गाभा:
अन बुद्ध हसला ...... आणि बुद्धु हसले....
..... अंगुलीमालाने मानवी अवयवांची माळा गळ्यातून उतरवली . पश्चात्तापाने दग्ध हातातील शस्त्र सोपवत बुद्धाकडे पाहिले. करुणेने भारलेली नजर त्याच्या जीवनात नवी पहाट करून गेली...... अन बुद्ध हसला.....
...... कोवळे वय आहे. सुधारकेंद्रातूल मानवीय वागणुकीने तो सुधारेल. .. मग आपल्या घरी परतेल तेंव्हा इतरांना हत्येपासून परावृत्त करेल ... भले त्याला सोडवायला त्याचे साथीदार विविध क्लुप्त्या वापरतील. कदाचित आणखी काही हल्ले होतील. त्याच्यावर कोटयवधी खर्च येईल. पण म्हणून कसाबला मृत्युदंड हा अमानवी आहे....
कसाबला मृत्युदंड दिला गेला नाही तर त्या न्यायाधीशाला काय सजा मिळावी.....
विचारात गुंग बुद्धू हसले....
प्रतिक्रिया
6 May 2010 - 8:40 am | Manoj Katwe
बुद्ध यांचा जमाना गेला.
आत्ता जमाना आहे तो राजकारण्यांचा.
ते मेलेल्या प्रेतावारच्या टाळूवरचे सुद्धा लोणी खातात.
बुद्ध यांना बघू रडेल , हसणार नाही.
6 May 2010 - 9:15 am | उग्रसेन
नाडी पट्ट्या काय भविष्य सांगत्या
कसाबच्या ?
बाबुराव :)
6 May 2010 - 8:42 pm | तिमा
कसाबला आज फाशी ठोठावली आहे हे वाचून कुठल्याही सच्चा भारतीयाला आनंदच होईल. पण ती अंमलात कधी येणार हीच खरी चिंता आहे.
या निकालावर राजकारण्यांच्या प्रतिक्रिया मात्र हास्यास्पद आहेत. यातून म्हणे पाकिस्तानला योग्य मेसेज जाईल. त्यांना काय फरक पडणार आहे?
हा ऐतिहासिक निर्णय, आमचा विजय कसा ? ते दुसरे दोघे सुटले त्याचे काहीच नाही?
फक्त १० अतिरेक्यांनी तब्बल ३ दिवस सार्या देशाला वेठीस धरले होते! त्यातल्या फक्त एकाला शिक्षा सुनावली आहे. खरे सूत्रधार पाकिस्तानात मजा करत आहेत. हा कसला विजय?
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
8 May 2010 - 2:37 am | धनंजय
अतिशय निर्घृण निर्ढावलेले मनुष्यघातक मनुष्य पश्चात्तापदग्ध होऊ शकतात असे म्हणतात खरे. अंगुलिमालाची गोष्ट अशी आहे.
पश्चात्ताप करू शकणारे क्रूरकर्मे कसे ओळखावे, त्यांचा पश्चात्ताप पूर्ण होईपर्यंत त्यांच्या धोकादायक प्रवृत्तीस आळ्यात कसे आणावे... या बाबतीत कायदेमंडळे, न्यायालये, आणि मुख्य म्हणजे लोकशाहीचे मालक (म्हणजे आपण सर्व) चर्चा करणे योग्यच आहे.
सध्याच्या न्यायालयाने सध्याच्या कायद्यांना अनुसरून निर्णय दिलेला आहे. श्री ओक यांचे मत बहुसंख्य भारतीयांना पटले, कायदा बदलला, तर भविष्यात कदाचित वेगळा निर्णय दिला जाईल. एकमेकांना कायदे बदलण्याबद्दल पटवण्याचे स्वातंत्र्य भारतात आहे, ते उत्तमच आहे. आणि जेथपर्यंत कायदे आज अस्तित्वात आहे, तेथवर न्यायालय निर्णय देते, तेही उत्तम.
(श्री. माणूसघाणे यांच्याकरिता अवांतर : कोणाला फाशी बघून आनंद होतो की नाही त्यावरून सच्चे भारतीयत्व ठरवता कामा नये. त्या व्यक्तीचे पूर्ण आयुष्य आणि कर्तृत्व बघावे. एखाद्या व्यक्तीच्या नुसत्या बोलण्यामुळे नव्हे, तर कृतींमुळे भारताचे खरोखरचे नुकसान होत असेल - म्हणजे पोलीस अधिकार्याने लाच घेऊन अतिरेक्यास मदत केली, समजा - तर तशा परिस्थितीत आपण "सच्चा भारतीय नाही" वगैरे आरोप करण्यात काही हशील आहे.)