किस्सा मुंबई पोलिसांचा (२)

नेत्रेश's picture
नेत्रेश in काथ्याकूट
30 Apr 2010 - 12:25 am
गाभा: 

हा अनुभव माज्या नात्यातील एकाला आलेला.

साधारण ४ - ५ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. हा कमर्शीयल आर्ट कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला. उत्तम चित्रकार. हातात जादु म्हणाना. तसेच खुप कष्ट करायची तयारी.
काही वेगळे, थोडे इंटरेस्टींग असे दिसले की पठ्याचा हात चालु लागलाच म्हणुन समजावे. कायम स्केच पॅड, पेन्सिल्स वगैरे साहित्य असलेली बॅग खांद्याला.

एक दिवस कॉलेज मधुन उशीराने घरी परत येताना बस स्टॉप वर बसची वाट बघत बराच वेळ थांबला होता. काळोख पडत आला होता. बस स्टॉपवर १ - २ लोक होते. बाजुलाचाच मुंबई पोलीसांची नीळी जीप उभी होती. एक दोन पोलीस आत बसले होते आणी एक बाहेर जीपला हात टेकुन पान खात तीरका उभा होता.

हा बाहेत पान खाणारा पोलीस अंगाने मस्त सुटला होता. त्याचे पोट (ढेरी) ईन केलेल्या शर्ट मधुन खासच दीसत होते. त्या विचीत्र आकाराकडे लक्ष जाताच या कंटाळलेल्या माणसातला कलाकार जागा झाला. नकळतच स्केचबुक आणी पेन्सील बाहेर आली आणी हा एकग्र चित्ताने त्या पोलीसाच्या ढेरीचा शेप गीरऊ लागला. दुसरीकडे कुठेही लक्ष नाही, याचे डोळे फक्त त्याच्या पोटाकडे आणी वहीकडे.

ईकडे पोलीसाचे लक्ष त्याच्याकडे गेले. तो एवढ्या एकाग्रतेने तो कुठे पहातोय याचा अंदाज आला. बहुतेक त्याल खुप अन्-कंफर्टेबल झाले असावे आणी तो पोलीस या चित्रकारच्या जवळ आला.
याला अजुन भानच नव्हते. पोलीसाने खांद्यावर हात मारुन मानगुट पकडले.
"काय चालले आहे?" पोलीस
"नाही..काही नाही...असेच जरा..." हा दचकुन फाफलला. तो पर्यंत पोलीसाने याची 'कला' पाहीली आणी भयंकर चिडुन याच्या ए़क कानाखाली मारली.
"हे धंदे करतोस ईथे बसुन? लाज नाही वाटत?" पोलीस.

तो पर्यंत बाकीचे पोलीस जीप मधुन उतरुन तीथे आले. जाड पोलीसाचा हात याच्या मानेवर पक्का बसला होता. एका मीनीटात हा भानावर आला.
"साहेब, मी कमर्शीयल आर्ट चा स्टुडंट आहे. मी ** कॉलेज मध्ये शीकतो. सर माझी स्केच बुक बघा. आणी हे माझे ID. चुकलो सर, मी मुद्दाम नाही केले, असाच हात चालायला लागला." चित्रकार
गाडीतुन आलेल्या पोलीसांनी याचे ID आणी स्केच बुक तपासले. बरेचसे अर्धवट काढलेले आकार, चेहेरे, हात-पाय आणी बाकी बरीचशी चित्रे पाहुन त्यांचे समाधान झाले असावे.

पण याने आत्ताच काढलेला पोटाचा आकार पाहुन ते दोघेही जोरदार हसत सुटले. वातावरण नीवळले. "पुढच्यावेळी जरा जपुन चित्रे काढ....नाहीतर परत मार खायची पाळी येईल" पोलीसांचा प्रेमळ सल्ला मीळाला. त्याने काढलेले पोटाच्या चित्राचे पान काढुन घेउन त्याचे स्केच बुक आणी ID परत दिले.

एवढ्यात त्याची बस आली आणी हा पटकन बस मध्ये चढला.

पण याने काढलेले ते चित्र त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये नक्की गाजले असणार :)

प्रतिक्रिया

Pain's picture

30 Apr 2010 - 12:31 am | Pain

हेहेहे

अस्मी's picture

30 Apr 2010 - 2:45 pm | अस्मी

हाहाहाहा

सह्ही :)

- अस्मिता

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
ओळखेल कुणीतरी मला माझ्यापेक्षा जास्त..
स्वतः सूर्याला तरी कुठे दिसतो सूर्यास्त

भडकमकर मास्तर's picture

30 Apr 2010 - 2:46 pm | भडकमकर मास्तर

लै भारी किस्सा आहे..... मजा आली....
:) :)
ते चित्र त्या दिवशी पोलीसस्टेशनात नक्कीच गाजले असेल...
अगदी अगदी...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Apr 2010 - 3:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच!

>> ते चित्र त्या दिवशी पोलीसस्टेशनात नक्कीच गाजले असेल... <<
'वाँटेड'पेक्षाही जास्त!

अदिती

विकास's picture

30 Apr 2010 - 4:27 pm | विकास

अजून एक ऐकीव किस्सा...

माणसाचे मन कधी भिरभिरून "यड्यासारखा" वागेल हे सांगता येत नाही. एक प्राध्यापक (कदाचीत प्राध्यपाकांमधे तरूण असेल, तरी देखील...) बस मधून गुमान चालला होता. बाहेर असाच "वर्णानात्मक" पोलीस दिसला. डोक्याला समजण्याच्या आधीच तोंडातून शब्द बाहेर गेले, "ए पोट्या!" ... पुढे काय झाले ते सांगायला नको, ;) पण वरच्याप्रमाणेच हातागालाची भेट झाली आणि काही कळायच्या आत स्वारी पोलीस स्टेशनवर. नशिबाने तेथील इन्स्पेक्टर ने त्या व्यक्तीस ओळखले कारण त्यांच्या मुलाचा तो शिक्षक निघाला... कधी नव्हे ते पालका कडून शिक्षकाला लेक्चर मिळाले पण तेव्हढ्यावरच निभावलं :-)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

नेत्रेश's picture

30 Apr 2010 - 8:59 pm | नेत्रेश

सर्वांचे आभार

II विकास II's picture

30 Apr 2010 - 9:12 pm | II विकास II

घाटपांडेकाकांचा प्रतिसाद वाचायला उत्सुक.

-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

राजेश घासकडवी's picture

1 May 2010 - 8:50 am | राजेश घासकडवी

मजा आली वाचून.