गाभा:
रोजचे स्नान ह्याचे नाना प्रकार आहेत...काहि लोक रोज सकाळी अंघोळ करतात तर काहि संध्याकाळी..काहि ना गरम पाण्या शिवाय होत नाहि तर काहि गार पाण्याने अंघोळ करतात...
मला गरम पाण्याने आंघोळ करायला आवडति...
पुण्याला होस्टेल मधे रहात होतो त्या वेळी गरम पाणी हि चैन होति..त्या मुळे वेळ मिळेल तसा गार पाण्याने स्नान करायचो...
कारखान्यात कामाला होतो त्या वेळी शॉप फ्लोअर वर काम असायचे ..अंगावर ऑइल, चे सुक्ष्म फवारे उडायचे..ग्रिज, सा~याने आंग अंबुन जायचे म्हणुन कामावरुन सुटलो कि परत आंघोळ करुन फ्रेश व्हायचो...
माझ्या पहाण्यात असे बरेच स्त्री पुरुष आहेत जे १२ महिने गार पाण्याने स्नान करतात...
आपली स्नानाचि वेळ काय असते? व कसे करता? गरम कि गार पाण्याने?
प्रतिक्रिया
12 Apr 2010 - 7:18 pm | मदनबाण
आपली स्नानाचि वेळ काय असते? >>>
इच्छा होईल तेव्हा...
व कसे करता? >>>
आता सारी दुनिया कपडे काढुनच अंघोळ करते...त्यामुळे म्या जगरीत फॉलो करतो.
गरम कि गार पाण्याने?
उन्हाळ्यात गार...आणि गारव्यात गरम
काय अजुन प्रश्न हाय का ?
म्हणजे साबण कंचा वापरता ?
टावेल वापरता का पंचा ?
उभ्या उभ्या अंघोळ करता की खाली बसुन?
बादली मधल्या पाण्याने की फवार्या खाली ?
चला एका ओळी पेक्षा जास्त टंकल्या हायेत्... त्ये यक ओळचा धागा परवडीत व्हता का ? असा म्या इचार करतोय.
(२ टेम अंघोळ करणारा)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
12 Apr 2010 - 7:10 pm | शुचि
सकाळी आंघोळ न करता ऑफीसात जाणारे काही महाभाग असू शकतात, मी त्यातली नाही. I firmly believe one should rediate freshness least early in the morning. त्यामुळे स्नान आवश्यक.
संध्याकाळी झोप, पूजा आदि गोष्टींची व्यवस्थित पूर्तता होण्यासाठी , संध्याकाळचे स्नान आवश्यक.
जे लोक होलसेल मधे एकाच प्रकारचे साबण विकत घेऊन महीनोंमहीने त्याच सुगंधाचा साबण वापरत बसतात त्यांची मला कीव येते. मला महीन्या / पंधरवड्यानी नवीन सुगंधाची वडी लागते. - चंदन, लव्हेंडर, गुलाब म्हणाल तो : )
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
13 Apr 2010 - 12:23 am | सुचेल तसं
>>माझ्या पहाण्यात असे बरेच स्त्री पुरुष आहेत जे १२ महिने गार पाण्याने स्नान करतात...<<
पहाण्यात म्हणजे? आंघोळ करताना?
>>आपली स्नानाचि वेळ काय असते?
घान वाटायला लागलं की स्नान करतो.
>>कसे करता?<<
जेवढा प्रदेश हाताक्रांत करता येतो तिथपर्यंत साबण लावून स्नान करतो.
>>गरम कि गार पाण्याने?<<
सुरूवातीला पाणी गरम असतं. साबण लावून होऊस्तोवर कोमट होऊन जातं. फारच कंटाळा आला तर आंघोळीची गोळी घेऊन बाहेर येतो.
अजून असे मनोरंजक धागे येऊ द्या - साबण कोणता वापरता? शाम्पू कितीवेळा लावता? आंघोळीला किती वेळ लागतो? आंघोळ करताना गाणी म्हणता की स्तोत्रं म्हणता की गप राहता?
13 Apr 2010 - 10:57 am | केशवराव
असले धागे मिसळ पाव वर टाकून काय मिळते ? [ कि साबणासाठी सर्वे करता ?]