चला! एकदाची त्या युद्धखोर कसबला फाशीची शिक्षा सुनावली गेली. भारतीय संघराज्यविरूद्ध त्याने पुकारलेल्या युद्धाबद्दल भारतीय कायद्याप्रमाणे कोर्टाने ही शिक्षा ठोठावली. कसबला फाशी व्हायला हवीच होती असे मलाही वाटते. मात्र मला असे वाटण्याचे कारण माझ्या अतिरेक्यांविरूद्धच्या तीव्र भावना आहेत.
हा भावनावेग बाजूला ठेवला व राष्ट्रप्रेमापलिकडे थोडं डोकं शांत ठेऊन बघितलं तर डोक्यात अनेक प्रश्न उभे रहातात. त्यावरच मला लोकांची मते जाणून घ्यायची आहेत.
१. कसबला फाशी झाली. कमीत कमी ९ भारतीयांचा थेट व शेकड्यांचा साथीदारासह खून करणार्या व्यक्तीला आपण मृत्यूदंड ठोठवला आहे. ह्या कसबला फाशी देऊन गेलेल्यांचा जीव परत येणार नाहि पण इतरांना जरब बसेल असा युक्तीवाद केला जातो. पण अशी फाशी देऊन आपण कसबला, इतर अतिरेक्यांच्या दृष्टीने, "शहीद" करत आहोत का?
२. जर शहीद करत असलो, तर त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन अधिक हल्ले होण्याची शक्यता नाही का? पाकीस्तानी अतिरेक्यांचे जे ब्रेन वॉशिंग होते त्यापुढे या निकालाने काहि तरी फरक पडेल असे वाटते का?
३. माझ्यामते कसबला फाशी देणं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं मात्र त्यामुळे दहशतवाद कमी होण्यास, त्याला आळा बसण्यास किंवा जरब बसण्यास काहि हातभार लागेल असं वाटतं का?
४. कसबला फाशी ठोठाऊन ती प्रत्यक्षात येण्यासाठी आता कित्येक वर्षे लागतील. तेव्हा या निमित्ताने आपण भारतातील न्यायप्रक्रीयेचे हसे करून घेत आहोत का?
५. कसबला मदत करणार्या इतर भारतीयांचाच छडा न लाऊ शकल्याने पोलिस व गृहखात्यावर नामुष्की ओढवली आहे असे तुम्ही मानता की यामागे कोणी भारतीय असूच शकत नाहि असे तुम्हाला वाटते?
६. एक हायपोथेटीकल प्रश्नः फाशीऐवजी दुसरी कोणती शिक्षा तुम्ही सुचवाल?
प्रतिक्रिया
6 May 2010 - 11:21 pm | नितिन थत्ते
फाशीच हवी.
प्र क्र २,३ व ४ चे उत्तर= नाही
नितिन थत्ते
6 May 2010 - 11:56 pm | वाहीदा
इस्लाम मध्ये पण याला माफी नाही तर आम्ही सामान्य लोकं काय माफ करणार ??
धर्माच्या नावाखाली असे निच कृत्य करण्यार्यास फक्त फाशीच हवी !!
खुद भी गुमराह और आवाम को भी गुमराह कर ने वाले को सिर्फ फासी ही या तो फिर ऐसी जिंदगी के उसे जिने से भी नफरत हो जाए
पण हे हिमनगाचे टोक आहे त्याच्या खाली बरेच काही दडले आहे...
~ वाहीदा
6 May 2010 - 11:25 pm | पक्या
काऴकोठडीत (जिथे सूर्यदर्शन ही होणार नाही आणि दुसरा कोणीही माणूस क्वचित नजरेस पडेल, हातपाय साखळदंडाने जखडलेले असतील) मरण येई पर्यंत शिक्षा. अशा जगण्यापेक्षा मला मृत्यू द्या अशी वेळ कसाबवर आली पाहिजे.
अर्थात हे शक्य नाही हे माहित आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत फाशीच योग्य वाटते.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
6 May 2010 - 11:34 pm | चिरोटा
कसाबला फाशीची शिक्षाच योग्य आहे.
प्रश्न-२/३/४ ला उत्तर "नाही" असे आहे.
स्थानिक (भारतिय) लोकांची मदत घेतल्याशिवाय अशी राष्ट्रविघातक क्रूत्ये कोणी करूच शकत नाही.
अवांतर्-अगदी गुप्तचर संघटनानाही दुसर्या देशात कारवाई(covert operation) करायची असली तरी स्थानिक लोकांची मदत घ्यावी लागते.
भेंडी
P = NP
6 May 2010 - 11:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अशी फाशी देऊन आपण कसबला, इतर अतिरेक्यांच्या दृष्टीने, "शहीद" करत आहोत का ?
कसाबच म्हणाला ना. माझ्या या कर्तबगारीने असंख्य तरुणांमधे अशीच युद्ध करण्याची प्रेरणा निर्माण होईल. [संदर्भ नाहीत] त्यामुळे तो खूप मोठा झाला आहे.
२. जर शहीद करत असलो, तर त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन अधिक हल्ले होण्याची शक्यता नाही का?
स्फूर्ती घेऊन, अधिक नव्याने नवे हल्ले होण्याची शक्यता वाटते. दहशतवाद्यांना माहित आहे की, सर्व जगाने त्या "कसाबला' हल्ला करतांना पाहिलं. 'कसाबला' बाजू मांडण्याची संधी दिली, अशी प्रतिमा उभी करण्यात आपण यशस्वी झालो. पण, सर्व आरोप सिद्ध होऊनही फाशी किंवा जन्मठेपीची शिक्षा व्हायला भारतात खूप वेळ लागतो. हाही संदेश आपण दिलाच आहे. त्यामुळे दहशतवाद्यांची नवी पिढी दुर्दैवाने उत्साहात असेल असे वाटते.
४. कसबला फाशी ठोठाऊन ती प्रत्यक्षात येण्यासाठी आता कित्येक वर्षे लागतील. तेव्हा या निमित्ताने आपण भारतातील न्यायप्रक्रीयेचे हसे करून घेत आहोत का?
आपल्या व्यवस्थेत त्याला शिक्षा होण्यासाठी अजून खूप वेळ आहे असे म्हणावे.
५. कसबला मदत करणार्या इतर भारतीयांचाच छडा न लाऊ शकल्याने पोलिस व गृहखात्यावर नामुष्की ओढवली आहे असे तुम्ही मानता
कसाबच्या साथीदारांबद्दल भक्कम पुरावे सादर करु शकलो नाही. त्यातूनच लक्षात येते की येथील व्यवस्थेत योग्य नियोजन नाही.
६. एक हायपोथेटीकल प्रश्नः फाशीऐवजी दुसरी कोणती शिक्षा तुम्ही सुचवाल?
प्रकाटाआ
-दिलीप बिरुटे
7 May 2010 - 1:39 am | अरुंधती
प्र का टा आ म्हणजे काय? मला हा खूप दिवसांपासून प्रश्न पडलाय.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
7 May 2010 - 1:41 am | प्रभो
प्रतिसाद काढून टाकला आहे.
7 May 2010 - 12:13 am | विकास
कसाबला फाशीची शिक्षा करण्यामागे माझे राष्ट्रप्रेम अथवा भावना नसून तो अध्याय पूर्णपणे समाप्त करणे महत्वाचे आहे इतकेच वाटणे आहे. शिवाय फाशीची शिक्षा भारतीय घटनेप्रमाणे "rarest of the rare" प्रसंगात द्यावी असे आहे. २६/११ हा सुदैवाने अजूनही rarestच आहे...
राष्ट्रप्रेम आणि भावनांचा विचार केल्यास कायदे, त्यांचे पालन करणारे कायद्याचे रक्षणकर्ते आणि नागरीक हे सर्वार्थाने जागरूक व्हावेत असे वाटते, जेणे करून असले प्रसंग परत घडणार नाहीत...
१. पण अशी फाशी देऊन आपण कसबला, इतर अतिरेक्यांच्या दृष्टीने, "शहीद" करत आहोत का?
करत असूही कदाचीत पण त्यांच्या दृष्टीने त्यावेळेस मारले गेलेले शहीद झाले आहेतच. त्यात अजून एकाची भर. शिवाय जर फाशी दिली नाही तर, "आमचे काही चालू शकते" हा आत्मविश्वास लाभेल त्याचे काय?
प्र. क्र. २, ३, ४ - उत्तर नाही असेच आहे.
प्र.क्र. ५ चे उत्तर - अशा घटनांमधे एखादा काय अगदी भारतीयांचा गट असू शकतो ना. पण त्याला काय करणार? असे गद्दार सर्वत्र असतात... पण शेवटी, स्वतःच्या जीवावर उदार होऊन कसाबला पकडणारा पण जो पर्यंत भारतीय पोलीस असू शकतो, तो पर्यंत माझा आशावाद कमी होणार नाही.
६. एक हायपोथेटीकल प्रश्नः फाशीऐवजी दुसरी कोणती शिक्षा तुम्ही सुचवाल?
हायपोथेटीकल कशाला? खरेच असे झालेतर हवे असे वाटते: कसाबला फाशीची शिक्षा देण्याऐवजी, संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनस वर सोडा... त्याला "लोकशाही"चा पहीला आणि अखेरचा धडा मिळेल.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
7 May 2010 - 3:20 pm | भारद्वाज
"लोकशाही"चा पहीला धडा त्याला २६/११ च्या रात्रीच मिळालाय !!! पकडला गेल्यावर केवळ पोलिसांनीच नव्हे तर आजूबाजूच्या पब्लिकनेसुद्धा त्याला तुडवला.
http://www.youtube.com/watch?v=Cck3DPaNHRA&feature=related
हं, अखेरचा धडा देण्यासाठीही सगळेच आसुसलेले आहेत. लगे रहो.
भारत माता की जय
7 May 2010 - 12:23 am | प्रियाली
१. कसबला फाशी झाली. कमीत कमी ९ भारतीयांचा थेट व शेकड्यांचा साथीदारासह खून करणार्या व्यक्तीला आपण मृत्यूदंड ठोठवला आहे. ह्या कसबला फाशी देऊन गेलेल्यांचा जीव परत येणार नाहि पण इतरांना जरब बसेल असा युक्तीवाद केला जातो. पण अशी फाशी देऊन आपण कसबला, इतर अतिरेक्यांच्या दृष्टीने, "शहीद" करत आहोत का?
हो.
२. जर शहीद करत असलो, तर त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन अधिक हल्ले होण्याची शक्यता नाही का? पाकीस्तानी अतिरेक्यांचे जे ब्रेन वॉशिंग होते त्यापुढे या निकालाने काहि तरी फरक पडेल असे वाटते का?
नाही. कसाब जन्नतमध्ये अप्सरांबरोबर रममाण आहे असे त्यांना पटवून दिले जाईल. ;-)
३. माझ्यामते कसबला फाशी देणं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं मात्र त्यामुळे दहशतवाद कमी होण्यास, त्याला आळा बसण्यास किंवा जरब बसण्यास काहि हातभार लागेल असं वाटतं का?
नाही. आत्महत्येला तयार असणारे कसाब अनेक मिळतात असे दहशतवादाच्या इतिहासात डोके खुपसले तर दिसेल.
४. कसबला फाशी ठोठाऊन ती प्रत्यक्षात येण्यासाठी आता कित्येक वर्षे लागतील. तेव्हा या निमित्ताने आपण भारतातील न्यायप्रक्रीयेचे हसे करून घेत आहोत का?
नाही.
५. कसबला मदत करणार्या इतर भारतीयांचाच छडा न लाऊ शकल्याने पोलिस व गृहखात्यावर नामुष्की ओढवली आहे असे तुम्ही मानता की यामागे कोणी भारतीय असूच शकत नाहि असे तुम्हाला वाटते?
असू शकतो असे मला वाटते. अगदी हिंदूही असतील. देशद्रोहासाठी जात-धर्म वगैरे पाहिले जात नाही. उदा. माधुरी गुप्ता.
६. एक हायपोथेटीकल प्रश्नः फाशीऐवजी दुसरी कोणती शिक्षा तुम्ही सुचवाल?
इथे लिहिले आहे. ब्रेनवॉशिंग का बदला ब्रेनवॉशिंग ;)
7 May 2010 - 1:00 am | धनंजय
१,२,३,५,६ - ठाऊक नाही; ४ - नाही
7 May 2010 - 10:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
१. ... इतर अतिरेक्यांच्या दृष्टीने, "शहीद" करत आहोत का?
माहित नाही.
२. ... जे ब्रेन वॉशिंग होते त्यापुढे या निकालाने काहि तरी फरक पडेल असे वाटते का?
माहित नाही, बहुदा नाहीच.
३. ... जरब बसण्यास काहि हातभार लागेल असं वाटतं का?
बहुदा नाहीच.
४. ... आपण भारतातील न्यायप्रक्रीयेचे हसे करून घेत आहोत का?
अजिबातच नाही.
५. ... यामागे कोणी भारतीय असूच शकत नाहि असे तुम्हाला वाटते?
बहुतेक होय. वरही माधुरी गुप्ताचा उल्लेख आला आहे.
६. एक हायपोथेटीकल प्रश्नः फाशीऐवजी दुसरी कोणती शिक्षा तुम्ही सुचवाल?
विकासचे उत्तर आवडले आणि प्रियालीचेही! आधी ब्रेनवॉशिंग करून मग सीएसटी स्थानकात सोडून देणे.
अदिती
7 May 2010 - 12:02 pm | Dhananjay Borgaonkar
अशी फाशी देऊन आपण कसबला, इतर अतिरेक्यांच्या दृष्टीने, "शहीद" करत आहोत का?
अतिरेक्यांच्या द्रुष्टीने ते फक्त कसाबच नव्हे तर सर्व अतिरेकी हीरो आहेत ज्यांनी २६/११ मधे भाग घेतला व सामान्य माणसांची कत्तल केली. कसाबला फाशी देउन अथवा न देऊन आपण अतिरेक्यांची मानसिकता नाही बदलू शकत.
याला उपाय एकच नडला की तोडला. ताजच्या टॉवर वर नेऊन साल्याला फाशी दिली पाहिजे .
जर शहीद करत असलो, तर त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन अधिक हल्ले होण्याची शक्यता नाही का? पाकीस्तानी अतिरेक्यांचे जे ब्रेन वॉशिंग होते त्यापुढे या निकालाने काहि तरी फरक पडेल असे वाटते का?
कसाबला फाशी न देता त्याचा शाल श्रीफळाने सत्कार करुन त्याला चार्टर्ड फ्लाईट ने पाकिस्तानात पाठवला तरी सुद्धा अतिरेकी कारवाया थांबणार नाहीत्. उलट फोफावतील.
ऊपाय एकच पाकव्याप्त काश्मीर मधे घुसुन सर्व अड्डे उद्व्स्त करा.
२६/११ मुळे खुप मोठा चान्स होता आपल्याला, आपण का सोडला ते माहीत नाहे.
माझ्यामते कसबला फाशी देणं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं मात्र त्यामुळे दहशतवाद कमी होण्यास, त्याला आळा बसण्यास किंवा जरब बसण्यास काहि हातभार लागेल असं वाटतं का?
आजिबात नाही. जो पर्यंत पाकिस्तान आहे तो पर्यंत हे शक्य नाही.
कसबला फाशी ठोठाऊन ती प्रत्यक्षात येण्यासाठी आता कित्येक वर्षे लागतील. तेव्हा या निमित्ताने आपण भारतातील न्यायप्रक्रीयेचे हसे करून घेत आहोत का?
मला कायद्यातलं विशेष कळत नाही. पण लवकर फाशी नाही देऊ शकलो तर नक्कीच हसं करुन घेऊ.
आणि या हल्ल्यात शहीद झालेल्या जवांचा हा अपमान असेल.
कसबला मदत करणार्या इतर भारतीयांचाच छडा न लाऊ शकल्याने पोलिस व गृहखात्यावर नामुष्की ओढवली आहे असे तुम्ही मानता की यामागे कोणी भारतीय असूच शकत नाहि असे तुम्हाला वाटते?
मुंबईतल्या हल्ल्या मागे कोणी भारतीय असुच शकत नाही यावर माझा विशवास नाही.
या खटल्यावर सर्व आंतरराष्टीय समुदायाची नजर होती. जर का खटल्या भारतीय नागरीक दोषी सापडला असता तर ऊलट आपली जास्त नाच़क्की झाली असती म्हणुन कदाचीत ते दोघ सुटले असतील, कदाचीत...
एक हायपोथेटीकल प्रश्नः फाशीऐवजी दुसरी कोणती शिक्षा तुम्ही सुचवाल?
हायपोथेटीकल ऊत्तर.
१. संभाजी महाराजांना जश्या यातना देऊन मारल तशीच एखादी शि़क्षा किवा त्याहुनही अधिक भयानक.
२. सी.एस्.टी प्ल्यॅट्फॉर्म वर दिवस्भर रुळाला बांधुन त्यावरुन सर्व लोकल सोडणे.
३.बोफोर्स च्या तोंडी देउन त्याला डायरेक्ट नर्कात (पाकीस्तानात) पाठवणे.
सध्या तरी एवढ्याच साध्या शि़क्षा सुचत आहेत.
7 May 2010 - 12:11 pm | Nile
१.पण अशी फाशी देऊन आपण कसबला, इतर अतिरेक्यांच्या दृष्टीने, "शहीद" करत आहोत का?
-ह्याचे उत्तर त्यांचे ब्रेन स्टॉर्मिंग कसे होते त्यावर आहे. पण ह्या केस मध्ये (कसाब रडला, मला सोडा वगैरे विनवण्या केल्या) कसाबचे काय झाले ह्याकडे त्यांच्या फायद्याचा विचार करुन ते लोक दुर्लक्ष (नव्या दहशतवाद्यांना अंधारात ठेवण्यासाठी) करीत असावेत.
तर दुसर्याबाजुला, आपल्या समाजाचे नियम आहेत. हेच कृत्य कुणी अजुन केले असते तर फाशी मिळालीच असती. त्यामुळे फाशी दीली गेली पाहिजे.
२. जर शहीद करत असलो, तर त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन अधिक हल्ले होण्याची शक्यता नाही का? पाकीस्तानी अतिरेक्यांचे जे ब्रेन वॉशिंग होते त्यापुढे या निकालाने काहि तरी फरक पडेल असे वाटते का?
- वर म्हणल्याप्रमाणे. इतरही केसेस मध्ये फरक पडु शकतो पण फारसा नाहीच. फाशीचा निर्णय न घेण्याइतका फरक पडणार नाहीच.
३. दहशतवाद कमी होण्यास, त्याला आळा बसण्यास किंवा जरब बसण्यास काहि हातभार लागेल असं वाटतं का?
- झालाच तर किरकोळ.
४.तेव्हा या निमित्ताने आपण भारतातील न्यायप्रक्रीयेचे हसे करून घेत आहोत का?
-नाही(असेलच तर ते आधीच केले आहे, या निमित्ताने(च) नाही)
५. ठावुक नाही.
६. नाही, फाशीच योग्य.
-Nile
7 May 2010 - 1:37 pm | समंजस
१. नाही... (कसाब फाशी होउन मेला काय किंवा कमांडोंच्या गोळीने यामुळे अतिरेकी संगठनांना फरक पडत नाही. कसाब हा त्या दहा अतिरेकींपैकी एक होता. ईतर ९ अतिरेकी तेव्हा मारले गेले, हा आता मारल्या जाणार एवढाच काय तो फरक).
२. नाही.. (पुढिल अतिरेक्यांना स्फुर्ती द्यायला कसाब याला उदाहरण म्हणून वापरलं जाणार नाही. कसाब आणि बाकीच्या ९ अतिरेक्यांना स्फुर्ती देताना त्यांच्या संगठनांनी फाशी दिलेल्या कुठल्या अतिरेक्याचं उदाहरण वापरलं होतं????)
३. प्रश्न सुसंगत नाही त्यामुळे उत्तर नाही/हो असू शकत नाही.
(गैरभारतीय कसाब आणि ईतर ९ अतिरेक्यांनी केलेला हल्ला हा भारत देशा विरूद्ध पुकारलेलं युद्ध होतं ज्यात त्यांनी शेकडो भारतीय नागरीकांना मारलं. या फक्त एका कारणामुळे त्याला आणि त्याच्या साथिदारांना मारणे हेच योग्य आहे. त्यांना मारलं नसतं तर त्यांनी आणखी काही शेकडो भारतीय निरपराध नागरीकांना मारलं असतं. फरक एवढाच आहे की ईतर ९ अतिरेकी प्रतिहल्ल्यात मारले गेले आणि कसाब हा जिवंत पकडला गेल्यामुळे त्याच्या वर खटला चालवून त्याला शिक्षा करण्यात आली. कसाबची फाशी ह्या कारणांमुळे समर्थनीय आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आणि कसाबच्या फाशीचा काही संबंध नाही.)
४. भारतीय न्यायव्यवस्थेचे हसे या प्रकरणामुळे होणार नाही.
(हसे भारतीय न्यायव्यवस्थेचे नाही तर भारतीय राज्यकर्ते(सरकार) यांचं होणार आहे, किंबहुना ते आधीच झाले आहे अफझल गुरू च्या प्रकरणामुळे. भारतीय न्यायव्यवस्थेने अफझल गुरू+कसाब ला फाशी ची शिक्षा ठोठावून आपले कर्तव्य चोख बजावले, शिक्षेची अंमलबजावणी करण्यात चुकारपणा करून हसे करून घेतले ते भारतीय सरकार(राज्यकर्ते+अधिकारी वर्ग) यांनी )
५. हो. (महाराष्ट्र पोलिस आणि भारतीय गृहखातं हे अपयशी ठरलं अप्रत्यक्षरीत्या मदत करणार्यांना पकडण्यात)
६. गोळ्या घालून मारणे, कडेलोट करणे, मुंडकी उडवणे, जिवंत असताना विद्युत वाहीनीत टाकणे, साइनाइड चे इंजेक्शन देणे वगैरे वगैरे
हे जे काही लिहीलंय ते भावनावेग ठेवून नाही तर मानवताप्रेम आणि समाजप्रेम आणि राष्ट्रप्रेम ठेवून लिहीलंय :)
ज्या व्यक्तींकडे ह्या गोष्टी नाहीत, त्या व्यक्तींनी सांगावं की त्यांच्या जगण्यामागे इतर काय कारणे आहेत :?
7 May 2010 - 2:29 pm | मदनबाण
कसबला फाशी झाली. कमीत कमी ९ भारतीयांचा थेट व शेकड्यांचा साथीदारासह खून करणार्या व्यक्तीला आपण मृत्यूदंड ठोठवला आहे. ह्या कसबला फाशी देऊन गेलेल्यांचा जीव परत येणार नाहि पण इतरांना जरब बसेल असा युक्तीवाद केला जातो. पण अशी फाशी देऊन आपण कसबला, इतर अतिरेक्यांच्या दृष्टीने, "शहीद" करत आहोत का?
प्रत्येक अतिरेक्याला जिहादा बद्धल शिकवताना तुला जन्नत मिळणार (आणि काही कुमारिका)असे लॉलीपॉप दाखवले जातेच त्यामुळे त्यांच्या दृष्टीने तो नक्कीच शहिद असणार...
जर शहीद करत असलो, तर त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन अधिक हल्ले होण्याची शक्यता नाही का? पाकीस्तानी अतिरेक्यांचे जे ब्रेन वॉशिंग होते त्यापुढे या निकालाने काहि तरी फरक पडेल असे वाटते का?
दर महिन्याला ज्या देशात हजारोंनी अतिरेकी निर्माण होतात त्यांच्या कडुन तुम्ही मित्रत्वाची भावना अपेक्षित करणे योग्य आहे का ?हल्ले होतच राहणार...जो पर्यंत आपण पाकड्यांचे कंबरडे मोडत नाही तो पर्यंत हल्ले होतच राहणार. जळवा कधी रक्त पिणे थांबवतात का ?
माझ्यामते कसबला फाशी देणं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं मात्र त्यामुळे दहशतवाद कमी होण्यास, त्याला आळा बसण्यास किंवा जरब बसण्यास काहि हातभार लागेल असं वाटतं का?
जरब बहुधा शिवाजी महाराजांच्या काळात बसवली जात असे,आपण फक्त वार्तालाप करतो.आपल्या लोकांना समझोता करण्यात लयं इंट्रेस्ट.
कसबला फाशी ठोठाऊन ती प्रत्यक्षात येण्यासाठी आता कित्येक वर्षे लागतील. तेव्हा या निमित्ताने आपण भारतातील न्यायप्रक्रीयेचे हसे करून घेत आहोत का?
कसाबला लटकवे पर्यंत २०१२ पण उजाडु शकतात असं काही तज्ञ मंडळी न्यूज चॅनलवर सांगत होती.
कसबला मदत करणार्या इतर भारतीयांचाच छडा न लाऊ शकल्याने पोलिस व गृहखात्यावर नामुष्की ओढवली आहे असे तुम्ही मानता की यामागे कोणी भारतीय असूच शकत नाहि असे तुम्हाला वाटते?
अफजल अजुन जिंवत का आहे? या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले नाही...जर उत्तर मिळाले तर या प्रश्नाचा विचार करीन म्हणतो.
एक हायपोथेटीकल प्रश्नः फाशीऐवजी दुसरी कोणती शिक्षा तुम्ही सुचवाल?
गेट वे वर जाहीर फाशी देऊन त्याचे लाईव्ह टेलिकास्ट व्हावे ही मनातली इच्छा. दुसरी विचाराल तर हात पाय छाटुन छत्रपती शिवाजी स्थानकात एका पिंजर्यात आजन्म बसवणे.
मदनबाण.....
Life is God's novel. Let him write it.
ISAAC BASHEVIS SINGER
7 May 2010 - 4:05 pm | हर्षद आनंदी
१. कसबला फाशी झाली. कमीत कमी ९ भारतीयांचा थेट व शेकड्यांचा साथीदारासह खून करणार्या व्यक्तीला आपण मृत्यूदंड ठोठवला आहे. ह्या कसबला फाशी देऊन गेलेल्यांचा जीव परत येणार नाहि पण इतरांना जरब बसेल असा युक्तीवाद केला जातो. पण अशी फाशी देऊन आपण कसबला, इतर अतिरेक्यांच्या दृष्टीने, "शहीद" करत आहोत का?
अर्थात.. कसाब जीवंत पकडला गेला तेव्हाच अजरामर झाला!!
२. जर शहीद करत असलो, तर त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन अधिक हल्ले होण्याची शक्यता नाही का? पाकीस्तानी अतिरेक्यांचे जे ब्रेन वॉशिंग होते त्यापुढे या निकालाने काहि तरी फरक पडेल असे वाटते का?
त्याचे स्पेशल सेल, सिक्युरीटी, धार्मिक वागणुकिची सुट, मनोच्छित खानपान, बाजु मांडण्याची संधी.. त्याला वकीलही मिळतो वा वा.. इसेही जन्नत केहते है!! हल्ल्यानंतर काही काळ कसाब हा सर्वात जास्त सुरक्षीत नागरीक (मंत्री, आमदार, खासदार हे नागरीक नाहीत.. राजे आणि महाराजे ) होता. असे लाड पाहुन अजुन हजारो तरुण तयार झाले असतील... lets wait & watch.. आसाम, पूणे कुठे कुठे झालेच की बॉम्बस्फोट , जो पर्यत आपण प्रत्युत्तर देत नाही तो पर्यंत हे हिजडे नंगा नाच करतच राहणार!!
३. माझ्यामते कसबला फाशी देणं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं मात्र त्यामुळे दहशतवाद कमी होण्यास, त्याला आळा बसण्यास किंवा जरब बसण्यास काहि हातभार लागेल असं वाटतं का?
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने कसाब केव्हाच मेलाय.. भारत प्रत्युत्तर कसा देणार याची उत्सुकता होती, ती दफन होऊन जमाना झाला!!
४. कसबला फाशी ठोठाऊन ती प्रत्यक्षात येण्यासाठी आता कित्येक वर्षे लागतील. तेव्हा या निमित्ताने आपण भारतातील न्यायप्रक्रीयेचे हसे करून घेत आहोत का?
भारत आणि न्यायप्रक्रीया हा एक फार मोठा विनोद आहे असे वाटत नाही का??
कोणी कुठल्या काळच्या गोर्या माकडांनी बनविलेली न्याय-व्यवस्था ऊत्तम म्हणुन थोडा बदल करुन वापरणारे आम्ही.. काय दाद द्यावी आमच्या न्यायप्रियतेची!!
बलात्कार झालेल्या बाईला न्याय मिळण्यासाठी ती म्हातारी झालेली असते.
आमच्या पंतप्रधानाच्या हत्या होते आणि निकाल १५ वर्षाने लागतो..
बास हसुन हसुन पोट दुखायला लागले..
५. कसबला मदत करणार्या इतर भारतीयांचाच छडा न लाऊ शकल्याने पोलिस व गृहखात्यावर नामुष्की ओढवली आहे असे तुम्ही मानता की यामागे कोणी भारतीय असूच शकत नाहि असे तुम्हाला वाटते?
हे हे हे काय बोलता राव.. उघड्या डोळ्यांनी बघा की.. समोर आहेत, पन तुम्ही पकडता? ह्या नाही, काहीतरी काय.. मतांची पेटी आहे ना.. अल्पसंख्यांक किंवा धनाढ्य ते.. लोकशाही काही आहे की नाही आणि छे! ते असे कशाला करतील???
६. एक हायपोथेटीकल प्रश्नः फाशीऐवजी दुसरी कोणती शिक्षा तुम्ही सुचवाल?
किमान ७ दीवस.. कुठल्याही चौकात, मैदानावर सालटे सोलणे, खार्या पाण्याचा शॉवर, जळवांची फौज असे आणि अनेक नरकयातना भोगायला लावणारे प्रकार.. पण जीवंत ठेवुन शेवटच्या दीवशी हात्-पाय तोडुन, डोळे फोडुन, जीभ कापुन, कानात उकळते तेल टाकुन.. सोडुन देईन कोणत्याही गटारात.. किमान ५ फूट खोल असलेल्या.. घाण गिळुन मरेल कुत्रा!!
ही शिक्षा पण कमीच असेल..
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
7 May 2010 - 6:03 pm | चिंतातुर जंतू
कसाबला अवाजवी महत्त्व दिले जात आहे. तो केवळ हुकमाचा पाईक होता. तो पकडला गेला, म्हणून त्याला कायद्यानुसार शिक्षा झाली. देहदंडाच्या शिक्षेचे समर्थन करताना 'इतरांना जरब बसावी, म्हणून देहदंडाची शिक्षा हवी' असे म्हटले जाते. हल्ल्यांमागचे खरे सूत्रधार हाती लागत नाहीत, तोवर याच्यासारख्यांना फाशी झाली, न झाली, काय फरक पडणार? थोडे मानसिक/भावनिक समाधान मिळणार, एवढेच.
दहशतवादाविरुध्दच्या लढ्यात खरा फायदा झालाच असेल, तर तो कसाब जिवंत सापडल्याने झाला असेल, कारण या निमित्ताने त्याच्याकडून थोडीफार गोपनीय माहिती मिळालेली असू शकते.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
7 May 2010 - 7:22 pm | सुधीर काळे
पुन्हा एकाद्या 'इंडियन एअरलाइन्स'च्या विमानाचे अपहरण होऊन कृष्णासाहेबांना कसाबला 'सोबत' म्हणून कंदाहारला जायची वेळ येऊ नये म्हणून (आणि म्हणूनच) त्याला फाशी देऊन हा "अध्याय" संपवला पाहिजे! "Finis"
सुधीर काळे, या आठवड्यात तलाहासी, फ्लॉरीडा येथे बहिणीकडे!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9; प्रकरण दुसरे: http://tinyurl.com/2cptlvo
7 May 2010 - 8:58 pm | अन्या दातार
नाहीतरी कसाब इथे लोकांना मारुन मरायलाच आला होता. आता तो दोषी ठरुन मरणार आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्याला फाशी दिल्याने कोणाला उत्तेजन मिळत असेल तर खुशाल मिळो. कोणाला काहीही वाटो; तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भारतात कोणाला तरी या खटल्याने प्रोत्साहन मिळणार नाही हे कशावरुन?
कसबला फाशी ठोठाऊन ती प्रत्यक्षात येण्यासाठी आता कित्येक वर्षे लागतील. तेव्हा या निमित्ताने आपण भारतातील न्यायप्रक्रीयेचे हसे करून घेत आहोत का?
या आधीच अनेक खटल्यांच्या माध्यमातून ते झालेले नाहीए का????
कसबला मदत करणार्या इतर भारतीयांचाच छडा न लाऊ शकल्याने पोलिस व गृहखात्यावर नामुष्की ओढवली आहे असे तुम्ही मानता की यामागे कोणी भारतीय असूच शकत नाहि असे तुम्हाला वाटते?
काही भारतीयांचा सहभाग आहे हे तर उघड सत्य आहे. पण **त दम आहे का त्यांना पकडण्यासाठी?
एक हायपोथेटीकल प्रश्नः फाशीऐवजी दुसरी कोणती शिक्षा तुम्ही सुचवाल?
नक्की देणार आहात का? तर सुचवतो
कुठलेही काम करायला मार्गांपेक्षा इछाशक्तीची गरज असते.
7 May 2010 - 9:17 pm | अविनाशकुलकर्णी
. एक हायपोथेटीकल प्रश्नः फाशीऐवजी दुसरी कोणती शिक्षा तुम्ही सुचवाल..त्याचा वध करावा
7 May 2010 - 9:23 pm | ऋषिकेश
सगळ्यांचं (माझ्यासकट) मत कसबला फाशी व्हायलाच हवी होती असं आहे... मात्र त्यामुळे नक्की किती फायदा झाला व तोटा झाला याचं गणित प्रत्येकाचं वेगळं दिसतंय :)
चर्चेला कुठेही न वळवता थेट मत दिल्याबद्दल आभार. जमल्यास लवकरच उत्तरे एकत्र करून इथे एकूणातला आढावा देतो
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
8 May 2010 - 2:34 am | विकास
मात्र त्यामुळे नक्की किती फायदा झाला व तोटा झाला याचं गणित प्रत्येकाचं वेगळं दिसतंय
न्याय देताना फायदा-तोटा बघायचा नसतो तर कायद्याप्रमाणे न्याय देताना कर्तव्यात कसूर झाली नाही ना, इतकेच पहायला हवे.
तोटा म्हणाल तर तो २६/११ ला झाला आणि फायदा म्हणाल तर तो देखील २६/११ ला कसाबला पकडल्याने झाला. कारण जर कोणताच अतिरेकी पकडला गेला नसता, तर पाकीस्तानचे हात वर राहीले असते: "आमचा त्याच्याशी संबंध नाही!" आता तसे अधिकृतरीत्या (प्रयत्न करूनही) करू शकले नाहीत हा त्यातील म्हणलं तर फायदा...असे वाटते. :-)