पुण्यातील एका स्कूटरचे आत्म(घातकी)व्रूत्त्.....(तमा पुणेकरांची "स्थूल्"मानाने क्षमा मागून)

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
25 Mar 2008 - 1:49 pm

आमचे स्फूर्तीस्थान : संदीप खरे आणि आपले आवडते विडम्बनकार केशवराव.....

बसतेस वरी तू जेंव्हा
जीव बसका फुसका होतो
पळण्याचे सुटते भान
टायर ही फाटका होतो.....

ऊर फाटुन नीज उडावी
कल्लोळ तसा ओढवतो
स्टिअरिंग दिशाहीन होते
कुणीतरी* पोरका होतो..... * कुणीतरी म्हणजे एखादा निष्पाप वाटसरु

येताच "पुणे" दाराशी
हिरमुसून जाती लोक
डिक्किशी थडकुन गाडी
जीव "द्वंद्वा"वाचुन जातो.....

तव मुठीत आवळणार्‍या
क्लच ब्रेक अन तुटक्या तारा
"फासा"विण घुसमट व्हावी
मी तसाच अगतिक होतो.....

तू टांग सखे वर काय
समजून टाकशी आज
इंजिनास भरते धडकी
सायलेन्सर पण तणतणतो.....

ना अजून झालो "गोठा"
तू मावशील ज्याच्यात
तुज वाचुन उबगत जातो
तुज वाचुन "पंप"# ही अडतो.....

# पंप म्हणजे पेट्रोल पंप- कारण "भार्"दस्त माणसाला माईलेज कमी देते गाडी आणि म्हणूनच पेट्रोल जास्त लागते.....

प्रतिक्रिया

प्राजु's picture

25 Mar 2008 - 11:18 pm | प्राजु

हाहाहा...

तू टांग सखे वर काय
समजून टाकशी आज
इंजिनास भरते धडकी
सायलेन्सर पण तणतणतो.....

हे एकदम सहीच..

- (सर्वव्यापी)प्राजु

उदय सप्रे's picture

26 Mar 2008 - 9:06 am | उदय सप्रे

प्रिय प्राजु(सर्वव्यापी),

आभिप्रायाबध्दल धन्यवाद !
माझ्या काही लिन्क्स ३ लेख आणि १ कविता मी दिल्या आहेत्,जमल्यास वाचून पहा आणि कळवा आपले मत.

- उदय गंगाधर सप्रे-ठाणे.