोका नाही.

- पंडित गागाभट्ट

Manoj Katwe's picture

19 May 2010 - 6:34 am | Manoj Katwe

प्रत्येक समस्येवर ऊठसूट 'मिलिटरी घुसवावी'
नक्षलि आणि अतिरेकी तुम्हाला किरकोळ समस्या वाटते हे हास्यास्पद आहे.

मी काही मेट्रो साठी किंवा पाणी मिळत नाही, किंवा प्रदूषण होत आहे म्हणून मिलिटरी घुसवा अस काही म्हणालो आहे. का ?

नक्षलि आणि अतिरेकी हे जे काही प्रश्न आहेत त्यात बर्याच प्रमाणात हिंसा होते व त्यासाठी खूप आधुनिक शस्त्रास्त्रे लागतात हे माझ्या सारख्या अडाणी माणसाला देखील कळते.

जर मिलिटरी नाही तर मग काय पोलीस लाठ्या घेऊन जातील कि मी काही एखादा चाकू वगेरे घेऊन लढायला जाऊ. (मला कुठून हो एखादे बंदूक मिळणार ?)

नक्षलि आणि अतिरेकी तुम्हाला किरकोळ समस्या वाटते हे हास्यास्पद आहे.

नक्षलवादी आणि अतिरेकी ही साधारणपणे १९८०नंतरच्या दशकातल्या पंजाबमधील दहशतवादाइतकीच गंभीर समस्या आहे असे वाटते. त्यावेळीही ऊठसूट मिलिटरी घुसवलेली नव्हती. जेव्हा आत्यंतिक गरज भासली तेव्हा आणि तेवढ्यापुरता सैन्यदलांचा वापर केला होता. त्याचीही किंमत पुढे मोजावी लागलीच, पण तरीही त्यावेळी दुसरा इलाज राहिला नव्हता म्हणून. आणि तेव्हाही सैन्याचा हातभार मर्यादित उद्दिष्टांपुरताच होता, एरवी बहुतांशी आणि प्रामुख्याने पोलीस दलेच सर्व सांभाळत होती, असे आठवते.

मिलिटरी घुसवणे म्हणजे जादूची कांडी फिरवणे नव्हे. त्याने प्रश्न चुटकीसरशी सुटतात असे नाही. जम्मू-कश्मीरमध्ये प्रचंड प्रमाणात भारतीय सैन्य बर्‍याच वर्षांपासून तैनात आहे, पण म्हणून कश्मीरप्रश्न सुटलेला नाही. मात्र तेथे कदाचित इतक्या प्रमाणात नाही तरी सैन्य तैनात ठेवण्याची इतर कारणे असू शकतील. मला माहीत नाही.

शिवाय सैन्याच्या नुकसानाचा आणि सैन्य तैनात ठेवण्याच्या इतर फायद्यातोट्यांचा, जमाखर्चाचाही विचार करावा लागतो असे वाटते. आणि सगळीकडेच सैन्य घुसवले गेले तर सैन्य एकही काम - आणि आपले नेहमीचे, देशाच्या संरक्षणाचे कामसुद्धा - धड करू शकणार नाही हा भाग वेगळाच. शेवटी सैन्यालाही मर्यादा आहेत, आणि कितीही झाले तरी बाहेरच्या शत्रूपासून देशाचे रक्षण करणे हे सैन्याचे मुख्य काम आहे, देशाच्या आतल्या गडबडींचा मुकाबला करणे नव्हे, हा मुद्दा राहतोच. देशाच्या आतल्या गडबडींच्या मुकाबल्यासाठी गरज लागेल तिथे जिथे सैन्याजवळ त्या हाताळण्याचा अनुभव आहे तिथे सैन्याची मदत घेता येते, पण ते सैन्याचे मुख्य काम नव्हे. सैन्याला आपले मुख्य काम करू दिले पाहिजे, इतर गोष्टींत शक्यतो अडकवता कामा नये.

बरे, अतिरेकी दहशतवाद्यांच्या मुकाबल्यासाठी सैन्याला तैनात करावे म्हणत आहात, तर नेमके कुठेकुठे अतिरेकी हल्ला करणार आहेत, आणि त्याप्रमाणे नेमके कुठेकुठे लष्कराला तैनात करावे लागेल, याबद्दलही खात्रीलायक आगाऊ माहिती असल्यास कळवावे. संरक्षण मंत्रालयास त्याप्रमाणे तुमचा निरोप कळवता येतो का ते पाहतो. (किंवा खरे तर तुम्हीच का नाही कळवत?)

बाकी, जिथेतिथे दिसल्या (लहान किंवा मोठ्या) समस्येपाठी सैन्य घुसवावे अशी मानसिकता जर भारतीय समाजमनात रुजू लागली (आणि अर्थातच अशी मानसिकता असलेली मंडळी घाऊक भावाने जर सैन्यात जाऊ लागली), तर मात्र भारताचा पाकिस्तान व्हायला फार वेळ लागणार नाही अशी भीती वाटते. सुदैवाने तितकी वाईट परिस्थिती असल्याचे जाणवत नाही; अशी मानसिकता अल्पमतातच दिसून येते, आणि दिसते तिथे फक्त तोंडाची वाफ दवडण्याइतपतच दिसून येते. ही परिस्थिती जोपर्यंत आहे, तोपर्यंत भारताच्या लोकशाहीबद्दल चिंता करण्याचे काहीही कारण मला तरी दिसत नाही.

- पंडित गागाभट्ट.

Manoj Katwe's picture

18 May 2010 - 9:42 am | Manoj Katwe

सध्याच्या काळात सामान्य माणसाच्या मनातील हे प्रश्न आहेत.
हे प्रश्न वाढतच जाणार आहेत. त्यातून उद्या कोण काय निर्णय घेईल हे माहित नाही.
सर्वच्या सर्व काही भारत सोडून जाऊ शकत नाही . पण जे राहतील ते भारताचा काय वाटोळा झालेले पाहतील/भोगतील परमेश्वरालाच माहित.

राजकारणी लोक फक्त मलिदा लाट लाट लाटतील आणि हा देश वार्यावर सोडून निघून जातील एक दिवस.

तोच दिवस कोणता हा प्रश्न मी विचारला आहे.
(म्हणजे कमीत कमी तशी मनाची तयारी तरी करायला )

Dipankar's picture

18 May 2010 - 9:51 am | Dipankar

भारताचे तुकडे होणे अशक्य ज्या देशात येवढी विविधता आहे त्या देशात वाद हे होतच रहाणार, पण कुठलाही लढा/वाद हा देश तेव्हाच तोडु शकतो ज्या वेळेला लढा उभारणार्‍यांन कडे एक तर स्वतंत्र झाल्यावर काय करायचे या विषयीची ठोस भुमिका असते वा त्यांना पाठींबा देणार्‍या परकीय शक्ती त्यांना स्वतःच्या देशात सामावून घेतील

आज जे काही नक्षलवादाचे थैमान चालु आहे त्यात तेथील जनतेला त्यांच्या कडे झालेले दुर्लक्ष हे कारणीभुत आहे, त्यांना कदाचीत चीन पाठींबा देतही असेल पण स्वतंत्र देश होण्यासाठी भारतीय लष्कराशी सामना द्यावा लागेल
पण ती वेळ येणार नाही कारण तेथील जनतेला स्वतंत्र होण्यापेक्षा अन्याय दुर होणे हे गरजेचे वाटत आहे.

आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

राजेश घासकडवी's picture

18 May 2010 - 10:20 am | राजेश घासकडवी

भारत प्रगती करीत नसून अधोगती करत आहे.

नक्षली, अतिरेकी, जातीयवाद यांपेक्षाही लोकशाहीचे व एकंदरीतच समाजाचे खरे महाभयानक शत्रू म्हणजे अज्ञान, निरक्षरपणा, रोगराई, दुष्काळ, गरीबी, भुकेकंगाली हे आहेत. या सर्व आघाड्यांवर भारताने (किंबहुना सर्वच जगाने) गेल्या पस्तीस वर्षांत नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. अधोगतीचे तुमचे निकष काय आहेत हे मला काही कळलं नाही.

असो, तुम्ही खूप सीरियस दिसता. तेव्हा तुमचे काही ठाम निकष असतील देखील...

राजकारणी लोक फक्त मलिदा लाट लाट लाटतील आणि हा देश वार्यावर सोडून निघून जातील एक दिवस.

अहो ते ब्रिटिशांनी केलं... तेव्हापासून मलिदा वाढला, हे कसं?

आज परिस्थिती पूर्वीपेक्षा वाईट आहे असं तुमच्या लेखनावरून वाटतं. कुठच्या काळी आजच्यापेक्षा चांगली परिस्थिती होती हे सांगता येईल का?

वेताळ's picture

18 May 2010 - 10:37 am | वेताळ

मला ही गुरुजी तुमच्या सारखाच प्रश्न पडला आहे.
अधोगती आपली किती झाली आहे ते तरी एकदा सांगा म्हणजे पुढचे बोलता येईल.

हेरंब साहेब ह्याचे जरा स्पष्टीकरण द्याल काय?

अधोगतीला कधी अंत नसतो. ते आपण गेल्या ६० वर्षांत अनुभवले आहेच ना ?


आपण काय अधोगती केली? व जगातील कोणत्या देशाने भौतिक प्रगती बरोबर अध्यात्मिक प्रगती आपल्यापेक्षा जास्त केली आहे हे जरा सांगाल काय?
भौतिक प्रगती सोडुन आणखी कोणती प्रगती असते?
वेताळ

Manoj Katwe's picture

19 May 2010 - 6:46 am | Manoj Katwe

प्रश्न काय आहे ते प्रथम समजून घ्या.

प्रश्न काल आणि आजचा अजीबात नाही.
प्रश्न आहे तो आज आनि उद्याचा

जर आपण म्हणतात तसेच जर का भारत पुढे जर राहिला तर
१) मला मान्य आहे कि मी काळ MB मध्ये खेळायचो, आज GB मध्ये तर उद्या TB मध्ये खेळेन,
२) काल मला फोटो घेणे अवघड होते पण उद्या मला कॅमेरा विकत घेणे अजून स्वस्त झालेले असेल.
३) कदाचित mobile चे दर अजून कमी झालेले असतील etc etc

पण
१) मी एखाद्या local मध्ये बोंब स्फोटात मारला जाणार नाही ह्याची खात्री काय ?
२) उद्या नक्षलि पुण्यात येऊन हमाला करणार नाहीत ह्याची पण काय खात्री ?

पूर्वी प्रगत साधने नव्हती हे मान्य पण आज प्रगत साधने असून सुद्धा मानसिक शांतता कितीतरी पटीने ढासळलेली आहे.
आणि हीच ढासळलेली मानसिक शांतताच एके दिवशी विनाशास मारक ठरणार आहे.
मग हि प्रगत साधने काय उपयोगाची ?

सुधीर काळे's picture

21 May 2010 - 3:26 am | सुधीर काळे

घासकडवींशी सहमत!
इतके फालतू सरकार असूनही भारताची नेत्रदीपक प्रगती केवळ बुद्धिमान, उद्यमशील व कष्टाळू अशा भारतीय नागरिकांच्या मुळे झाली आहे. एवढेच काय पण उद्या २०१६ साली आजचा लूझियानाचा राज्यपाल बॉबी जिंदल अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनेल तोही त्याच्या भारतीय गुणांमुळे!
(त्यांने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे व त्याला भारताबद्दल विशेष आस्था नाहीं हे मला माहीता आहे. पण त्याच्यात भारतीय genes आहेत. आई-वडील हिंदू भारतीय आहेत. म्हणून गुणाने तो भारतीयच आहे!)
असे आहोत आपण Wonderful Indians!
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.

हेरंब's picture

18 May 2010 - 10:27 am | हेरंब

अहो, असे विषय मिपावर काढले की काही सदस्यांना राग येतो. त्यांच्या मते आपली भरपूर प्रगती झाली आहे. भ्रष्ट व्यवस्थेवर टीका केली की हे लगेच आकडेवारी मागू लागतात.
अधोगतीला कधी अंत नसतो. ते आपण गेल्या ६० वर्षांत अनुभवले आहेच ना ?
पुढच्या पिढीची चिंता करु नका. कारण त्यांना फक्त भौतिक प्रगतीच दिसत आहे आणि ते त्यावरच खुष आहेत.

राजेश घासकडवी's picture

18 May 2010 - 12:04 pm | राजेश घासकडवी

व्यवस्था भ्रष्ट आहे, परिस्थिती वाईट आहे याबद्दल दुमत नाही. प्रश्न बदलाचा आहे. समजा आपण परिस्थितीच्या चांगलेपणाचा ग्राफ काढला (काळ हा क्ष अक्ष मानून) तर अनादी कालापासून अधोगतीच चालू आहे का? की ती बदललीच नाही?
शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर परिस्थितीच्या चांगलेपणाचा डेरिव्हेटिव्ह पॉझिटीव्ह आहे का? म्हणजे सुधारणा होते आहे का? म्हणजे तो ग्राफ सपाट आहे, उतरता आहे, की कधीतरी चढता होता- पण त्यानंतर ती बिघडायला लागली (कलियुग वगैरेमुळे...)? जर तसं असेल तर ती सर्वोत्तम कधी होती?

या प्रश्नांची कोणी उत्तरं देत नाही. सध्या जे काही वाईट चाललंय ते वाईट आहे, असं म्हणायला कोणाचाच आक्षेप नाही. पण वाईटामुळे आणखीन वाईट होणार असं म्हटलं तर आजच्यापेक्षा चांगलं नक्की कधी होतं? असा प्रश्न उपस्थित होतोच.

Manoj Katwe's picture

18 May 2010 - 12:41 pm | Manoj Katwe

शास्त्र, maths , आकडे सोडा हो, मला फक्त हे सांगा कि
तुम्ही मुंबई मधल्या local मधून आज समाधानाने फिरू शकता का ?
तुम्ही काश्मीर मध्ये मन मोकळे पनाने ये जा करू शकता का ?
तुम्ही आसाम , बिहार, नक्षल ग्रस्त भाग येथे जाऊन राहू शकता का ?
काही लोक software शिकली, परदेशी गेली, काही पगार वाढ म्हणजे खरी प्रगती का ?
आज ते ipad , mp3 player , इंटरनेट स्वस्तात मिळायला लागेल म्हणजे प्रगती का ?

मी आधीच सांगितलं आहे कि हे अति सामान्य माणसाच्या मनातील प्रश्न आहेत.
जो रोज मुंबई मधील लोकाल मधून प्रवास करतो.
(आणि कधी मेला जाईल ह्याचा पत्ता नसतो )

जितकी आपण प्रगती करत आहोत त्या पेक्षा कितीतरी पतीने आपण अधोगतीला जात आहोत.
जर तुमचे ते काय ग्राफ वगेरे काढले आणि जर वेगवेगळे मुद्दे मांडले कि काय प्रगती केली आणि काय अधोगती केली तर माझ्या मते प्रगती पेक्षा कितीतरी हजार पट प्रोब्लेम्स वाढले आहेत.
आणि रोज हे वाढतच आहेत.

आजच्यापेक्षा खरच अगोदर चांगला जग नवते हे जरी मला मान्य असला तरी सुद्धा हे म्हणजे कैक पटीने बिघडले आहे.
जग हे चांगले कि वाईट हे आपण कोणत्या बाजूला आहोत ह्यावरून समजते.

जर भविष्यात (देव ना करो) आपल्याला कोणत्या भीषण परिस्थितीचा सामना करावा लागला
तर आपण खरच हे ग्राफ , अक्ष, etc मांडून स्वताला प्रगत म्हणून घेऊन समाधानी करून घ्याल का ?

जे मेले किव्वा ज्यांचे ह्या सर्व प्रकारामुळे वाईट झाले आहे ते काय हा ग्राफ मांडून बसतील कि काय ?

अहो हे एक भीषण सत्य आहे.
त्यावर mathematics ची चर्चा म्हणजे निव्वळ हास्यास्पद आहे.
हे म्हणजे असा आहे कि अधोगतीचे आकडे दाखवा नाहीतर आम्ही प्रगत आहोत.
मांजर डोळे मिटून दुध पिते म्हणजे कोणी भागात नाही असा याचा अर्थ होत नाही
आपण किती दिवस डोळे मिटायचे ते आणि कधी उघडायचे तेच ठरवायला हवे.

आपल्या भावना कधीतरी तीव्र करायलाच हव्यात.
नाहीतर आपली मुलाना त्यांच्या भावना तीव्र कराव्या लागतील

(एक टाका जर वेळीच शिवला तर पुढचे दहा टाके वाचतात)

१. काही लोक शिकूनसवरून, सॉफ्टवेअरमध्ये करिअर करण्यासाठी, उच्च शिक्षणासाठी वगैरे परदेशी गेले, हे खरे. ते तसे जाऊ नयेत म्हणून अधोगती न झालेल्या भारतात काही उपाययोजना झाल्या होत्या काय? की ते तसे परदेशी गेल्याने अधोगती झाली?
२. अशा कित्येक लोकांना (ज्यातला मी एक) शिक्षणव्यवस्थेतील जातीनिहाय प्रवेशपद्धती, आरक्षणे इ. चा जबर फटका बसला. अधोगती न झालेल्या भारतात अशी आरक्षणे होती, असे मी ऐकलेले नाही. असल्यास त्यांचे प्रमाण सध्याच्या प्रमाणाच्या तुलनेत किती, याबद्दल मला माहीत नाही. जर जातीनिहाय आरक्षणे रद्द केली, तर भारताची (निदान शिक्षणव्यवस्था आणि तिचे व्यवस्थापन) या बाबतीतली तथाकथित अधोगती थांबेल, असे मला वाटते. आपले यावर काय म्हणणे आहे?
३. प्रगत देशांमध्ये (उदा. अमेरिकेत) राजकारणात आणि राजकीय व्यवस्थेत रुजलेला भ्रष्टाचार हा अत्यंत वरच्या पातळीवर आहे, अशी माहिती उपलब्ध आहे. सामान्य नागरिकाला अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या संस्था जसे वाहतून व नागरी पोलिसदले, औषधोपचार आणि आपत्कालीन सेवा जसे अग्निशमन इ. अशा संस्थांमध्ये ज्या पातळीवर सामान्य नागरिकाचा थेट संबंध येतो, तेथे भ्रष्टाचार नाही. उदा. भारतात वाहतूक पोलिसाने अडवल्यावर लायसन्समध्ये १००/५०० ची नोट घालून देण्याचा संकेत आहे. अमेरिकेत तसा प्रयत्न करून पाहिल्यास काय परिणाम होतील, याबद्दल न बोललेलेच बरे! या संस्थांमध्ये नागरिकांचा संस्थेच्या ज्या कर्मचार्‍यांशी व पदाधिकार्‍यांशी थेट संबंध येतो, ते सुद्धा तुमच्याआमच्यासारखे नागरिकच नव्हेत काय? मग राजकारण्यांच्या नावाने का गळे काढत आहात?
४. भारतात स्थानिक स्वराज्य संस्था तसेच संसदीय व्यवस्थेत महिलांना ३३% आरक्षण आहे. राज्यसंस्थेच्या कारभारात त्यांना अगदी ग्रामपंचायत पातळीपासून थेट सहभागी होण्याची व्यवस्था केली गेली आहे. बचतगट, व्यसनमुक्ती केंद्रे इ. पासून ते सॉफ्टवेअर, क्रीडा इ. सर्व क्षेत्रांत त्यांचा स्पृहणीय संचार आहे. जगातील अनेक समृद्ध, श्रीमंत देशांत (जसे काही आखाती देश) ही स्थिती आजही नाही. मग भारताची अधोगती होते आहे का? अधोगती ना झालेल्या भारतात ही स्थिती होती का? जर ही स्थिती आपण पूर्वस्थितीत नेली, तर भारताची प्रगती होईल का?
५. प्रचलित व्यवस्थेच्या नावाने शंख करण्यापेक्षा तुमच्याकडे भारताच्या प्रगतीसाठी काही ठोस उपाययोजना आणि विधायक कल्पना आहेत काय, ते सांगा. असल्यास कृपया सविस्तर समजावून द्याव्यात. या संकेतस्थळाच्या आणि/किंवा इतर संपर्कमाध्यमांच्या मदतीने त्या अमलात आणण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतील.
६. कोणत्या भावना आणि कशा पद्धतीने तीव्र करायच्या, ते समजावून सांगाल काय? भावनांच्या तीव्रतीकरणातून भारताची अधोगती कशी थोपवता येईल, ते सांगा. इतकेच नव्हे, तर प्रगती कशी करता येईल, ते सांगा.
(जिज्ञासू)बेसनलाडू

राजेश घासकडवी's picture

18 May 2010 - 1:19 pm | राजेश घासकडवी

जर तुमचे विचार हे केवळ व्यक्तिगत अनुभवांवरून व तुम्ही बघितलेल्या जगाच्या मर्यादेतून तुम्हाला प्रतीत होणाऱ्या भीतीतून आले असतील तर प्रश्नच मिटला. मला वाटलं होतं की लोकांना समजावून सांगत आहात तेव्हा काही व्यक्तिनिरपेक्ष निकष असतील. अधोगती व प्रगती याचं मूल्यमापन 'मला लोकलमध्ये प्रवास करताना भीती वाटते, व तशीच ती इतरांनाही वाटत असणार' एवढ्यावरच केल्यावर काय बोलणार?

चर्चाप्रस्तावक असूनही तुम्ही माझ्या प्रश्नांना बगल देऊन इतर प्रश्न विचारले आहेत. मी पुन्हा सांगतो, सध्या परिस्थिती उत्तम नाही, हे मान्य आहे. फक्त नक्की कधी याहून चांगली होती? एवढंच सांगा. मग सुधारतेय की बिघडतेय याविषयी बोलता येईल.

बेसनलाडू's picture

18 May 2010 - 1:21 pm | बेसनलाडू

सध्या परिस्थिती उत्तम नाही, हे मान्य आहे. फक्त नक्की कधी याहून चांगली होती? एवढंच सांगा. मग सुधारतेय की बिघडतेय याविषयी बोलता येईल.
(सहमत)बेसनलाडू

Manoj Katwe's picture

19 May 2010 - 7:00 am | Manoj Katwe

अधोगती व प्रगती याचं मूल्यमापन 'मला लोकलमध्ये प्रवास करताना भीती वाटते, व तशीच ती इतरांनाही वाटत असणार' एवढ्यावरच केल्यावर काय बोलणार?
काय राव झोपलेल्याला जागे करणे सोपे आहे म्हणतात, पण झोपेचा सोंग घेतलेल्याला जागे करणे महाकठीण.
तुम्हाला समजूनच घायचे नाही असे म्हणाना.

माफ करा पण तुम्हाला असे काही म्हणायचे होते का, कि काही जणांना भीती वाटत नाही . आणि फक्त मला असा भास होत कि सर्वांना भीती वाटते.

आज काळ लोक केवळ मजबुरी म्हणून त्यातून प्रवास करीत आहेत.

(Local मधून मी एकटा प्रवास करतो आणि मला एकट्याला भीती वाटते. )
=))

अधोगती व प्रगती याचं मूल्यमापन साधनांशी का करता. जरा मानसिक स्थैर्य, नागरिक सुरक्षा ह्यावरून करून बघा कि.

राजेश घासकडवी's picture

20 May 2010 - 4:52 pm | राजेश घासकडवी

साध्या प्रश्नाला सरळ उत्तर देण्याऐवजी चर्चाप्रस्तावकांनी दुसरंच काही तरी लिहिल्यामुळे मी ही चर्चा सोडून देतो आहे.

अधोगती व प्रगती याचं मूल्यमापन साधनांशी का करता. जरा मानसिक स्थैर्य, नागरिक सुरक्षा ह्यावरून करून बघा कि.

माझ्या मूळ प्रतिसादात मी कुठेच 'साधनांचा' उल्ले़ख केलेला नव्हता. अज्ञान, दारिद्र्य व रोगराई हे राष्ट्रीय सुरक्षा किंवा नक्षलवाद यांपेक्षा गंभीर प्रश्न आहेत असं म्हटलं होतं. ते तुम्हाला पटत नाही असं दिसतंय. राह्यलं.

अहो मनोज-जी,
इथे कमीत कमी पाकिस्तानी येऊन गोळ्या घालतात. अमेरिकेत तर अमेरिकन फौजी त्याच्या सहकार्‍यांवर गोळ्या घालतो, शाळा-कॉलेजमधली पोरेही गोळ्या घालतात आपल्या सहविद्यार्थ्यावर! अशा घटनांवरून देशाची प्रगती-अधोगती मापता कामा नये!
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.

Manoj Katwe's picture

18 May 2010 - 12:42 pm | Manoj Katwe

हा प्रतिसाद चुकून आलेला आहे. काढून टाकावा.

Dipankar's picture

18 May 2010 - 10:59 am | Dipankar

असे विषय मिपावर काढले की काही सदस्यांना राग येतो. त्यांच्या मते आपली भरपूर प्रगती झाली आहे

आपण अमेरीकेशी तुलना करत आहात तर नक्कीच प्रगती झाली नाही, पण आपण भारत ५० वर्षापूर्वीचा भारत आणी आत्तचा भारत यात तुलना करा.

आपण महासत्ता आहोत ही नक्कीच बढाई आहे पण आपण जर थोडीबहुत प्रगती केली असेल तर ती नाकारणॅ हा न्युनगंड होय

आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

हेरंब's picture

18 May 2010 - 11:59 am | हेरंब

५० वर्षांत नक्कीच प्रगती झाली आहे. पण भ्रष्टाचार नसता वा कमी असता तर याच्या कितीतरी पटीने प्रगती झाली असती. अधोगती ही पैशांत मोजता येणार नाही. पण भ्रष्टाचार पूर्वीपेक्षा वाढला आहे हे तरी मान्य आहे का ? त्यालाच मी अधोगती म्हणतो. आणि भौतिक प्रगती म्हणाल तर ती होण्यात आपल्या देशांत किती हातभार लागला ? किती शोध आपल्या देशांत लागले ? फरक इतकाच पडला आहे की पूर्वीच्या बंधनांमुळे फॉरिन चैनीच्या वस्तु सामान्य माणसाला मिळत नसत. आताच्या मुक्त अर्थव्यवस्थेमुळे त्या मुबलक मिळतात.
मोबाईल, काँप्युटर, आयपॉड हे आपल्याला आयते मिळाले आहेत.
प्रगती झाली आहेच पण ती वर्षांच्या व मनुष्यबळाच्या तुलनेने कमी आहे असे माझे मत आहे.

अरुण मनोहर's picture

18 May 2010 - 11:11 am | अरुण मनोहर

काय को ईतना सोचने का?
२०१२ मे सब खतम होने वाला है!

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2010 - 11:18 am | परिकथेतील राजकुमार

साला तगेल तितक्या दिवस तगेल, नाही तगली तर बंद करुन टाकु.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अरुण मनोहर's picture

18 May 2010 - 11:22 am | अरुण मनोहर

हे आहे हे असं आहे. नाहीतर काय कशात घालायच अन काय करायच तेही मिपावासींना माहीत आहे.

टारझन's picture

18 May 2010 - 11:47 am | टारझन

अश्लिल ... अश्लिल .... कांदे स्वस्त झालेत काय तिकडे ? ;)

(काही बाही खाऊन प्रतिसाद) तरुण कांदोहर

अरुण मनोहर's picture

18 May 2010 - 11:54 am | अरुण मनोहर

अश्लिल असते तर संपादकांनी उडवले नसते का भौ?
संपादक तर ह.. ह.. लो..

बाकी कांद्यांचा असला उपयोग माहीत नव्हता हं. आभार.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 May 2010 - 11:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

अदिती

मिसळभोक्ता's picture

19 May 2010 - 1:25 am | मिसळभोक्ता

साला तगेल तितक्या दिवस तगेल, नाही तगली तर बंद करुन टाकु.

त्या आधी, अर्ध्या अधिक लोकांना चपला घालून बाहेर पाडवू, हे विसरलात.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मदनबाण's picture

18 May 2010 - 11:20 am | मदनबाण

देशातले काही राजकारणी हे अगदी गोचीडा सारखे आहेत...सतत रक्त पिण्यासाठी आसुसलेले...त्यांना देशाच्या प्रगती पेक्षा स्वतःच्या प्रगतीची जास्त काळजी वाटते...लोकांच्या घरात वीज नाही,पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे...हे आपल्या देशाच्या प्रगतीचे लक्षण आहे ना !!!
तरुणांना नोकर्‍या मिळताना मारामारी आहे...विश्वास नाही बसत मग हे जरुर वाचा...
हमालाच्या नोकरीसाठी ६७८ पदवीधरांचे अर्ज !
http://alturl.com/n5wa
स्विस बॅंकेत कोणाचे किती धन आहे हे जाहीर करायला सरकार का प्रयत्न करत नाही ?
देश विकुन खातील हे लोक एक दिवस !!! :(

मदनबाण.....

“control oil and you control nations; control food and you control the people”.
Henry Kissinger

हमालाच्या नोकरीसाठी ६७८ पदवीधरांचे अर्ज !
हमालकी कोणालाही कुठे ही करता येते. फक्त त्याला ज्या ठिकाणी हमालकी करायची आहे तिथल्या प्रशासनाची परवानगी पाहिजे.
राहिले वरील बातमी बद्दल ही जर हमालकी सरकारी नोकरी असेल तर त्याची चंगळच आहे.बोंबलायला काम नाही,सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार, इतर भरपुर सोयीसुविधा व वरुन मलिदा. मग पदवीधर तरी मागे कशाला राहतील?
म्हणुनच मलिदा आपल्याला मिळावा ह्या करीता तक्रारदार न्यायालयात दाद मागायला गेला असणार.
वेताळ

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2010 - 11:38 am | परिकथेतील राजकुमार

ह्या विषयावर हमाल धमाल मुलगा ह्यांचे विचार जाणुन घ्यायला आवडतील.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

समंजस's picture

18 May 2010 - 3:04 pm | समंजस

जाउ द्या हो मनोजसाहेब. एवढी काळजी करू नका.
अधोगती ही व्यक्तीसापेक्ष आहे. त्यामुळे या बाबतीत सार्वमत नाही होणार :)
अधोगतीच्या व्याख्या/समिकरणं ही व्यक्तीनुसार/काळानुसार बदलतात.

शाळेत/महाविद्यालयात प्रवेश घेणे(जास्तीचे पैसे भरून) हे काही व्यक्तींकरीता अधोगती असेल काहीं करीता नाही :)
वर फक्त एकच उदाहरण दिलंय, अनेक देता येतील पण साध्य काय होणार??
शेवटी जैसी प्रजा तैसा राजा....(लोकशाहीतील म्हण आहे ही) :)

अरुंधती's picture

18 May 2010 - 10:00 pm | अरुंधती

१ला प्रश्न :
भारतात नक्की लोकशाही आहे? की मनगटशाही, झुंडशाही वगैरेंमध्ये ती कधीच लोप पावली आहे?

२ रा प्रश्न :
आपल्याकडे लोकशाही मुळात रुजली तरी आहे का, जी काही वर्षांनी नष्ट होईल?

३रा प्रश्न :
ही लोकशाही टिकवण्यासाठी, तिचे संवर्धन होण्यासाठी तुम्ही - मी - आपण सर्वांनी मतदान करण्यापलीकडे काही वेगळे केले आहे का? असल्यास ते काय?

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

शिल्पा ब's picture

18 May 2010 - 10:57 pm | शिल्पा ब

भारतात भ्रष्टाचार आहेच...इथे फक्त मुंबई आणि पुणे शहरातील उदा. दिली आहेत असे वाटते.....अगदी ठाण्यापासून जवळच असलेल्या आदिवासी खेड्यांमध्ये सुविधा नाहीत...वेळोवेळी लोकसत्तात याविषयी आवाज उठवला गेला आहे...उत्तरेकडील राज्ये तसेच आसाम, ओरिसा अजूनही मागासच आहेत..

जागतिक खेडे बनल्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांना हव्या त्या वस्तू मिळू शकतात...शहरात लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे आणि खेडी रिकामी होत आहेत, कारण तिथे कामच नाही....शेतकर्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत...जे करत नाहीत त्यांना पाण्याचे दुर्भिक्ष, विजटंचाई , शेतमालाला कमी किंमत (उदा. द्राक्षे) इ. संकटाना तोंड द्यावे लागत आहे...

खेड्यात शिक्षणाची चांगली सुविधा नाही...तरीसुद्धा महाराष्ट्रात काही ठिकाणी उत्तम दर्जाचे शिक्षक विद्यार्थ्यांना स्वच्छता, शेतीसाहित वेगवेगळ्या विषयाचे शिक्षण देत आहेत (लोकसत्तातील लेख)

भरमसाठ वृक्षतोड आणि त्याप्रमाणात लागवड नाही...परिणामी कमी पाऊस, पाण्याचे दुर्भिक्ष. शेतजमिनीवर बांधकाम
राजकारण आणि राजकारणी यांच्याबद्दल तर काही बोलायलाच नको...municipal शाळांच्या दर्ज्याबाबत प्रश्नचिन्ह....
अजूनही बर्याच गोष्टी आहेत...यातील काही चांगल्या तर काही वाईट...काही प्रमाणात प्रगती आहे तर काही गोष्टीमध्ये अधोगती...उदा. पर्यावरण, कायद्याची अंमलबजावणी

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मदनबाण's picture

18 May 2010 - 11:08 pm | मदनबाण

भरमसाठ वृक्षतोड आणि त्याप्रमाणात लागवड नाही...परिणामी कमी पाऊस,
आमच्या नेत्यांना त्यांच्या "साहेबांचे" मोठे फलक लावुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे जास्त महत्वाचे वाटते...अश्या सर्व पोस्टर्सचा खर्च काढला तर त्यात किती झाडे लावता आली असती ?
डोंगर पोखरले,नद्या प्रदुषित्,जमिन नापिक्...सर्व काही इंपोर्ट करायला लावतील हे हिंदुस्थानातील नेते.
इथे म्हणतात आमच्या पक्षाचे विचार आणि तत्व आहे !!! आणि याच तत्व,विचार यांना फाट्यावर मारुन युती / आघाडी करणारे हेच पक्ष...
कसला आलाय जनतेचा कैवार !!! तुम्ही खा आणि आम्हालाही खाण्यासाठी जागा ठेवा हेच यांचे विचार आणि धोरण.

मदनबाण.....

“control oil and you control nations; control food and you control the people”.
Henry Kissinger

बाळकराम's picture

19 May 2010 - 1:45 am | बाळकराम

मी या संकेतस्थळावर नेहेमी वाचनमात्र असतो, पण हा बालिश लेख वाचून लिहावसं वाटलं. काही लोक इतके निराश का आहेत तेच कळत नाही. भारत संपणार अशी दिवास्वप्ने पाहणारे इथल्याच मातीत मिसळून गेलेत. जो देश गेल्या २००० वर्षांपैकी जवळपास १७००-१८०० वर्षे जगातील सर्वात श्रीमंत देश होता त्याला यापुढेही अवास्तव काळजी करण्याची गरज नाही असे वाटते- निदान तो संपून जाईल असं समजण्याची तर बिलकुल गरज नाही.

Manoj Katwe's picture

20 May 2010 - 5:33 am | Manoj Katwe

हा बालिश लेख वाचून लिहावसं वाटलं. काही लोक इतके निराश का आहेत तेच कळत नाही

मला काही प्रश्न पडले आहेत, कृपया त्याची उत्तर द्या.
१) काही लोक निराश आहेत . म्हणजे बाकी किती लोक एकदम सुखी आहेत. (असो काही धनवान मंडळी, करोडपती अंबानी, बिर्ला, टाटा, कदाचित तुम्ही नक्कीच सुखी असतील, पण
लोक का निराश आहेत हे तुम्हाला कळत नाही म्हणल्यावर तुम्ही भारतातच राहतात का हा पण एक प्रश्न पडला आहे.
२) भारत मागील १८०० वर्षे श्रीमंत होता. तो भूतकाळ आहे. एखादा श्रीमंत माणूस गरीब , भिकारी झाल्यावर काय पुन्हा आपोआप श्रीमंत होतो का ?. कि त्याला काही परिश्रम करावे लागतात ?
३) माझ्या मते तुम्हाला काही कोणती झळ अद्याप बसलेली दिसत नाही. तुमच्या घरी १२-१४ तास लोडशेडींग चालू होऊ द्यात, तुम्हाला ३-४ km वरून पाणी आणावे लागुद्यात, तुम्चाकडे पोरांसाठी शिक्षणाला पैसे नसतील, वरून हे नक्षलि , अतिरेकी कारवायांपुढे तुम्ही काही तुम्हे आप्त गमावले असतील तरी तुम्हाला हे सगळा बालिश वाटेल ?
४) भारत संपणार हे दिवास्वप्ना नाहीये. ब्रिटीश आले तेव्हा सुधा आपण असेच गाफील राहिलो होतो. आपण पुढे जाऊन महासत्ता होऊ हे दिवास्वप्ना आहे.
५) तुमच्या घरी कोणते वर्तमान पत्र येत नाही का ? कि तुम्ही कधी ते वाचत नाही ?
६) तुमच्या घरी AC कोणता आहे ते समजेल का. नाही म्हणाल बाहेर इतकं रान पेटलं आहे तरी तुमचे डोक एकदम थंड.

बेसनलाडू's picture

20 May 2010 - 5:56 am | बेसनलाडू

इतरांना प्रश्न करण्याआधी तुम्हांला इतरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, हे नम्र, कळकळीची विनंतीवजा आवाहन.
(आवाहक)बेसनलाडू

Manoj Katwe's picture

20 May 2010 - 8:34 am | Manoj Katwe

हा धागा मी प्रश्नोत्तराचा खेळ खेळण्यासाठी लिहिलेले नसून, मला खाली नमूद केलेल्या गोष्टींवर चर्चा अपेक्षित आहे.
१) आपण सर्व मिळून भारत समृद्ध करण्यासाठी काय करू शकतो (कोणती विश्वासार्ह योजना आहे काय ?)
२) भ्रष्टाचार, जातीयवाद, यांनी पोखरलेल्या भारताला नवीन संजीवनी कशी देऊ शकतो ?
३) आपला इतिहास सांगतो कि आपण आपापसातच बांधून बरंच काही गमावले आहे.
त्यातून शहाणपण घेऊ शकतो का ?
४) आज भारत चारही बाजूनी शत्रूंनी वेढला गेला आहे. त्याला प्रगतीचा , शांततेचा, समाधानाचा मार्ग शोधण्यासाठी काही प्रयत्न करू शकतो का ?
५) कालचा आपला शत्रू (इंग्रज) हा माहित होता. पण आज आपला खरा शत्रू आपल्यातच आहे. त्याच्यावर कशी मात करता येईल ?
६) जर खरच काही होणार नाही ह्याची खात्री झाली तर आपण सामान्य माणसाला पुढील भविष्यासाठी काय सल्ला देऊ शकतो ?
झाड कितीही प्रिय असले तरी ते जव्हा रानाच्या आगीत सापडते, तेव्हा पक्षी ते झाड (दुखाने का होईने) सोडून जातो.

भारताने प्रगती केली का अधोगती हा ह्या चर्चेचा विषयच नाही.
मला आपण कालपासून आज कुठे आलो आहोत यापेक्षा आज पासून उद्या कुठे जाऊन पोहोचू ह्या चर्चेत जास्त रस आहे.

विषय खरंच खूप गंभीर आहे. कृपया personally घेऊ नये.

बेसनलाडू's picture

20 May 2010 - 8:40 am | बेसनलाडू

१. जेव्हा तुम्ही चर्चाप्रस्ताव लिहिला तेव्हाचा तुमच्या प्रस्तावाचा मसुदा
२. प्रस्तावावर आलेल्या प्रतिसादांमधील मुद्द्यांचा प्रतिवाद करतानाचे तुमचे प्रतिसाद आणि
३. तुमच्या वरील प्रतिसादातील सर्व प्रश्न
यांचा एकत्रित विचार करता तुम्ही ही चर्चा तुमच्या सोयीने वहावत नेत आहात/भरकटवत आहात, असे खेदाने म्हणावेसे वाटते. तुम्हांला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याजवळ नसल्यास तसे मान्य करा. ज्या मुद्द्यांच्या संदर्भात ते प्रश्न विचारले गेले आहेत, तो एकेक मुद्दा मुद्देसूदपणे हातावेगळा केल्याखेरीज तुमच्या इतर प्रश्नांकडे ढुंकूनही बघायची गरज नाही. तुमचा चर्चा भरकटवायचा खोडसाळपणा असाच चालू राहिला, तर दुर्दैवाने यापुढे तुमच्या मताला काडीचीही किंमत उरायची नाही.
(सावध)बेसनलाडू

Manoj Katwe's picture

20 May 2010 - 9:05 am | Manoj Katwe

चर्चा तुमच्या सोयीने वहावत नेत आहात/भरकटवत आहात, असे खेदाने म्हणावेसे वाटते

तुम्हाला भारत हे कुठे वाहत/भरकटत चालला आहे त्या बद्दला खेद दिसत नाही आणि माझ्या चर्चे बद्दला खेद दिसतो आहे हे ऐकून मला खरच वाईट वाटले.

माझ्याकडे हजारो प्रश्नांची उत्तरे नाही म्हणून तर हा धागा मी चर्चे साठी ठेवला.
चर्चाप्रस्ताव, मुद्द्यांचा प्रतिवाद हे सगळे एकदम as per process नेण्यासाठी हे काय इथे साहित्य संमेलन भरले आहे कि काय अशी शंका येऊ लागली आहे ?

अहो मी काय म्हणतोय आणि तुमचा काय चाल्लय

माझे मुद्दे खोडून काढण्यापेक्षा एकतरी प्रश्नांबाबत काहीतरी समाधान सुचवा.

आणि मी खोडसाळ पण करतो आहे हा साक्षात्कार कुठून झाला बुवा तुम्हाला का कि फक्त तुम्ही म्हणता ते खरे
बाकी इतरांना काय वाटते ते त्यांनी बोलू देखील नये कि काय ?

(मला आता इथे सकाळ सकाळी नळावर चाललेली बायकांची भांडणे वाटू लागली आहेत हि)
कृपया तुम्हाला काही खरच positive सुचत असेल तर बोला अन्यथा गप्प राहा.

हा माझा आपणास असलेला शेवटचा प्रतिसाद आहे.

कृपया तुम्हाला काही खरच positive सुचत असेल तर बोला अन्यथा गप्प राहा.
हेच खरे तर मी तुम्हाला सांगणार होतो. तेव्हा - तुम्हाला काही खरच positive सुचत असेल तर बोला अन्यथा गप्प राहा.
(सुस्पष्ट)बेसनलाडू

ऋषिकेश's picture

20 May 2010 - 9:56 am | ऋषिकेश

बेसनलाडूशी सहमत...

माझे मुद्दे खोडून काढण्यापेक्षा एकतरी प्रश्नांबाबत काहीतरी समाधान सुचवा.

जिथे उत्तरे मिळाली आहेत तिथे दुर्लक्ष करायचे आणि नुसते इथून तिथे चर्चा हलवत रहायची..

जरी साहित्यसंमेलन नसले तरी चर्चा सुसंबद्ध रितीने झाली नाहि तर होतो तो गोंधळ काहि निष्कर्ष निघणारी चर्चा नव्हे.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

बाळकराम's picture

21 May 2010 - 1:32 am | बाळकराम

श्री. मनोज साहेब,

काही लोकं इतकी निराश का आहेत अस म्हटलं त्याचा मतितार्थ एवढाच की तुम्ही सगळे प्रश्न जमेस धरून सुद्धा त्याचा बाऊ करण्याचे कारण नाही. (मी भारतात राहत नाही हा निष्कर्ष मात्र बरोबर आहे- पण माझ्या आयुष्यतील २८ वर्षे मी भारतातच काढली आहेत त्यामुळे भारतातील प्रश्नांची मला जाण नसावी हा कयास मात्र चुकीचा आहे.) ह्या लेखाला बालिश म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे नक्षलवादासारख्या ज्वलंत प्रश्नाचे जे सुलभीकरण तुम्ही करु पाहात आहात त्यासंदर्भाने आहे. प्रश्न कुठल्या देशात नाहीत- इस्रायल सारखा देश गेले कित्येक वर्षे अरबांशी लढतो आहे- त्यात कोण चूक/बरोबर हा प्रश्न नाही- पण त्याला संपवण्यची कसम खालेल्ल्या श्रीमंत अरबांना इस्रायलला संपवणे अजूनही शक्य झालेले नाही. महाबलाढ्य अमेरिकेविरुद्ध कयुबाची गोष्टही अशीच. त्यामुळे भारतासारख्या बलवान- लष्करी व आर्थिक दोन्ही द्रुष्टीनेही- देशाला संपवणे एवढे सोपे नाही हे भारताच्या शत्रूंनासुद्धा ठाऊक आहे. ( म्हणूनतर दहशतवाद्याच्या साहाय्य ते घेताहेत)

भारत मागील १८०० वर्षे श्रीमंत देश होता ते काही उगीच नाही आणि उद्या महासत्ता होइल ते ही आपोआप नाही. (http://www.time.com/time/specials/2007/article/0,28804,1649060_1649046_1...)

प्रश्न गंभीर आहे हे तर खरेच, पण तो तुम्ही समजता त्यापेक्षाही गंभीर आहे आहे आणि त्यासाठी सनसनाटी व उथळ विचार न करता मूलगामी उपाययोजना करण्याची गरज आहे.
आतापुरते एवढेच.

बाळकराम

डावखुरा's picture

19 May 2010 - 2:29 am | डावखुरा

भारताची लोकशाही किती दिवस तग धरू शकेल ?

जर हा प्रकल्प यशस्वी ठरला तर हा प्रश्न निकालात निघु शकेल....
कारण ज्या व्यक्तीवर ह्या प्रकल्पाचा कार्यभार आहे ती व्यक्ती विश्वासार्ह आहे असे माझे आणि कित्येकांचे मत आहे...

----------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

yogeshwar patil's picture

19 May 2010 - 5:15 pm | yogeshwar patil

लै दिवस तग धरेल!

लोक तशीच तेथील प्रशासन व्यवस्था. प्रजा तथा राजा. यात नविन असे काही नसुन तुमचा आक्रोश कळत आहे. मुळात याने बिना टिकट फिरायला नको होते आणि त्याने असा विश्वास घात करायला नको होता. या सर्व गोष्टी बाजुच्या पर्यन्त असतात तो पर्यन्त आपण त्याला सुचवतो. अवेळी असाच प्रंसग आपल्यावर आल्याने आपण सर्व नियम धाब्यावर बसवुन गंगा स्नान केल्या सारखे करतो.

अविनाशकुलकर्णी's picture

20 May 2010 - 11:25 am | अविनाशकुलकर्णी

सा~या समस्यांचे मुळ वाढति लोकसंख्या आहे..१२५ कोटी झालो तरी वाढतच आहे...एक मुल जन्माला येणे म्हणजे एका मतात वाढ असे गणीत आहे राजकारण्यांचे....त्यात घुसखोरी...

अविनाशकुलकर्णी's picture

20 May 2010 - 11:35 am | अविनाशकुलकर्णी

१) आपण सर्व मिळून भारत समृद्ध करण्यासाठी काय करू शकतो (कोणती विश्वासार्ह योजना आहे काय ?)......... :)) .......वा दादा जय हो...ज्यांनी करायाला हवे ते लुट करतात..तुमचे सारे विचारवंत ,पत्र्कार .अन विरोधी पक्ष त्यांना सामील....अन आमचे दर डोई उत्पन्न २० रुपये..रहायाला घर नाहि...खायला अन्न नाहि....हाताला काम नाहि...अंगावर वस्त्र नाहि....सारी सत्ता तुमच्या कडे...जमीनी तुमच्या..संपत्ति तुमची..अन आम्हि काय करणार??? अडचण आली कि जनता काहि करत नाहि म्हणुन बोंब्लायचे..अन तुम्हि लुटमार करायची कायदेशीर व सनद्शिर मार्गाने..तुमची लोकशाहि तुम्हालाच मुबारक...

मराठे's picture

20 May 2010 - 10:06 pm | मराठे

प्रगती वा अधोगतीचा विचार आपल्याला तीन दृष्टीकोनांतून करावा लागेल
१. आर्थिक
२. सामाजिक आणि
३. सांस्क्रुतिक
..
मला ह्यापैकि कुठलाच दृष्टीकोन नसल्याने इथेच थांबतो! ;-)

ज्ञानेश...'s picture

21 May 2010 - 6:02 pm | ज्ञानेश...

हे मराठे 'त्या' मराठेचे कोणी नातलग तर नव्हेत? (पक्षी: ध्यान??)