वीकेन्ड् चा मेनू - पास्ता आणि गार्लिक ब्रेड

अम्रुताविश्वेश's picture
अम्रुताविश्वेश in पाककृती
26 Apr 2010 - 2:25 am

From general" width="1000" height="1000" alt="" />

आज वीकेन्ड् असल्यामुळे घरामधे काहिहि शिल्लक नवत. म्हणून केलेला १ प्रयोग.

साहित्य :

पास्ता साठी

पास्ता ( कुठलाही आकार )
कान्दा १ उभा चिरून
ढोबळी मिरची १ उभी चिरून
मक्याचे दाणे पाव वाटी
मटार चे दाणे पाव वाटी
टॉमेटॉ सॉस
बटर २ चहाचे चमचे
मैदा २ चहाचे चमचे
दूध साधारण अर्धा कप
मिरि ची पूड १ छोटा चमचा
मीठ चवीनुसार

गार्लिक ब्रेड साठी :
ब्रेड
लसणीच्या पाकळ्या ४
चीझ किसून

कॄती :
एका भान्ड्यामधे पाणी उकळायला ठेवा.उकळी आली की त्यात मीठ आणि थोडस तेल घाला.त्यानन्तर पास्ता घाला. जर कणकेचा पास्ता असेल तर साधरण २० मिनिटात शिजेल.आणि मैद्याचा असला तर साधरण १० मिनिटात शिजेल.

पास्ता शिजेपर्यन्त दुसर्‍या एका भान्ड्या मधे थोड्या बटर वर सगळ्या भाज्या थोड्या परतून घ्या.ह्या भाज्या एका ताटलीमधे काढून घ्या.आता त्याच भान्ड्या मधे २ चहाचे चमचे बटर घाला.बटर तापल की त्यामधे मैदा घाला.मैदा शिजला की दूध घाला आणि हे मिश्रण हलवत रहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. हे मिश्रण घट्ट होईल. ह्या मिश्रणामधे सगळ्या भाज्या घाला आणि टॉमेटॉ सॉस घालून हलवा. ह्यामधे चवीनुसार मीठ आणि मिरि पूड घाला. सगळ्यात शेवटी शिजलेला पास्ता घालून मिश्रण एकत्र करून घ्या.पास्ता तय्यार !

गार्लिक ब्रेड साठी लसणीच्या पाकळ्या किसून त्या चीझ मधे घाला.हवे असल्यास तिखट आणि मीठ घाला.ब्रेड स्लाईस ला बटर लावून भाजून घ्या. त्यावर तयार केलेल चीझ च मिश्रण पसरा. आणि बेड स्लाईस तव्यावर बेड स्लाईस पेक्षा छोट्या आकाराचे झाकण ठेवून चीझ वितळे पर्यन्त भाजून घ्या.
गार्लिक ब्रेड तय्यार
:)

प्रतिक्रिया

अम्रुताविश्वेश's picture

26 Apr 2010 - 2:27 am | अम्रुताविश्वेश

परत फोटो बघा ना लहानच आहे
.कसा मोठा करू?

:(

Nile's picture

26 Apr 2010 - 3:13 am | Nile

टेस्ट!

अम्रुताविश्वेश's picture

26 Apr 2010 - 3:19 am | अम्रुताविश्वेश

धन्यवाद. :)

रेवती's picture

26 Apr 2010 - 6:25 am | रेवती

हे असं सगळं जर समोर आणून दिलं तर छानच वाटेल. आम्हीही काल पास्ताच खाल्ला. गार्लिक ब्रेड मस्त लागतो पण क्यॅलरीजचा विचार करायचा म्हटलं तर गार्लिक ब्रेडचा विचार करता येत नाही. तरी फोटो छान!
रेवती

अम्रुताविश्वेश's picture

26 Apr 2010 - 8:16 am | अम्रुताविश्वेश

हो ना, अगदी खरा आहे. पण घरचा गार्लिक ब्रेड बाहेर च्या पेक्षा कितीतरी पटी नी कमी क्यालरीज वाला असल्यामुळे जास्तच खाल्ला गेला.

;)

विसोबा खेचर's picture

26 Apr 2010 - 8:26 am | विसोबा खेचर

मस्त फोटो.. :)

अम्रुताविश्वेश's picture

26 Apr 2010 - 8:34 am | अम्रुताविश्वेश

थ्यान्कू तात्या
8> >:D< O:)

मला वाटत होते कि ब्रेड तयार करताना त्या कणकेत लसणाची पेस्ट वापरत असावेत. :D
वेताळ

अम्रुताविश्वेश's picture

27 Apr 2010 - 12:21 am | अम्रुताविश्वेश

तोही प्रयोग करून बघायला हरकत नाही. :D
कदाचित तस करतही असतील.

बेसनलाडू's picture

27 Apr 2010 - 4:18 am | बेसनलाडू

भूक लागली!
(खवय्या)बेसनलाडू
पदव्युत्तर शिक्षणाच्या दिवसात बाजारात मिळणारे गार्लिक स्प्रेड ब्रेडच्या स्लाइसला लावून गार्लिक ब्रेड बनवून खायचो, त्याची आठवण झाली.
(स्मरणशील)बेसनलाडू

इंटरनेटस्नेही's picture

28 Apr 2010 - 4:46 am | इंटरनेटस्नेही

असेच म्हणतो..!

(पदवीच्या दिवसांत स्वतः स्वतःकरिता जेवण बनवणारा) इंटरनेटप्रेमी..

अरुंधती's picture

29 Apr 2010 - 7:23 pm | अरुंधती

गार्लिक ब्रेड आणि पास्ता पाहून तोंडाला पाणी सुटले!
गार्लिक ब्रेडमध्ये मला लसणाचा खूप दर्प सहन होत नाही म्हणून केलेला एक बदल : ज्या पॅनमध्ये आपण गार्लिक ब्रेड गरम करणार असतो त्याच्या तळाला थोडा ठेचलेला लसूण लावायचा. मग त्यावर बटर, बटरवर चीझ लावलेला ब्रेड....... यम्म्म्म्म्म्मी!!!! :D

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/