गाभा:
शिव वडा पाव व कॉंग्रेस पुरस्कृत कांदे पोहे यांची खुप चर्चा झाली होति..
प्रसिध्द चेफ श्री निलेश लिमये यांनी शिव वड्या पावा साठी खास पध्धतिची रेसिपि बनविली असे वाचनात आले होते...
पुण्यात आम्हि बरिच चौकशी केली पण जोशी वडेवाले यांचाच वडा पाव पुण्यात मिळतो..
शिव वडा पाव व कॉंग्रेस पुरस्कृत कांदे पोहे हे बघायला सुध्धा मिळाले नाहि....
तसेच लालु यांनी पण रेलगाडीत ह्या व.पा.ला विक्रीस परवांगी दिलि असे पण वाचनात आले होते...
कम्युनिटी वरील मुंबई च्या सदस्यांना विचारु इछ्छितो..
मुंबैत शिव वडा पाव व कॉंग्रेस पुरस्कृत कांदे पोहे मिळतात का? कुठे? सभासदा पैकी कुणी याची चव चाखली आहे का? चवदार आहेत का हे पदार्थ? दर काय? आम्हा पुणेकरांना कुणी हि माहिति पुरवु शकेल का?
प्रतिक्रिया
12 May 2010 - 9:38 pm | पांथस्थ
तुम्हाला खाई खाई झालेली दिसते :)
आधी मध्यरात्रीचे खाणे...आता पोहे/वडा पाव...
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
12 May 2010 - 10:33 pm | शुचि
=))
हा हा
खाय खाय शब्द खूप दिवसांनी ऐकला.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
12 May 2010 - 11:39 pm | चिरोटा
असे काय पेशल घालतात हे सेना/काँग्रेसवाले त्या वडापाव्/पोह्यांमधे?
हल्लीच खालील चित्रात दिलेला गोली शेजवान वडापाव खाल्ला.आणि वडा/पाव इथे कधीच खाणार नाही अशी शपथ घेतली.
P = NP
13 May 2010 - 10:47 am | भारद्वाज
शिव वडा पाव नि कांदेपोहे......मी तरी अजुन नाही पाहिला मुंबईत !!!
14 May 2010 - 3:12 pm | वेडा कुंभार
मी मुंबई मध्ये भांडूप (पूर्व) येथे शिव वड्याचे छोटेसे दुकान पाहिले आहे. पण अजून त्याची चव घेतली नाही.
-------------------------------------------------------------------------
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
14 May 2010 - 3:24 pm | भारद्वाज
जावून चव घेवून बघावी लागेल...एकत्रच जावूया मग
जय महाराष्ट्र
14 May 2010 - 3:30 pm | मेघवेडा
भांडुप पश्चिमेचा, शिवाजी तलावाजवळचा 'भाऊ वडापाव' आपला फेव्हरिट!! :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
14 May 2010 - 3:35 pm | वेडा कुंभार
माझा सुद्धा तो वडा पाव फेवरीट आहे.
कधीतरी भेटू आणि पोटभर वडापाव खाऊ.
----------------------------------------------------------------------------------------------
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
14 May 2010 - 3:48 pm | मेघवेडा
तिथं समोरच तो एक उपाहारगृहसुद्धा सुरू करत होता. झालं का रे ते सुरू?
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
14 May 2010 - 4:21 pm | वेडा कुंभार
कारण मी आधी भांडूप मध्ये राहात होतो. आता डोंबिवलीला राहायला गेलो आहे.
------------------------------------------------------------------------------------------------
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
14 May 2010 - 6:07 pm | नितिन थत्ते
>>कारण मी आधी भांडूप मध्ये राहात होतो. आता डोंबिवलीला राहायला गेलो आहे
अरेरे. मुंबईतला मराठी टक्का अजून घसरला. :(
नितिन थत्ते