रसग्रहण - सुपरहिट गाणी !

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
22 Apr 2010 - 3:44 pm

णमस्कार्स मंडली ,

सहजरावांबरोबर चर्चा करता करता सुचलेला एक विषय ... आपली बॉलीवुड परंपरा अतिशय महान आहे. मनोरंजणाचा अनलिमिटेड खजाणा आहे.

दलाल : मिथुन च्या एका अप्रतिम हिट चित्रपटातलं हे गाणं म्हणजे क्या केहने ? सुनते ही बात बनती है ..
"चढ गया उपर रे ... अटरीया पे लोटन कबुतर रे ... गुटूर गटूर ..."
व्वा !! ज्या कोणी लिहीलंय त्याने कसं एखाद्या बैठकीला लिहीलंय ... "चढ गया उपर रे ... " मधे जो यमनाचा सुर लागतो त्यावर मिथुन ने तितक्याच ताकदवर नृत्याभिनयाने शब्दाशब्दाला दाद दिली आहे. आणि त्यानंतर "अटरीया पे लोटन का कसला तरी कबुतर म्हणजे खल्लासंच ! शिवाय "गुटूर गुटूर " हा कोरस सदृष पदार्थ तर लाजवाब .

हिरो नंबर १ : ह्यात खरं तर एकसे बढकर एक गाणी. तसंही नाईंटीज मधे गोविंदावर पिक्चराईझ झालेल्या गाण्यांना तोडंच नाही. गोविंदाला दिलेलं ड्रेसिंगही खास असे .. लाल शर्ट , पिवळी पँट (आजवर आम्ही फक्त गोविंदा आणि द मास्क लाच पिवळ्या पँट मधे पाहिला आहे ) ... गाणं काहीसं असं होतं
मै तो रस्ते से जा रहा था ..
भेल पुरी खा रहा था ...
तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू ?

फक्त एकंच प्रश्न पडला .... रस्त्याने चालता चालता अशी भेळपुरी खाता येते ? बर खातोय गोवींदा ... आणि त्या करिश्माला मिर्ची कशी काय लागली ? बरं लागली तर लेका तुझी हिरॉइन आहे ना ती ? तुच "मै क्या करू ?" म्हंटला तर कसं होणार? (नाही तसं करिश्मा म्हंटलं की बरेच स्वयंसेवी कार्यकर्ते "काहीही" करायला तयार झाली असती म्हणा ) पण ह्या गाण्याचे लिरिक्स इतर कोणत्याही गाण्यापेक्षा केवळ अर्थपुर्ण नाही तर रियलॅस्टिक आहेत. उगाच चंद्र-तारे तोडुन आणन्याच्या कवीकल्पना नाहीत .. किंवा "तेरे लिया सारी दुनिया छोड जाऊंगा " सारखी डोकेफिरू आशिकी नाही.... किती डाऊन टू अर्थ ?

गुलाम : तसं पाहिलं तर हा आमचा त्यावेळचा सर्वांत आवडता चित्रपट. अमिर खान अ‍ॅक्टिंग मधे तगडा आहे ह्यावर कोणाचंच दुमत नसेल (जसं प्रा.डॉ.दिलीप कुमार बद्दल आहे). ह्या चित्रपटातलं एक गाणं ..
"ए क्या बोलती तु ? .... " इतकी जबरस्त स्टाईल .. आणि त्यात इतका इंटेलिजंट प्रश्नं विचारावा ?
मग त्यावर लाडकी हिरॉइन " ए .. क्या मै बोलू" असं लाडिक उत्तर न देईल तर कसे ?
नायकही पहा कसा मौका पाहुन चौका मारतोय .. " आती क्या खंडाला ? " बरं आता हिरॉइनीने मंद असलंच पाहिजे का ? ती म्हणते .. "क्या .. करू ... आके मै खंडाला ? " अगं बाई .. .तो तुला इंदिरा आवास योजना किंवा जवाहरलाल नेहरु ग्रामरोजगार योजने अंतर्गत वीटा वहायला नाही गं घेऊन चालला ... असो .. कायम लक्षात राहाणारं अफलातुन गाणं

आंखे : गोविंदा बाबुंचंच एक गाणं आठवलं .
"अंगना मे बाबा ... द्वारे पेमा ... कैसे आये गोरी हम तोहारे घरमा "
कॅन यु इमॅजिन .. ? हिरॉइनीचा पप्पा अंगणात पत्ते कुटत बसलाय ... आणि दरवाजावर आई रंग घेऊन नेमप्लेट बनवते आहे "श्री.आगणे बाबा आणि सौ. द्वारका " .... आणि अशा ह्या कायम घरी पडिक असलेल्या आई-बापाच्या पोरीवर गोविंदाने प्रेम करावे ... तिला भेटणार कसा हा ? किती गहन प्रश्न किती सहजतेने माडंला आहे ? नाही ?

दाग- द फायर :एक महिमा चौधरी आणि संजय दत्तंचं गाणं .. आता 'सिवाजी - द बॉस' , 'हिरो - द नायक' , 'तात्या - द मालक' , 'टार्‍या - द हिणकस' सारखं "दाग" आणि "द फायर " चं काय रिलेशन आहे ? असला अतिमहामुर्ख प्रश्न विचारायचा नाही.
"ओ निले आखोंवाला ... तेरा लकी कबुतर
पिये इश्क दा प्याला .. तेरा लकी कबुतर"

आता निळ्या डोळ्यांचं कबुतर असतं का ? असा वैचारिक प्रश्नं विचारायचा नाही .. हे म्हणजे आणासपुर्‍या म्हणतो तसं " धु म्हंटलं की धुवायचं .. उगा काय लोंबतंय ते इचारायचं न्हाई " .. असो .. तर हे निले आखो वाला कबुतर .. तो ही महिमा चौधरी चा ? पहा काय महिमा आहे (हिला स्वतःला लक ची आवश्यकता होती .. तीला मिळालं नाही .. पण कबुतर लकीच) .. तसा सुरुवातीला काही अर्थबोध होत नाही .. पण दुसरं वाक्य आलं की पुर्ण अर्थ कसा गंगाजळाप्रमाणे क्रिस्टल क्लियर होतो.

खलनायक : संजुबाबा संजु चा हा चित्रपट कोण विसरेल .. साला आम्ही लै लहान होतो त्यावेळेस.. आणि आमच्या घरी टिव्ही पण नव्हता... तेंव्हा शेजारच्या आंटींना प्रश्न विचारला होता... तिने पुन्हा घरी टिव्ही पाहु दिला नाहीच .. उलट घरी तक्रार केली .. च्यायला माझं काय चुकलं म्हणुन मी बरेच दिवस खाजवत होतो ... डोकं.. असो .. गाणं काहीसं असं आठवतंय ..
"कुक कुक कुक कुक कुक कुक कुक ..... चोली के पिछे ...क्या है ... चोली के पिछे ... (एन टाईम्स) "
वं बाई जे काही आहे ते एक किंवा दोनंच असेल .. किति वेळा ? किती वेळा ? आं ? कोण्या एलियन ने लिहीलंय हे गाणं ? तर ते "कुक कुक कुक कुक " हे गाणं आमच्या गावी कोंबड्यांना परत बोलावण्यासाठी खुराड्यात डालन्याव्या वेळेस वाजवले जाण्याचा प्रघात होता. चोली के पिछे क्या है ? हे मात्र परिस्थिती नुसार बदलु शकतं .. ह्याला एकंच स्टॅटिक उत्तर कसं देता येईल ? आता जर चोली हँगर ला इस्त्रि करुन लटकवली असेल तरी तिच्या पिछे हिचं दिल कसं असु शकेल ? असो ..

राजाबाबु : गरिबांच्या मिथुनचं अजुन एक गाणं ते ही लाडक्या करिश्मा बरोबर. ऐन हिवाळ्याची वेळ ... गरिब घराण्यातली हिरो-हिरॉइनी ... (त्या काळी भिकेला लागले तरी महालात राहून फॅशन करण्याची "तारा रम पम" गिरी परवडायचीच नाही म्हणा )
"सरकाईल्यो खटिया जाडा लगे "
हिरो हिरॉइन कडे फक्त वन रुम झोपडी असल्याने हे अंगणात झोपायचे. आता त्यावेळी काही ग्लोबल वॉर्मिंग ची समस्या नव्हती. आपली पृथ्वी हिरवी गार होती. ओझोनच्या थराला बिळ पडलेली नव्हती. अर्थात ... थंडी फारंच बोचरी पडे. हिरो हिरॉइन बाहेर झोपल्याने त्यांना मच्छरही फार चावत असावेत. त्यात यांच्याकडे एकंच गोदडी असल्याने एक सुंदर उपाय सुचवताना गोविंदा किती निरागस पणे करिश्माला म्हणतो .. सरकायल्यो खटीया जाडा लगे .. आणि त्याचं हे प्रेम किंवा समंजसपणा पाहुन तीही "जाडे मे बलमा प्यारा लगे " म्हणुन परतफेड करते.
अफलातुन गुढ खुल अर्थ असलेलं गाणं ..

आवरता हात घेतो... कारण गाणी तर खुप आहेत .. पण आमचा स्टॅमीना तेवढा नाही. आणि तसंही आम्हीच सगळं लिहीलं तर प्रतिसादात पब्लिक काय लिहील ?

- (लिरिक्स रायटर) कावेत अस्तर

तळ टिप : लेख लिहीतांना गाणी आणि माहिती पुरवल्याबद्दल सहजरावांचे आभार. ह्या निमीत्ताने त्यांच्या समर्पण कपाटात आमच्याकडनं पण एक लेख.

व्याकरण

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Apr 2010 - 3:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हं... मी आधीच दोन गाण्यांचं रसग्रहण केलं होतं. त्यातही एक नाचाबद्दलच जास्त होतं, पण हे मिपावर टाकलं नव्हतं. दुसरं इथेच विडंबन म्हणून टाकलं होतं.

१. जब से हुई है मुहोब्बत

२. निकल भी जा

भडकमकर मास्तरांनीही एका गाण्याची मापं काढली होती, ती शोधा कोणीतरी!

अदिती

मनिष's picture

22 Apr 2010 - 3:56 pm | मनिष

नायकही पहा कसा मौका पाहुन चौका मारतोय .. " आती क्या खंडाला ? " बरं आता हिरॉइनीने मंद असलंच पाहिजे का ? ती म्हणते .. "क्या .. करू ... आके मै खंडाला ? " अगं बाई .. .तो तुला इंदिरा आवास योजना किंवा जवाहरलाल नेहरु ग्रामरोजगार योजने अंतर्गत वीटा वहायला नाही गं घेऊन चालला ...

=)) =)) =))

परिकथेतील राजकुमार's picture

22 Apr 2010 - 3:56 pm | परिकथेतील राजकुमार

टात्या,
एकदा ह्या गाण्याविषयी सुद्धा लिहाना.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

shweta's picture

22 Apr 2010 - 8:08 pm | shweta

टात्या भाउ ... :)
सर्व गाण्यांत कुठेतरी "यमन" डोकावतो आहे .... :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Apr 2010 - 4:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

आपले डोके म्हणजे एक अथांग कचरा पेटी आहे. त्यात काय काय पडले असेल सांगता येत नाही.

टारोबा, वाचता वाचता मला भुलोकीच्या एका किन्नराची आठवण झाली, आपला सुनिलरे, आणि त्याला प्लेबॅक देणारा भुलोकीचा गंधर्व कुमार सानु. आठवले का गाणे "हाय हु़क्कु हाय हु़क्कु हाय हाय ये लडकी मेरे सामने मेरा दील लिये जाय जाय जाय" काय कंबर हालवली होती सुन्याने. आपण तर बाबा फॅन आहोत त्याचे.

त्याच सुन्याच दुसर गाणे " शहेर की लडकी" केवळ अप्रतिम.

आणि " क्या अदा क्या जलवे तेरे पारो दीलके टुकडे हो गये हजारो" यामधील नृत्याविष्काराला तर काही तोडच नाही.

धडकन मधले त्याचे डायलॉग आठवा केवळ शिल्पा शेट्टी सारखी सशक्त अभिनेत्रि समोर होती म्हणुन तिचा टिकाव लागला. दुसरी कोणि असती तर तीने अभिनय करणेच सोडले असते.

तसा आमचा सनी बाबा पण काही कमी नाही बरका... आठवा
यारा ओ यारा (जीत) मधे त्याने उडवलेली धमाल
मै निकला गड्डी लेके मधला त्याची ती अफाट नृत्यशैली
किंवा "दरवाजा बंद करलो (डर) मधले त्याचा मुद्राभिनय

आपण त्याचे दिवने झालो आहोत बाबा.

पैजारबुवा,
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Apr 2010 - 4:11 pm | बिपिन कार्यकर्ते

टार्‍या... एक लंबर.... त्याच्याही वर काय ते... अशा प्रकारचे लेख लिहिण्यात तू आहेच उस्ताद...

वं बाई जे काही आहे ते एक किंवा दोनंच असेल .. किति वेळा ? किती वेळा ? आं ? कोण्या एलियन ने लिहीलंय हे गाणं ?

=)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

इंटरनेटस्नेही's picture

22 Apr 2010 - 4:26 pm | इंटरनेटस्नेही

जबरी...

नंदन's picture

22 Apr 2010 - 4:34 pm | नंदन

=)) =))
बाकी यूट्यूबवर 'भोजपुरी साँग्ज' असा शोध दिल्यावर सापडणारे काही दिव्य व्हिडिओजसुद्धा या लेखाचा पुढचा भाग लिहिण्यात उपयोगी पडावेत ;)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Apr 2010 - 4:36 pm | बिपिन कार्यकर्ते

लिंका नाही दिल्यात? ;)

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

22 Apr 2010 - 4:41 pm | टारझन

धन्यवाद नंदन , दुसरा भाग लिहीण्याचा आणि तो लिहुन इथे टाकण्याचा जरूर प्रयत्न करीन. मी आत्ता माझ्या मित्राला एक "हाय हाऊ आर यू ? " आशयाचे पत्र लिहीण्यात व्यस्त आहे. त्याला चॅट वर भेटुन १० मिनीटांचा काळ लोटला. तो बीआरबी इन ५ मिनीट म्हणुन गेलाय तो अजुन आलेला नाही. माला त्याची काळजी वाटते.

- (आद्य पत्रविरचक्र धारक) शंकर पाळे

प्रकाश घाटपांडे's picture

22 Apr 2010 - 4:39 pm | प्रकाश घाटपांडे

"कुक कुक कुक कुक कुक कुक कुक ..... चोली के पिछे ... चोली के पिछे ... (एन टाईम्स) "
वं बाई जे काही आहे ते एक किंवा दोनंच असेल .. किति वेळा ? किती वेळा ? आं ? कोण्या एलियन ने लिहीलंय हे गाणं ? तर ते "कुक कुक कुक कुक " हे गाणं आमच्या गावी कोंबड्यांना परत बोलावण्यासाठी खुराड्यात डालन्याव्या वेळेस वाजवले जाण्याचा प्रघात होता. चोली के पिछे क्या है ? हे मात्र परिस्थिती नुसार बदलु शकतं .. ह्याला एकंच स्टॅटिक उत्तर कसं देता येईल ? आता जर चोली हँगर ला इस्त्रि करुन लटकवली असेल तरी तिच्या पिछे हिचं दिल कसं असु शकेल ?

हे लोकगीतावर आधारलेले आहे अशी ऐकीव माहिती आहे. मला हे गाण जाम आवडल होत.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

चित्रगुप्त's picture

22 Apr 2010 - 4:40 pm | चित्रगुप्त

खल्ला................स

ही परंपरा रमया वस्तावय्या.....वगैरे पासूनची...
मित्रलुप्त
(यमेश फासचुकवी)

दिपक's picture

22 Apr 2010 - 4:42 pm | दिपक

ह्या गाण्यावरही लिहा...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Apr 2010 - 4:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे घ्या, मी आधी लिहीलेलं आहेच. पुन्हा एकदा या गाण्याचाही उद्धार होऊ देत.

अदिती

दिपक's picture

22 Apr 2010 - 4:52 pm | दिपक

भीषण सुंदर

शिर्षकातच फुटलो.

पार्श्वभूमीवर एक बाई भेसूर हसते ज्यावर आपल्याला ना हसायला येतं ना रडायला! आणि मग दिसतो हा आपला हॅण्डसम हंक!

=)) =))

तर ... मी असं म्हणत होते, की सुरूवातीला वीजा चमकल्यावर हा ठोंब्या अचानक दिसतो एका बागेत आणि गंमत म्हणजे हवा एकदम मस्त! अहो, क्षणाक्षणाला बदलणार्‍या हवेसाठी प्रसिद्ध असणार्‍या सायबाच्या देशातही एवढ्या चटकन हवा बदलत नाही. अर्थात पापणी लवायच्या आत मुंबैहून मिलानला जाणार्‍या लोकांसाठी हवा बदलणं म्हणजे नक्कीच 'किस झाड की पत्ती' असणार! तर तिथे दिसतो आपला ठोंब्या, एका बागेत, एका फोटोबरोबर, त्याच्या बर्‍यापैकी किंचितशा सुटलेल्या ढेरीपोटासकट! आणि मग गाणंही सुरू होतं, "जब से हुई है मुहोब्बत, तब से हुई ..." नाही, माझं गाण्याच्या बोलांकडे लक्षच गेलं नाही. माझं सगळं लक्ष होतं ठोंब्याकडे! काय सुंदर नाच बसवला आहे या गाण्यावर! मला एकदम आमच्या शाळेच्या गॅदरिंगची आठवण झाली. एका वर्षी वानखेडे (का वानरवेडे?) सरांनी एक "डॅन्स" बसवला होता त्याची; गाणं होतं,
हिवर पिवर पिवर पी हिवर पिवर पिवर पी।
पायात पैंजण मी घातलेले, जशी पायमोडी, पायमोडी करणारी ।

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

त्या हिरोला त्या गाण्यानंतर आयसीयू मध्ये भरती केले असणार... :D

टारझन's picture

22 Apr 2010 - 5:10 pm | टारझन

काय दिपकराव , ब्लॉग वर प्रतिसाद टाकायला बंदी केली आहे का ?
=)) =)) =))

बाकी दिपकराव आपला व्हिडिओ इतका बेष्ट इतका बेष्ट इतका बेष्ट आहे की त्यावर लिहीणे म्हणजे टाईम वेष्ट :)
वर्षभरा पुर्वी पाहिला तेंव्हा हसून मुरकुंडी वळली होती.

सुबक ठेंगणी's picture

25 Apr 2010 - 12:59 pm | सुबक ठेंगणी

=)) =)) =)) ......क्ष
मधेच गोलांट्या उड्या काय मध्येच शवासन काय...छानच "बसवलाय" डेन्स...
त्या उजव्या कोपर्‍यात "कमाल" का लिहिलंय ते प्रात्यक्षिकासहित कळलं...

स्वाती दिनेश's picture

22 Apr 2010 - 4:44 pm | स्वाती दिनेश

टारोबा, रसग्रहण लईच भारी..
स्वाती

निखिल देशपांडे's picture

22 Apr 2010 - 5:13 pm | निखिल देशपांडे

ह्या टार्‍याचा सुपिक डोक्यातुन काय निघेल सांगता येत नाही..
एक से एक गाणे आणि त्यावरच्या टिपण्ण्या...
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

स्वप्निल..'s picture

23 Apr 2010 - 12:55 am | स्वप्निल..

एक्झॅक्टली!!

=))

ऋषिकेश's picture

25 Apr 2010 - 3:55 pm | ऋषिकेश

सहमत
धागा परत परत वाचून परत परत हसतोय

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

दिपक's picture

22 Apr 2010 - 5:26 pm | दिपक

=)) =))
जबराट रसग्रहण....टारोबा पुढचं येवुद्या...

जे.पी.मॉर्गन's picture

23 Apr 2010 - 3:25 pm | जे.पी.मॉर्गन

कहर आहे.... ते मुहब्बत वालं गानं तर लय म्हंजे लयच भारी !

श्रावण मोडक's picture

22 Apr 2010 - 6:56 pm | श्रावण मोडक

याला काही गाणी निवडून द्यावीत काय? त्या गाण्यांचा सूड घेण्याची ही क्लृप्ती भारी आहे!!!

मराठे's picture

22 Apr 2010 - 8:13 pm | मराठे

हहपुवा

"चढ गया उपर रे ... अटरीया पे लोटन कबुतर रे ... गुटूर गटूर ..."
व्वा !! ज्या कोणी लिहीलंय त्याने कसं एखाद्या बैठकीला लिहीलंय ... "चढ गया उपर रे ... " मधे जो यमनाचा सुर लागतो त्यावर मिथुन ने तितक्याच ताकदवर नृत्याभिनयाने शब्दाशब्दाला दाद दिली आहे. आणि त्यानंतर "अटरीया पे लोटन का कसला तरी कबुतर म्हणजे खल्लासंच ! शिवाय "गुटूर गुटूर " हा कोरस सदृष पदार्थ तर लाजवाब .

हे गाणं 'हनी इराणी' ह्या बयेनं लिहिलायं!! तिच्या एका मुलाखतीत तिने ह्या गाण्याचं "आत्मा परमात्म्याचं मिलन" वगैरे रसग्रहण करुन दाखवलं होतं आणि ऐकणार्‍यांना झीट आणली होती.

बेसनलाडू's picture

22 Apr 2010 - 8:59 pm | बेसनलाडू

(आस्वादक)बेसनलाडू

नितिन थत्ते's picture

22 Apr 2010 - 9:06 pm | नितिन थत्ते

मी एका उत्तर भारतीय मित्राला अटरिया आणि लौटन या शब्दांचे अर्थ विचारले होते.
अटरिया = माळा (लॉफ्ट)
लौटन = पुन्हा
असे ज्ञानार्जन झाले होते.

नितिन थत्ते

देवदत्त's picture

22 Apr 2010 - 9:45 pm | देवदत्त

अरे वा.. मस्त.

इश्क कमीना, निकम्मा किया इस दिल ने वगैरे गाण्यांबद्दलही काही तरी असेलच. तेही लिहा.

मी थोडीफार गाणी लिहितो नंतर.. तोपर्यंत... चालू द्या.

जाता जाता: हिंदी सिनेमा आणि गाणी ह्यात मला माहित असलेल्या गोष्टींत नाक खुपसण्याची खोड काही जात नाही म्हणून २ बदल सुचवितो ;)
मै तो रस्ते से जा रहा था .. हे गाणे हिरो नं १ नाही तर कुली नं १ मधील आहे.
आणि दाग द फायर मधील निले आँखो वाला नाही तर निले नैनों वाला :) :)

टारझन's picture

22 Apr 2010 - 9:51 pm | टारझन

हे गाणे हिरो नं १ नाही तर कुली नं १ मधील आहे.

हाहाहा .. खरं आहे .. चुकलंच .. पण साला कुली नं १ , हिरो नं १ , बिवि नं १ , गली नं १ , फॉर्मुला नं १ एवढे नं १ झाले .. त्यात चुकुन मिष्ट्येक झाली बघा :)

दाग द फायर मधील निले आँखो वाला नाही तर निले नैनों वाला

सॉरी शक्तिमान

धन्यवाद देवदत्त सर !!!

बाकी पार्ट टू जरा फुरसत ने लिहावा लागेल :)

अक्षय पुर्णपात्रे's picture

22 Apr 2010 - 9:52 pm | अक्षय पुर्णपात्रे

बाकी पार्ट टू जरा फुरसत ने लिहावा लागेल

मालकांकडून प्रेरणा घेऊन पुढचा भाग दक्षिणेकडे जाऊ द्या.

हुप्प्या's picture

22 Apr 2010 - 10:17 pm | हुप्प्या

सानिया मिर्झा हनिमूनला हे गाणे म्हणेल असा एक अंदाज आहे. पण तो अर्थातच उथळपणा आहे.
http://www.youtube.com/watch?v=UXOG5rfn1Go
पण त्याच्या वरवरच्या अर्थाकडे बघू नका. त्यात एक खोल, गहन, गूढ अर्थ भरलेला आहे. त्यात काही आध्यात्मिक छटा आहेत. एक आत्मशोध आहे. व्याकुळता आहे. आणि बरेच काही आहे.

पण लिही की..

लेख बेश्टच आहे..

"अंगणा मे बाबा...." ची कोरियोग्राफी उत्कृष्ट आहे. काय एक एक अँगल आहे, वा:!!

पुढ्च्या भागासाठी काही गाणी सुचवू का?

१. जबतक रहेगा समोसेमे आलू!!
२. खडा है, खडा है! (अनील "केसाळ" कपूर आणि चावला बेन)
३. दिल का दरवाजा खुला है राजा...

अजून्ही आहेत..

बेसनलाडू's picture

23 Apr 2010 - 12:48 am | बेसनलाडू

१. सातों जनम तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते (हीरो नं. १)
२. किसी डिस्को नें जाए, किसी होटल में खाए (बडे मियाँ छोटे मियाँ)
३. बाबुजी जरा धीरे चलो (दम)
४. आ अन्टे अमलापुरम
५. लोटेला
(पर्यायसूचक)बेसनलाडू

एक's picture

23 Apr 2010 - 1:45 am | एक

मधे जो "अं अं.. (नीट लिहिता येत नाही आहे" आवाज आहे तो दाद घेऊन जातो :)

बेसनलाडू's picture

23 Apr 2010 - 1:54 am | बेसनलाडू

क्रेडिट गोज टू विजू शहा
(श्रेयनिर्देशक)बेसनलाडू

टारझन's picture

23 Apr 2010 - 10:44 am | टारझन

म्हणजे आपले विजु भाऊ काय ? ते कधी अंह् अंह् करत होते ? :)

(समाजसुधारक) १_२ तीन चार

सुरेखा पुणेकर's picture

23 Apr 2010 - 1:10 am | सुरेखा पुणेकर

रस ग्रहन येकम ब्येस!!
मिपाच मुखपृष्ठ लिवायला ह्या टार्यालाच सांगाव का? ;)

-- सुरेखा
कारभारी दमानं.....

मराठमोळा's picture

23 Apr 2010 - 11:15 am | मराठमोळा

टार्‍या.....

=)) =))

फुटलो रे..
खतरनाक.. जबरा टोला.. आयपीएल सारखं मिसळपाव मॅक्सीमम

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

स्पंदना's picture

23 Apr 2010 - 2:59 pm | स्पंदना

हि सारी भजन आहेत रे !! सार् या देवानी देवताना आळवुन आळवुन म्हन्टलेली. तुझ्या शिवाय कुणाचीच बिशाद नाहि अस रसग्रहण करायची.
बाकि" कुकुकुक" चा केलेला कचरा एक्दम दिलाला भिडला बघ! माधुरी आन्टी उर बडवुन रडेल ऐकल तर

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

स्पंदना's picture

23 Apr 2010 - 4:17 pm | स्पंदना

आधी हे गाण ओळखा पाहु?
पुर् या गाण्यात फक्त दोनच शब्द आणी गाण तस भर्पुर लाम्बड.

ओळखा पाहु?

तेरे बिना तेरे बीना तेरे बीना तेरे बिना..........

अहो हे गाण लागल ना कि रेस लागायची कोण पहिला रेडिओ बन्द करतोय याची आमच्या घरात.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

टारझन's picture

23 Apr 2010 - 10:12 pm | टारझन

सर्व प्रतिसाद देणारांचे आभार !! आणि जे फुकट वाचुन गेले आणि लेख आवडुनही प्रतिक्रीया न दिलेल्यांना चमचाभर चुचुमेड गोड शिरा !!
ज्यांना लेख आवडला नाही , आणि वाचुन टाईम वेष्ट झाला त्यांची क्षमा मागतो :)

- टारझन

मी-सौरभ's picture

25 Apr 2010 - 12:27 pm | मी-सौरभ

लै भारी.......

१. टेलीफोन धून मे हसनेवाली -- अस काहीतरी कमल हसन च गानं ऐकलय का तू भावा??????

-----
सौरभ :)

टेलीफोन धून मे हसनेवाली -- अस काहीतरी कमल हसन च गानं ऐकलय का तू भावा??????

त्या गान्यातले शब्द तर खूप बहारदार आहेत.
तेरी गली मे मर्द न छोडुंगा औरत भी न छोडुंगा.......

जेन's picture

25 Apr 2010 - 12:45 am | जेन

ईट वॉस अ स्टूपेनडो, फेन्टेब्यूलसली फेनटास्टीक लेख .....
कुठून शोधले हे सगळे गाणे?

टारझन's picture

25 Apr 2010 - 12:58 am | टारझन

हेहेहे ... दॅट वॉज द चुम्मेश्वरी प्रतिसाद :)

धन्यवाद गं !! आणि साँग्ज कुठनं हवेत शोधायला ? वातावरणात फिरताना माहिती झालेली असतात गं @@

मी-सौरभ's picture

25 Apr 2010 - 12:29 pm | मी-सौरभ

क्या बात!!!......
क्या बात!!!......
क्या बात!!!......
क्या बात!!!......
क्या बात!!!......
क्या बात!!!......

-----
सौरभ :)

डावखुरा's picture

28 Apr 2010 - 11:41 pm | डावखुरा

गीता मा,तेरेन्स,आणि ग्रान्ड मास्तर मिपा वर अवतरले....
=)) =)) =)) =))
--------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

प्रभो's picture

25 Apr 2010 - 9:41 pm | प्रभो

लै भारी...ह ह पु वा

धमाल मुलगा's picture

25 Apr 2010 - 11:07 pm | धमाल मुलगा

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

भैताड हैस लेका.
काय पेशन्स म्हणायचं का पायजमा? आयला, रसग्रहण करण्याइतका अभ्यास करुन ही गाणीगिणी बघितलीस? _/\_ धन्य आहेस.

डावखुरा's picture

26 Apr 2010 - 1:36 pm | डावखुरा

"लगे रहो भैइ.........
मेरे सामने वालि खिडकी मे...
एक दुअवाला रेहता है..
वह चोर नही वो अंडा है...
मेरे दुध मे पानी..मिलाता है..."
------------------------------------------------------------

"कालीसि..सुरत .. आखोमे मस्ती..
दुर खडी चिल्लाये.. दे व माये..."
------------------------------------------------------------
------------------------------------------------------------(हे आमचे सहीतील वाक्य आहे....कृपया नोंद घ्यावी)>>>>
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

टारझन's picture

26 Apr 2010 - 1:58 pm | टारझन

"कालीसि..सुरत .. आखोमे मस्ती..
दुर खडी चिल्लाये.. दे व माये..."

=)) =)) =)) =))
मस्त रे लालसा !!

- खालसा

कुंदन's picture

26 Apr 2010 - 4:55 pm | कुंदन

या अशा गाण्यांना चाली कोण लावत असेल बरे?

नरेश_'s picture

26 Apr 2010 - 8:41 pm | नरेश_

आता तात्यांना स्पर्धा वाढली म्हणायची ;) टार्‍याचं काही खरं नाही.

मी सोडून इतरांनी खोटं बोललेलं मला मुळीच खपत नाही ;)

विशाल कुलकर्णी's picture

28 Apr 2010 - 5:29 pm | विशाल कुलकर्णी

टार्‍या... तू धन्य प्राणी आहेस. कोपरापासुन रे बाबा... नमस्कार ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

(बहुदा रिटायर्ड किवा रिटार्डेड मास्तराने लिहिले असावे)
मेरी मेहबूबा तू होती ... तो नंबर सौ मी सौ देता ..
नजाकत के अलग देता .. शरारत के अलग देता ...

सुप्रिया's picture

4 Dec 2010 - 4:21 pm | सुप्रिया

काय फर्स्टक्लास रसग्रहण आहे.
हा लेख नजरचुकीने वाचायचा राहून गेला होता.
धमाल आली.
-सुप्रिया