साहित्य :
१ कांदा उभा चिरलेला ,आले लसून पेस्ट ,दही ,तिखट ,मीठ चवीप्रमाणे,जिरे,मोहरी
बिर्याणी मसाला (परंपरा ,रसोई मॅजिक छान लागतो),प्रॉन्स,मोकळा भात,
तेल,तूप,खडा मसाला (लवंग,तेजपान,वेलदोडा)
कोथिंबीर बारीक चिरून.
कृती :
प्रॉन्स धुवून त्याला लिंबाचा रस आणि आले ,लसून पेस्ट,थोडे दही लावून १० मिनिटे ठेवले.
फोडणी साठी तेल तापत ठेवले त्यात जिरे , मोहरी तडतडल्यावर,तेजपान ,लवंग(३),वेलदोडा टाकून ,कांदा परतवून घेतले.
त्यात आले, लसून, पेस्ट टाकून परतवून घेतले.मग बिर्याणी मसाला टाकला.मग त्यात प्रॉन्स खमंग वास येईपर्यंत परतवून घेतले. चवीनुसार तिखट ,मीठ घालावे.
मग मोकळा भात त्यात टाकून,वर झाकण ठेवून , मंद आचेवर दणदणीत वाफ येवू दिली.
मग १ चमचा तूप टाकून हलकेच हलवले.तुपाचा मस्त वास येतो बिर्याणीला.
वरून कोथिंबीर भुरभुरावी.
दह्याच्या रायत्या सोबत फडशा पडावा.
झटपट बिर्याणी असल्याने काही राहिले असण्याची शक्यता आहे.
नासिक ला 'हाजी' ची प्रॉन्स बिर्याणी खूप मस्त लागते.
प्रतिक्रिया
7 May 2010 - 10:38 am | जयंत कुलकर्णी
तज्ञांनी मार्गदर्शन करावे.
प्रॉन्स बरोबर शिजले हे कसे ओळखावे. जास्त शिजले तर कडक होतात आणि कमी शिजले तर कच्चे.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
13 May 2010 - 12:27 pm | प्रभाकर पेठकर
कोलंबी (प्रॉन्स) च्या आकारानुसार शिजण्याच्या वेळांत फरक पडतो. प्रॉन्स मंद आंचेवर शिजवावे. प्रॉन्स मधील पाण्याचा अंश उडून जाता कामा नये. एखादा खाऊन पाहावा.
------------------------------------------------------
विवाहित पुरुषाने कितीही नोकर्या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.
7 May 2010 - 2:47 pm | खादाड
=D> ह्म्म्म छानच दिसतेय !!
7 May 2010 - 5:56 pm | मीली
आधी थोडे दहीलावून ठेवल्याने प्रॉन्स छान शिजतात..आणि झाकण ठेवून वाफ आणली कि पण छान शिजतात. प्रॉन्स नुसार शिजायला कमी ,जास्त वेळ लागू शकतो.
प्रॉन्स नीट शिजले कि नाही हे बघायला प्रॉन्स चा तुकडा तोडून खावून बघावा व नसेल शिजला तर झाकण ठेवून परत वाफ आणावी .
मीली
7 May 2010 - 6:22 pm | जयंत कुलकर्णी
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com