'जांगडगुत्ता' हा शब्द मी लिहिला आणि बहुतेकांना त्याविषयी जिज्ञासा निर्माण झाली.
हास्यसम्राट१ मध्ये मिर्झा बेग हे सदगृहस्थ स्पर्धक म्हणून होते, ते त्यांच्या विनोद सादरीकरणात जांगडगुत्ता शब्द आवर्जून वापरीत. तेव्हा त्यातून व्यक्त होणारा अर्थ- मोठा गोंधळ, गडबड, गहजब असा असे. 'तुमचा काहीतरी जांगडगुत्ता चाललेला दिसतो' अशा वाक्यातून गौडबंगाल, भानगड, कटकारस्थान असाही अर्थ ध्वनित होई. फार फार तर जांगड म्हणजे भलामोठा, भयंकर, जबरदस्त आणि गुत्ता म्हणजे गुंता, गोंधळ अशी या शब्दाची फोड करता येईल.
काही शब्द मोठे मजेशीर असतात. कोठेतरी,काहीतरी वाचतांना आपणाला अचानक भेटतात, अचंबित करतात,मिश्किलपणे हसवतात. शब्दांचे वेगळे नमुने म्हणून आणखी काही उदाहरणे देता येतील...
१) कट्टरकिल्ली- 'त्याने अशी कट्टरकिल्ली मारली की तिढा सुटला.' नेमकी चाल, युक्ती योजणे असा अर्थ निघतो.
२) मोचाळून- 'ते ऐकून ती मोचाळून गेली.' गोंधळणे याअर्थी.
३) गोमचाळ- ' दोघांचं गोमचाळ खूप दिवसापासूनचं,' म्हणजे अनैकता, लफडे अशा अर्थी!
प्रत्येकाच्या वाचनात असे नव्यापिढीचे नवे शब्द येत असतात. ते तेथेच सोडून देण्यापेक्षा त्यांची नोंद ठेवली तर आपल्या लेखनशब्दांचा परीघ वाढत असतो.
शब्दकोशामध्ये पुढील आंतरजालीय शब्दांची भर पडायलाच हवी-
अक्षरमुद्रा-font
आंतरजाल-internet
खरडफळा-scrap
खरडवही-scrapbook
विदा-data
विदागार-database
विरोप-email
जालनिशी-blogging
इत्यादी...
काही वेळा दोन भाषांतील शब्दांचा संधी करून नवा शब्द सर्रास वापरात येतो-
परवडेबल, सहनेबल, डोकँलिटी, नेटकर, विकांत, गंजीफ्रॉक इ.इ.
असे शब्द वाचतांना, उच्चारतांना, लिहितांना फार मौज वाटते. जांगडगुत्ता हा शब्द त्याच कुळातला. असे शब्द शब्दकोशांतून आढळत नाहीत, किँवा शब्दकोश निर्मात्यांपर्यँत ते पोहचत नसावेत. क्षणापुरता आनंद देणारे असे शब्द आपण विसरून जातो. खरेतर अशांची जपणूक व्हायला हवी, लिखाण करतांना वापर केला जावा. त्याने भाषेची शब्दसंपत्ती वाढीस लागेल. परंतु असे प्रयत्न होतांना दिसत नाहीत. ग्राम्य, बोलीभाषेतील किंवा अनाकलनीय अर्थ अशा शिक्क्याखाली ते पुरले जातात. याच अवगुणामुळे मराठीची शब्दसंख्या मर्यादित राहिली आहे. इंग्रजी बृहत कोशात दर पाच वर्षाँनी अनेक नवनवीन शब्दांची भर घातली जाते. तशी लवचिकता आपण स्विकारायला हवी. आंतरजालावर बऱ्याचदा अनेक शब्दांचे संक्षिप्त रूप लिहून नेटकऱ्यांकडून वेळ वाचवला जातो. उदा.-
व्यनि-व्यक्तिगत निरोप
हीही-याचा विस्तारीत अर्थ हसणे नसून हीन, हीणकस आहे याची नोंद घ्या!
पुलेशु-पुढील लेखनास शुभेच्छा!
हेवेसांन-हे वेगळे सांगायला नको.
चर्चेच्या माध्यमातून जालावर अनेक प्रतिशब्द अनेकदा सुचविले जातात. परंतु त्यांचा वापर कितीसा होतो? त्यांची दखल घेतली जाते का? हे अनुत्तरीत प्रश्न आहेत.
बरेतरबरे हे नवनवे शब्द कोशकारांपर्यँततरी पोचतात का? आणि बहुतेक कोशकार ते स्विकारतील की नाही ही शंका उपस्थित होतेच.
नवे शब्द केवळ कोशात शोभेची वस्तू म्हणून ठेऊन देणे उपयोगाचे नाही, तर जरूर तेथे त्यांचा मुक्तहस्ते वापर व्हावा. भाषेच्या उत्कर्षासाठी शब्दांचा प्रवाह खळाळून वहावा, फक्त कोशात दिखाव्यासाठी ठेऊन त्यांचे डबके होणार नाही याची काळजी घेण्याचं काम तुम्हां आम्हां सारख्या सुशिक्षितांकडे ओघानेच येतं. नाही का?
'जांगडगुत्ता'च्या निमित्ताने..
गाभा:
प्रतिक्रिया
25 Apr 2010 - 3:37 pm | मितभाषी
प्रकाटा, LOL काय आहे??????
हे मिपावर बर्याच ठिकाणी वाचले आहे.
विषय दिलेला नाही हे एक नविन.
भाबडा भावश्या.
25 Apr 2010 - 5:09 pm | शुचि
Laughing Out Loud
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
25 Apr 2010 - 3:42 pm | मितभाषी
संपादन.
25 Apr 2010 - 4:04 pm | II विकास II
खरडफळा-scrap
== खरड - scrap
25 Apr 2010 - 4:05 pm | टारझन
ते हि&ही अशा प्रकारेने वापरतात ... :) "हीही" पहिल्यांदाच पाहातो आहे. :)
बाकी लेख उपक्रमोत्तम आहे :)
- टारझन
25 Apr 2010 - 5:20 pm | विसोबा खेचर
शीर्षक वाचून आधी थोडा 'मोचाळून'च गेलो होतो पण लेख मात्र फार आवडला..! :)
बाकी लेखाच्या निमित्ताने पूर्वी काही केलेली 'गोमचाळ' प्रकरणं आठवली! ;)
आपला,
'जांगड'तात्या.
25 Apr 2010 - 5:35 pm | शुचि
लेख मस्तच. काय अनवट शब्द पुनरुज्जीवीत केलेत .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
25 Apr 2010 - 7:21 pm | युयुत्सु
असहमत!
मराठीची शब्द्संख्या इंग्रजीच्या प्रभावाने कमी झाली. १९३० साली प्रकाशित झालेला द्विखंडात्मक सरस्वती कोश माझ्या कडे आहे. त्या वरून नजर टाकली तर मराठी किती समृद्ध होती हे लक्षात येते.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.