होय, मुंबई आम्ही विकत घेतलीय!

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in काथ्याकूट
5 May 2010 - 12:14 pm
गाभा: 

<<<मुंबई फक्त मराठ्यांचीच नव्हे तर सगळ्यांची, इथपासून ते 'मुंबई तुमची, भांडी घासा आमची' म्हणण्यापर्यंत कटुता ताणली जात असते. मुंबई हे दक्षिण आशियाचे इकॉनॉमिक हब होण्यापर्यंतची घोडदौड ही परप्रांतीयांच्या भांडवलामुळे झाली असे उदाहरणांसकट मांडले जाते. पैसा, भांडवल हे शब्द नुसते ऐकले तरी मराठी माणसाला विनाकारण हुडहुडी भरते. किंबहुना पैसा आणि मराठी हे दोन विरुद्धाथीर् शब्द असल्यागत आपली वाटचाल चालू असते. त्यामुळे भांडवलवाल्या अमराठी माणसांसमोर मराठी माणसे कायम न्यूनगंड घेऊन वावरत असतात. रस्त्यावरच्या राड्यांमागेही हाच न्यूनगंड असतो.

पण याच महाराष्ट्राने मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला चक्क कोट्यवधी रुपये मोजले आहेत, हे फारच कमीजणांच्या गावी असेल.

मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी १०६ हुतात्म्यांचे रक्त तर आपण सांडले आहेच, पण ६० कोटी ६६ लाख रुपयेही मोजले आहेत! >>>>>

आजच्या मटातील दखल या सदरातली बातमी, by प्रतिमा जोशी

मुळ दुवा: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5891303.cms

आपले मत काय? हे जाणुन घेण्यास उत्सुक आहे.

विशाल

प्रतिक्रिया

रानी १३'s picture

5 May 2010 - 1:57 pm | रानी १३

बापरे!!!!!

चिरोटा's picture

5 May 2010 - 2:41 pm | चिरोटा

म.टा.मधला लेख भावनेच्या भरात लिहिलेला वाटतो.राज्याचे विभाजन होते तेव्हा जे नविन राज्य होणार आहे त्या राज्याला मूळ राज्याने/केंद्राने रक्कम द्यावयास हवी हे योग्य आहे.इतर राज्यांचे विभाजन झाले तेव्हाही हे होत असावे(जाणकारांनी सांगावे).तेव्हा पैसे मुंबईसाठी मोजलेले नसावेत तर नविन राज्याची स्थापना होणार म्हणून दिले असावेत.State Reorganization Act,Bombay मध्ये सहावा विभाग पहावा.APPORTIONMENT OF ASSETS AND LIABILITIES
Special Revenue Reserve Fund in Gujarat.- (1) Out of the investments in the cash balance investment account which remain with the State of Maharashtra after giving effect to the provisions of section 51, such securities of the value of 1,420 lakhs of rupees as the Central Government may by order specify shall stand transferred to the State of Gujarat.

(2) There shall be constituted in the State of Gujarat a Fund to be called the Special Revenue Reserve Fund consisting of the securities transferred to that State under sub-section (1) and such other securities belonging to the State of Gujarat of the value of 1,419 lakhs of rupees as the Central Government may be order specify

तेव्हा पैसे ठरल्याप्रमाणेच दिले असावेत!!
भेंडी

भारद्वाज's picture

5 May 2010 - 2:49 pm | भारद्वाज

अस्सं काय.......
-
जय महाराष्ट्र

तिमा's picture

5 May 2010 - 6:05 pm | तिमा

पाकिस्तानला तर ५५ कोटी दिलेत. ते पण याच नियमांच्या आधारे का ?

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

शेखर जोग's picture

5 May 2010 - 6:27 pm | शेखर जोग

मला पैसे देण्याबद्दल काही बोलायचे नाही. हा त्याकाळच्या नेत्यांचा प्रष्न होता. पण तुम्ही म्हणता ते खरे आहे मराठी मनाला पैसा, भांडवल, गुंतवणूक वगैरे गोष्टी नको वाटतात. हे बदलायला नको का? किती वर्षे आपण फक्त चाकोरीतून चालणार? मला वाटते आपण सर्वानी या विषयाकडे बारकाईने बघितले पाहिजे. तरच आणि तरच मराठी माणसे पुढे येतील. व ते नक्की होईल. कारण आपल्याला तल्लख बुध्दी आहे. धमक आहे. वाण आहे फक्त चाकोरीबाहेर विचार करण्याची. असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. गुंतवणूक, शेअर बाजार म्हटल्यावर बापरे! असे म्हणून चालणार नाही. दुर्दैवाने अजून कोणी मराठी फंड मॅनेजर मराठी लोकाना प्रोत्साहीत करण्यासाठी पुढे आलेला दिसत नाही.