प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

Primary tabs

विकास's picture
विकास in काथ्याकूट
29 Apr 2010 - 9:07 am
गाभा: 

महाराष्ट्र राज्य स्थापनेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येस महाराष्ट्र स्थापनेच्या मुहुर्तापासून आज हयात असलेल्या/नसलेल्या कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन स्फुर्तिदायी मराठी व्यक्तींची नावे येथे प्रतिसादांमधे लिहीत हा धागा मोठा करूया.

त्या व्यक्ती महाराष्ट्रस्थापनेच्या आधी जन्माला आल्या असल्या तरी हरकत नाही. फक्त त्यांचा ठसा मराठी मनावर राहीलेला असला पाहीजे.

शक्यतो या कुठल्याच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक वेळेस (प्रतिसादात) नको.

व्यक्ती स्फुर्तिदायी असणे महत्वाचे, ती खूपच प्रसिद्ध नसली पण काम स्थानिक पातळीपासून अगदी आंतर्राष्ट्रीय पातळीवर कुठेही असले ज्याने समाजात फरक पडला असेल तर हवी.

सगळ्या क्षेत्रातील व्यक्ती याव्यात अशी इच्छा.

त्या मधे कुठेही क्रमांक लावायचा नाही, तर जे मनापासून स्फुर्तीदायी वाटले त्यांची यादी करायची इतकाच उद्देश.

धन्यवाद

प्रतिक्रिया

विकास's picture

29 Apr 2010 - 9:08 am | विकास

वरील धाग्याची सुरवात करत आहे:

पहीला मानः भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) यांना देतो. त्यांचे गाजावाजा न करता केलेले सामाजिक कार्य स्फुर्तिदायी आहेच. त्याशिवाय ऐकीव माहीती प्रमाणे, जेंव्हा १९५८ साली त्यांना भारतरत्न प्रदान केले गेले, तेंव्हा त्यांनी नेहरूंना "संयुक्त महाराष्ट्र" स्थापना राहील्याची आठवण करू दिली होती.

चिंतामणराव देशमुख (१८९६-१९८२)खः रिझर्व बँकेचे पहीले भारतीय गव्हर्नर (१९४३). नंतर नेहरूंच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री. नेहरूंनी जेंव्हा एकहाती मुंबई केंद्रशासित करण्याचा निर्णय जाहीर केला, तेंव्हा "तुम्हाला महाराष्ट्राबद्दल आकस आहे" असे म्हणत राजीनामा दिला आणि मागे घेतला नाही. नंतर नेहरूंच्या विनंतीस मान देऊन युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचे पहीले अध्यक्ष झाले खरे, पण केवळ रू. १ च्या मानधनावर, देशासाठी.

आचार्य अत्रे: संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील एक सेनानी. तसेच बहुरंगी व्यक्तिमत्व!

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

दीपक उभे's picture

29 Apr 2010 - 2:10 pm | दीपक उभे

महाराष्ट्र स्थापनेच्या इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल का?

विशाल कुलकर्णी's picture

29 Apr 2010 - 3:38 pm | विशाल कुलकर्णी

१. र.धों. कर्वे
२. डॉ. प्रकाश आमटे
३. डॉ. अब्दुल कलाम आझाद

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

पाषाणभेद's picture

29 Apr 2010 - 8:03 pm | पाषाणभेद

डॉ. अब्दुल कलाम आझाद मराठी कसे?
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर
डॉ. जयंत नारळीकर
अवांतर - चुकून नाव आले असेल.. आता तरी खुश ? चांगल्या धाग्यात उगाच वादविवाद नको :-)
~ वाहीदा

नेत्रेश's picture

30 Apr 2010 - 4:13 am | नेत्रेश

१. शिल्पा शिरोडकर
२. किमी काटकर
३. राखी सावंत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Apr 2010 - 9:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'' माझे स्वप्न केवळ राजकीय सत्ता मिळविण्याचे नव्हते, तर समतेसाठी आवश्यक ते समाजपरिवर्तन घडवून आणण्याचे होते. संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर सत्ता अधिक लोकांकडे आली, लोकशाहीचे विकेंद्रीकरण झाले. परंतू ही सत्ता आता अधिक खालच्या व मागासलेल्या लोकांच्या हाती जाण्याई प्रक्रिया थांबली आहे. तसे काही विभाग मागासलेले राहून प्रादेशिक असमतोलही निर्माण झाला आहे.
अशा वेळी जागृत जनसंघटनेच्या आधारे सत्तेच्या विकेंद्रीकरण व समतेकडे नेणारी सामाजिक परिवर्तनाची कामे निरनिराळ्या मार्गांनी व्हायला पाहिजेत. परिवर्तनाचे अटकलेले चक्र पुनश्च गतिमान व्हावयास हवे. ''

संदर्भ : संयुक्त महाराष्ट्र : स्वप्न आणि वास्तव या एस.एम. जोशी यांच्या लेखातून.

अजून एक मराठी मनावर प्रभाव असलेले नाव. सेनापती बापट. सेनापती बापटांनी लंडन येथील वास्तव्यादरम्यान बॉम्ब बनवण्याची कला हस्तगत केली. असे असले तरी "माझ्या बॉम्बमुळे एकही बळी गेला नाही". ते फक्त आमच्या कार्याकडे ल़क्ष वेधण्यास केले गेले होते" असे त्याचे म्हणणे होते.
[मराठी विकिपीडियावरुन]

याच सेनापती बापटांनी न्हावी दाढी करायला आला नाही म्हणून नंतर कधीच हजामत केली नाही असे म्हणतात. चुभुदेघे. :)

अजून खूप नावे सांगता येतील. फूरसतीने त्यांची नावे आणि जराशी माहिती टंकतो.

-दिलीप बिरुटे

II विकास II's picture

29 Apr 2010 - 9:55 am | II विकास II

>>एक आणि जास्तीत जास्त तीन स्फुर्तिदायी मराठी व्यक्तींची नावे येथे प्रतिसादांमधे लिहीत हा धागा मोठा करूया.
:(

स्वातंत्र्य वीर सावरकर
शाहुराजे(चौथे, कोल्हापुरचे)
महात्मा जोतिबा फुले

(अधिक माहीती सवडीने)

--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

मदनबाण's picture

29 Apr 2010 - 10:00 am | मदनबाण

ह्म्म...

संयुक्त महाराष्ट्राचे १०६ हुतात्मे :---
http://bit.ly/asrHZu
या पैकी कोणाचीही विशेष माहिती महाराष्ट्र सरकारकडे नाही असे हल्लीच ऐकले आहे...म्हणजे यांचे कोणाचे वंशज जिवंत आहेत की नाही,घराचा पत्ता इ.

जाता जाता :----
मुंबई, डांग, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदरसह संयुक्‍त महाराष्ट्र "झालाच" पाहिजे...असं म्हणणार्‍यांना फक्त एव्हढच सांगावेसे वाटते, अजुन ५० वर्ष वाट बघा !!!.कोणाला आहे तुमची पर्वा??? कसला आलाय मराठीचा अभिमान? इथे ठाण्यातच परप्रांतिय इतके झाले आहेत की आम्हीच महाराष्ट्रात आहोत का असा प्रश्न हल्ली मलाच पडतो !!!
कर्जात बुडालेल्या...पाणी आणि वीज या मूलभूत सेवा देखील जनतेला न देऊ शकणार्‍या महाराष्ट्रात सामील होऊन काय मिळाणार तुम्हाला ?

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

ऋषिकेश's picture

29 Apr 2010 - 9:49 am | ऋषिकेश

बाबा आमटे: यांच्याबद्दल काहि लिहायची गरज आहे?
अण्णा हजारे: माहीतीच्या अधिकाराचे प्रणेते
पु.ल. देशपांडे: अखिल मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे लेखक, वादक, गायक, अभिनेते, दिग्दर्शक वगैरे वगैरे वगैरे

टिपः ३ ची अट जाचक आहे.. निदान १० तरी लिहू द्या हो
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

अमोल नागपूरकर's picture

29 Apr 2010 - 9:55 am | अमोल नागपूरकर

महाराष्ट्र राज्य स्थापनेस सध्या ५० वर्षे पूर्ण होत आहेत.
अभय बन्ग,
सुरेश भट
आणि विनोबा भावे

विकास's picture

29 Apr 2010 - 4:54 pm | विकास

डोक्यात पन्नासच होते आणि टाईप करताना (टायपो) चुकलो. दुरूस्ती केली आहे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

II विकास II's picture

29 Apr 2010 - 9:56 am | II विकास II

>>टिपः ३ ची अट जाचक आहे.. निदान १० तरी लिहू द्या हो
काका, ह्याच धर्तीवर आता, ३ आवडलेल्या मराठी माणसावर मराठी लेख लिहायचा उपक्रम चालु कराल काय?
आम्ही पाठींबा देउ.

--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

बेसनलाडू's picture

29 Apr 2010 - 10:01 am | बेसनलाडू

१. सचिन तेंडुलकर
२. लता मंगेशकर (या मूळच्या गोव्याच्या, पण मराठी या गटात मोडावेसे वाटते)
३. रघुनाथ माशेलकर (२ प्रमाणे)
(मराठी)बेसनलाडू

बेसनलाडू's picture

29 Apr 2010 - 10:03 am | बेसनलाडू

एकाच सदस्याने कमाल किती प्रतिसाद द्यावेत यावर बंधन नसल्याची पळवाट साधून आणखी तीन -
१. आशा भोसले (माझ्या आधीच्या प्रतिसादातील २ व ३ प्रमाणे)
२. सुनील गावस्कर
३. अनिल काकोडकर (माझ्या आधीच्या प्रतिसादातील २ व ३ प्रमाणे)
(मराठी)बेसनलाडू

भारद्वाज's picture

29 Apr 2010 - 10:07 am | भारद्वाज

महाराष्ट्र राज्य स्थापनेस ६० वर्षे पूर्ण होत आहेत.

कसे काय बुवा? :? :?
२०१०-१९६०=६०?
-
जय महाराष्ट्र

भारद्वाज's picture

29 Apr 2010 - 10:31 am | भारद्वाज

१) छत्रपती शिवाजी महाराज : यांनीच तर स्थापन केला की हो....
२) पंडीत भीमसेन जोशी : यांच्या गायकीबद्दल सर्वांना सांगण्याची आवश्यकता नाही, पण त्यांचे ऑटोमोबाईलचे ज्ञानही अगाध आहे.
३) शहीद तुकाराम ओंबाळे : सुज्ञास सांगणे न लगे

जय महाराष्ट्र

विकास's picture

29 Apr 2010 - 4:53 pm | विकास

डोक्यात (आणि माहीतीत ;) )पन्नासच होते आणि टाईप करताना (टायपो) चुकलो. दुरूस्ती केली आहे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

इन्द्र्राज पवार's picture

29 Apr 2010 - 10:47 am | इन्द्र्राज पवार

सुन्दर धागा >>>>>

तीन स्फुर्तिदायी मराठी व्यक्तींची नावे जी आपल्या प्रिय महाराष्ट्राच्या नसानसात भिनली आहेत ::::

१. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
२. गानकोकिळा लता मंगेशकर
३. कवी कुसुमाग्रज

~~~ ही नावे मला व्यक्तिशः देव नामाहून अधिक प्रिय आहेत.... त्यामुळे यांच्याविषयी काही लिहिण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. धन्यवाद !

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

सातबारा's picture

29 Apr 2010 - 10:50 am | सातबारा

एकमेव स्फूर्तीदायी नाव.

" हिन्दूह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर "

यांच्या नावानंतर दुसरे नाव लिहीता येत नाही. क्षमस्व !

-------------------------
हे शेतक-यांचे राज्य व्हावे.

सुमीत भातखंडे's picture

29 Apr 2010 - 10:57 am | सुमीत भातखंडे

१) साने गुरुजी: लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग

२) आनंदीबाई जोशी: पहिली महिला भारतीय डॉक्टर, पहिली हिंदू डॉक्टर

३) दिपक घैसास: चीफ फायनानशियल ऑफीसर आणि चीफ एक्झीक्युटीव्ह ऑफीसर - आय-फ्लेक्स सोल्युशन्स

थोडसं अवांतरः महाराष्ट्र राज्य स्थापनेस ५० वर्ष पुर्ण होत आहेत, ६० नव्हे

सुमीत भातखंडे's picture

29 Apr 2010 - 11:06 am | सुमीत भातखंडे

एकाच सदस्याने कमाल किती प्रतिसाद द्यावेत यावर बंधन नसल्याची पळवाट साधून आणखी तीन

असेच म्हणून:

१) बाल गंधर्व: ज्यांच्याबद्दल बोलताना पु. ल. देशपांडे, सुधीर फडके, भीमसेन जोशी यासारखी मंडळीही भारावून जातात, त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार!!!

२) सुधीर फडके: पुन्हा एकदा शब्द नाहीत, नावच पुरेसं आहे.

३) दादासाहेब फाळके: भारतीय चित्रपटस्रुष्टीचे जनक

भय्या's picture

29 Apr 2010 - 11:12 am | भय्या

काही महत्वाची नावे आगोदरच आलेली आहेतच. (महाराष्ट्रईय असून भारतावर ठसा उमटविणारे)
राजकीय
यशवंतराव चव्हाण,
धनंजयराव गाडगिळ
विखे पाटील
शरद पवार,
बाळासाहेब ठाकरे,
प्रमोद महाजन
कला नाट्य --
दादासाहेब फाळके,
व्ही. शांताराम
भालजी पेंढारकर,
जब्बार पटेल,
मोहन आगाशे,
आमोल पालेकर
नाना पाटेकर
शास्त्र -
विजय भटकर,
अनिल काकोड्कर,
माशेलकर,
जयंत नारळी कर
संगीत
भिमसेन जोशी,
बाबूजी फडके,
किशोरी आमोणकर
वसंतराव देशपांडे

साहित्यावर खू प मोठी यादी आहे ती परत कधीतरी

घाशीराम कोतवाल १.२'s picture

29 Apr 2010 - 8:20 pm | घाशीराम कोतवाल १.२

यशवंतराव चव्हाण,
ते कस काय बुवा? ह्याच चव्हाणानी मुंबईस संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ह्या वाक्यात वर जोर कशाला अस आचार्य अत्रेंना विचार तेव्हा अत्रे म्हणाले तुमच्या आडनावातला काढा आणी मग बघा म्हणे ह्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला अहो हेच नेहरुसमोर म्हणाले महाराष्ट्रापेक्षा पंडीत नेहरु मला मोठे अशी लाचारी कॉग्रेसवाल्यांची

विखे पाटील

नक्की कोणते विखे पाटील तुम्हाला अपेक्क्शीत आहेत ? :? :?
राधाकृय्ष्ण कि त्यांचे तिर्थरुप :)

प्रशु's picture

30 Apr 2010 - 10:34 pm | प्रशु

+१

रामदास's picture

29 Apr 2010 - 12:27 pm | रामदास

की सर्वात आधी आठवण झाली ती प्रल्हाद केशव अत्रे यांची.

राजेश घासकडवी's picture

29 Apr 2010 - 12:29 pm | राजेश घासकडवी

ज्ञानेश्वर
तुकाराम
एकनाथ

चिरोटा's picture

29 Apr 2010 - 12:47 pm | चिरोटा

महर्षि कर्वे
नरेंद्र जाधव
भेंडी
P = NP

मी_ओंकार's picture

29 Apr 2010 - 1:09 pm | मी_ओंकार

पूर्ण देशात ठसा उमटवणारी नावे जी स्फुर्तिदायक तर आहेतच शिवाय भारतात एक चळवळ उभी करण्याचे काम यांनी केले.

१. पेशवे. (अर्थात दुसरा बाजीराव सोडून)
२. लोकमान्य टिळक.
३. बाबासाहेब आंबेडकर.

अविनाशकुलकर्णी's picture

29 Apr 2010 - 1:25 pm | अविनाशकुलकर्णी

२ नावे
१] तात्या अभ्यंकर
२] टारझन

सातबारा's picture

29 Apr 2010 - 2:42 pm | सातबारा

- सहमत. :D

------------------
हे शेतक-यांचे राज्य व्हावे.

सातबारा's picture

29 Apr 2010 - 3:13 pm | सातबारा


१. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

~~~ ही नावे मला व्यक्तिशः देव नामाहून अधिक प्रिय आहेत.... त्यामुळे यांच्याविषयी काही लिहिण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही.

हे लिहून आपण काळजालाच हात घातला.

- स्वातंत्र्यवीर सावरकर भक्तांचा दास ..

-------------------------
हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.

वारा's picture

29 Apr 2010 - 3:42 pm | वारा

१) अशोक सराफ
२) शरद तळवळकर
३) लक्ष्मिकांत बेर्डे.
४) निळू फुले..(आमाला तुमच ईलेक्शन बी नगो आनी ईलेक्शनच तिकीट बी नगो आमाला फक्त पायजेल सपट चहा.)

१.डॉ.हेडगेवार.
२.प.पू.गोळवलकर गुरुजी.
३.नानाजी देशमुख.

शेखर's picture

30 Apr 2010 - 2:59 pm | शेखर

१००% सहमत.

धमाल मुलगा's picture

29 Apr 2010 - 4:00 pm | धमाल मुलगा

१.वासुदेव बळवंत फडके.
२.बाबासाहेब पुरंदरे.
३.नथुराम गोडसे. (होय!कुणाला कितीही हे असत्य वाटलं, कोणी कितीही आदळआपट केली..तरीही हे वास्तव आहे. पटत नसेल तर अगदी छोटीशी बाब पहावी..ऑर्कुटावरची "श्री.नथुराम गोडसे" कम्युनिटी.)

बट्ट्याबोळ's picture

29 Apr 2010 - 4:29 pm | बट्ट्याबोळ

लक्शमणराव किर्लोस्कर
शंतनूराव किर्लोस्कर
चितळॅ
गरवारे
विट्ठल कामत
जगन्नाथ शंकरशेठ

नितिन थत्ते's picture

29 Apr 2010 - 4:48 pm | नितिन थत्ते

यशवंतराव चव्हाण
मेधा पाटकर
एस एम जोशी

(स्फूर्तिदायक नावे लिहायची आहेत म्हणून नाहीतर
काम स्थानिक पातळीपासून अगदी आंतर्राष्ट्रीय पातळीवर कुठेही असले
ज्याने समाजात फरक पडला असेल तर हवी.

सगळ्या क्षेत्रातील व्यक्ती या अटींमध्ये बसणारे एक नाव आहे
दाऊद इब्राहीम कासकर ;) )

नितिन थत्ते

बट्ट्याबोळ's picture

29 Apr 2010 - 5:11 pm | बट्ट्याबोळ

आणि छोटा राजन पण !!!

विकास's picture

29 Apr 2010 - 6:05 pm | विकास

"सगळ्या क्षेत्रातील व्यक्ती या अटींमध्ये बसणारे" याच बरोबर "स्फुर्तिदायी" पण म्हणलेले आहे ते विसरू नका. अर्थात तुम्हाला दाऊदच्या कारनाम्यामुळे दंगली करण्याची अथवा "एन्काउंटर" करण्याची स्फुर्ती मिळाली असे म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

स्वाती२'s picture

29 Apr 2010 - 5:00 pm | स्वाती२

अनुताई वाघ
गोदावरी परुळेकर

भोचक's picture

29 Apr 2010 - 6:20 pm | भोचक

श्री. ना. पेंडसे - भलेही 'प्रादेशिक' कादंबर्‍या म्हणून हिणवलत, तरी श्रीनांनी दीर्घात मांडलेला तत्कालीन समाजजीवनाचा लेखाजोखा स्तिमित करणारा.
विजय तेंडुलकर- मराठी साहित्याला 'आंतरराष्ट्रीय' परिमाण देणारा थोर आणि कालातीत साहित्यिक.
गो. नि. दांडेकर- महाराष्ट्राचा इतिहास 'जिवंत' करणारा नि आयुष्याचे टक्केटोणपे खाऊन तावून सुलाखून निघालेल्या जीवनाचे तितकेच आरसपानी दर्शन घडविणारा अवलिया.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

प्रशु's picture

30 Apr 2010 - 10:38 pm | प्रशु

गोनिदा बाबत सहमत...

भोचक's picture

29 Apr 2010 - 6:28 pm | भोचक

विष्णू श्रीधर वाकणकर- भोपाळजवळच्या 'भीमबेटका' येथील तब्बल दहा हजार वर्षांपूर्वीची भित्तीचित्रे शोधली. अर्थ लावला. रॉक पेंटिंगबद्दल मूलगामी काम.
प्रभाकर माचवे- मराठीसह हिंदीतही तितकेच लेखन. पण दुर्देवाने मराठी लोकांकडूनच उपेक्षा.
अहिल्याबाई होळकर- प्रातःस्मरणीय. यांच्याबद्दल काय सांगावे?

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

भारद्वाज's picture

29 Apr 2010 - 7:02 pm | भारद्वाज

किर्लोस्कर- पहिले मराठी उद्योजक
बी.जी. शिर्के- प्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक
आनंद देशपांडे- पर्सिस्टंट सॉफ्टवेयरचे संस्थापक

-
जय महाराष्ट्र

धमाल मुलगा's picture

29 Apr 2010 - 8:47 pm | धमाल मुलगा

बा़ळासाहेब ठाकरे.
राज ठाकरे.

अप्पा जोगळेकर's picture

30 Apr 2010 - 9:29 am | अप्पा जोगळेकर

इतिहासात काय असेल ते असेल ? आज तरी महाराष्ट्राचं मढं झालंय. मर्तिक घातलं पाहिजे.

बा़ळासाहेब ठाकरे.
राज ठाकरे.

- हे स्फूर्तिदायक ? नक्की का ?

II विकास II's picture

30 Apr 2010 - 9:38 am | II विकास II

श्री आप्पा, ह्या धाग्यावर वाद नकोस. उगाच चांगल्या धाग्याची वाट लागेल. हवा तर नवीन धागा काढ. मलाही बाळ ठाकरे आणि राज ठाकरे हे इतर अनेक लोकांपेक्षा स्फुर्तीदायक कसे होउ शकतात हा प्रश्न पडला आहे. पण शेवटी दुसर्‍यालाही मत असते, त्यालाही मान द्यायला हवा.

--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

नम्रता राणे's picture

30 Apr 2010 - 11:45 am | नम्रता राणे

मलाही बाळ ठाकरे आणि राज ठाकरे हे इतर अनेक लोकांपेक्षा स्फुर्तीदायक कसे होउ शकतात हा प्रश्न पडला आहे. पण शेवटी दुसर्‍यालाही मत असते, त्यालाही मान द्यायला हवा.

दुसर्‍यांच्या मतालाही आदर दिल्याबद्दल लाख ला़ख धन्यवाद!!!!!

धन्यवाद!!!!!!!!!

इन्द्र्राज पवार's picture

30 Apr 2010 - 2:58 pm | इन्द्र्राज पवार

".....पण शेवटी दुसर्‍यालाही मत असते, त्यालाही मान द्यायला हवा."

अत्यंत संतुलीत विचार आणि म्हणून आदर्शवत !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्रिय मिपासदस्यानों
जरा आठ्वून पहा साधारण पाच वर्शापूर्वी म टा ने एक साहित्यिकांची यादी तयार केली होती, ती वाचकांच्या प्रतिसादावार अवलंबून होती.
कुणाला माहित असेल तर धागा द्यावा.
----
राम गणेश गडकरी
नाथ माधव
लक्ष्मिबाई टिळक
बाबूरावा आर्नाळकर
साने गुरूजी
विनोबा भावे
आचार्य अत्रे
ग दि माडगुळकर
व्यंकटेश माडगुळकर
वि स खांडेकर (ग्यानपिठ)
वि वा शिरवाडकर (ग्यानपिठ)
विंदा करंदीकर(ग्यानपिठ)
काका कालेलकर
बाबासाहेब पुरंदरे
गो नि दांडेकर
गो पु देशपांडे
पु ल देशपांडे
भालचंद्र नेमाडे
जी ए कुलकर्णी
शंकर पाटील
विजय तेंडुलकर
शं ना नवरे
केशवसूत
बा सी मर्ड्।कर
शांता शेळके
विश्वास पाटील
शोभा डे
गोविंद तळवलकर
माधव गडकरी (यांचा एक अग्रलेख पार सर्वोच्च न्यायालाया पर्यंत गेला होता)
बाबा कदम
कुमार केतकर
----जसे आठ्वले तसे लिहीले आहे. नॉट इन एनी ऑर्डर--

भारद्वाज's picture

30 Apr 2010 - 2:43 pm | भारद्वाज

हेमंत करकरे
अशोक कामटे
विजय साळसकर
-
जय महाराष्ट्र

सातबारा's picture

30 Apr 2010 - 3:25 pm | सातबारा

करकरे इ.

कसाबच्या हल्ल्यात सापडले आणि मूर्खासारखे मेले ?

सरकार आणि मिडीयाला लक्ष दुसरी कडे वळवायला साधन हवे होते म्हणून त्यांना हुतात्मा केले.

कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांना छळणे हे मात्र कर्तुत्व स्फुर्तिदायक आहे. X(

---------------------
हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.

भारद्वाज's picture

30 Apr 2010 - 10:20 pm | भारद्वाज

केवळ '२६/११ चा हल्ला' हाच काही त्यांचा पोलिसातील नोकरीचा कार्यकाल नव्हे.
करकरेंनी रॉ मधे काम केले होते.
कामटेंनी खैरलांजीत दंगलखोरांना थोपवले होते.
साळसकरांनी गुंडांचा एन्काउंटर केला होता.

-
जय महाराष्ट्र

ईन्टरफेल's picture

30 Apr 2010 - 8:10 pm | ईन्टरफेल

=)) =)) =)) =)) =)) एक शेतिऊपयोगि मानुस न मिळाल्यामिळे शेति करित नसलेला शेतकरि...........जगाला-ताप नव्हे जगताप

भारद्वाज's picture

30 Apr 2010 - 2:47 pm | भारद्वाज

माझा प्रतिसाद उपप्रतिसाद म्हणून का येतोय?
कुणी सांगेल का काय करावं ते?
-
कृपाभिलाषी

नितिन थत्ते's picture

30 Apr 2010 - 2:53 pm | नितिन थत्ते

आत्ता मी तुमच्या प्रतिसादाच्या खिडकीतल्या "उत्तर द्या" वर क्लिकवलं. तेव्हा तो उपप्रतिसाद झाला.

मी सर्वात खाली असणार्‍या चौकटीत प्रतिसाद टंकला असता तर तसे झाले नसते.

पण तुमचा प्रतिसाद उपप्रतिसाद म्हणून कुठे आलाय?

नितिन थत्ते

भारद्वाज's picture

30 Apr 2010 - 3:00 pm | भारद्वाज

ओह...समजलं.
मन:पूर्वक धन्यवाद.
(याआधीचा प्रतिसाद उप झालाय. प्रकाशित झाल्यावर लक्षात आलं मी कुठे क्लिकवलं होतं ते)

मृगनयनी's picture

30 Apr 2010 - 3:05 pm | मृगनयनी

१) सिन्धुताई सपकाळ
२) हिमानी सावरकर
३) पल्लवी ताई जोशी-अग्निहोत्री.

या ३ स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रातल्या असून आज महाराष्ट्रात त्यान्चा टी आर पी सर्वात जास्त आहे! :)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

तिमा's picture

30 Apr 2010 - 3:16 pm | तिमा

प्र.बा. जोग
मधु आपटे
गणपत पाटील
पी. सावळाराम

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

भारद्वाज's picture

30 Apr 2010 - 5:11 pm | भारद्वाज

डी. पी. दांडेकर - कॅम्लिनवाले
के. बी. वीरकर - डिक्शनरीवाले
सुरेश अलुरकर - अलुरकर म्युझिक हाउस
जोशी - वडेवाले,
चितळेबंधू - मिठाईवाले
वगैरे वगैरे

-
जय महाराष्ट्र

प्रदीप's picture

30 Apr 2010 - 7:03 pm | प्रदीप

१. आचार्य अत्रे
२. लता मंगेशकर
३. सुनील गावस्कर

प्रशु's picture

30 Apr 2010 - 10:44 pm | प्रशु

दाक्षीणात्य नट्यांची हिंदीतली मक्तेदारी एकाहाती मोडुन काढुन मराठीचा झेंडा फडकावल्या बद्द्ल.... माधुरी दिक्षीत...

सुधीर काळे's picture

30 Apr 2010 - 11:06 pm | सुधीर काळे

सुरेख उपक्रम!
जुन्या नट्या:
शोभना समर्थ
नूतन
तनुजा
नलिनी जयवंत
(झनक झनक) संध्या
जयश्री गडकर
जयश्री वणकुद्रे (V. Shantaram's wife)

जुने नट:
विवेक
रमेश देव
लक्ष्मीकांत बेर्डे
भगवान दादा
नाना पळशीकर
शरद तळवलकर

नवे नट
अमोल पालेकर
नाना पाटेकर
Three idiots मधील दोन मराठी idiots! (नावे आठवत नाहींत)

संगीतकार:
लक्ष्मीकांत (प्यारेलालमधले)
राम-लक्ष्मण
चितळकर (सी. रामचंद्र)
वसंत देसाई

गायिका:
सुलोचना चव्हाण
(कळिदार) रोशन सातारकर

सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9

सुधीर काळे's picture

30 Apr 2010 - 11:00 pm | सुधीर काळे

भारतरत्न पां. वा. काणे
सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9

केशवराव's picture

1 May 2010 - 2:34 am | केशवराव

१] सुलोचना

२] उषा किरण

आणि ३] जयश्री गडकर

विकास's picture

1 May 2010 - 4:30 am | विकास

भरघोस प्रतिसादा बद्दल आणि इतक्या सर्वांना लक्षात ठेवल्याबद्दल धन्यवाद!

फक्त तीनच नावांचा नियम आता मोडून, अजून काही आठवलेले: (बहुतेक करून ही नावे वर आलेली नाहीत)

स्मिता पाटील
उषा मंगेशकर
हृदयनाथ मंगेशकर
सई परांजपे
शांता शेळके
गोविंद तळवकर
माधव गडकरी
ग.वा. बेहरे
(विचार पटत नसले तरी) कुमार केतकर
(मृत्यूनंतर अधिक वादग्रस्त ठरलेले) प्रमोद महाजन
प्रथम महीला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
शाहीर साबळे
कन्याकुमारीच्या निर्मितीसाठी होऊन जनतेला एकत्र केलेले विवेकानंद केंद्राचे एकनाथजी रानडे
पाणीवाली बाई - मृणाल गोरे
कोकण रेल्वेचे स्वप्न पाडलेले मधू दंडवते आणि त्यांच्या चळवळ्या पत्नी प्रमिला दंडवते
सहकार चळवळ तयार करण्यात सिंहाचा वाटा असलेलेल अर्थशास्त्रज्ञ वि.म. दांडेकर

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

शुचि's picture

1 May 2010 - 4:58 am | शुचि

छत्रपती शिवाजी महाराज
बाजी प्रभू देशपांडे
तानाजी मालुसरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

हुप्प्या's picture

1 May 2010 - 9:01 am | हुप्प्या

संत गाडगेबाबा : एक महान व्यक्ती. लोकांना हातात झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले. अंधश्रद्धेवर कठोर प्रहार केले. अविस्मरणीय.

अबिनाश धर्माधिकारी. उत्तम, अभ्यासू वक्ता.

नरेंद्र करमरकर : गणितातील ह्यांचा अल्गोरिदम जो अत्यंत उपयोगी आहे, त्यांच्या नावाने अजरामर राहील.

अण्णा हजारे. वादग्रस्त वाटले तरी राळेगणशिंदीकरता त्यांनी खूप काम केले आहे. आणि अनेक गावांनी त्यांच्याकडून स्फूर्ती घेतली आहे.

केशवराव केळकर : वनवासी कल्याण आश्रमाचे प्रचंड कार्य केले आहे. ठाणे जिल्ह्यातील सगळ्या आदिवासी परिसर तळहातावरील रेषांप्रमाणे जाणत.

दुर्गा भागवत : एक अफाट विद्वत्ता असणारी बाई. संस्कृत, पाली असल्या पुरातन भाषांबरोबर अनेक आदिवासी बोलींचा अभ्यास. अत्यंत निर्भिड व्यक्तिमत्व. आणीबाणीच्या काळात केलेली आंदोलने.

सुधीर फडके : उत्तम गायक तर होतेच पण एक सच्चे देशभक्तही.

इन्द्र्राज पवार's picture

1 May 2010 - 4:37 pm | इन्द्र्राज पवार

कामगार चळवळीशी अत्यंत निगडीत असलेली तीन नावे :

१. कॉम्रेड डांगे
२. जॉर्ज फर्नांडीस
३. दत्ता सामंत

आता इथे "या तिघांनी कामगारांसाठी जे केले त्यामुळे कामगार सुखी झाला की देशोधडीला लागला...." हा चर्चेचा मुद्दा करू नये... कारण तो हा या धाग्याचा हेतू नाही.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मदत करणारे ,लोकाना सदमार्ग दाखवणारे थोर महापुरुष,संन्यास मार्गाचा अवलंब करणारे,कशाचाही मोह न बाळगणारे,सतत लोककल्याणात व्यग्र असणारे
श्री श्री प्.पु नरेंद्र महराज
श्री श्री प्.पु. अनिरुध्द बापु
श्री स्वामी शिवानंद
हे हि तितकेच महत्वाचे आहे असे मला वाटते.
वेताळ

सातबारा's picture

2 May 2010 - 6:53 am | सातबारा

कर्नल प्रसाद पुरोहित
---------------------
हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.

सुचेल तसं's picture

2 May 2010 - 8:01 pm | सुचेल तसं

अभय बंग
राणी बंग
अनिल अवचट