शाळेतला प्रकल्प: पालकांचे काम- मुलांचे नाव

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in कलादालन
7 Apr 2010 - 9:48 pm

शाळेतला प्रकल्प: पालकांचे काम- मुलांचे नाव
आजकाल शाळांत मुलांना वेगवेगळे प्रकल्प करून आणायला सांगतात. लहान मुले हा प्रकल्प पुर्ण करूच शकत नाहीत. मग पालकांना हातातले काम सोडून ते प्रकल्प पुर्ण करावे लागतात.
उदा. अंध लोकांसाठी पैसे जमा करणे, खरी कमाई, एखादा सायन्स- विज्ञान प्रदर्शन मधला प्रकल्प, क्राफ्ट, पुठ्याचे घर बनवणे, चित्र काढणे आदी.

लहान मुलांना असली न जमणारी कामे ते का देतात ते समजत नाही. शाळेतच चुकीचे का होईना त्या मुलांनच ते प्रकल्प बनवू दिले तर ते जास्त फायदेशीर राहिल. पुन्हा असे सांगाचे वाटते की तो प्रकल्प पुर्ण न झाला तरी हरकत नाही, मुलांनी शाळेत त्यानी स्वत: प्रयत्न करणे महत्वाचे. आपण मदत करतो म्हणजे तो पुर्ण प्रकल्पच पुर्ण करून तो प्रकल्प मुले फक्त शाळेत पोचता करतात.
आता माझ्या मुलाला शाळेत 'उन्हाळ्यावरचे चित्र' काढून आणायला लावले होते. तो दुसरीत आहे. तो लहान लहान चित्रे काढू शकतो. जसे:पतंग, एखादे मुक्तहस्त वैगेरे. पण खुप बारकाईचे मोठे चित्र त्याच्या वयाच्या मुलाला मनाने काढणे शक्य नाही. मग त्याने माझ्या मागे लकडा लागून चित्र पुर्ण करवून घेतले. अर्थात त्या चित्राला बर्‍याच ठिकाणी त्यानेच रंगविले. तोच त्याचा सहभाग म्हणावा लागेल. ते चित्र खाली दिले आहे.

the summer season
the summer season
मी आधी हे चित्र कंटाळ्यामुळे काढणार नव्हतो. पण नंतर मी ते त्याच्या पुस्तकात बघून काढले. (पहा: मी ही मदत घेवूनच चित्र पुर्ण केले ना.) चला या निमीत्ताने का होईना खुप वर्षांनी मी हातात पेन्सिल घेतली अन जुने दिवस आठवले हे काय कमी आहे का?

तुमचा अनुभव काय आहे? तुम्हालाही असला प्रोजेक्ट तुमची मुले देतात काय. जरूर कळवा.

रेखाटन

प्रतिक्रिया

डावखुरा's picture

7 Apr 2010 - 11:25 pm | डावखुरा

हा अनुभव जवळपास सर्व पालकांना असत जरी ते हा प्रकल्प स्वतः करत नसले तरी पण तो त्यांच्याच वर्गात लावला जाउन सर्व मुलांना त्याचा फायदा होतो....
त्या निमित्ताने आपणही मुलांकडे लक्ष देतो.....

आता तुम्ही म्हणाल बाजारात तक्ते मिळतात त्याचा वापर शाळेने करावा....
मान्य पण हाताने बनवलेल्या प्रकल्पाची मजा कही औरच...
मुलाला स्वतःच्या तसेच आपल्या वर्गमित्रांच्या प्रकल्पाबद्दल कुतुहल वाटुन बाजरातील तक्त्या पेक्क्षा नक्कीच जास्त वेळ निरीक्षण करेल...

निरीक्षणातुन व प्रकल्पातुन होणारा अभ्यास पुस्तकातील रट्टेबाजीपेक्षा केव्हाही उत्तमच......राजे

आपण मदत करतो म्हणजे तो पुर्ण प्रकल्पच पुर्ण करून तो प्रकल्प मुले फक्त शाळेत पोचता करतात.
(अवांतरःत्यांना सोडायला जाताना आपल्यालाच तो पोचता करायला लागतो....)

"राजे!"

संदीप चित्रे's picture

7 Apr 2010 - 11:32 pm | संदीप चित्रे

>> तो प्रकल्प पुर्ण न झाला तरी हरकत नाही, मुलांनी शाळेत त्यानी स्वत: प्रयत्न करणे महत्वाचे

इथेच तर सगळी गोची आहे !
आपल्याकडे विषय 'समजून घेण्या'पेक्षा 'पूर्ण करण्यावर' खूप जास्त भर दिला जातो :(

पाषाणभेद's picture

8 Apr 2010 - 4:02 am | पाषाणभेद

लालसा: लहान वयात 'पुठ्ठ्याचे 'घर' बनविणे', मोठ्या कार्डशीट वर चित्र काढणे, क्राफ्ट च्या वहीत प्रत्येक धड्याच्या अनुषंगीक चित्र काढणे कोणत्या मुलांना जमेल हो? तरीही शाळेवाले असली कामे खुपच कमी वयात का देतात?

माझे म्हणणे आहे की त्या त्या वयाच्या मुलाला झेपेल असेच कामे द्या ना. उदा. १/२ री - कागद सरळ कापणे, गोल, चौकोन काढून रंगविणे, क्ले (माती) चा एखादा आकार बनविणे आदी.

मुले अशाच छोट्या गोष्टीतून आपसूक शिकतात.

संदीप चित्रे : खरे आहे. असले प्रकल्प पुर्ण करून घेण्याच्या अट्टहासापाई मुलांचेच नुकसान होते. ते प्रकल्प आपणच पुर्ण करतो अन त्यांच्या वाटेला काहीच येत नाही.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३