गाभा:
समजा पृथ्वी फिरायची थांबली तर ...
समजा पृथ्वी ४ वाजता एकदमच थांबली ...तर तुमच्याइथे कायम ४ च वाजलेले असणार .
मग तुम्हाला अशी कोणती वेळ आवडेल - जी आयुष्यभर तुमची साथ करेल ? अन का ?
कोणाला पहाटेची वेळ आवडेल , कोणाला सूर्यास्त ...
तुमची आवड काय ?
बाकी पृथ्वी थांबल्यामुळे वातावरणावर होणारे परिणाम , त्याचा कुंडल्यावर होणारा परिणाम, नाड्यावर होणारा परिणाम
यासाठी आपण स्वतंत्र धागा काढू ...
प्रतिक्रिया
19 Apr 2010 - 1:44 pm | मेघवेडा
>> कोणाला पहाटेची वेळ आवडेल , कोणाला सूर्यास्त ...
कुणालाही कायम एकाच वेळेत राहायला आवडेल काय?? कुणाला सूर्यास्त मोहक वाटतो कुणाला सूर्योदय! पण २४ तास ३६५ दिवस एकाच वेळेत राहायचं म्हणजे जरा कठीणच आहे! विचारा त्या नॉर्वेकडच्या लोकांना.. तुम्ही म्हणता तसं झालंच तर माझ्या मते लोक जगभर फिरू लागतील.. कारण बदल हा आवश्यक आहे. आज मला सूर्योदयाची वेळ भावते पण कायम त्याच वेळेत जगणं कठीण आहे! काही काळानंतर रणरणती उन्हंही हवीतच.. काही काळानंतर शांत शीतल संध्या हवीच! आणि काही काळानंतर रात्रही हवीच! तेव्हा समजा पृथ्वी जर थांबलीच (भारतात स. ७ वा. असं गृहीत धरू) तर भारत एक 'मॉर्निंग टूरिस्ट डेस्टिनेशन', इंग्लंड एक 'मिडनाईट टूरिस्ट डेस्टिनेशन', ऑस्ट्रेलिया एक 'मिडडे टूरिस्ट डेस्टिनेशन' आणि अमेरिका एक 'इव्हनिंग टूरिस्ट डेस्टिनेशन' म्हणून प्रसिद्ध होतील!!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
19 Apr 2010 - 2:07 pm | डावखुरा
कहीपण....
आता कसं वाटतंय .....गार गार वाटतंय....!!!
"राजे!"
19 Apr 2010 - 5:01 pm | फ्रॅक्चर बंड्या
मेघवेडा तुमच्याशी सहमत...
पण लोकांना कोणती वेळ जास्त आवडते हे जाणुन घ्यायला आवडेल...
आणखी एक मला स्वता:ला पावसाळा जरी आवडत असला तरी त्याची मजा खरी उन्हाळ्यानंतरच ... तसेच काहितरी...
तेव्हा समजा पृथ्वी जर थांबलीच (भारतात स. ७ वा. असं गृहीत धरू) तर भारत एक 'मॉर्निंग टूरिस्ट डेस्टिनेशन', इंग्लंड एक 'मिडनाईट टूरिस्ट डेस्टिनेशन', ऑस्ट्रेलिया एक 'मिडडे टूरिस्ट डेस्टिनेशन' आणि अमेरिका एक 'इव्हनिंग टूरिस्ट डेस्टिनेशन' म्हणून प्रसिद्ध होतील!!
छान आहे -असा विचार नाही आला डोक्यात ...
binarybandya™
19 Apr 2010 - 5:04 pm | फ्रॅक्चर बंड्या
@लालसा-- जरा विचार करा की ...
खरेच काही कारणाने थांबली पृथ्वी फिरायची तर ???
binarybandya™
19 Apr 2010 - 7:07 pm | डावखुरा
खरेच काही कारणाने थांबली पृथ्वी फिरायची तर ???
आले जीवन चक्रही थांबेलना राव.....
"राजे!"
19 Apr 2010 - 5:08 pm | बेभान
टांगा पलटी घोडं फरार..(नाद खुळाच्या अभुतपूर्व यशाच्या आधीचा शब्दप्रयोग. उगमः कोल्हापूर)
19 Apr 2010 - 6:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पृथ्वी सूर्याभोवती फिरायची थांबली का स्वतःभोवती फिरायची थांबली तर ....
अदिती
19 Apr 2010 - 6:14 pm | नितिन थत्ते
>>पृथ्वी सूर्याभोवती फिरायची थांबली का स्वतःभोवती फिरायची थांबली तर ....
हॅ हॅ हॅ. पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून सूर्य पृथ्वीभोवती रोज एक फेरी मारतो हे आम्ही अनेक ग्रंथांतून सांगूनही तुमचे आपले पालुपद चालूच ....
(जे डोळ्यांनी दिसते ते मानायचे नाही आणि भलतेच तर्क लढवायचे याला काय म्हणावे?)
नितिन थत्ते
20 Apr 2010 - 10:38 am | फ्रॅक्चर बंड्या
स्वतःभोवती फिरायची थांबली तर ???
binarybandya™
19 Apr 2010 - 6:29 pm | शुचि
कुणाकडे कुसुमाग्रजांची "पृथ्वीचे प्रेमगीत" कविता आहे का?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.
20 Apr 2010 - 1:37 am | मेघवेडा
आपल्याकडे रेशन कार्डाच्या मलपृष्ठावर ते छापलेलं असतं असं ऐकलं होतं! :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
20 Apr 2010 - 8:15 am | पाषाणभेद
रेशन कार्ड तुम्ही बर्याच दिवसात वापरलेले नाही असे दिसते.
रेशन कार्डवर 'गरीबांना (सरकारी लोकांनी) लुबाडू नका' अशा अर्थाची कविता आहे.
पुर्ण पोट भरले की प्रेमबीम सुचते. त्यामुळे रेशनकार्ड वर असल्या प्रेमाच्या कविता येणार नाही.
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
20 Apr 2010 - 1:53 pm | मेघवेडा
मग पूर्वी असायची का??
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
19 Apr 2010 - 7:19 pm | विकास
...तर तुमच्याइथे कायम ४ च वाजलेले असणार .
याचा अर्थ, पृथ्वी स्वतःभोवती फिरायची थांबली असा होतो. मात्र ते पहायला आपण पृथ्वीवर तसेच त्याच ठिकाणी राहीलो, तर न्यूटन आपण पहीला सिद्धांत मांडताना घोडचूक केली असे वाटून ढसाढसा रडत बसेल असे वाटते. :? (तो अर्थात सध्या कुठे आहे ते माहीत नाही!)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
20 Apr 2010 - 9:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
वरच्या एका प्रतिसादात धागाप्रवर्तकाचं असंही एक वाक्य आहे: "आणखी एक मला स्वता:ला पावसाळा जरी आवडत असला तरी त्याची मजा खरी उन्हाळ्यानंतरच ... तसेच काहितरी..."
त्यामुळे मला प्रश्न पडला.
@राजेशः भारतात संध्याकाळी साडेपाचचा सुमार, पण कोणत्या महिन्यात्/ऋतूत? सध्या संध्याकाळी साडेपाचलाही बाहेर पडताना त्रास होतो आहे.
(ऑफिसकोंबडी) अदिती
20 Apr 2010 - 10:08 am | राजेश घासकडवी
एवढा पृथ्वी बदलण्याचाच चॉईस असेल तर मी इटली वगैरेसारख्या भूमध्यसागरी हवामानात जाईन म्हणतो. (दक्षिण कॅलिफोर्निया काही अगदीच वाईट नाही)
भारतातलेच संदर्भ द्यायचे असतील तर ७ जूनची हवा आवडेल. कधी पाऊस पडेल, कधी नुसती हुरहूर असेल...किंवा एकदम सप्टेंबरमधलं हिरवंकंच माथेरान, किंवा जुलैमधलं मनाली...
च्यामारी, फारच चॉईस झाले... शेवटी तेच तेच असण्याचा कंटाळा येतो हेच खरं. मला यातलं सगळंच थोडं थोडं मिळेल का?
20 Apr 2010 - 10:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
यगजॅक्टली! म्हणूनतर मूळ प्रश्नाला उत्तर देत नव्हते ना!!
बाकी ते हिरवंकंच माथेरान वगैरे बोलू नका हो, इथे आधीच उन्हाळा त्यातून वीजटंचाई!
अदिती
19 Apr 2010 - 8:48 pm | टारझन
ज्याच्या इथं कायमचे १२ वाजलेले असतील त्याचे विचार जाणुन घ्यायची इच्छा आहे. :)
19 Apr 2010 - 10:58 pm | भारद्वाज
अमृता खानविलकर 'वाजले की १२' वर नाचून नाचून नाचून नाचून नाचून नाचून नाचून नाचून.....
नवी मुंबईकर
19 Apr 2010 - 11:02 pm | टारझन
हाहाहा ... अमृता नं त्या "वाजले की १२" वर डॅण्स चा ऑव्हरडोस केला असला तरी ती आम्हाला आवडते :)
- टारेश बारावाजवी
19 Apr 2010 - 9:10 pm | धनंजय
सूर्य आकाशात फिरायचा थांबला, तर आकाशात ज्या कुठल्या ठिकाणी थांबेल, ते ठिकाण माझ्यासाठी अतिशय अप्रिय होईल.
मात्र त्यातल्या त्यात संधिकाल बरा. प्रभात किंवा सांज. सूर्य क्षितिजाच्या अर्धवट वरती असावा.
सूर्य खूप काळ क्षितिजावरच संधिप्रकाश देत राहाण्याचा अनुभव ध्रुवप्रदेशाजवळ येतो. काहीतरी करून तिथल्या लोकांचे आयुष्य सुसह्य असते. तसेच म्हणतो आहे.
20 Apr 2010 - 2:37 pm | बिपिन कार्यकर्ते
मात्र त्यातल्या त्यात संधिकाल बरा. प्रभात किंवा सांज. सूर्य क्षितिजाच्या अर्धवट वरती असावा.
पहाटे पहाटे अगदी उजाडू पाहात असतं तेव्हा अकारण उदात्त वगैरे वाटतं, पण संध्याकाळी मात्र एक विलक्षण अनाम हूरहूर लागते... झाडावरच्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने तर त्यात अजून भर पडते... परदेशात असताना अशा वेळी सहसा बाहेर पडणे टाळतो. होमसिकनेस बळावतो त्या वेळी... :(
बिपिन कार्यकर्ते
19 Apr 2010 - 9:40 pm | Nile
चीरनिद्रा घेईन म्हणतो, आज ना उद्या घ्यायचीच आहे की.
19 Apr 2010 - 10:37 pm | सुधीर१३७
नावातला "फ्रॅक्चर" खर्रा............... होईल..... ;) @) >:P :D
20 Apr 2010 - 12:37 am | राजेश घासकडवी
पृथ्वी थांबली का या प्रश्नापेक्षा कुठच्या वेळेत आपल्याला कायम स्वरूपात राहायला आवडेल असा प्रश्न आहे...(बाकी पृथ्वी थांबण्याऐवजी तिचा परिवलनाचा व परिभ्रमणाचा दर एकच झाला तरी हे होईल... मग न्यूटनसुद्धा थडग्यात वळणार नाही... थोडा जड झाल्याने ते कठीणच होईल म्हणा)
मला संध्याकाळी साडेचारच्या सुमाराला जो मंद प्रकाश इथे असतो तो आवडतो. (भारतात बहुधा साडेपाचच्या सुमाराला). ढगाळ हवेतून सूर्य बाहेर आला न आला असा असताना कधी चंदेरी-सोनेरी 'सांज अहाहा तो उघडे' असा प्रकाश पडतो. तो जादूई असतो.
सकाळच्या तशा प्रकाशात कधी धुकं पडलं की तो आणखीनच गूढ होतो.
20 Apr 2010 - 1:15 am | खादाड_बोका
कोणी ही जिवंत राहणार नाही रे बाबा. कशाला नुसता विचारही नाही करायचा रे ~X( ~X(
मला तर स्वप्नातही भुक लागते....
20 Apr 2010 - 1:32 pm | कवितानागेश
प्रुथ्वी थाम्बली तर मि सरळ 'मन्गळ' पकडेन!
'वेळ' कुठलीही का असेना, मुम्बईकराना वेळ कुठे आहे थाम्बायला?
============
आशावादी मुम्बईकर माउ
20 Apr 2010 - 5:22 pm | आम्हाघरीधन
प्रुथ्वी थांबली तर आपला सर्वांचा पगार बंद होईल...... दिवस कसे मोजणार(म्हणजे ऑफिसच्या भाषेत ..ढकलणार)? :)
कल्पना पण नकोशी वाटते.....