आज मि. पा. वर पोलिसांचे दोन किस्से वाचुन १२-१३ वर्षांपुर्वीची घटना आठवली...
मी मुंबईहुन कोकणात (S.T. ने) जायला नीघालो होतो. वेळ साधारण दुपारची होती. S.T. लागायला वेळ होता. मी मुंबई सेंट्रलच्या S.T. स्टँड बाहेर फुटपाथ वर रमत गमत चाललो होतो. फारसे सामान नव्हते. फक्त १ सॅक होती. सॅक जुनी होत आल्यामुळे नवी घ्यायच्या वीचारात होतो. तीथेच फुटपाथ वर बसलेल्या फेरीवाल्याकडे बर्यापैकी सॅक होत्या.
बघताना १ सॅक पसंत पडली. घासाघीस चालु झाली.
"बढीया है साब, ए १ माल, गैरंटी है साब...ले लो साब, २५० दे दो" ... फुटपाथ वरचा भैय्या.
"५० में दे" मी.
"क्या मजाक करते हो साब, चलो १५० फायनल" भैय्या.
"६५ देता हुं" मी
"नही होगा साब, १२५ के नीचे नही जा सकते" भैय्या.
....
५ मीनीटांनी मी ८० वर आणी भैय्या १०० वर अडकुन बसलेलो.
मी त्याला टेंप्ट करण्या साठी १०० ची नोट हातात काढुन ८० वर अडुन बसलो होतो.
एकदम तो म्हणाला, "चलो लेलो साब ८० में". त्याने ती सॅक माझ्या हातात दिली आणी मी १०० ची नोट त्याच्याकडे. तो २० रुपये न देता दुसर्या गिर्हाईकाकडे वळला.
"२० रुपया दे दो ना" मी
"कैसा २० रुपया, सॅक तो सौ का है" भैय्या.
"८० बोला था. ८० में नही देना है तो पैसा वापस दे दो" मी
"पैसा नही मीलेगा, चाहीये तो सॅक उठाओ और आगे बढो" बैय्या.
सॅक छान होती. मी १०० ला ही घेतली असती. पण ही सरळ सरळ लबाडी होती.
दोन मीनीटे वीचार केला भीडावे का याला. पण त्यात फारसा फायदा नव्हता. २० रु साठी शर्ट फाटला असता कींवा सामान गेले असते. पण लुबाडला गेल्याची जाणीव अस्वस्थ करीत होती. हात शीवशीवत होते. जाउन एक त्याच्या कानाखली द्यावी असे वाटत होते. पण घरी जाताना मारामारी नको, शीवाय बाजुचे भैय्या लोक त्याच्या मदतीला येण्याची शक्यता होतीच.
तेवढ्यात समोर असलेल्या पोलीसांच्या शेड कडे लक्ष गेले. त्या लोखंडी शेड खाली १ फौजदार आणी ३-४ पोलीस होते. एका क्षणात अजुन पर्यंत 'दक्षता' मध्ये वाचलेल्या मुं. पो. च्या गोष्टी आठवल्या आणी पाय आपोआप तीकडे वळले.
"साहेब, एक तक्रार आहे" मी.
"बसा" लोखंडी खुर्ची कडे बोट दाखवत फौजदार.
"काय नाव तुमचे? काय करता?" फौजदार.
"मी नेत्रेश. सेंट्रल गर्व्हमेंट च्या सर्व्हीस मध्ये क्लास १ गॅझेटेड ऑफीसर आहे" मी.
२२-२३ वर्षांच्या माझ्याकडे बघुन माझे ID मागीतले. ते पाहुन झाल्यावर वीचरले "बोला काय तक्रार आहे?"
"मी ही सॅक त्या फेरीवाल्याकडुन ८० ला घेतली आणी १०० रुपये दीले. तो २० रुपये परत देत नाही" मी.
"ये सावंत, जरा यांच्या बरोबर जा आणी त्या ****ला घेउन ये." फौजदार. "तुम्ही सावंत बरोबर जा आणी कोण फेरीवाला ते दाखवा"
सावंत पोलीस पुढे आणी मी मागे, नीघालो.
"हा नीळ्या शर्टातला" मी
क्षणात सावंतने त्याची कॉलर पकडुन खाड करुन कानाखाली वाजवले. फेरीवाला धडपडलाच. मी चांगलाच दचकलो. गिर्हाईके व बघे मागे सरकले.
"चल रे ***. साहेबांनी बोलावले आहे" सावंत.
"साब धंदा चालु है, सब माल खुला पड है, साब...." फेरीवाला.
सावंतने काही न बोलता आणखी एक मुस्काटात मारली
"जरा माल देखना ..." फेरीवाला बाजुच्या फेरीवाल्याला बोलला आणी चालु लागला.
सावंतने पुर्ण वेळ त्याची कॉलर/मानगुट पकडुन ठेवली होती.
आमची वरात त्या शेड खाली परत आली.
"माज आला कारे *** तुला. सरळ धंदा करता येत नाही?" फौजदाराने एका मीनीटांत आपला हात आणी तोंड त्याच्यावर साफ करुन घेतले. "चल यांचे पैसे काढ"
तेव्हा त्याचे मझ्याकडे लक्ष गेले. एका सेकंदात १०० ची नोट खीशातुन नीघाली.
"तुम्हाला बॅग हवी का साहेब"? फौजदार
"८० मध्ये देत असेल तर हवी आहे" मी.
"चल २० रुपये दे यांना" फौजदार
फेरीवाल्याने मला २० रुपयांची नोट दीली. (१०० ची नोट अजुन त्याच्या हातातच होती)
मी फौजदारांचे आभार मानले.
सामान बघुन त्यांनी वीचारले "कुठे बाहेत नीघालात काय?"
"हो, आता अर्ध्या तासात S.T. आहे." मी.
"मग तुम्ही नीघा साहेब. तुमची S.T. नीघे पर्यंत याला ईथेच बसऊन ठेवतो." फौजदार
मी मुंबई पोलीसांच्यावर खुप खुश होउन निर्धास्त S.T. बसलो.
प्रतिक्रिया
29 Apr 2010 - 1:02 am | Pain
अरे वा ! भारी !
29 Apr 2010 - 1:22 am | विकास
अनुभव जबरा आहे, जरी (मानवी हक्कांचा विचार करता ;) ) कानाखाली आवाज काढणे बरोबर का चूक हा प्रश्न पडला असला तरी! :?
मात्र तुम्ही आपला हक्क बजावलात आणि काही उपयोग नाही म्हणत पोलीसांकडे जायचे टाळले नाहीत, या बद्दल अभिनंदन...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
29 Apr 2010 - 3:28 am | इंटरनेटस्नेही
कानाखाली मारणे बरोबर आहे. कारण श्री नेत्रेश यांचे २० रुपये चोरी केल्याचा / फसवल्याचा गुन्हा दाखल केला असता तर ते त्या भैयाला जास्त महागात पडले असते. त्या शिवाय श्री नेत्रेश यांचे २० रु त्यांना अत्यंत उशिरा परत मिळाले असते.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
29 Apr 2010 - 3:31 am | पक्या
त्या माणसाने लबाडी केली म्हणून तुम्हाला पोलीसी खाक्या दाखवावा लागला हे ठीकच आहे.
बाकी नेहमीचेच एक निरिक्षण म्हणजे आपण अशी घासाघीस मॉल मध्ये वा मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये करत नाही. प्राईस टॅग वर असलेल्या किमतीला वस्तू विकत घेतो . पण दहा वीस रुपयांसाठी मात्र हातावर पोट असलेल्या विक्रेत्यांकडे तो त्या किमतीला वस्तू द्यायला तयार होईपर्यंत घासाघीस करत रहातो.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
29 Apr 2010 - 4:36 am | नेत्रेश
बरेच मॉल / मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअर डिफेक्टीव्ह माल बदलुन देतात किंवा पैसे परत देतात.
तसेच रस्त्यावरील हातावर पोट असलेल्या विक्रेताही त्याला परवडत असेल तरच सौदा करतो.
मॉल आणी रस्त्यावरील फेरीवाला यांची तुलना होउ शकत नाही.
29 Apr 2010 - 5:44 am | इंटरनेटस्नेही
अहो.. जे लोक २०० रु. भाव लाउन तीच वस्तु ५० रु ला विकतात त्याचा अर्थ सरळ असा आहे की त्या वस्तुचे निर्मिती मुल्य रु २५ पेक्षा जास्त नाही...
श्री. नेत्रेश तुम्ही पोलिसी खाक्या दाखवलात ते योग्य केलं.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
5 May 2010 - 1:36 am | पक्या
नफ्याचे मार्जिन मोठ्या दुकानांमध्ये जास्त असते. आमच्या नात्यातील एकाचे पंजाबी ड्रेस आणि ड्रेस मटेरिअल चे पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर मोठे दुकान आहे. तो माणूस एका ड्रेस मागे दुप्पट ते तिप्पट नफा कमावतो. ड्रेस ची खरेदी ४००-५०० रुपये असेल तर त्याच्या दुकानात विक्रीसाठी तो सहज १००० रुपयापर्यंत लावतो.
मॉल मध्ये किंवा मोठ्या दुकानांमधील सर्वच वस्तूंची गॅरंटी नसते.
आणी एकदा घेतलेला माल काही कारणास्तव परत करायचा झाल्यास सहजासहजी दुकान दार माल परत घेत नाहीत. हा स्वानुभव आहे.
अशा ठिकाणी आपण आहे त्या किमतीला वस्तू विकत घेतो. घासाघीस करत नाही.
घासाघीस करुन वस्तू विकत घेण्यात चूक काहीच नाही पण अगदीच किरकोळ पैशांसाठी ज्यांचे हातावर पोट असते अशा लोकांकडून घासाघीस करून वस्तू विकत घेणे (उदा. भाजीवाले, फेरीवाले) आणि मॉल मधील वस्तू मात्र आहे त्या किमतीला विकत घेणे ह्यात मला माणसाच्या वागण्यातील विरोधाभास जाणवतो.
-जय महाराष्ट्र , जय मराठी !
29 Apr 2010 - 3:32 am | शुचि
वा याला म्हणतात पोलीसी खाक्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
29 Apr 2010 - 5:43 am | रेवती
सुखद अनुभव पोलिसांचा!
चला, तुमचं काम नीट झालं, नाहीतर फसवले गेल्यावर स्वत:चाच राग येतो.
रेवती
29 Apr 2010 - 1:22 pm | इन्द्र्राज पवार
"...... लुबाडला गेल्याची जाणीव अस्वस्थ करीत होती."
नेमकी हीच मानसिक अस्वस्थता तुम्हाला पोलिसांची मदत घेण्यास प्रवृत्त करती झाली हे ठीक झाले, नाहीतर घरी आल्यानंतरच काय पण पुढे कित्येक दिवास "आपण लुबाडलो गेलो" ही भावना सतत टोचत राहिली असती.
गेल्या वर्षी गोव्याच्या सहलीत पहिल्याच दिवशी "पणजी" येथील एका गाईडने हॉटेलात आमच्या ग्रुप ला असेच "फसवले" आणि (निदान माझे तरी...) सहलीचे उरलेले तीन दिवस पूर्णपणे नासून गेले. आता या क्षणी येथे ही प्रतिक्रिया टाईप करताना देखील "त्या" आठवणीने लुबाडलो गेल्याच्या भावनेने शरम वाटते. तुम्ही खरोखरी नशीबवान की मुंबई पोलिसांनी तुम्हाला वर्णन केल्याप्रमाणे सहकार्य केले व न्याय मिळवून दिला. पणजीत हे सुख नव्हते.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
29 Apr 2010 - 1:36 pm | बिपिन कार्यकर्ते
तुम्ही केलेत ते बरोबरच... पण ....
"मी नेत्रेश. सेंट्रल गर्व्हमेंट च्या सर्व्हीस मध्ये क्लास १ गॅझेटेड ऑफीसर आहे" मी.
ही खरी गोम आहे त्यातली. तुम्ही जे तुम्ही होता ते नसता तर विपरित अनुभव यायची शक्यताच जास्त. फेरीवाल्यांचे पेमेंट ठरलेले असते. तुमच्याकडून काय मिळणार?
बिपिन कार्यकर्ते
29 Apr 2010 - 1:39 pm | प्रमोद देव
सहमत.
एरवी वेगळा अनुभव आला असता.
29 Apr 2010 - 7:38 pm | घाशीराम कोतवाल १.२
दॅटस द पॉईंट बिका?
कारण हे पडले सेंट्रल गर्व्हमेंटचे सर्व्हीस गॅझेटेड ऑफीसर ते पण क्लास वन म्हणुन ह्यांच काम झाल नाही तर बाकीच्यां सामान्याशी हे लोक कसे वागतात हे जगजाहीर आहे .....
29 Apr 2010 - 7:57 pm | टुकुल
तुम्ही म्हणता ते कदाचीत बरोबर पण असु शकेल बिका, पण पोलिंसा बद्दलचे काही चांगले अनुभव वाचायला मिळाले हे त्यातल्या त्यात बरे वाटले.
--टुकुल
1 May 2010 - 2:45 am | नेत्रेश
त्या वेळी मी जरी "TCS मध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे, किंवा LIC चा विमा एजंट आहे" असे सांगितले असते तरीही त्यांनी मला अशीच मदत केली असती अशी माझी खात्री आहे. माझ्या पदाचा पोलीस/प्रशासकीय खात्याशी दुरान्वयेही संबंध नव्हता (त्यानी माझे ID पाहीले होते).
बहुतेक मराठी माणसाला फसविणार्या फेरीवाल्याचा त्यांना राग आला असावा, किंवा सकाळ पासुन लोखंडी शेड खाली उन्हात आणी धुळीत बसुन ते कंटाळले / वैतागले असावेत.
29 Apr 2010 - 2:36 pm | कानडाऊ योगेशु
चांगला अनुभव.
पोलिसांबद्दलचे असेच चांगले अनुभव वाचायला आवडतील.
29 Apr 2010 - 11:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगला अनुभव....! पोलिसांचे असे चांगले अनुभव टाका रे कोणीतरी. बिचारे, लैच बदनाम झाले आहेत. :)
-दिलीप बिरुटे
30 Apr 2010 - 12:02 am | II विकास II
>>पोलिसांचे असे चांगले अनुभव टाका रे कोणीतरी. बिचारे, लैच बदनाम झाले आहेत.
हॅ हॅ हॅ.,
दादा कोंडके ह्यांनी पांडु हवालदार चित्रपट काढला, पोलिस प्रामाणिक आहेत असे दाखवले. तर एका पोलिस अधिकार्याने सेन्सार(शेणसार) बोर्डाकडे पोलिस प्रामाणिक दाखवले म्हणुन तक्रार केली.
संदर्भ - एकटा जीव
--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.