पालक पुरी

मीली's picture
मीली in पाककृती
17 Apr 2010 - 8:05 am

जिन्नस :-
गव्हाचे पीठ ६ वाट्या
चण्याच्या डाळी चे पीठ १ वाटी
तिखट, मिठ, हळद, ओवा चवीप्रमाणे
लसुण पेस्ट १ चमचा
मिर्ची कोथिंबीर पेस्ट २ चमचे धने, जिरे पुड १/२ चमचा प्रत्येकी
१ पालक जुडी ,मळताना लागेल इतके पाणी

मार्गदर्शन :-
सर्वात प्रथम गव्हाचे पीठ व चण्याचे पीठ एकत्र करावे. त्यात वरील सर्व जिन्नस घालावे.
पालकाची जुडी धुवून पेस्ट करून घ्यावी व कणिक मळून घ्यावी तेल लावून ५ मिनीटे झाकून ठेवावी.
छोटा गोळा घेवून पुरी लाटावी व खरपुस तळावी.

टीपा :-
सारख्या आकाराच्या पुरया हव्या असल्यास वाटी वापरता येते.
पुरी तळून झाल्यावर टिपकागदा वर ठेवावी म्हणजे पुऱी तेलगट लागणार नाही.
तळण नको असल्यास घडीच्या पोळी सारखे लाटल्यास पालक दशमी होते.
प्रवासात मुलांना द्यायला उत्तम! सोबत लसुण चटणी, लोणचे आणी कांदा असेल तर मस्तच !

प्रतिक्रिया

झुम्बर's picture

17 Apr 2010 - 10:18 am | झुम्बर

यात मळताना थोडे तेलाचे मोहन घातल्यास पुर्या खमंग होतील .....
तळताना तेलात थोडी साखर घालावी म्हणजे पुर्या टम्म फुगतील ...
बाकी पाकृ छान ....

पर्नल नेने मराठे's picture

17 Apr 2010 - 10:48 am | पर्नल नेने मराठे

एक चमचा रवा घातल्यास पुर्या अजुन टम्म फुगतील ...

चुचु

खादाड's picture

17 Apr 2010 - 1:28 pm | खादाड

कीती ट्म्म फुगवाल तायान्नो ?
;)

रेवती's picture

18 Apr 2010 - 6:35 am | रेवती

हेहेहे!:)
छान पाकृचा छान प्रतिसाद!

रेवती

मदनबाण's picture

17 Apr 2010 - 1:40 pm | मदनबाण

हा,,,आत्ता कसं...फोटु बिगर पाकृ उघडायला मजाच नाय !!! :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

अरुंधती's picture

17 Apr 2010 - 1:44 pm | अरुंधती

हिरव्या टम्म्म्म्म पुर्‍या आणि सोबत कैरीचे ताजे लोणचे..... यम्म्म! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

इंटरनेटस्नेही's picture

18 Apr 2010 - 1:55 am | इंटरनेटस्नेही

दह्या सोबत पण छान लागेल...

(कल्पनाविलासी) इंटरनेट्प्रेमी.

चित्रा's picture

18 Apr 2010 - 6:52 am | चित्रा

ओव्याची चव छानच येईल. धन्यवाद.

मीली's picture

20 Apr 2010 - 2:21 am | मीली

प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार!
सल्ल्यानुसार पुर्या अजून टम्म फुगवायचा प्रयत्न करेल नक्की.तो पर्यंत ह्यावर ताव मारायला आपली हरकत नसावी.
हा पण प्रतिसाद वाचून उत्साह नक्की वाढला.

प्राजु's picture

20 Apr 2010 - 2:24 am | प्राजु

तुफ्फान फोटो आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/