भाषा मराठी..

विवेकवि's picture
विवेकवि in जे न देखे रवी...
22 Mar 2008 - 3:23 pm

मला चा॑गले वाटले म्हणून येथे सादर करत आहे..
सरप॑चानी राग मानु नये..

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढया जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रागते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नादते मराठी

येथल्या फ़ुलाफ़ूलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिदते मराठी
येथल्या वनावनात गुजते मराठी
येथल्या तरुलखात साद्ते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकामधून डोलते मराठी
येथल्या नद्यामधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदाध तख्त फोडते मराठी

मराठी माणसा जागा हो आता तरी...

प्रतिक्रिया

आणिबाणीचा शासनकर्ता's picture

22 Mar 2008 - 5:35 pm | आणिबाणीचा शासनकर्ता

हे वाचावे!

आमच्या सहनशक्तिचा अंत पाहू नये ही विनंती!

-- जनरल डायर.