कोणता फोटो नैसर्गिक वाटतो? (निकाल )

युयुत्सु's picture
युयुत्सु in कलादालन
7 May 2010 - 9:39 pm

खाली एकाच दृष्याच्या दोन वेगवेगळ्या प्रतिमा दिल्या आहेत. प्रत्येक जोडीतील एक प्रतिमा संस्कारीत आहेत. या जोड्या मध्ये कोणती प्रतिमा जास्त नैसर्गिक वाटते हे सांगावे.

या चाचणीचं प्रयोजन
कॅनन ही कंपनी आणि तिचे फॅन्स कॅननच्या प्रतिमेतील रंगांच्या नैसर्गिकतेबद्दल वाहव्वा करताना दिसतात. Untrained eyeला हा नैसर्गिकपणा ओळखता येतो का हे जाणून घेणे हा या चाचणीचा उद्देश आहे. वर दिलेल्या फोटोंमधले मूळ फोटो जास्त संख्येने निवडले गेले तर कॅननचा दावा खरा आहे असं मानायला हरकत नाही. पण जर तसं झाल नाही तर मात्र फोटोवर संस्कार करण्याकरता वापरलेलं तंत्र फोटोतील नैसर्गिकपणास कारणीभूत आहे असं म्हणण्यास जागा आहे. एकच तंत्र वापरुन मी फोटो-संस्करण केले आहे.
१अ

१ब

२अ

२ब

३अ

३ब

सर्व फोटॉ canon sx200 is वापरून घेतले आहेत.

---------------------------------------------------

अंतिम निकाल

नंदूच्या प्रतिसादाने confusion होउन निकालात थोडी चूक झाली त्याबद्द्ल क्षमस्व. आवश्यक ती दूरुस्ती खाली दिली आहे पण निकालात फरक पडला नाही.

१अ - मिली, प्रकाश घाटपांडे, साधासुधासौरभ, अगोचर, अपर्णा-अक्षय, जे.पी.मॉर्गन, मोहन ( ७ मते)
१ब - पांथस्थ, ऋषिकेश, मनमोजी, इरसाल, शिल्पा ब, टुकुल, नंदू, (७ मते)
२अ - पांथस्थ, ऋषिकेश, अपर्णा-अक्षय, इरसाल, शिल्पा ब, टुकुल,नंदू, (७ मते)
२ब - मिली, प्रकाश घाटपांडे, मनमोजी, साधासुधासौरभ, अगोचर, जे.पी.मॉर्गन, मोहन (७ मते)
३अ - साधासुधासौरभ, अपर्णा-अक्षय, इरसाल, शिल्पा ब, टुकुल, नंदू, (६मते)
३ब - मिली, पांथस्थ, प्रकाश घाटपांडे, ऋषिकेश, मनमोजी, अगोचर,
जे.पी.मॉर्गन, मोहन ( ८ मते)

कॅमेरातील मूळ फोटो - १ब, २अ, ३अ

या गटाला मिळालेली एकूण मते - २०/४२

संस्कारित फोटो १ अ, २ ब, ३ब
या गटाला मिळालेली एकूण मते - २२/४२

@नीधप
हे सर्व फोटो कलर्स।कर्व्हज हे जिम्प मधले फिचर वापरुन संस्कारित केले ( हे मी सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो). त्यामुळे मिळणारा **नेमका परिणाम** आपण म्हणता त्या प्रमाणे सेटींग्ज, लाइट पॅटर्न बदलून कसा मिळवता येईल हे जाणून घेण्यास मी उत्सूक आहे. कारण कॅमेराचा डिस्प्ले कंपोजिशनवर मर्यादा आणतो.

अंतिम निर्णय

संस्कारित फोटोना जास्त मते मिळाली कारण ते जास्त नैसर्गिक वाटले. कॅननचा आणि कॅनन भक्तांचा दावा या चाचणीपुरता तरी खोटा ठरला आहे.

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार...

तंत्र

प्रतिक्रिया

मीली's picture

7 May 2010 - 10:31 pm | मीली

१अ ,२ ब ,३ब

मीली

युयुत्सु's picture

8 May 2010 - 8:01 am | युयुत्सु

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कोणते फोटो मूळ आणि कोणते संस्कारीत हे नंतर सांगेन.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

पांथस्थ's picture

8 May 2010 - 8:35 am | पांथस्थ

१ब, २अ, ३ब

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

प्रकाश घाटपांडे's picture

8 May 2010 - 8:40 am | प्रकाश घाटपांडे

१अ ,२ ब ,३ब हे मूळ असावेत
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

युयुत्सु's picture

8 May 2010 - 8:49 am | युयुत्सु

मूळ फोटो कोणते हे ओळखायचे नसून कोणते फोटो जास्त नैसर्गिक वाटतात हे सांगायचे आहे.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

प्रकाश घाटपांडे's picture

8 May 2010 - 10:16 am | प्रकाश घाटपांडे

एक मूळ फोटो आहे व एक संस्कारित. आम्ही मूळ फोटोला नैसर्गिक (वाटणे) म्हटले आहे. कुणाला संस्कारित फोटो नैसर्गिक वाटु शकतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

ऋषिकेश's picture

8 May 2010 - 10:11 am | ऋषिकेश

१ब, २अ, ३ब

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

शानबा५१२'s picture

8 May 2010 - 11:24 am | शानबा५१२

सर्वच

*************************************************
मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

JAGOMOHANPYARE's picture

8 May 2010 - 7:43 pm | JAGOMOHANPYARE

मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

:) :)

नीधप's picture

8 May 2010 - 12:25 pm | नीधप

संस्कारित म्हणजे फोटो काढून झाल्यानंतर फोटोशॉप किंवा तत्सम तंत्रांच्या आधारे बदल करणं असंच म्हणायचंय ना?
तसं असेल तर यातला एकही संस्कारित नाहीये.

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

युयुत्सु's picture

8 May 2010 - 1:19 pm | युयुत्सु

तसं असेल तर यातला एकही संस्कारित नाहीये.

प्रत्येक जोडीतील एक फोटो GIMP 2.6 हे सॉफ्टवेअर वापरून संस्कारित केला आहे.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

सुधीर१३७'s picture

8 May 2010 - 3:39 pm | सुधीर१३७

मी नाय साँगनार .......ज्जा................................. :$ 8}

मनमोजी's picture

8 May 2010 - 8:20 pm | मनमोजी

माझ्या मते प्रत्येक फोटोतील दोन नंबर फोटो जास्त नैसर्गिक वाटतात

सांजसखी's picture

8 May 2010 - 8:51 pm | सांजसखी

सर्व 'ब' गटातले..
फार काही कळ्त नाही यातले पण जास्त उजेडातले खरे वाटले..
सर्वच सुंदर आहेत पण.....
उत्तम फोटोग्राफर आहात आपण !!!!

१अ - मिली, प्रकाश घाटपांडे
१ब - पांथस्थ, ऋषिकेश, मनमोजी
२अ - पांथस्थ, ऋषिकेश
२ब - मिली, प्रकाश घाटपांडे, मनमोजी
३अ -
३ब - मिली, पांथस्थ, प्रकाश घाटपांडे, ऋषिकेश, मनमोजी

संदिग्ध प्रतिसादांचा विचार केलेला नाही. अजून काही प्रतिसाद मिळाल्यास निष्कर्ष काढणे सोपे जाईल...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

मी-सौरभ's picture

9 May 2010 - 12:03 am | मी-सौरभ

-----
सौरभ :)

कवितानागेश's picture

9 May 2010 - 1:43 am | कवितानागेश

तीनही, पहिले फोटो, मूळ वाटतात, पन दुसरे जास्त छान आहेत.
"नैसर्गिक', पहिलेच वाटतात.
============
माउ

अगोचर's picture

9 May 2010 - 1:52 am | अगोचर

---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान

स्पंदना's picture

9 May 2010 - 8:18 am | स्पंदना

सारे "अ" नैसर्गिक वाटतात, सन्स्कारित फोटोज मध्ये रेखीवता आणि उठावदारपणा आहे.

मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!
>:)

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

चिंतातुर जंतू's picture

9 May 2010 - 4:54 pm | चिंतातुर जंतू

नैसर्गिक हा शब्द फसवा आहे. एकच वस्तू वेगवेगळ्या छायाचित्रांत वेगवेगळी दिसते. त्याची कारणे अनेक असतात. उदा: प्रकाश कोणत्या दिशेने येत आहे, तो प्रखर आहे की सौम्य आहे, यासारख्या घटकांवर ते अवलंबून असते. याशिवाय छायाचित्रण ही मूलतः तंत्राधिष्ठित प्रक्रिया असल्यामुळे उपकरण कोणते वापरले, छिद्रातून किती वेळ प्रकाश आत जाऊ दिला, अशा घटकांमुळेही प्रतिमेचा दृश्य परिणाम बदलतो.

एक प्रयोग म्हणून गूगल प्रतिमा शोधाचा वापर करून मोनालिसाच्या आंतरजालावरच्या वेगवेगळ्या प्रतिमा शोधून पाहाव्यात. नमुन्यादाखल दोन उदाहरणे पाहा:

मोनालिसा - अ:
मोनालिसा - अ

मोनालिसा - ब:
मोनालिसा - ब

कोणती अधिक मुळाबरहुकुम आहे, हे ठरवण्यासाठी कदाचित लूव्रमध्येच जावे लागेल. तिथे किमान (सध्या तरी) संग्रहालय खुले असते, तेव्हा सर्व काळ सारखाच (आणि त्याच कोनांतून) प्रकाश येतो. प्रत्यक्ष निसर्गात तर तसेही होत नाही. त्यामुळे 'नैसर्गिक' ही संकल्पना फार गुंतागुंतीची आहे.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

नीधप's picture

30 May 2010 - 4:43 pm | नीधप

>>त्यामुळे 'नैसर्गिक' ही संकल्पना फार गुंतागुंतीची आहे.<<
अगदी अगदी. गोंधळाची पण म्हणायला हरकत नाही.

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

युयुत्सु's picture

9 May 2010 - 5:12 pm | युयुत्सु

या चाचणीचं प्रयोजन वेगळे आहे. कॅनन ही कंपनी आणि तिचे फॅन्स कॅननच्या प्रतिमेतील रंगांच्या नैसर्गिकतेबद्दल वाहव्वा करताना दिसतात. Untrained eyeला हा नैसर्गिकपणा ओळखता येतो का हे जाणून घेणे हा या चाचणीचा उद्देश आहे. वर दिलेल्या फोटोंमधले मूळ फोटो जास्त संख्येने निवडले गेले तर कॅननचा दावा खरा आहे असं मानायला हरकत नाही. पण जर तसं झाल नाही तर मात्र फोटोवर संस्कार करण्याकरता वापरलेलं तंत्र फोटोतील नैसर्गिकपणास कारणीभूत आहे असं म्हणण्यास जागा आहे. एकच तंत्र वापरुन मी फोटो-संस्करण केले आहे.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

नीधप's picture

11 May 2010 - 12:17 pm | नीधप

कॅनन किंवा इतर कोणताही कॅमेरा असो. तुम्ही जे संस्कारित केलेले फोटो आहेत तसे कुठल्याही साध्या डिजिटल क्यामेर्‍यावर थोडी सेटींग्ज आणि लाइट पॅटर्न बदलून काढता येतील.
आणि तुम्ही संस्कारित केलेले आहेत किंवा सेटींग्ज, लाइट पॅटर्न बदलून काढलेले फोटो आहेत हे कळण्यासाठी अंतर्ज्ञानच हवे. :)
असो..
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

नंदू's picture

9 May 2010 - 7:28 pm | नंदू

१अ ,२ ब ,३ब हे ओरिजिनल असवेत. असो, पण त्यांच्या संस्कारित प्रति जास्त नैसर्गिक वाटतात.

निकॉन फॅन,

नंदू

जे.पी.मॉर्गन's picture

10 May 2010 - 2:11 pm | जे.पी.मॉर्गन

पाहणीचे निष्कर्ष पहाण्यास उत्सुक

जे पी

इरसाल's picture

10 May 2010 - 2:17 pm | इरसाल

चिंतातूर जंतू म्हणतोय त्याप्रमाणे पहिला फोटो खरा आहे मी स्वत लौव्रे मध्ये गेलो होतो.माझ्याजवळ तिथले फोटोही आहेत पण इथे मला फोटो टाकता येत नाहीयेत आणि विशेष म्हणजे हे मराठी अगोदर इसकाळ वर लिहून इथे कॉपी केले आहे.बाकी वरच्या फोटोबद्दल म्हणाल तर १ब, २अ, ३अ हे नैसर्गिक आणि उरलेले संस्कारित आहेत.

युयुत्सु's picture

10 May 2010 - 3:34 pm | युयुत्सु

आज रात्री सर्व प्रतिसाद परत संकलित करीन आणि निष्कर्ष जाहिर करीन.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

शिल्पा ब's picture

11 May 2010 - 12:18 am | शिल्पा ब

छान छायाचित्रण आहे...मला एक प्रश आहे..इथे फोटो कसे upload करायचे...मी प्रयत्न केला पण जमले नाही...म्हणजे पूर्वपरीक्षण करताना फोटो दिसत नाही...पिकासाची लिंक टाकली तरी. वेळ मिळाला तर सांगा.

शिल्पा
http://shilpasview.blogspot.com/

शिल्पा ब's picture

11 May 2010 - 3:50 am | शिल्पा ब

छान छायाचित्रण आहे...मला एक प्रश आहे..इथे फोटो कसे upload करायचे...मी प्रयत्न केला पण जमले नाही...म्हणजे पूर्वपरीक्षण करताना फोटो दिसत नाही...पिकासाची लिंक टाकली तरी. वेळ मिळाला तर सांगा.

शिल्पा
http://shilpasview.blogspot.com/

हे पण खूप महत्त्वाचं आहे.

प्रत्येक मॉनिटर चं सेटींग वेगवेगळं असतं.

-एक

टुकुल's picture

11 May 2010 - 12:02 pm | टुकुल

१ब, २अ, ३अ

--टुकुल

मोहन's picture

11 May 2010 - 12:29 pm | मोहन

१अ, २ब, ३ब नैसर्गीक वाटतात.

आता निकाल सांगा.

मोहन

युयुत्सु's picture

11 May 2010 - 5:45 pm | युयुत्सु

अंतिम निकाल

नंदूच्या प्रतिसादाने confusion होउन निकालात थोडी चूक झाली त्याबद्द्ल क्षमस्व. आवश्यक ती दूरुस्ती खाली दिली आहे पण निकालात फरक पडला नाही.

१अ - मिली, प्रकाश घाटपांडे, साधासुधासौरभ, अगोचर, अपर्णा-अक्षय, जे.पी.मॉर्गन, मोहन ( ७ मते)
१ब - पांथस्थ, ऋषिकेश, मनमोजी, इरसाल, शिल्पा ब, टुकुल, नंदू, (७ मते)
२अ - पांथस्थ, ऋषिकेश, अपर्णा-अक्षय, इरसाल, शिल्पा ब, टुकुल,नंदू, (७ मते)
२ब - मिली, प्रकाश घाटपांडे, मनमोजी, साधासुधासौरभ, अगोचर, जे.पी.मॉर्गन, मोहन (७ मते)
३अ - साधासुधासौरभ, अपर्णा-अक्षय, इरसाल, शिल्पा ब, टुकुल, नंदू, (६मते)
३ब - मिली, पांथस्थ, प्रकाश घाटपांडे, ऋषिकेश, मनमोजी, अगोचर,
जे.पी.मॉर्गन, मोहन ( ८ मते)

कॅमेरातील मूळ फोटो - १ब, २अ, ३अ

या गटाला मिळालेली एकूण मते - २०/४२

संस्कारित फोटो १ अ, २ ब, ३ब
या गटाला मिळालेली एकूण मते - २२/४२

@नीधप
हे सर्व फोटो कलर्स।कर्व्हज हे जिम्प मधले फिचर वापरुन संस्कारित केले ( हे मी सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो). त्यामुळे मिळणारा **नेमका परिणाम** आपण म्हणता त्या प्रमाणे सेटींग्ज, लाइट पॅटर्न बदलून कसा मिळवता येईल हे जाणून घेण्यास मी उत्सूक आहे. कारण कॅमेराचा डिस्प्ले कंपोजिशनवर मर्यादा आणतो.

अंतिम निर्णय

संस्कारित फोटोना जास्त मते मिळाली कारण ते जास्त नैसर्गिक वाटले. कॅननचा आणि कॅनन भक्तांचा दावा या चाचणीपुरता तरी खोटा ठरला आहे.

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

llपुण्याचे पेशवेll's picture

11 May 2010 - 5:53 pm | llपुण्याचे पेशवेll

काहीसा असहमत.
तौलनिक अभ्यास करता चित्र क्र १ व २ यासाठी मतविभागणी समसमान आहे.
चित्र क्र ३ साठि फक्त ६ X ८ अशी आहे.
त्यामुळे निष्कर्ष काहीसा कमी प्रयोगावर आधारित वाटतो आहे. केवळ एका चित्राला मिळालेल्या अधिक मतांमुळे तसा ग्रह झाल्यासारखे वाटते.
अधिक चित्रांच्या सहाय्याने परत चाचणी घेतली तर अजून चांगले परिणाम मिळतील असे वाटते.
अशी चाचणी घेतल्याबद्दल युयुत्सुंचे आभार.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

युयुत्सु's picture

11 May 2010 - 5:58 pm | युयुत्सु

त्यामुळे निष्कर्ष काहीसा कमी प्रयोगावर आधारित वाटतो आहे.

या चाचणीला मर्यादा आहेत हे मला मान्य आहे. म्हणूनच मी वर "या चाचणीपुरता" असा शब्द प्रयोग केला आहे.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

नीधप's picture

30 May 2010 - 4:41 pm | नीधप

>>त्यामुळे मिळणारा **नेमका परिणाम** आपण म्हणता त्या प्रमाणे सेटींग्ज, लाइट पॅटर्न बदलून कसा मिळवता येईल हे जाणून घेण्यास मी उत्सूक आहे.<<
मला समजवता येण्याइतकं ज्ञान असतं तर समजावून द्यायला नक्की आवडलं असतं. मी जो मुद्दा मांडला तो म्हणजे डिजिटल क्यामेरे घेऊन विविध सेटिंग्ज आणि विविध प्रकारे लाइट बदलून मी जे प्रयोग करून बघितले माझे माझे त्यातून आलेला अनुभव आहे. फक्त सगळे प्रयोग अजून बाल्यावस्थेत असल्याने मला काय केले असता काय होईल अशी गणिते मिळालेली नाहीयेत. बहुतांशी वेळेला अपघाताने गोष्टी घडतायत. पण घडतायत हे नक्की

>>कारण कॅमेराचा डिस्प्ले कंपोजिशनवर मर्यादा आणतो.<<
तुमच्या चित्रांमधे कंपोजिशन (म्हणजे रचना/ ठराविक स्पेसमधे सब्जेक्टसची मांडणी असे आम्हाला तरी डिझायनिंगच्या वर्गात शिकवले होते) मधे बदल नाहीये. जो बदल आहे तो केवळ प्रकाशाचा आणि रंगांचा खेळ आहे. त्यामुळे डिस्प्लेने कंपोजिशनवर मर्यादा आणणे हे दोन्ही चित्रात समान पद्धतीने घडले आहे. ढोबळमानाने तरी.

असो.

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

टुकुल's picture

11 May 2010 - 6:21 pm | टुकुल

अरे वा! माझी तिन्ही उत्तरे बरोबर आली :-)

--टुकुल

llपुण्याचे पेशवेll's picture

11 May 2010 - 6:34 pm | llपुण्याचे पेशवेll

आयला तू लै भारी.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

टारझन's picture

11 May 2010 - 8:12 pm | टारझन

आयला लै भारी .... तु सट्टा लाव लेका ... तुझे स्टार्स लै जोरात दिसत्यात :)

- टू कुल (डुड)

मी-सौरभ's picture

24 May 2010 - 12:56 am | मी-सौरभ

सट्टा मट्का नकोरे बाबा

-----
सौरभ :)