धुम्रपान कसे सोडावे

अंगद's picture
अंगद in काथ्याकूट
26 Apr 2010 - 1:16 am
गाभा: 

नमस्कार मित्रांनो,

मी धुम्रपान करतो. क्रॉनिक कॅटॅगरीत मोडणारा स्मोकर आहे मी. मागच्या काही दिवसात धुम्रपान सोडण्याची इच्छा बळावली आहे. (गरज झाली आहे)
मी धुम्रपान खुप कमी करु शकतो, अगदी दिवसाकाठी एक इथपर्यंतही कमी करु शकतो पण पुर्णपणे सोडु शकलेलो नाही.
मिपावरच्या गुणीजनांचे मार्गदर्शन, अनुभव यांवर चर्चा अपेक्षित आहे.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

26 Apr 2010 - 1:25 am | धमाल मुलगा

मी स्वतः २५५ वेळा सोडलीये सिगारेट :D

जोक्स अपार्ट, असं म्हणतात, की मनाचा निग्रह असेल तर धुम्रपान सहज सोडता येते. (मला कल्पना नाही. मी फारतर फार ५-६ दिवस प्रयत्न करु शकतो, तेही बायकोनं शंख केल्यावर..पुन्हा पहिले पाढे पंचावन्न :D )
फक्त एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, जर आधी धुम्रपान खुप मोठ्या प्रमाणावर होत असेल तर 'निकोटिन विड्रॉवल'ची काळजी घेणे गरजेचे.

अवांतर:
एकदा एकजण धुम्रपान सोडण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्यायचे ठरवतो. रोजच्या सिटिंग्जमध्ये, संमोहनातुन खुप फरक पडतो आहे असं मित्रांना सांगतो.
काही दिवसांनंतर मित्र भेटल्यावर विचारतात, " काय रे, तुझा तो कोर्स संपला का?"
फुक्या म्हणतो, "हो, संपला की!"
मित्रः "काय मग? रिझल्ट काय?"
फुक्या: "डॉक्टर दिवसाला २० सिगारेट्स ओढायला लागलाय" =)) =))

विसोबा खेचर's picture

26 Apr 2010 - 1:58 am | विसोबा खेचर

येथील सर्व अनावश्यक प्रतिसाद काढून टाकले आहेत..

तात्या.

सुचेल तसं's picture

26 Apr 2010 - 2:27 am | सुचेल तसं

ओशो धुम्रपान सोडण्यासाठी खालील उपाय सांगत:

जेव्हा तुम्ही सिगरेटचं पाकीट खिशातून काढाल तेव्हा अगदी आरामात काढा. पाकीटातून अगदी सावकाश सिगरेट काढा. लगेच न पेटवता, पाकीटावर हलकेपणाने मारत रहा (टॅप).. ह्या गोष्टी नेहेमीसारख्या यांत्रिकपणानी न करता पूर्ण जाणिवेने करा. नंतर त्या सिगरेटचा सुंदर वास घ्या - चहाच्या दरवळणार्‍या सुगंधाप्रमाणेच. सिगरेट ओढायच्या तुमच्या सलग कृतीला अशा छोट्या छोट्या भागात वाटून करा. प्रत्येक कृती पूर्ण सजगतेने करा.

आता सिगरेट शिलगवा, एक एक पफ तुमच्या फुप्फुसांपर्यंत जाऊ द्या.. प्राणायाम करताना जसा श्वास आत घेतो तसा. अगदी आरामात धूर सोडा. जर हे तुम्ही केलं तर तुम्हाला सिगरेट पिण्यातला मूर्खपणा जाणवेल आणि सिगरेटची सवय आपोआप सुटेल.

(हे किती परिणामकारक आहे मला माहीत नाही पण ओशोंनी हा उपाय सुचवला होता)

Nile's picture

26 Apr 2010 - 3:05 am | Nile

ह्यावरुन सुचलं. एका सिगरेटचा एका पेक्षा जास्त झुरका न घेता विझवा, पुढच्या झुरक्याला नवी सिगरेट. पुन्हा पुन्हा सिगरेट शिलवायचा कंटाळा आल्याने (आणि झालेल्या प्रचंड खर्चाने?) लवकरच सुटेल.

बहुगुणी's picture

26 Apr 2010 - 3:53 am | बहुगुणी

१. शक्यतो सिगारेट्स जवळ ठेवू नका. Making them inaccessible is a single most effective reason for you wanting to not bother to take extra steps. धूम्रपानाची तल्लफ येईल तेंव्हा प्राणायाम करा.

2. धूम्रपान सोडतांना 'आज'चाच विचार करा. आज झोपेपर्यंत हातात सिगारेट घ्यायची नाही इतकाच मर्यादित 'पण' करा. उद्याची बात उद्या, आज जमलं तर उद्याही जमेल.

३. धूम्रपानाचे तोटे काय आहेत हे इथे सांगायची गरज नसावी, कारण तुम्ही स्वतः होऊन हा निर्णय घेता आहात, तरीही पुनर्जाणीवेसाठी हे repetition: In the long term, smoking means 3Ds: Disease, Destruction and Death. सिगारेट सोडतांना तुम्ही दोघांचा विचार करता आहात हे कायम लक्षात ठेवा; एक स्वत:चा आणि दुसरा तुम्हाला आयुष्यात प्रिय असलेल्या निदान एका तरी इतर व्यक्तिचा. Passive smoking is as disastrous as active smoking. तेंव्हा तुमच्या धूम्रपान सोडण्याने निदान दोन जण आनंदी होतील हे कायम लक्षात असू द्या.

४. काही तणावपूर्ण परिस्थिती धूम्रपान करण्याची तल्लफ वाढवू शकतील याची जाणीव असू द्या. उदाहरणार्थ, कुठे तरी जाण्याच्या घाईगर्दीत असतांना टायर पंक्चर होणे, वाहन न मिळणे, किंवा घरातील/नात्यातील प्रिय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका वगैरे सारख्या परिस्थितीत तातडीच्या वैद्यकीय मदतीची भासणे, इत्यादि वेळा तणाव कमी व्हावा म्हणून 'पांढर्‍या कांडी'ची मदत घेतली जाते, अशा वेळी हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की तणावपूर्ण परिस्थितीत निर्णय घेण्याची तुमची क्षमता कमी होते, वाढत नाही, आणि धूम्रपानामुळे मूळात manageable असणारी परिस्थिती आधिक हाताबाहेर जाऊ शकते, तेंव्हा सिगारेट तुमची सहायक नाही, विरोधक आहे हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवणे चांगले.

५. तुम्ही सिगारेट का सोडू पहाता आहात त्याची तुमची अशी काही विवक्षित कारणं नक्कीच असतील, त्यांची यादी एका छोट्या कागदावर लिहून पाकिटात किंवा सिगारेटच्या पाकिटात ठेवा. जेंव्हा तल्लफ येईल तेंव्हा आधी ती यादी पहा. That should be a helpful deterrent.

६. धूम्रपान सोडतांना पहिले ३-४ दिवस भरपूर फळांचा रस प्या, त्यामुळे निकोटिन शरीरातून वाहून जायला मदत होते.

७. धूम्रपान सोडतांना पहिले काही महिने कदाचित तुमचं वजन वाढू शकेल. याचा सामना करण्यासाठी आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. (गाजराचे तुकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत जवळ ठेवलेत तर सिगारेट ओढावीशी वाटेल तेंव्हा हे तुकडे खावेत, तल्लफ कमी होते.) वजन प्रमाणात ठेवण्याचा दुसरा मार्ग अर्थातच रोज जमेल तसा किमान व्यायाम करणे.

८. तुम्ही धुम्रपानावर खर्च केली असती ती रक्कम रोज बाजूला काढून ठेवा, महिन्याच्या शेवटी तुम्हाला आवडेल त्या constructive गोष्टीसाठी (पुस्तके, ट्रेकिंगचे बूट, खेळाची साधने इ.) खरेदी करा, अथवा वर्षभर असे पैसे बाजूला ठेवू शकलात तर कुटुंबियांबरोबर एखादी सहलही करू शकाल.

९. धूम्रपानाची तल्लफ आली तर जिथे धूम्रपान वर्ज्य आहे अशा ठिकाणी जा. लायब्ररी, थिएटर, (बॉसचं ऑफिस!) ही अशी काही ठिकाणे.

१०. जवळच्या (धूम्रपान न करणार्‍या!) काही मित्रांना आणि नातेवाईकांना तुमच्या धूम्रपान सोडण्याच्या निश्चयाविषयी सांगा, आणि तुमच्या यशाचा (आणि क्वचित होणार्‍या अपयशाचाही) त्यांना नियमित पाठपुरावा करू द्या. Nothing succeeds like success in a company.

तुम्हाला धुम्रपान सोडण्यासाठी मनापासून शुभेच्छा!

इंटरनेटस्नेही's picture

28 Apr 2010 - 3:55 am | इंटरनेटस्नेही

अतिशय अभ्यासपूर्ण.
--
इंटरनेटप्रेमी.

राजेश घासकडवी's picture

26 Apr 2010 - 6:12 am | राजेश घासकडवी

दिवसाकाठी एक जर ओढू शकत असाल तर संपूर्ण बंद करण्याची काय गरज? आत्तापर्यंत कुठल्याही संशोधनात दिवसाला एक सिगरेटने अपाय झाल्याचं सिद्ध झालेलं नाही. जे संशोधन आहे ते बहुतांशी दिवसाला वीस ते चाळीस ओढणाऱ्यांच्या बाबतीत. एक वा दोन ओढल्यात तर आनंद मिळेल व धोका जवळपास नाही. शून्याचा, परफेक्शनचा आग्रह का आहे?

राजेश

विसोबा खेचर's picture

26 Apr 2010 - 8:41 am | विसोबा खेचर

सहमत..

एक किंवा फार फार तर दोन.. त्याने आनंदही मिळेल आणि धोकाही नाही..

आणि तसंही सिगरेट तर सोडाच, परंतु सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसलेल्या लोकांना कॅन्सर झाल्याची कितीतरी उदाहरणं आहेत..

२४ तासात एखाद् दोन सिगरेटी बिनधास्त ओढा.. काही प्रॉब्लेम नाही..

तात्या.

चेतन's picture

28 Apr 2010 - 10:50 am | चेतन

>>एक किंवा फार फार तर दोन.. त्याने आनंदही मिळेल आणि धोकाही नाही..

नक्की कशाबद्द्ल म्हणताय.. ;)

अवांतरः एक किंवा दोन एक जुनी जाहिरात आठवली
अतिअवांतरः माझा जुना रूममेट म्हणजे धम्याचिच कॉपी होती सिगरेट बाबतित

धमाल मुलगा's picture

28 Apr 2010 - 3:14 pm | धमाल मुलगा

>>अवांतरः एक किंवा दोन एक जुनी जाहिरात आठवली
=)) =))
बरणीत टोमॅटो :D

>>अतिअवांतरः माझा जुना रूममेट म्हणजे धम्याचिच कॉपी होती सिगरेट बाबतित
करा...करा च्यायला आमची बदनामी ;)

नॉर्वे मधील संशोधनाचा हा शास्त्रीय दुवा पहा. यानुसार असं आढळलं की Smoking even one cigarette a day trebles the risk of heart disease or lung cancer - and the effect is greater in women.

तसंच २००९ सालच्या या Hypertension Research या शास्त्रीय नियतकालिकातील या लेखाचाही उल्लेख करायला हवा. या लेखावर आधारित ScienceDaily.com वरील या लेखात smoking one cigarette increases the stiffness of the arteries in 18 to 30 year olds by a whopping 25 per cent असा उल्लेख आहे.

आणि केवळ सिगारेट एकच आहे हा पुरेसा data नाही असं वाटतं, त्यात निकोटिन content किती आहे, धूम्रपान करतांना किती धूर inhale केला जातो, वगैरे अनेक बाबी विचारात घेतल्या पाहिजेत.

अंगद यांच्या बाबतीत व्यक्तिशः महत्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःच "धुम्रपान सोडण्याची इच्छा बळावली आहे. (गरज झाली आहे)" असं म्हंटलं आहे. यावरून [कदाचित काहीतरी त्रासदायक शारिरीक (किंवा सामाजिक) कारण असावं, ज्यानुसार] chronic smoker असूनही त्यांना धुम्रपान सोडायची मनापासून इच्छा आहे असं दिसतं. कारण काहीही असो, पण धूम्रपान सोडायचं म्हणून त्यांनी मदत मागितली आहे. अशा परिस्थितीत 'एक सिगारेट हरकत नाही' असं सुचवून त्यांचा अवसानघात होऊ नाही असं वाटतं.

विसोबा खेचर's picture

26 Apr 2010 - 8:43 am | विसोबा खेचर

कारण काहीही असो, पण धूम्रपान सोडायचं म्हणून त्यांनी मदत मागितली आहे. अशा परिस्थितीत 'एक सिगारेट हरकत नाही' असं सुचवून त्यांचा अवसानघात होऊ नाही असं वाटतं.

हम्म! हाही मुद्दा खराच!

तात्या.

अप्पा जोगळेकर's picture

26 Apr 2010 - 1:16 pm | अप्पा जोगळेकर

सिगरेट हा एक नितांतसुंदर प्रकार आहे. मी फक्त शनिवारी आणि रविवारी सिगरेट पितो. त्यामुळे गंमत टिकून राहते. रोज प्यायलो तर मात्र नक्कीच कंटाळा येईल. श्रीखंडपुरी जरी झाली तरी ती आपण रोज कुठे खातो ?

राजेश घासकडवी's picture

26 Apr 2010 - 2:21 pm | राजेश घासकडवी

नॉर्वेच्या पेपराचा डेटा बघितला मी. त्याच्यात जे लिहिलं आहे आणि त्यावरून जो निष्कर्ष तुम्ही काढला आहे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
- कार्यकारण सिद्ध झालं नसून कोरिलेशन सापडलं आहे... आता लोक तेच ते म्हणतील, पण तेच ते नसतं. पलंगावर झोपणे व मृत्यू यांमध्येही तसंच कोरिलेशन आहे.
- त्यातही त्यांनी फक्त मूठभर (मूळ पॉप्युलेशनच्या सुमारे २०%) मेलेल्या माणसांचा अभ्यास केलेला आहे. सर्व माणसांचा अभ्यास केलेला नाही. बहुतांश माणसं सिगरेट ओढो वा न ओढो, शेवटी म्हातारपणाने मरतात...
- लाखात ८ लंग कॅन्सरचे मृत्यू (० सिगरेट्स) विरुद्ध लाखात २४ मृत्यू (१ ते ४ सिगरेट्स) याला 'रिस्क तिप्पट' म्हणा हवं तर. पण त्याला नक्की अर्थ काय? उद्या रस्ता क्रॉस करताना एकदा उजवीडावीकडे बघण्याऐवजी दहावेळा बघितल्याने अपघाताची रिस्क एक षष्ठांश होते असंही सिद्ध होऊ शकेल....

मी त्यांना फक्त प्रश्न विचारला की असं काय कारण आहे, ज्यासाठी एक सिगरेट ओढता येत असूनही ती शून्यावर आणायची आहे. मी कोणाला कशापासून परावृत्त करत नाही. पण जर कोणी म्हणालं मी रोज एक चमचा साखर खातो. ती मला सोडून शून्यावर आणायची आहे तर मदत करा. तर तुम्ही विचारालच ना, का रे बुवा शून्य? खूप साखर वाईट, पण दिवसात एक चमचा काही वाईट नाही... तेवढीच गोडी राहाते आयुष्यात.

राजेश

अप्पा जोगळेकर's picture

26 Apr 2010 - 2:36 pm | अप्पा जोगळेकर

राजेश घासकडवी,

एकदम जब्राट उत्तर दिलंत.

मी त्यांना फक्त प्रश्न विचारला की असं काय कारण आहे, ज्यासाठी एक सिगरेट ओढता येत असूनही ती शून्यावर आणायची आहे. मी कोणाला कशापासून परावृत्त करत नाही. पण जर कोणी म्हणालं मी रोज एक चमचा साखर खातो. ती मला सोडून शून्यावर आणायची आहे तर मदत करा. तर तुम्ही विचारालच ना, का रे बुवा शून्य? खूप साखर वाईट, पण दिवसात एक चमचा काही वाईट नाही... तेवढीच गोडी राहाते आयुष्यात.

- + १००

तसं पाहिलं तर वडा - पाव तरी कुठे खूप चांगलं अन्न आहे. तरीसुद्धा आपण खातोच की कधीतरी.

आंबोळी's picture

26 Apr 2010 - 10:06 am | आंबोळी

अंगद,
सगळ्यात पहिल्यांदा... मी माझी १५-१६ वर्षाची धुम्रपानाची सवय गेल्या जुलै महिन्यात सोडली. त्यासाठी काहीही विशेष केले नाही. फक्त आज पासून सिगरेट ओढायची नाही असे ठरवले. सुरवातीला ४-५ दिवस खुप काम झाले, वैताग आला की ओढावी असे वाटायचे पण नाही ओढली. नन्तर ३-४ महिने दारू पिताना ओढावी असे खुप वाटायचे. त्यात समोरचा ओढत असला तर फारच ओढाविशी वाटते. पण ते ही टाळले. अता तसे काहिच वाटत नाही.
या अगोदर २ वर्षा पूर्वी एकदा २ महिन्यासाठी सोडली होती... पण माज म्हणून परत सुरू केली.
अ‍ॅलन कार नामक लेखकाचे एक छोटेसे पुस्तक आहे (how to quit smoking ) . ते वाचा . सिगरेट सोडायला ते खुप उपयोगी पडेल. पिडिएफ स्वरूपात नेट वर मिळेल. नाही तर तुमचा इमेल व्यनी करा मी पाठवीन.
सिग्रेट सोडण्या बद्दल शुभेच्छा!

( ™ )आंबोळी

डावखुरा's picture

26 Apr 2010 - 12:54 pm | डावखुरा

मला पाठ्वा प्लीज...

(अ‍ॅलन कार नामक लेखकाचे एक छोटेसे पुस्तक आहे (how to quit smoking ) . ते वाचा . सिगरेट सोडायला ते खुप उपयोगी पडेल. पिडिएफ स्वरूपात नेट वर मिळेल. नाही तर तुमचा इमेल व्यनी करा मी पाठवीन.)

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

चंबा मुतनाळ's picture

26 Apr 2010 - 8:03 pm | चंबा मुतनाळ

अंबोळीशी सहमत आहे.
सिगारेट सोडायला अगदी नैमित्तीक कारण लागते.
मी देखील २५ वर्षे धुम्रपान करत होतो. केवळ मित्राबरोबर दारू पिताना झालेल्या एका भांडणामुळे सिगारेट सोडायचा निर्णय घेतला. परंतू मी त्यावेळेस तंबाखू पण खायचो . त्यामुळे सिगारेट सोडली तरी माझा निकोटीन इनटेक मेनटेन केला होता. तीन वर्षांपूर्वी तंबाखू खाणेपण सोडले. कारण गम्मतशीर होते. विमानप्रवासात मी माझा तंबाकूचा बार टॉयलेटमधे भरायचो (कारण सहप्रवाशाना नाहीतर शिंका यायच्या!!) , त्यासाठी मी नेहमी आईल सीट घ्यायचो. अशाच एका प्रवासात मला चुकून खिडकीजवळचे स्थान मिळाले. आणी रात्रीची वेळ असल्यामुळे बाजूचे दोन प्रवासी गाढ झोपले होते. ज्याम उठायला तयार नव्हते. तेव्हा वैतागून मी तंबाखू पण सोडायचा निर्णय घेतला.
आणी मला परत सिगारेट्/तंबाखू खायची ईछ्छा झालेली नाही. मद्यपानात मात्र काटकसर करायची गरज वाटलेली नाही अद्याप.

चंबा

आनंदयात्री's picture

26 Apr 2010 - 10:17 am | आनंदयात्री

वाहवा .. उत्तमोत्तम प्रतिसाद.
बहुगुणींचे प्रतिसाद फारच मार्गदर्शक !!

माझ्या वडिलांना अतोनात फायदा झाला. ते एकेकाळचे चेन स्मोकर होते. गेली ३० वर्षं ते सिगारेट पासून दूर आहेत. आता तर धुराचा वास सुद्धा सहन होत नाही. बहुगुणींच्या प्रतिसादामधील दुसरा उपाय हा त्यांना संस्थेनेच सांगितला होता. त्या संस्थेत व्यसनातून मुक्त झालेले लोक त्यांचे अनुभव सांगतात. त्याचाही फायदा होतो.

धुम्रपान सोडण्याचा निर्णय घेतलात या बद्दल अभिनंदन. काही टिप्स ज्या माझ्या वडिलांकडून मी ऐकल्या:
१. "एका सिगरेटमुळे काय होतं", "आजच्या दिवस ओढ, उद्याचं उद्या" अश्या विचारांपासुन (ते कितीही "शास्त्रीय" आहेत, हे पटवण्याचा प्रयत्न केला गेला तरी) रहाता आलंतर दूर रहा. अशी लोकं तुमचा विश्वास डळमळीत करतील.
२. मनोनिग्रह जबरदस्त हवा.
३. जो पर्यंत निश्चय पक्का होत नाही तो पर्यंत व्यसनी मित्र पण टाळा.
४. व्यसन हे नेहमी वाढ्तं जातं. एका सिगरेट ने समाधान होत नाहीसं झालं कि २ सिगारेटी लागतात. त्याचा नंतर आर्थिक ताण येतो.

व्यसन सोड्ण्याचे मानसिक फायदे पण वडिलांनी बरेच अनुभवले आहेत. एक नवीन आत्मविश्वास येतो. व्यसन सोडणं ही खूप मोठं यश आहे. एक पॉझीटीव्ह माईंडसेट तयार होतो. आज हे सांगताना माझ्या वडिलांबद्दल मला खुप अभिमान वाटतो. हे मोठं उदाहरण माझ्या समोर असल्यामुळे मला पण या सवयींची कधी गरज वाटली नाही. आणि आता या पुढे कधी लागेल असही वाटत नाही. म्हणला तर हाही एक मोठा फायदा आहे.

व्यसनाचे शारिरिक मानसिक आणि कुटंबावर होणारे परिणाम मी खूप जवळून बघितलं आहेत अनुभवले आहेत. त्यामुळे राजेश घासकडवीं सारख्या लोकांना कळकळीची विनंती कि जर एखादा जण चांगला निर्धार करत असेल आणि तुम्हाला मदत करता येत नसेल तर उगाच काहितरी "शास्त्रीय" दाखले देवून त्याचा विश्वासतरी डळमळीत करू नका.

Pain's picture

26 Apr 2010 - 10:21 am | Pain

माझा मित्रपण आत्ता सोडायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे त्याला constipation चा त्रास होतोय. असेही होउ शकते, त्याची तयारी ठेवा / औषधे घ्या.

युयुत्सु's picture

26 Apr 2010 - 10:34 am | युयुत्सु

मला एक वेगळा मार्ग सुचवावासा वाततो. निश्चय करणे आणि तो ठाम पणे पार पाडणे हे जरा यातनादायक असते.

Visualization चे तंत्र मला आयुष्यात बर्‍याचवेळा उपयोगी पडले आहे. एखादी गोष्ट मनात आपण जेवढी intensely अनुभवू शकतो तेवढी ती वास्तवात येण्याची शक्यता जास्त असते. त्या दिशेने करावे लागणारे प्रयत्न जास्त सहज पणे होतात. तुम्ही धूम्रपानरहित आयुष्याची जेवढी intensely कल्पना करु शकाल तेवढी ते सोड्ण्याची तुमची इच्छा बळावत जाईल आणि ते सुटेल.ÿ

मी स्वतः धूम्रपान करत नाही. त्यामुळे ते सोडण्याचा अनुभव माझ्याकडे नाही :).

आपल्या संकल्पास मनापासून शुभेच्छा!

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

ओढत होतो.पण किक बसते तसे काही होईना म्हणुन सिगारेट फुक्याना त्याबद्दल विचारले. त्यांनी मला सिगारेट ओढुन त्याचा धुर पोटात घे म्हणुन सांगितले.त्या किक नंतर मी कधीही सिगारेट ओढली नाही :D

वेताळ

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Apr 2010 - 11:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बहुगुणी, एक यांचे प्रतिसाद आवडले.

राजेश, तुमच्या प्रतिसादातला एक पॉइंट, अंगदना सिगरेट सोडायची असेल तर एखाद सिगरेटीने काही त्रास होत नाही हा विचार मला चुकीचा वाटतो.
दुसरं, कोणत्याही गोष्टीवर खूपच अवलंबून रहाणं वाईटच नाही का? अगदी सिगरेट असो वा इंटरनेट!! (अर्थात इंटरनेटचा वापर खूप चांगल्या गोष्टींसाठी होतो हे माहित आहे तरीही!!)

धम्या, तुझ्याकडून अगदी अपेक्षित प्रतिसाद आला आहेच... पण २५५ हा आकडा फारच फुगवून सांगितला आहेस! :P

अदिती

राजेश घासकडवी's picture

26 Apr 2010 - 2:34 pm | राजेश घासकडवी

>अंगदना सिगरेट सोडायची असेल तर...

मी प्रश्न विचारला की नक्की का सोडायची आहे. ती चुकीच्या कारणासाठी सोडली तर आनंदाला मुकण्याचं नुकसान होतं. त्याहीपलिकडे स्वत:पुढे आपण काय करतोय व का करतोय, त्याचे फायदेतोटे काय याचं स्पष्ट चित्र असणं आवश्यक आहे. जर माझ्या माहितीमुळे त्यांनी विचार बदलला तर त्यांना 'चांगल्या गोष्टीपासून परावृत्त केलं' म्हणून मी दोषी ठरेन का?

>खूपच अवलंबून रहाणं वाईटच नाही का?

'खूपच' शब्दामध्ये मेख आहे. म्हणूनच मी एकच वर भर दिला होता.

धम्याचं उत्तर खरं तर १०००००००० - १ असं आहे...जगात १० प्रकारचे

मिसळभोक्ता's picture

26 Apr 2010 - 10:39 pm | मिसळभोक्ता

धम्या, तुझ्याकडून अगदी अपेक्षित प्रतिसाद आला आहेच... पण २५५ हा आकडा फारच फुगवून सांगितला आहेस!

धम्याचा काउंटर फक्त १ बाईट चा आहे.

असो, पण मूळ विषयाविषयी:

समजा तुम्ही दिवसाला १/२ अशी मर्यादा पाळू शकत असाल, तर दिवसाला शून्य ही मर्यादा पाळणे फारसे अवघड नाही.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

इनोबा म्हणे's picture

26 Apr 2010 - 12:21 pm | इनोबा म्हणे

मी सुद्धा भरपुर वेळा सिगरेट सोडण्याचा निश्चय केला होता. आता निश्चय करनेच सोडुन दिलेय.असो.
जर तुम्हाला खरेच सिगरेट सोडता आली. तर तुमचा अनुभव इथे नक्की लिहा. शुभेच्छा!

मराठमोळा's picture

26 Apr 2010 - 12:44 pm | मराठमोळा

हमममम... न संपणारा प्रश्न...
सिगारेट असो वा दारु किंवा ईतर काही एकदा सवय लागली की लवकर सुटत नाही हे खरे आहे.
त्यातल्या त्यात सिगारेट म्हणजे स्वस्त, कुठेही ओढु शकता, वेळ काळ काही लागत नाही, कुणा पार्टनर ची गरज नाही म्हणुन सुटणं जास्त अवघड.
असो, जे लोक जास्त एकटेपणात असतात, मन फार चंचल असते किंवा मनावर ताबा नसतो ते लोक लवकर या गोष्टींच्या अधीन होतात असे माझे वैयक्तीक मत.
घरच्या सदस्यांबरोबर असताना एक एक आटवडा सुद्धा मला सिगारेट ओढावीशी वाटत नाही, अगदी एकट्यासाठी मोकळा वेळ मिळाला तरी, दुसरी गोष्ट म्हणजे माझे छंद, जसे गाणे ऐकणे, खेळणे हे करताना सुद्धा मला कधी सिगारेट ओढावीशी वाटत नाही.
कोणत्याही गोष्टीची मजा घेणे ठीक आहे पण तिचे अ‍ॅडिक्शन व्हायला नको याची काळजी घेणे महत्वाचे आहे असे मला वाटते.
मग सिगारेट काय कोणतीही सवय तुम्ही कधीही सोडु शकता..
माझे कित्येक मित्र आहेत के जे महिन्या दोन महिन्यात एकदा ड्रिंक घेतात आणी तेव्हाच सिगारेट ओढतात.. मला अश्या लोकांचे फार कौतुक वाटते.. आणी मग ते काही चुक करतात असेही वाटत नाही :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Apr 2010 - 12:47 pm | llपुण्याचे पेशवेll

मी निश्चयाने १ १/२ वर्षे सिगारेट पूर्ण सोडली होती. छान वाटले होते तेव्हा.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

डावखुरा's picture

26 Apr 2010 - 12:56 pm | डावखुरा

आधीच भरपुर उपदेश आहेत...
मी फक्त शुभेछा देतो...

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

कानडाऊ योगेशु's picture

26 Apr 2010 - 1:05 pm | कानडाऊ योगेशु

कॉलेज हॉस्टेलवर असताना मलाही सिगारेट,दारु (फ्कत ह्या दोनच) ह्या गोष्टींची सवय काही परम मित्रांनी लावली होती.
सिगारेट कितीही पिली तरी कमीच वाटत असे.इव्हन ती पित नसतानाही सिगारेटचेच विचार डोक्यात घोळत असत.आणि सोडावे म्हटले तरी आजुबाजुला सगळेच फुकाडे.त्यामुळे सिगारेट सोडण्याचा निग्रह काही तासांपुरताच मर्यादित राहत असे.
पण नंतर मात्र सिगारेट पिणे सोडण्याबाबत अगदी हट्टालाच पेटलो.
आणि यशस्वीरित्या सोडली सुध्दा.
गेले ८ वर्ष मी सिगारेटपासुन दूर आहे.
सिगारेट सोडण्यासाठी मी खालील युक्ती वापरायचो.
जेव्हा सिगारेट पिण्याची तलफ येई तेव्हा मी हाताच्या दोन बोटात सिगरेट आहे असे समजायचो.तिचा खोटाखोटाच कश घ्यायचो आणि तोंडाने धूर सोडतोय असा विचार करुन तोंडातुन भरपुर हवा सोडायचो.
हा प्रकार मी फुकाड्या मित्र सोबत असतानाही करायचो.
कालांतराने जाणवले कि सिगरेटची मजा घ्यायला सिगरेटच प्यायला हवी असे काही नाही.
इव्हन आतासुध्दा अशीच क्लृप्ती वापरुन मी नसलेली सिगारेट हवी तेव्हा ह्व्या तितक्या वेळेला पिऊ शकतो.(chain mocker :D )
थ्री इडियट्स मध्ये आमीर खन म्हणतो त्याप्रमाणे मनाला उल्लु बनवता आले पाहीजे.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

मराठमोळा's picture

26 Apr 2010 - 1:13 pm | मराठमोळा

>>ह्या गोष्टींची सवय काही परम मित्रांनी लावली होती.
योगेश सेठ,
माझ्या मते इथे चुकता आहात..
आपण काय करायचे आणी काय नाही हा सर्वस्वी आपला निर्णय असतो असे मला वाटते.. कॉलेजमधे आम्च्या ग्रुप मधे २ जण असे होते की त्यांनी कधीही कुठल्याही गोष्टीला हात लावला नाही (आम्ही फोर्स केला तरी) आणी आजही ते आमच्या खास मित्रांच्या यादीत आहेत :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

कानडाऊ योगेशु's picture

26 Apr 2010 - 2:00 pm | कानडाऊ योगेशु

मराठमोळा,
तुमचे बरोबरच आहे.पण इतकेही शब्दशः घेऊ नका राव.
सिगरेटची सवय मित्रांनी लावल्यापेक्षा मित्रांमुळे लागली असे म्हणणे जास्त योग्य ठरले असते.
ते परम मित्र आजही माझे परम मित्र आहेत .
बर्याच जणांनी सिगारेट सोडण्याच प्रयत्न केला.एखाददुसार वगळता बाकींच्यांकडुन आजही आम्ही भेटतो तेव्हा सिगारेट सोडायचीय यार असे म्हणुन कश मारले जातात.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

छोटा डॉन's picture

26 Apr 2010 - 1:11 pm | छोटा डॉन

उत्तम चर्चा चालु आहे,तुर्तास मी नुसती वाचतो आहे.
सवडीने भर घालीनच ....

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

सांजसखी's picture

26 Apr 2010 - 6:23 pm | सांजसखी

अंगद, आपला विचार आणि सोबत करत असलेला प्रयत्न खरच खूप प्रशंसनीय आहे. आपण त्यावर येणा-या मतांचा विचार करताना तुमचा विवेक जागा ठेवावा एवढे मात्र अनाहूतपणे सुचवेन. कारण तुम्ही योग्य दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असताना चुकीचा रस्ता दाखवून तो चुकीचा कसा नाही याचे समर्थन करणे फारसे योग्य नाही.... त्या मुळे अशा मतांबाबत सावध....
निर्धार वैगेरे शब्द आपण वापरून वापरून बोथट केले आहेत... वस्तुत: एकदा ठरविले आणि करून दाखवले यासाठी प्रथम स्वतःच्या मनाशी सुसंवाद साधा. चांगले काय आणि वाईट काय ते सुस्पष्टपणे कागदावर मांडा.. तुम्ही नक्की योग्य निर्णय घेऊ शकाल..
'बहुगुणी' यांनी दिलेले उपाय नक्की मदत करतील... जसे...
१. सिगारेट न पिण्याबद्द्ल स्वतःला आवडिचे असे बक्षिस द्या.(पुढिल
सिगारेट वा दारू वगळून!!!!!!!)
२.जवळच्या (धूम्रपान न करणार्‍या!) काही मित्रांना आणि नातेवाईकांना तुमच्या धूम्रपान सोडण्याच्या निश्चयाविषयी सांगा, आणि तुमच्या यशाचा (आणि क्वचित होणार्‍या अपयशाचाही) त्यांना नियमित पाठपुरावा करू द्या. Nothing succeeds like success in a company.
३.दररोज सकाळी किमान १० वेळा सिगारेट न ओढण्याबद्द्ल स्वत:ला सांगा..
४.संगत याबाबत फार महत्त्वाची ठरते... जेव्हा अशा व्यक्ती टाळणे शक्य नसेल तर तुम्ही सिगारेट न पिण्याची नैतिक जवाबदारी त्यांच्यावरच टाका.... आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या कुचेष्टेला बळी पडू नका... एवढी तयारी ठेवा....
तुम्ही नक्की सिगारेट मुक्त होणार आहात...... हा आशावाद किंवा भविष्य नव्हे... कारण तुम्ही प्रयत्न सुरू केले आहेत आणि त्यांना यश नक्की आहे....
लवकरच मी असा सिगारेट मुक्त झालो आणि तुम्ही पण व्हा अशा लेखाची प्रतिक्षा राहिल....
आपली हितचिंतक... नैतिक / वैचारिक मदत देण्यास सदैव तयार....

अनिल हटेला's picture

26 Apr 2010 - 6:33 pm | अनिल हटेला

धम्रपान कसे सोडावे ?
हे जर माहीत असतं तर कित्ती बरं झालं असतं... ;)

असो....
धम्रपान का करु नये ? :-?

(सध्या मार्लबोरोप्रेमी) ;)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D

धमाल मुलगा's picture

26 Apr 2010 - 6:38 pm | धमाल मुलगा

अन्या गप रे.

च्यायला, हिते शिरेस चर्चा हुन र्‍हायलीय आन आपन दोघं कायबाय बोलतोय...
कुणाला सोडायची असली तर सोडु द्या की.

-(मार्लबोरो-लाईट्सप्रेमी ;) ) ध.

सुधीर काळे's picture

26 Apr 2010 - 6:46 pm | सुधीर काळे

अंगद-जी,
मी सिगरेट सोडून २० वर्षें झाली! या विषयावरचा माझा लेख एक 'मिपा'चे सहसभासद श्री. प्रमोद देव यांनी प्रकशित केलेल्या हिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाचा दुवा जरा शोधून पाठवीन. सध्या कांहीं दिवसांसाठी अमेरिकेत आलोय, त्यामुळे शोधायला जरा वेळ लागेल. किंवा देवसाहेबांनी हा प्रतिसाद पाहिल्यास तेही तो दुवा पाठवू शकतील.
या 'प्रथमपुरुषी-एकवचनी' लेखाचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल असे वाटते! विशेषतः तुम्हालाही माझ्या मुलीसारखी 'खंबीर' मुलगी असेल तर नक्कीच!!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
'न्यूक्लियर डिसेप्शन' या मी 'मिपा'वर लिहीत असलेल्या मालिकेचे प्रकाशन १७ एप्रिलपासून 'ई-सकाळ'मध्ये सुरू झाले. प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण १: http://tinyurl.com/24rlna9

चतुरंग's picture

26 Apr 2010 - 8:55 pm | चतुरंग

मी स्वतः आयुष्यात एकदाच सिग्रेट ओढली आहे. नववीत होतो बहुतेक. घरी कोणी नसताना बाबांच्या पाकिटातून कुतुहल म्हणून एक सिग्रेट पळवली आणि बाथरुम मध्ये जाऊन, पेटवून जोरदार झुरका मारला!! ठो ठो ठो नुस्ता खोकत सुटलो. दम कोंडला, जीव घाबरा झाला, डोळे लालबुंद झाले आणि पाण्याच्या धारा लागल्या!!! इतका त्रास होतो तर बाबा का ओढत असावेत सिग्रेट हे कोडे पडले?? आणि बसलेल्या दहशतीमुळे आजतागायत पुन्हा सिग्रेटीला हात लावलेला नाही. :SS
(माझ्या बाबांचे एक मित्र होते खलील म्हणून ते चेनस्मोकर होते पुढे लंग कॅन्सरने गेले. ते मला सांगायचे "आयुष्यात सिग्रेट कधीही ओढू नकोस! मी करु शकलो नाही आणि म्हणून तुला तळमळीने सांगतोय. आजवर मी सिग्रेटपायी जेवढा पैसा घातला त्यात एक अँबॅसिडर बाळगू शकलो असतो!")

चतुरंग

पक्या's picture

26 Apr 2010 - 10:20 pm | पक्या

सिगारेट ओढण्याचा अजून एक तोटा म्हणजे पुरषाच्या शरीरातील शुक्राणूंची संख्या कमी होते असे वाचले आहे. त्यामुळे विवाहीत आणि लग्नाळू पुरषांनी सावधान . त्यातूनही ज्यांना कुटुंब विस्तार करायचा आहे त्यांनी काळजी घेतलेली (धूम्रपान बंद करणे) हितावह.

-जय महाराष्ट्र , जय मराठी !

अविनाशकुलकर्णी's picture

26 Apr 2010 - 10:59 pm | अविनाशकुलकर्णी

हम पिते है तब पिते है

.................................................................................
हे करुन बघा............

नेत्रेश's picture

26 Apr 2010 - 11:22 pm | नेत्रेश

तुम्हाला "press here" म्हणायचे आहे क?

अविनाशकुलकर्णी's picture

27 Apr 2010 - 12:06 am | अविनाशकुलकर्णी

हो सिगरेट्चा चटका तिथे द्यायचा =)) =)) =))

रेवती's picture

27 Apr 2010 - 6:14 am | रेवती

अंगदसाहेब, होमिओपॅथीमध्ये काही औषधे आहेत असे वाचून मी माझ्या सासर्‍यांवर ट्रायल्स घेतल्या होत्या.......केवळ उत्सुकतेपोटी आणि घरीच हक्काचा मेंबर मिळाल्यामुळे!;) अमके तमके औषध कपभर पाण्यात विरघळवून दर १० मिनिटांनी दोन चमचे घ्यावे वगैरे...... चारपाच दिवसांनी मीच दमले दर १० मिनिटांनी पळापळी करून. त्यांना काहीही फरक पडला नाही. अर्थात अजून प्रयत्न करायला हवे होते असे आता वाटते. मग मध्यंतरी त्यांनी स्वत:च ठरवून धूम्रपान पूर्णपणे बंद केले. त्यामुळे त्यांची लहानसान आजारपणे अक्षरश: पळून गेली. दोनेक वर्षांनी,"आता आपण ठणठणीत बरे झालो आहोत" असा समज करून घेत त्यांनी पुन्हा धूम्रपान सुरू केले.

रेवती

धमाल मुलगा's picture

28 Apr 2010 - 3:19 pm | धमाल मुलगा

मीही अशा होमिओपॅथीमधल्या कोणत्याशी गोळ्या घ्यायचो..२ आठवडे कसेबसे! त्या गोळ्यांनी म्हणे सिगारेट ओढली की उलटी येते आणि माणसाला नॉशिया येऊन सिगारेट बंद होते. सुरुवातीला बहुतेक औषधाचा परिणाम (की प्लासिबो इफेक्ट?) एक-दोनदा जाणवला..सिगारेट ओढली की मळमळायचं! जरा आठवडाभर कंट्रोलमध्ये राहिलो. सिगारेट ओढावी असं वाटलं की पटकन २ गोळ्या तोंडात टाकायचो...

एक आठवड्यानंतर, ४ गोळ्या दाढेशी ठेऊन सिगारेट ओढली तरी काहीही होईनासं झालं.
होमेपदीच्या डाकटरला चार शिव्या घातल्या अन विषय संपला.

(च्यायला: व्यसनमुक्ती केंद्रात सुरुवातीला जसं एकेकजण आपापले अनुभव सांगतो तसं वाटायला लागलंय राव :( )

अंगद's picture

27 Apr 2010 - 10:56 pm | अंगद

वा मिपाकरहो .. काय बोलु !!
तुमच्या प्रोत्साहनानेच अर्धी लढाई जिंकल्यासारखे वाटते आहे.

प्रति राजेश घासकडवी:

सिगारेट सोडण्याची इच्च्छा अत्यंत तीव्र आहे. याची कारणे खालीलप्रमाणे:
१. फुफ्फुस आणी श्वसनसंस्थेसंबधीत विकार होण्याची दाट शक्यता. ब्राँकायटीस हा विकार प्रार्थमिक श्रेणीत आहे.
२. व्यसनमुक्त होण्याची आंतरिक इच्च्छा.
३. हे व्यसन सुरु ठेवण्यासाठी कराव्या लागण्यार्‍या तडजोडी (जसे खोटे बोलावे लागणे ही तत्वाची तडजोड)
४. अक्युट इमोशनल सिचुएशन्स मधे जाणवणारी सिगारेटवरची डिपेंडंसी.
५. हितचिंतकांच्या तसेच व्यक्तिगत आयुष्यातल्या इतर स्टेकहोल्डरच्या रास्त अपेक्षा.
६. आपले आयुष्य आपण ज्या पद्धतीने जगतो त्याचा अत्यंत सुक्ष्म चांगला/ वाईट परिणाम आपण समाजाच्या (भविष्यातल्या) जडणघडणीवर करत असतो असा माझा विश्वास आहे. सिगारेट पिणे हे मला त्या दृष्टीने अनैतिक वाटते. उदाहरणार्थ आमच्या कुटुंबात आम्हा भावंडांची पुढची पिढी येउ घातली आहे, ते मोठे होत असतांना माझ्या सिगारेट पिण्याचा त्यांच्या भावनिक जडणघडणीवर वाईट परिणाम होउ शकतो याची जाणीव मला आहे. एकुणातच सिगारेट पिणे ही अत्यंत वैयक्तिक अशी आनंद देणारी बाब असुनही मला ती सामाजिक दृष्ट्या अनैतिक वाटते हे ही सिगारेट सोडण्याच्या इच्च्छेमागचे एक प्रबळ कारण आहे.

बाकी प्रतिसादकांचेही आभार. सर्वांनी दिलेल्या सल्ल्यांचा अभ्यास करत आहे. या प्रतिसादांवरुन तसेच माझ्या इतर माध्यमातुन जमविलेल्या माहितेवरुन स्वतःसाठी एक कोर्स डिझाईन करत आहे, तो इथे नक्की देईन.

शतशः धन्यवाद.

राजेश घासकडवी's picture

28 Apr 2010 - 12:52 am | राजेश घासकडवी

अनैतिकतेबद्दलचा तुमचा मुद्दा पटला नाही, तरी तुमच्या मनाचा खंबीर निर्धार झाला आहे हे महत्वाचं आहे. तुम्ही जे 'प्रति राजेश घासकडवी' लिहिलंय ते 'प्रति अंगद' असं वाचा. कारणं सतत लक्षात ठेवा - त्यासाठी खालचं नेमॉनिक उपयोगी पडेल.
इवितकुपस्व

च्छा
विकार
डजोडी
कुबड्या
रिणाम (पुढच्या पीढीवर)
स्वजन

हे सतत आठवा.

तुमच्या डॉक्टरना जरूर भेटा, चॅंटिक्स सारखी काही औषधं असतात त्यांचा फायदा होतो.

शुभेच्छा. काही आठवड्यांनतर तुमची प्रगती जरूर कळवा.
राजेश

डावखुरा's picture

28 Apr 2010 - 12:40 am | डावखुरा

हे एकदा पहाच....!!!

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

धमाल मुलगा's picture

28 Apr 2010 - 3:20 pm | धमाल मुलगा

एकेकानं असं काहीकाही सांगितलंय की आता मला भितीच वाटायला लागलीये.

ओ आंबोळीशेठ, एका झटक्यात सिगारेट कशी बंद केलीत सांगा की राव जरा.

प्रमोद देव's picture

28 Apr 2010 - 3:28 pm | प्रमोद देव

आंबोळीनं कंदील पेटवायची धमकी द्यायच्या आत काय ते करून घे रे बाबा...नाही तर एका झटक्यात......

धमाल मुलगा's picture

28 Apr 2010 - 3:53 pm | धमाल मुलगा

हा हा हा...
खरंय गुरुदेव :)
आंबोळीशेठ कावले तर सिगारेट सोडा, आम्हालाच काडी लावायची वेळ यायची. :)

II विकास II's picture

29 Apr 2010 - 9:39 am | II विकास II

धम्या, आंबोळीला, तुझ्या सिगारेट्च्या नावाने कंदील पेटवायला लाव. आपोआप सिगारेट सुटेल. मग जग आरामात १०-२५ वर्षे जास्त.

टिपः १०-२५ वर्षे अदांजे लिहीले आहे. उगाच दुवे मागु नयेत.
--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

मितभाषी's picture

28 Apr 2010 - 4:01 pm | मितभाषी

गुळणीवाला भावश्या

सुधीर काळे's picture

29 Apr 2010 - 3:30 am | सुधीर काळे

अंगद-जी,
रोज २५ सिगारेटी २५ वर्षें ओढणार्‍या मी ती कशी सोडली याबद्दलचा एक लेख मी देवसाहेबांच्या हिवाळी विशेषांकात लिहिला होता. त्याचा दुवा मी आपल्याला व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठविला आहे. अजून मदत हवी असल्यास kbkale@yahoo.com वर संपर्क साधावा.
सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डी.सी. येथे)!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9