शिक्षण-प्रयोग-स्वप्ननगरीच्या धरतीवर, स्वप्न साकार होई पर्यंत

संजीव नाईक's picture
संजीव नाईक in काथ्याकूट
23 Mar 2008 - 10:08 am
गाभा: 

भावधारा अकॅडमी
शिक्षण-प्रयोग-क्रेन्द्र
स्वप्ननगरीच्या धरतीवर, स्वप्न साकार होई पर्यंत
जो जीवन-सुखाच्या शोधात आहे. ज्याला दु:ख नकोय. जीवन जन्मतः पराश्रित आहे, म्हणून सुखी कसं व्हायचं आणि दु:खाला बाजूस कसं सारायचं -- जाणता, अजाणता प्रत्येकाच्या जीवनाचे सतत हेच चिंतन किंवा प्रयत्न सुरू आहेत.
शिक्षण हेच जीवनाला सशक्त करते. त्याला पराधीनते पासून मुक्त करून स्वाधीन बनविते. नंतरच एक सार्थक तसेच सुखी जीवन अस्तित्वात येते.
शिक्षण म्हणजे काय? प्रत्यक्ष किंवा परोक्ष रूपाने कला संपादन करणे हेच शिक्षण होय. बाळपणात घरी आई- वडील हे संस्कार करतात, नंतर शाळेत मास्तर शिकवतात.
पण शिकवायचे काय आणि कसे -- हे पुरातन कालापासून एक मोठे आव्हान आहे. विज्ञान तसेच तांत्रिक ज्ञानामध्ये एवढी अफाट प्रगती होऊन सुद्धा जीवन त्रस्त आहे.
म्हणून, "भावधारा अकॅडमी" ह्या नावा खाली आम्ही प्रयत्न करतो आहोत, एक असं नियोजनबद्ध शैक्षणिक तत्त्वदर्शन. तसेच असे कार्यक्रम घडवायचेत की ज्याच्यामुळे स्वाधीनता साकार होऊ शकेल आणि पराधीनता संपुष्टात येईल. तसेच सुख साकार होईल आणि दु:ख नाहीसे होईल.
सामान्य भाषेत, एका शिक्षित माणसाला स्वाधीन असलं पाहिजे, त्याला रोजगाराच्या शोधात न राहून स्वयं-रोजगार निर्माण करता आला पाहिजे. आज असं सहजासहजी होत नाहीये.
भावधारा अकादमी सद्या आपल्या महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी-बहुल चंदनसार ( ता. वसई ) गावात इंग्रजी माध्यमाची एक पूर्व प्राथमिक तसेच प्राथमिक शाळा चालविते. ही शाळा इयत्ता पाचवी पर्यंत आहे. शाळेत मुले आणि मुली मिळून एकूण १५४ विद्यार्थी शिक्षण घेतात.
पण जागेच्या अभावी आम्ही अपेक्षित शैक्षणिक प्रयोग तसेच प्रगती करू शकत नाही आहोत. त्यासाठी आम्हाला जास्त मोठी जागा आणि सोयी हव्या आहेत.
स्वप्न मोठी आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी फक्त जीवन - दर्शन व त्याच्याकरिता समर्पितपणे काम करण्याची तयारी सोडून आमच्याकडे फार जास्त काहीच नाहीये.
म्हणून आम्हाला हव्या आहेत अजून काही गोष्टीं --
१) कमीत कमी पंचवीस एकर जागा -- शहराच्या गर्दीपासून दूर, तरीही विकसित नगराच्या शेजारी.
२) आवश्यक साधन - सामुग्री -- वर्ग चालविण्याकरिता तसेच राहण्या आणि खाण्या-पिण्याकरिता खोल्या आणि तसेच विद्यार्थ्यांना स्वाश्रित बनविण्याकरिता आवश्यक उपक्रमांसाठी विविध सोयी.
३) पन्नास मासिक शिष्यवृत्या त्यासाठी शुल्क प्रत्येकी रु. ५०००/- ( ह्यामध्ये अद्ययावत बोर्डिंग शाळेत मिळणार्‍या सर्व सोयी-सुविधा समाविष्ट आहेत. ) ज्याच्यामुळे संस्थेचे खर्च भागतील. संस्था स्वावलंबी होई पर्यंत ही गरज लागेल.
आम्ही विनंती करतो की आपण ह्याच्यात सहभागी व्हावे. सद्या चालू असलेल्या अकादमीला भेट देऊन खात्री करून घ्यावी की आमच्या अंगी स्वप्न साकार करण्याचा निर्धार आहे की नाही. ह्यासाठी आपण आमच्या अकादमीला भेट द्यावी असे आग्रहाचे आमंत्रण .
संस्थेला दिलेली देणगी आयकर अधिनियम ८०-जी खाली करमुक्त आहे.
संपर्क :- भावधारा अकॅडमी, कातकरीपाडा, चंदनसार, विरार पूर्व, ता. वसई, जिल्हा ठाणे ४०१३०५.
दूरध्वनी क्र. ०२५०-२५२४५६७ १०.०० ते १६.०० (लीलाधर पिरसाली)
९४२३०८६७६३ / ९८६९००८२६३ (संजिव नाईक )
E-mail:- bhadhara_academy@sancharnet.in or astro@sancharnet.in
मराठीत प्रस्तुती करण्यास प्रवृत्त करण्याकरिता मा. तात्या अभ्यंकर, मा. प्रमोद काकांस मन:पूर्वक धन्यवाद !