सन्त्र्याचे पूडिन्ग

अम्रुताविश्वेश's picture
अम्रुताविश्वेश in पाककृती
27 Apr 2010 - 7:34 am

साहित्य :

१ सन्त्रे - फोडी करून बारीक तुकडे करून
कणिक -१/२ वाटी
तूप -४ चमचे
इन्स्ट्न्ट जेलो : भारतामधे चायनाग्रास किन्वा कस्टर्ड पावडर मिळते ती वापरली तरी चालेल.

कॄती :

एका भान्ड्या मधे तूप गरम करून घ्या. त्या तूपावर कणिक खरपूस भाजून घ्या.थोडेसे दूध घालून हे मिश्रण एक्जीव करून घ्या. ज्या भान्ड्या मधे पूडिन्ग सेट करायचे आहे त्या भान्ड्यामधे हे मिश्रण काढून ते हातानी थापून हे भान्डे फ्रिजमधे ठेवा.म्हणजे पूडिन्ग चा बेस सेट होइल.

बेस सेट झाल्यावर त्यावर सन्त्र्याचे तुकडे पसरा. आता एका बाउल मधे दूध आणि जेलो एकत्र करून घ्या.हे मिश्रण सन्त्र्याच्या तुकड्यान्वर घाला . आणि हे मिश्रण फ्रिजमधे सेट करा. साधारण पणे अर्ध्या तासामधे सेट होइल.

सजावटी साठी सन्त्र्याची किसलेली साल वापरलेली आहे

:):)

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

27 Apr 2010 - 7:43 am | विसोबा खेचर

क्लासच फोटो!

एकदा केव्हातरी मुखपृष्ठावरच्या खादाडी सदरात देखील टाकेन.. :)

तात्या.

रामदास's picture

28 Apr 2010 - 8:03 pm | रामदास

लवकरच टाका.

टारझन's picture

28 Apr 2010 - 10:57 pm | टारझन

व्वा !! संत्रे म्हणजे आमचे जिवकी प्राण :) लै भारी हो अमृता तै !
फोटू झक्काआआस !!
बाकी संत्रापुडींग शेजारी आमचा बी फोटू हवाय !!

"लुटा लुत्फ टारझनचा ... संत्र्याच्या पुडींग सोबत " अशा हेडिंग खाली :)
आणि हो .. (फक्त उमेद्वार म्हैलांसाठी) असा बोर्ड लावायला विसरू नका =))

(टारझन प्रेमी) संत्र्याचं पुडिंग

अम्रुताविश्वेश's picture

27 Apr 2010 - 7:45 am | अम्रुताविश्वेश

:) .... अवश्य टाका.

वाट बघतेय.

आमोद's picture

28 Apr 2010 - 2:57 pm | आमोद

ह्यात साखर किती घालावी याचा ऊल्लेख नाही

अम्रुताविश्वेश's picture

28 Apr 2010 - 10:43 pm | अम्रुताविश्वेश

इन्स्टन्ट जेलो वापरल्यामुळे साखर नाही घातली तरी चालते.
अधिक गोड हवे असल्यास साधारण पणे १ कप दूधाला ५ चहाचे चमचे साखर पुरे होइल.

दिपाली पाटिल's picture

27 Apr 2010 - 9:04 pm | दिपाली पाटिल

छान दिसतंय पुडिंग...जेलो ऑरेंज फ्लेवरचं घेतलं आहे कां?
दिपाली :)

अम्रुताविश्वेश's picture

27 Apr 2010 - 9:14 pm | अम्रुताविश्वेश

माझ्याकडे नव्हता ऑरेंज फ्लेवर. म्हणून बनाना क्रीम फ्लेवर होता तोच घातला आहे.

:)

प्राजु's picture

27 Apr 2010 - 9:38 pm | प्राजु

आई शपथ्थ!!
काय सह्ही आहे हा फोटो!

एक शंका : तो कणकेचा बेस तयार करायचा .. तो तयार होतो तेव्हा तो पाय क्रस्ट सारखा दिसतो का? तसे असेल तर रेडीमेड पाय क्रस्ट आणला आणि त्यावर पुडिंग केल तर चालेल का? (तसंही हे असले प्रकार मला येतच नाहीत.. त्यापेक्षा तुझा पत्ताच दे.. तेच सोपं आहे. ;) )
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

अम्रुताविश्वेश's picture

27 Apr 2010 - 10:17 pm | अम्रुताविश्वेश

रेडीमेड पाय क्रस्ट आणून त्यावर पुडिन्ग केल तरी चालेल. :)
बेस घरीच तयार करायला अजून १ पध्धत म्हणजे मारी किन्वा पारले जी च्या बिस्किटिन्चा चुरा करून त्यात बटर घालून सेट करायचा. ह्या पध्धतीमधे बेस सेट करायला दूध घालायची गरज नाही.

O:)

इंटरनेटस्नेही's picture

28 Apr 2010 - 4:43 am | इंटरनेटस्नेही

मस्त फोटो आहे आणि रेसिपी छानच... आईला नक्कीच सांगेन बनवायला...

--
इंटरनेटप्रेमी.

डावखुरा's picture

28 Apr 2010 - 11:09 pm | डावखुरा

अपुनको खुपच आवड्या......
:) <:P :P <:P :)
--------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

स्वाती दिनेश's picture

30 Apr 2010 - 10:57 am | स्वाती दिनेश

फोटो मस्तच दिसतो आहे,
स्वाती

स्वाती२'s picture

30 Apr 2010 - 3:59 pm | स्वाती२

छान आहे पाकृ.