कृपया मार्गदर्शन करावे

babadi manjar's picture
babadi manjar in पाककृती
16 Apr 2010 - 10:53 pm

अमेरिके सारख्या थंड देशात कडधान्य ला मोड कशी आणायची हे कोणी सुचवू शकेल का ?
बरेच उपाय करून बघितले यश आले नाही .

प्रतिक्रिया

शुचि's picture

16 Apr 2010 - 10:56 pm | शुचि

ओव्हन थंड असताना, त्यात ओल्या कपड्यात भीजवून कडधान्य ठेवलं तर मोड येत नाही का? तिथे साधारण ऊब असते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

babadi manjar's picture

16 Apr 2010 - 11:00 pm | babadi manjar

नाही न उलट खूप दिवस ठेवले तर सडून गेले आणि सगळेच वाया गेले

प्राजक्त's picture

16 Apr 2010 - 11:09 pm | प्राजक्त

नेहमी प्रमाणे कपड्यात बांधून कूकर मधे ठेवावे व कूकरचे झाकण बंद करावे.१०/१२ तासात छान मोड येतात.

चित्रा's picture

18 Apr 2010 - 8:04 pm | चित्रा

नेहमी प्रमाणे कपड्यात बांधून कूकर मधे ठेवावे व कूकरचे झाकण बंद करावे.१०/१२ तासात छान मोड येतात.

फक्त शिट्टी वाजवायची नाही इतके लक्षात ठेवा. ;)

II विकास II's picture

18 Apr 2010 - 8:07 pm | II विकास II

>>१०/१२ तासात छान मोड येतात.
१०/१२ तास उभे राहुन शिट्टीची थरथर पहायची का? ;)

अश्विनीका's picture

16 Apr 2010 - 11:12 pm | अश्विनीका

स्प्राऊट मेकर नावाचे एक भांडे मिळते. त्याच्या आत अजुन एक बाहेरील भांड्यापेक्षा जरा लहान साईज चे भांडे असते. आणि ते जाळीचे असते.

मी अजून स्प्राउट मेकर घेतला नाहीये कारण अमेरिकेत असूनही मला हा प्रश्न कधी पडला नाही. मी काय करते - एका भांड्यात मटकी , मूग वगैरे कडधान्ये घेऊन कोमट पेक्षा जरासे गरम अशा पाण्यात भिजत घालते. पाण्याची पातळी कडधान्यापेक्षा जास्त असावी. रात्री भिजत घातले की सकाळपर्यत कडधान्ये छान मऊ होतात. जरासे खाऊन बघितले की कळेल मऊ झाले की नाही. खड्यासारखे कडक लागायला नको. मग हे पाणी काढून टाकून एका चाळणीत २-३ किचन पेपर टॉवेल (टिश्यू पेपर पेक्षा हा पेपर जाड असतो.) टाकून त्यावर कडधान्य घालते. मग परत अजून २-३ किचन पेपर टॉवेल वरून घालून चारी बाजूने झाकायचे. कडधान्यातील पाणी चांगले निथळलेले असावे. ओवन ३ मिनिटे चालू करून ठेवायचा. तापमान वाढवायचे नाही. ३ मिनिटानी ओवन बंद करायचा आणि आत चाळणी ठेवून द्यायची. एक दिवसात मोड आलेले दिसू लागतील. फार फार दीड दिवस. छान लांब लांब मोड येतात. माझ्या कडधान्याला चांगले २-३ इंच लांब मोड येतात. पेपेर टॉवेल ऐवजी सुती कापड ही वापरू शकता. त्यात कडधान्य गाठोड्यासारखे बांधायचे.
मोड आल्यावर लगेच उस़ळ / भाजी करायची नसल्यास कडधान्य फ्रिज मध्ये ठेवायचे नाहीतर ओलसर पणामुळे २ दिवसानंतर बुरशी धरू लागते.
-अश्विनी

दिपाली पाटिल's picture

16 Apr 2010 - 11:46 pm | दिपाली पाटिल

मी पण अगदी असंच करते...हमखास मोड येतात..नसेलच जमत तर अगदी कमी कडधान्य घेउन ट्रायल अ‍ॅन्ड एरर करून बघा...

दिपाली :)

babadi manjar's picture

17 Apr 2010 - 12:10 am | babadi manjar

मी करून बघेन आभारी आहे

babadi manjar's picture

17 Apr 2010 - 12:13 am | babadi manjar

अमेरिकेत नवीन असल्यामुळे बऱ्याच गोष्टी माहित नाही त्यामुळे गोंधळ उडतो .तरीही धन्यवाद

अम्रुताविश्वेश's picture

16 Apr 2010 - 11:54 pm | अम्रुताविश्वेश

मी पण मायक्रोवेव ओवन गार असताना त्यात एका झाकण असलेल्या भान्ड्यात रात्रभर ठेवते. छान मोड येतात.

:)

भानस's picture

17 Apr 2010 - 12:20 am | भानस

चांगले भिजले की टपटपीत फुगते. मग ते निथळून ( पाणी शक्यतो पूर्णपणे काढावे परंतु अगदी खडखडीत करू नये ) पंचाच्या फडक्यात/ हवा जरा खेळती राहील अश्या फडक्यात बांधून ठेवले की मोड येतात. मोड येण्यासाठी दमट पण उबदार व कडधान्याला श्वास घेता येईल असे वातावरण गरजेचे असते. मटकीला मोड आणताना मलाही पूर्वी फार कटकट होई. ( आमच्याकडे वर्षाचे सात महिने जोरदार थंडी ) मटकी निथळून घेतली की काचेच्या/ कुठल्याही भांड्यात झाकण न ठेवता मी ठेवते. दुस~या दिवशी मस्त मोठे मोड येतात. थोडीशी मटकी-मूग घेऊन करून पाहा. आशा आहे मोड येतीलच. कडधान्य फार वेळ घट्ट बांधून ठेवू नये नाहीतर अतिशय कुबट वास येतो.

मिसळपाव's picture

18 Apr 2010 - 7:53 pm | मिसळपाव

...आणि भिजवलेलं कडधान्य त्यात ठेवा. दिव्याची उष्णता पुरेशी होते. (कदाचित तुम्हाला दिवा ३-४ तासानी बंद करावा लागेल - एक - दोनदा प्रयोग केलात कि जमेल)

प्रभाकर पेठकर's picture

20 Apr 2010 - 1:03 am | प्रभाकर पेठकर

मोडाची प्रक्रिया उबदार वातावरणात होते.
रात्रभर भिजवलेले कडधान्य पाणी निथळवून कोमट पाण्यात १० मिनिटे ठेवायचे. नंतर हे कोमट पाणीही पुर्ण निथळवायचे. पण कडधान्याला आलेला उबदारपणा जायच्या आत पातळ कपड्यात घट्ट बांधून ठेवायचे. घट्ट बांधण्यामागे उद्देश हाच असतो की धान्याच्या दाण्यांमध्ये हवा खेळती राहून उब नाहिशी होऊ नये.
एखाद्या मोठ्या पातेल्यात तळाशी पाणी घालून त्यावर चाळणी पालथी घालायची (पाणी चाळणीच्या जाळीपर्यंत असता कामा नये) त्यावर वरील गाठोडे ठेवायचे आणि मोठ्या पातेल्यावर झाकण ठेवून त्यावर वजन ठेवायचे. गाठोड्यातील उब आणि गाठोड्या बाहेरील आर्द्रता ह्यामुळे लवकर मोड येतात.
फडक्यात बांधण्या ऐवजी थर्मोकोलच्या हवाबंद डब्यातही ठेवून मोड आणता येतात. किंवा प्लॅस्टीकच्या हवाबंद डब्यात ठेवूनही मोड येतात.

कापडाचे गाठोडे किंवा भांडे सारखे सारखे उघडून पाहू नये. ७-८ तास न उघडता उबदार जागी ठेवावे. (फ्रिज मध्ये नाही).

मुगांना चटकन आणि लांब मोड येतात, मटकीला जरा वेळ लागतो, वालांना सर्वात जास्त वेळ लागतो.

मोड आलेल्या वालांना सोलताना मोड आलेले वाल (एकावेळी फक्त वाटीभर) कोमट पाण्यात टाकावेत आणि सोलावेत. सालं लगेच निघतात. एक वाटी सोलून झाले कि पुन्हा नवीन कोमट पाणी घेऊन (कारण आधीचे थंड झालेले असते) त्यात वाटीभर वाल टाकावेत आणि सोलावेत. अशा प्रकारे सर्व वाल कमी श्रमात सोलता येतात.

------------------------------------------------------
विवाहित पुरुषाने कितीही नोकर्‍या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.

खादाड_बोका's picture

20 Apr 2010 - 1:11 am | खादाड_बोका

भिजलेल्या कडधान्यास ओल्या कापडात गुंढाळा. ओव्हन थोडा गरम करुन त्यात ठेवावे. ओव्हन बंद करा, मात्र ओव्हनचा लाईट सुरु ठेवावा. हमखास मोड येतेच.

अनुभवाचे बोल ;)

मला तर स्वप्नातही भुक लागते....

क्रुपया सागावे

मिसळभोक्ता's picture

21 Apr 2010 - 10:00 am | मिसळभोक्ता

मोड आलेलीच धान्ये विकत घ्यावीत. हा एक सोपा उपाय आहे.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

babadi manjar's picture

30 Apr 2010 - 9:50 pm | babadi manjar

अमेरिकेत मोड आलेले धान्य विकत मिळतात असे मला वाटत नाही निदान आम्ही राहतो तिथे तरी नाही,नाहीतर प्रश्नच उदभवला नसता मिसळभोक्ता साहेब ~X(

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Apr 2010 - 10:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

धागा चुकला मिभोकाका, त्यांनी दही बनवण्याची रेसिपी नाही विचारलेली! ;-)

अदिती