नमस्कार,
सकाळी व संध्याकाळच्या वेळेत खाण्यासाठी एक आरोग्यदायी पर्याय म्हणून मानल्या गेलेल्या, Grilled Sandwich ची पाककृती मराठीत उपलब्ध करून देण्याची विनंती मी आपल्या मिपावरील जाणकार आणि खव्वये यांना याद्वारे करतो.
प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
प्रतिक्रिया
22 Apr 2010 - 2:19 am | अम्रुताविश्वेश
साहित्य :
१ कान्दा
४ हिरव्या मिरच्या
आवडत असल्यास ह्यामधे गाजर्,कोबी आणि उकडलेलाबटाटा पण घालता येइल.
मीठ चवीप्रमाणे
साखर चवीप्रमाणे
चीझ किसून
ब्रेड स्लाईस
टॉमेटॉ सॉस
कॄती :
प्रथम एका भान्ड्यामधे बारीक चिरलेला कान्दा,मिरच्या किसून किन्वा बारीक चिरून्,मीठ आणि साखर एकत्र करा.
आता ब्रेड स्लाईस ला टॉमेटॉ सॉस लावा.त्यावर तयार केलेले मिश्रण पसरा.त्यावर चीझ पसरा.त्यावर दूसरा स्लाईस ठेवा.
एका नॉन स्टिक तव्याला बटर लावा.तवा गरम झाला की हे सॅन्ड्विच तव्यावर ठेवा.त्या सॅन्ड्विच वर एखादे ब्रेड च्या पेक्षा आकारानी छोट झाकण दाबून धरा. म्हणजे ते २ स्लाईसेस एकमेकाना चिकटतील आणि आतले चीझ पण वितळेल. नन्तर दूसर्या बाजूनी पण ब्रेड खरपूस भाजून घ्या.
गरमागरम Grilled Sandwich तय्यार.
:)
23 Apr 2010 - 10:55 am | विसोबा खेचर
फोटो तितकासा स्पष्ट दिसत नाही..
तात्या.
24 Apr 2010 - 10:48 am | पर्नल नेने मराठे
मस्त पटकन होइल असे.
चुचु
23 Apr 2010 - 12:30 am | मितालि
ग्रील्ड सॅन्ड्वीच हा काही घरी बनवुन खाण्याचा प्रकार नाही.. रस्त्यातील छोट्या दुकानातुन.. टपरीत.. छान मिळतं.. वरळी ला अॅट्रीया मॉल च्या विरुद्ध दिशेला एक छोटीशी टपरी आहे .. तिथे एकदा खाउन पहा..
23 Apr 2010 - 5:23 am | Pain
@ अम्रुताविश्वेश
पाकक्रुतिसाठी धन्यवाद ! करुन पाहिन.
@ मितालि
दुर्दैव. शक्य नाही.
23 Apr 2010 - 9:27 am | अम्रुताविश्वेश
आणि कसे झाले ते सान्गा. :)
हवे असल्यास थोड्याशा तेलावर सगळ्या भाज्या थोड्या परतून घेतल्या तरी चालतील. :)
23 Apr 2010 - 11:10 pm | अम्रुताविश्वेश
तात्या, फोटो दिसतच नव्हता आधि. आता तो मोठा होत नाही. :(
कसा करावा?
23 Apr 2010 - 11:33 pm | विसोबा खेचर
सुधारणा केली आहे..
तात्या.
24 Apr 2010 - 4:44 am | अम्रुताविश्वेश
धन्यवाद तात्या:
:)
25 Apr 2010 - 4:03 am | इंटरनेटस्नेही
@ अमृता
खरंच अगदी सोपी आहे पाकृ. लवकरच बनवुन बघेन आणि तुम्हाला अभिप्राय कळवेन. मी अतिशय उशिराने प्रतिसाद देतो आहे त्या बद्दल माफी असावी. पण इंटरनेट वेळोवेळी बंद पडत असल्यामुळे एवढा उशीर झाला.
@ मिताली
नक्की ट्राय करेन... एका नवीन ठिकाणाची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.
@ तात्या
चित्र मोठे केल्या मुळे पाकृची रंगत वाढली... धन्यवाद.
--
आपला नम्र,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.