केवळ नामोल्लेखानेच कुणाला मळमळ होईल तर कुणी उतावीळ होईल. जितके प्राण्यांचे प्रकार तितक्या मांसाशनाच्या पद्धती, त्याहून जास्त मांसासाठीच्या पाकसिद्धी. मांसाहारामुळे बुद्धी बद्ध होते हा सिद्धकांचा आरोप असतो. प्रत्यक्षात तसे घडतेच असे नाही. अर्थात खाण्याबरोबर पिण्याची सोय झाली तर पुढे बऱ्याच गोष्टींची गैरसोय देखील होतेच. बुद्धीचे प्रकरण गुद्दी पर्यँत वाढते,इतकी खाणाऱ्या पिणाऱ्यांना चढते!
एकंदर काय तर मांसाशनाची मैत्री मदिरापानाशी जोडली गेल्याने सगळा जांगडगुत्ता झालाय. अशक्तपणात मांसाची आसक्ती ठेवल्याशिवाय शक्ती येत नाही किंवा क्षयरोगावर चिकनसूपासारखे पेय नाही अशी एक धारणा आढळते. आजकाल तर मांसाहार खुलेआम केला जातो. जाहिरातबाजीसाठी वस्तू लटकाव्यात तशा लालभडक मसाला लावून कोँबड्या लटकवलेल्या दिसतात. चटावलेल्या जिभा पायांना तिकडे ओढतात मग पुढे निषिद्धशा गोष्टीही जुळून येत जातात. शरीरसौष्ठवासाठी, शक्तिवर्धक म्हणून मांसाशनाचा महिमा वर्णिला जातो. यातील खरेखोटेपणा अमूकतमूक'श्री' किताबाच्या मानकऱ्यांनाच विचारला जावा. प्राणीमित्र संघटना, शाकाहार पुरस्कर्ते अधून मधून आवाज उठवतात, परंतु फुटाफुटावरील चिकनसेँटर अन् चौकाचौकावरच्या चायनिज टपऱ्यांच्या गदारोळात तो आवाज क्षीण ठरतो.
तंगड्या तोडायची सुपारी नळ्या फोडण्यापासून सुरू होते, हे सर्वश्रुत असलं तरी मांसाने मांस वाढते हा सिद्धांत फार पुरातन कालापासूनचा आहेच की!
मांसाशनाचा महिमा...
गाभा:
प्रतिक्रिया
23 Apr 2010 - 1:10 pm | विसोबा खेचर
छोटेखानी मुक्तक आवडले.. :)
आपला,
(ओल्या बोबलांच्या आमटीचा प्रेमी) तात्या.
23 Apr 2010 - 1:11 pm | विंजिनेर
??
तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय ते नीटसं कळाले नाही.
मांसाहाराला आक्षेप आहे का नाही? असलाच तर दारूची जोड मांसाहाराला नेहेमी असेलच असे नाही. मग दारूला मधे कशाला खेचा?
(गोंधळलेला मांसाहारी)विंजिनेर
23 Apr 2010 - 1:34 pm | विसोबा खेचर
हीच तर मला दिवट्यांच्या मुक्तकाची खासियत वाटली आणि म्हणूनच मला ते मुक्तक आवडले.. :)
तात्या.
23 Apr 2010 - 1:14 pm | वेताळ
तुम्ही कधी मांसाहार केलाय का?
वेताळ
23 Apr 2010 - 5:02 pm | मीनल
मी कधीही जाणून बूजून मांस भक्षण केले नाही.( आता चीन मधे राहिल्यानंतर नजाणता केले असण्याची शक्यता नाकारत नाही.)
यापुढेही करायची इच्छा नाही.
परंतू मुलाला मांस भक्षणाचे फायदे, तोटे सांगितले. प्रोत्साहन दिले नाही की मागे ओढले नाही. मांस खावे की नाही हा निर्णय त्याच्यावर सोडला.
वरील मुक्तक आवडले आणि मी त्या विचारांशी बहुतांशी सहमतही आहे.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
23 Apr 2010 - 5:56 pm | डॉ.श्रीराम दिवटे
मिपाकरांनी हा विषय तसा फारसा गौण ठरविलेला दिसतोय.
27 Apr 2010 - 8:32 pm | इंटरनेटस्नेही
मांस म्हणजे आपला जीव की प्राण हो दिवटे साहेब!
साला महिन्यातून दोन दिवस एकादशीचे पाळायचे म्हणजे अगदी जीवावर बेतते...
आमचा एक मित्र आहे एके काळचा पक्का शाकाहारी; पण त्याच्या सवयी आम्ही अश्या बदलल्या की आता तो केवळ मांसाहारी खाता यावे म्हणून.. आम्हाला भेटायला ३० किमी प्रवास करून येतो..(अर्थात घरातून लपून छपून!)
--
(भूक लागली किमान दोन ते तीन कोंबड्या चापणारा) इंटरनेटप्रेमी..