काटा रुते कुणाला, बोंबील खाती कोणी

ॐकार's picture
ॐकार in जे न देखे रवी...
21 Mar 2008 - 1:15 pm

काटा रुते कुणाला, बोंबील खाती कोणी
शिक्षा जिभेस माझ्या भर श्रावणात आहे

सांगू कशी कुणाला चव मस्त बांगड्याची?
उसळी, फळे, दूधाचा मज शाप, जाच आहे !

काही गिळू पहातो स्मरतो उपास तेव्हा
मऊभात पचवणेही विपरीत होत आहे !

उचक्या,ढेकरा की, काहीच आकळेना
भुरकून सोलकढी मी एकभुक्त आहे !

मूळ, काटा, बाटा, आणि कविता सुचे यांवरून प्रेरित.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

21 Mar 2008 - 1:30 pm | विसोबा खेचर

बाबारे ॐकारा,

हात टेकले रे तुझ्यापुढे!

खल्लास लिहिलं आहेस! लै भारी है भिडू...! :)

काटा रुते कुणाला, बोंबील खाती कोणी
शिक्षा जिभेस माझ्या भर श्रावणात आहे

उचक्या,ढेकरा की, काहीच आकळेना
भुरकून सोलकढी मी एकभुक्त आहे !

या ओळी तर खासच!:)

लेका, तू तर शांताबाई, रंगा आणि केश्या, सगळ्यांवरच कडी केली आहेस.. :)

आपला,
(बोंबिलप्रेमी) तात्या.

बेसनलाडू's picture

21 Mar 2008 - 2:00 pm | बेसनलाडू

(सोलकढीभक्त)बेसनलाडू

आजानुकर्ण's picture

22 Mar 2008 - 10:33 am | आजानुकर्ण

सहमत आहे.

(श्रावणप्रेमी) आजानुकर्ण

प्रियाली's picture

23 Mar 2008 - 8:33 pm | प्रियाली

बोंबिल ;-)

केशवसुमार's picture

21 Mar 2008 - 2:59 pm | केशवसुमार

तुम्ही सुद्धा..
विडंबन एकदम झकास..
(प्राण्यांच्या/माश्यांच्या प्रेतातल न कळणारा)केशवसुमार..

सहज's picture

21 Mar 2008 - 4:58 pm | सहज

>लेका, तू तर शांताबाई, रंगा आणि केश्या, सगळ्यांवरच कडी केली आहेस.. :)

१००% सहमत!!

धनंजय's picture

21 Mar 2008 - 6:45 pm | धनंजय

हे चाखता बाकी सगळी भलतीच शिवराक-उपासाची वाटू लागलीत.

चतुरंग's picture

21 Mar 2008 - 5:12 pm | चतुरंग

एकदम फर्मास विडंबन.

(अवांतर - शांताबाईंच्या एका गीताने एकाच दिवसात तीन विडंबनांना जन्म दिला हे अनोखेच!)

चतुरंग

चित्रा's picture

22 Mar 2008 - 8:53 am | चित्रा

शांताबाईंच्या एका गीताने एकाच दिवसात तीन विडंबनांना जन्म दिला हे अनोखेच!
हल्ली मि.पा. वर विडंबनकारांच्या प्रतिभेला बहर आलेला आहे असे दिसते. सर्व विडंबने बहारदार..

सुवर्णमयी's picture

21 Mar 2008 - 5:42 pm | सुवर्णमयी

थीम सांभाळून केलेले विडंबन आवडले. मस्त.

नंदन's picture

22 Mar 2008 - 11:08 am | नंदन

म्हणतो. फर्मास विडंबन.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सृष्टीलावण्या's picture

23 Mar 2008 - 7:31 am | सृष्टीलावण्या

सांगू कशी कुणाला चव मस्त बांगड्याची?
उसळी, फळे, दूधाचा मज शाप, जाच आहे !

जावे त्याच्या वंशा तेव्हा (बांगड्याच्या विरहाचे दु:ख) कळते..

>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

सुधीर कांदळकर's picture

23 Mar 2008 - 8:10 pm | सुधीर कांदळकर

उसळी फळांचा भोक्ता

शुभेच्छा.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

सकेत विचारे's picture

24 Mar 2008 - 5:53 pm | सकेत विचारे

मस्त रे..........खुप मस्त...........
अजुन कहि आहे का कविता. पोस्त कर ना..............