हल्लीच्या दुनियेत 'स्वामी', 'बाबा' किंवा तत्सम कुणीही धर्मोपदेशक म्हटला की तो अंमळ बाईलवेडा असतो असे आमच्या पाहण्यात आले आहे.. मग तो स्वामी नित्त्यानंद असो की आणखी कुणी स्वामी तात्यानंद असो.. त्यातूनही ती बया जर दाक्षिणात्य नटी असेल तर मग बघायलाच नको..; )
अलीकडेच स्वामी नित्त्यानंद आणि आपली सर्वांची लाडकी दाक्षिणात्य नटी रंजिता यांच्या काही चित्रफिती एक तमिळ वाहिनीने प्रसिद्ध केल्या आणि गूगलची पानंच्या पानं ओसंडून वाहू लागली! तूनळीवर चित्रफितीही प्रसिद्ध झाल्या आहेत..
आता ही बातमी खरी का खोटी?
स्वामींच्या संस्थळाने अर्थातच ह्या प्रकरणात स्वामीजींना विनाकारणच फसवलं गेलं आहे असा खुलासा आहे..
बाकी अन्यत्र तमाम ब्लॉग्जवर मंडळी चवीचवीने चर्चा करताहेत.. अहो पण मी म्हणतो की समजा असेल ही बातमी खरी तर त्यात इतका गहजब करण्याजोगं काय आहे? स्वामींना काही भावना नाहीत? असेल त्यांचा त्या रंजिता शिष्येवर अंमळ लोभ.. आणि म्हणूनच तिच्यावर विशेष अनुग्रह करण्याचे वेगवेगळे मार्ग ते अवलंबत असतील! कुणी सांगावं?! :)
पाहा बरं किती छान शिक्षण सुरू आहे ते! ;)
आणि अहो आमची रंजिता तर आहेच छान, अगदी कुणालाही आवडावी अशी.. छानच दिसते ब्वॉ! अंगापिंडाने सशक्त, तारुण्याने मुसमुसलेली आणि अगदी उफाड्याची! :)
तर मला सांगा, असं काय मोठं विशेष चुकलं हो आपल्या नित्त्यानंद स्वामींचं?! :)
हे स्कँडल खरं की खोटं?
खरं असल्यास आपल्याला हे कितपत गंभीर वाटतं? की यात काही विशेष गैर नाही असं आपलं म्हणणं आहे? :)
होऊ द्यात पाहू अंमळ विस्तृत आणि साधकबाधक चर्चा! :)
धन्यवाद,
आपला,
स्वामी तात्यानंद!
देवासकरांची कोठी,
इंदौर.
प्रतिक्रिया
21 Apr 2010 - 10:48 pm | पक्या
स्वामींना भावना आहेत तर त्यांनी रितसर लग्न का केले नाही? हे सर्व लपूनछपून कशाला ? मी असं ऐकलं आहे की रंजिता ला लग्न करायचे होते त्यांच्याशी पण स्वामीना त्यांचे पद सोडावे लागेल म्हणून त्यांनी नकार दिला. तेव्हा तिनेच हे त्यांचे स्टिंग ऑपरेशन घडवून आणले.
'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' असे म्हटले जाते . स्वामीजींची लोकांसाठी शिकवण आणी त्यांची स्वतःची वर्तणूक ह्यात जर तफावत असेल तर लोकांनी केलेला गहजब योग्यच म्हणावा लागेल.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
21 Apr 2010 - 11:02 pm | टारझन
आपण कोणत्या येर्या गबाळ्या स्वाम्याला डॉस्क्यावर बशिवलाच नव्हता ... त्याला आपण लोकाईले चुत्या बनवनार्या स्मार्ट भोंदुबाबाचाच दर्जा दिला हुता. .. तवा बाबा चा बाबु कमाल दाखवत आसल यात आश्चर्य ते काय ? उगा नको त्या गोष्टीन्ला म्हत्व देत्यात ती न्युज चॅनल वाली .. आणि ते उराव घेत्यात ती येडी लोकं ... :)
- बंभोले बाबा बाबुवाले उर्फ पेटिकोट बाबा
21 Apr 2010 - 11:20 pm | इंटरनेटस्नेही
=)) "बाबा चा बाबु"
ही ही ही....
21 Apr 2010 - 11:23 pm | चित्रगुप्त
शिव शिव.... अरे कुणी तुळशीची पाने आणून द्यारे, पाण्यात टाकून डोळे धुवायला....
हे असलं काही बघितल्यावर आणखी काय करणार?
आपल्या पुराणातल्या काही (सर्वच नव्हे...) तपस्वी ऋषिमुनींच्या पावलावर पाऊल टाकून चाललेत हे नित्य-आनंद....
यात त्यांना 'परमानंद' झाला असेल.....
आता मात्र आनंद ओसरून परमा तेवढा राहिला कि काय?
ही देवासकारांची कोठी नेमकी कोणती? आम्हीही इंन्दौरचे म्हणून विचारतो...
21 Apr 2010 - 11:29 pm | विसोबा खेचर
ही बापुभैय्या देवासकरांची कोठी.. 'तुझे आहे तुजपाशी'मध्ये आमच्या भाईकाकांनी बांधलेली..
आता तिथे आम्ही राहतो. मनाने..!
तात्याभैय्या देवासकर.
22 Apr 2010 - 5:03 pm | भोचक
ते मनाचं वगैरे सोडून द्या. किमान 'सशरीर' तरी या. सराफ्यात जाऊन हादडूया. वाट पहातोय. :H :-H :
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
21 Apr 2010 - 11:31 pm | टारझन
हॅहॅहॅ ... दुव्याबद्दल धन्यवाद गुप्ता साहेब :)
- पित्रमुक्त
21 Apr 2010 - 11:43 pm | आनंदयात्री
आयटम अंमळ दणका आहे.
22 Apr 2010 - 12:28 am | II विकास II
स्वामी नित्त्यानंद, स्वामी तात्यानंद आणि आपली रंजिता... :)
आपली शब्द पाहुन अंमळ मौज वाटली.
जुन्या ग्रंथात काही तरी प्रायश्चित्त असेलच ना, ते घेतले की झाले. कशाला इतकी चिंता असो.
रजिंताचे वय जर बाबापेक्षा जास्त वाटते. असो.
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
22 Apr 2010 - 5:43 am | प्रभो
बराच वेळ आहे का तात्या...??
रौशनीच्या चार लायनी तरी सरकवा की पुढं...
22 Apr 2010 - 11:43 am | shweta
छान लिहिलस रे प्रभो.
22 Apr 2010 - 8:32 am | पाषाणभेद
स्वामी नाडीपरिक्षण करण्यात कमी पडले की काय? नाही ते ही दक्षिणेकडचेच आहेत अन त्यांना नाडी बद्दल माहिती असेलच.

डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
22 Apr 2010 - 11:17 am | चिरोटा
कसली नाडी?त्यांनी मठाचीच माडी बनवली होती असे जाणकार सांगतात!!
. हिमाचलात स्वामीची काल गचांडी धरली ते बरे झाले.वर म्हंटल्याप्रमाणे स्वतःला स्वामी म्हणवून घेत असताना असले चाळे करणे निषिद्ध होय.
भेंडी
P = NP
22 Apr 2010 - 11:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
रोजच्यारोज मुख्य पानावर बाया दाखवून आणखी एक असलाच धागा? याच विषयावर खरोखर चर्चा करायची होती तर 'पेज थ्री' स्टाईलऐवजी चर्चाविषय नीट मांडता आला असता.
अदिती.
अवांतर मजकूर उडवला आहे..
-- तात्या अभ्यंकर.
22 Apr 2010 - 11:28 am | नीधप
आदितीशी सहमत.
संपूर्ण टिप्पणी चीप वाटली.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
22 Apr 2010 - 12:36 pm | टारझन
=)) साधारण वर्षभरापुर्वी "चीप" ह्या शब्दाची मिपावर मुक्तहस्ते झालेली उधळण आठवली =)) तेंव्हा चीप हा शब्द किती "चीप" आहे ह्याची जाणिव झाली होती हा भाग अलहिदा =))
- टी
22 Apr 2010 - 3:35 pm | नीधप
तेंव्हा चीप हा शब्द किती "चीप" आहे ह्याची जाणिव झाली होती हा भाग अलहिदा<<
हो आता मिपावर तो खूपच वेळा वापरायला लागतो त्याला कोण काय करणार.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
23 Apr 2010 - 2:05 am | निस्का
अदितीशी सहमत.
'अवांतर' मजकूर उडवला आहे' 8|
नि...
22 Apr 2010 - 11:42 am | II विकास II
# मौजमजा
== लेख मौजमजा ह्या सदरात असल्याचे लोकांनी लक्षात घेतलेले दिसत नाही.
बाकी हा विषय अगदी वेळ घालवण्यासाठी चांगला आहे.
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
22 Apr 2010 - 3:39 pm | यशोधरा
अदिती, पूर्ण सहमत आहे.
22 Apr 2010 - 4:04 pm | छोटा डॉन
*** सर्व संपादकांना निवेदन ****
आम्ही अदितीच्या प्रतिसादाला देत असलेला एक काही आक्षेपार्ह्य ( इन जनरल, आता कुणाची वैयक्तिक मते काय असतील ह्याचे काही ठोकताळे नाहीत ) नसताना वारंवार उडत आहे ...
कारण कळु शकेल काय ?
आणिबाणी संपली असे जाहीर केले असल्याने आम्हाला किमान तेवढा हक्क आहे ...
ह्या वेळी प्रतिक्रिया उडवताना किमान कारण देण्याची तसदी घेण्यात हावी ही सुज्ञ अपेक्षा.
अवांतर : हाच मजकुर सर्व संपादकांना व्यनीने पाठवत आहे.
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
22 Apr 2010 - 5:26 pm | इनोबा म्हणे
इतके दिवस मिपावर राहूनही 'स्पष्टीकरण देण्यास कुणी बांधील नाही' ही साधी गोष्ट तुम्हाला कळू नये याचे आश्चर्य वाटले डॉनराव. बाकी चालू दे!
बाय द वे, जसा ढकलपत्रातून आलेले साहित्य प्रकाशित न करण्याबाबतचा नियम आहे तसा इंटरनेटवरुन कुठल्याही परवानगीशिवाय उचललेल्या (चोरलेल्या, ढापलेल्या) छायाचित्रांबाबत काही नियम अस्तित्वात आहे काय? नसेल तर आम्ही नविन लेखमालिका चालू करावी म्हणतोय.
23 Apr 2010 - 2:36 pm | II विकास II
श्री डॉन, आम्हीही असेच काही प्रश्न विचारले आहेत.
--
७. संपादक हे कोणाला उत्तरदायी असणार का? त्यांनी केलेल्या निर्णयावर अपील असे काही प्रकार ठेवायचा विचार आहे का?
८ . बरेचदा एका संपादकाला एखादी गोष्ट चुकीचे वाटत नाही आणि दुसर्याला वाटते ह्यात लेखकाची वाट लागते, ह्यावर काही उपाय योजना करण्याचा विचार आहे का?
--
असो. आम्ही काही प्रश्न विचारले, त्यातील काही मुद्दे पुन्हा इतर मार्गांनी विचारले गेले, हे पाहुन खुप आंनद झाला. असो.
--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
23 Apr 2010 - 1:56 am | सुरेखा पुणेकर
अवांतर मजकूर उडवला आहे..
-- तात्या अभ्यंकर.
बोंबला!!! संपादन सोडलस का न्हाइस रे तात्या.
येक काय ते ठरीव.
-- सुरेखा
कारभारी दमानं.....
22 Apr 2010 - 11:56 am | अविनाशकुलकर्णी
दु:साहसा बद्दल क्षमा.....मालक
_________________________________________________

22 Apr 2010 - 12:12 pm | मितभाषी
=)) =))
भावश्या भयंकर.
22 Apr 2010 - 2:41 pm | विसोबा खेचर
जबरा... :)
23 Apr 2010 - 2:03 am | सुचेल तसं
अविनाशराव फुल फॉर्ममधे!!!! :-)
चित्रात फोटू बदलला तसा ओरिजनल विडीओमधे पण बदलून इथे लिंक द्या ....;)
23 Apr 2010 - 8:17 am | II विकास II
>>चित्रात फोटू बदलला तसा ओरिजनल विडीओमधे पण बदलून इथे लिंक द्या ....
तात्याचे काही खरे नाही.
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
22 Apr 2010 - 12:07 pm | निरन्जन वहालेकर
" वासनेच्या घरांतच महात्मेही वसतात
महात्म्यांचे पाय सुद्धा मातीचेच असतात " ! !
22 Apr 2010 - 2:32 pm | आम्हाघरीधन
ललनेला भुलले होते ऋषी मुनीही तिथे या नित्यानंदाची काय कथा........
बा बा बा कसोटी चे वेड भल्याभल्यांना घेवुन बुडाले आहे.
बा ई
बा ट्ली
बा जी
बाबाबा कसोटीने नित्य आनंद मिळविणारा......
22 Apr 2010 - 3:40 pm | sagarparadkar
This person has one aashram in Redmond, Washington; near Seattle city. However he has advertised it as a mere Hindu Temple. So naturally hindu people near the city visit it for dew-darshan.
While I visited this temple for mere dew-darshan and out of curiousity, I found that the deities were there as usual, but the entire temple was full of this Nityaanand's photos in various strange poses. Strange because, I had never seen a sage of such an age-group looking mischievously from a jungle of long curley hair with his hands folded as for Namaskara ....
His followers were advertising his specisalized courses, and were telling any rubbish things and making tall claims about his spiritual abilities.
Naturally I was doubtful about his calibre in spirituality in the first place. A strange irritative feeling had started occupying my mind. I mentioned to my friends that something is wrong with this fellow and his cult followers, and left that place immediately.
After reading his news few weeks back, I realized the cause behind that strange uneasy feeling.
The reason writing this here is that: Some of the foreigners who want to criticize everything that is Indian, always point towards such hopeless fellows as a proof to their theory, and endorse negative publicity about India and Indians, due to such kind of people.
23 Apr 2010 - 2:05 am | सुचेल तसं
दोस्ता इथे विंग्रजी कोणालाच येत नाही बघ. अनुवाद करून मराठीत टाक ना!!
23 Apr 2010 - 11:59 am | Pain
good job !
23 Apr 2010 - 11:48 am | sagarparadkar
अहो मी मराथीतच पाथ्वय्चा प्रयत्न कर्तोय पन बघा ना काय होतय ते ...