'होळी'ची 'होली'

भोचक's picture
भोचक in काथ्याकूट
21 Mar 2008 - 6:57 pm
गाभा: 

उत्तर भारतीयांपुढे स्पष्टपणे सांगायचं तर हिंदी भाषिकांपुढे मराठी लोटांगणाचे आणखी आणखी एक उदाहरण. आपल्याकडे होळी वेगळी. त्यानंतर धुळवड आणि मग रंगपंचमी असते. होळीच्या दिवशी रंग खेळत नाही. धुळवडीला विशेषकरून फक्त मुंबईत रंग खेळला जातो. उर्वरित महाराष्ट्रात रंगपंचमीलाच रंग खेळला जातो. पण आता होळीलाच रंगपंचमी साजरी करण्याची 'उत्तर भारतीय' परंपरा आपल्या महाराष्ट्रातही रूजू झाली आहे. त्यामुळे होळीची 'होली' झालीय. वास्तविक आपल्याकडे होळीचा अर्थ जाळणे असा आहे, तोच शब्द उत्तर भारतात रंगांशी संबंधित आहे. 'रंगो की होली' तिकडे असते. आपल्याकडे कागदपत्रांची 'होळी' होते. पण टिव्ही वाहिन्यांनी उत्तरेची होळी आपल्या महाराष्ट्रात आणून ठेवली आणि आम्ही त्यात रंगायला सिद्ध झालो. होळीचे स्वतंत्र अस्तित्व असते हेच विसरलो. एकजात सगळ्या पेपरवाल्यांनी आणि वाहिन्यांनी होळीला 'होली' करून टाकलेय. आपण मुकाट हे सांस्कृतिक आक्रमणही केव्हाच पचवलंय.वर म्हणायचं 'जय महाराष्ट्र'