चटकदार भेळ

अरुंधती's picture
अरुंधती in पाककृती
4 Apr 2010 - 9:29 pm

साहित्य :

चुरमुरे, फरसाण (३:१ प्रमाणात असावे)
बारीक शेव -खारेदाणे - तिखट बुंदी (आवडत असल्यास), कांदा बारीक चिरून, टोमॅटो बारीक चिरून, चिरलेली कोथिंबीर, चिरलेली कैरी, तिखट, चिंचेचे पाणी (चिंचेचा कोळ + गूळ + तिखट + मीठ), मिरचीचा ठेचा (थोडासा), पुदिन्याची चटणी (पर्यायी)
सोबत कडक पुरी :-)

एक मोठे पसरट भांडे घ्यावे. त्यात चुरमुर्‍यांत फरसाण, चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कैरी, चिंचेचे पाणी, ठेचा इ. साहित्य घालून हाताने चांगले मिसळावे. [हाताने/ चमच्याने घोटणे तुमच्यावर....पण जेवढे चांगले, खटखट मिसळाल तेवढी चांगली चव!] देताना वरून पुन्हा कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, शेव पेरावी, कडक पुरी खोचावी व द्यावे.

-- अरुंधती
http://iravatik.blogspot.com/

प्रतिक्रिया

शुचि's picture

4 Apr 2010 - 9:53 pm | शुचि

हा हा मस्त शैली लिखाणाची. खटखट मिसळा काय अन कडक पुरी खोचा काय :)
म्हटलं अरुचा लेख आहे पैसा (= वेळ) वसूलच मंगताय आणि वैसाइच हुआ!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I fly when you persue me, But when you shy I woo thee
Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.

नितिन थत्ते's picture

4 Apr 2010 - 10:38 pm | नितिन थत्ते

मस्त. पाणी सुटले तोंडाला.

भेळ चांगली होण्यासाठी आमच्या (निरीक्षणातून आणि अनुभवातून बनलेल्या)टिप्स...

१. कांदा भेळकरण्याच्या किमान २ तास आधी चिरावा. म्हणजे त्याचा उग्रपणा कमी होतो.

२. मोठ्या पातेल्यात (२-३ लिटर) एकच प्लेटच्या भेळेइतके जिन्नस घेऊन ढवळावे. म्हणजे चिंचेचे पाणी, चटणी वगैरे सगळीकडे सारखे लागते. (पसरट भांड्यात/परातीत नीट ढवळता येत नाही. सांडासांड फार होते.) भेळवाला नेहमी पातेल्यात भेळ बनवतो हे सर्वांनी पाहिलेच असेल. :)

३. चुरमुरे वार्‍याने उडणार नाहीत इतपत ओले होण्याइतके चिंचेचे पाणी आणि चटणी घालावी.

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

शुचि's picture

4 Apr 2010 - 10:41 pm | शुचि

सांडासांड फार होते =))
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I fly when you persue me, But when you shy I woo thee
Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Apr 2010 - 11:33 pm | बिपिन कार्यकर्ते

नितिन, कधी बसुया रे?

बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते's picture

4 Apr 2010 - 11:57 pm | नितिन थत्ते

भेळ खायला? =))

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

आवडत अस्ल्यास बटाटा आणि चाटमसाल/आमचुर वापरता येइल.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अरुंधती's picture

4 Apr 2010 - 10:54 pm | अरुंधती

शुचि, नितीन, जयपाल धन्यवाद!

नितीन : टिप्स एकदम १ नंबर! :-) पातेल्यातली भेळ येकदम बेष्ट! पुण्यात आम्ही पुष्करिणी भेळवाल्या काकांना अशी भेळ बनवताना त्या पातेल्याकडे (व त्यातल्या भेळेकडे) जिभल्या चाटत पाहिलंय.

जयपाल : बटाटा उकडलेला असावा ;-) हा हा हा! चाटमसाला व आमचूर... आवडत असल्यास, येस्स...पण मग चिंचेच्या पाण्याचे, कैरीचे व टोमॅटोचे प्रमाण थोडे कमी करावे लागेल. एकदम दात आंबण्याइतकी आंबट नको भेळ!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्राजु's picture

5 Apr 2010 - 7:51 am | प्राजु

भेळ भेळ भेळ!!!
:)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

परिकथेतील राजकुमार's picture

5 Apr 2010 - 1:50 pm | परिकथेतील राजकुमार

छ्या !! आता संध्याकाळी एक भेळ खायलाचा पाहिजे, त्याशिवाय आत्मा शांत / तृप्त होणार नाही !

कोल्हापुर / सांगली ह्याभागात भडंगाचे चिरमुरे वापरुन जी भेळ बनवतात ती पण उच्चच !

पुढच्या कट्ट्याचा चकणा श्री. थत्तेच घेउन येतील ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

5 Apr 2010 - 2:04 pm | नितिन थत्ते

चालेल.

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

डावखुरा's picture

5 Apr 2010 - 2:36 pm | डावखुरा

लालच आह लप्लप........

केव्हाही चालते.......

तोंडाला पाणी सुटलेय राव!!!!

"राजे!"

संदीप चित्रे's picture

6 Apr 2010 - 7:45 pm | संदीप चित्रे

भेळ म्हणजे माझा अक्षरशः जीव की प्राण आहे ग अरूंधती !
आता उन्हाळा सुरू होतोय म्हणजे जास्तीत जास्त वेळा भेळ खायचे योग येणार ! अर्थात आम्ही इथल्या ऐन हिवाळ्यातही भेळ खातोच म्हणा :)

तोंडाला पाणी सुटले!! =P~ =P~
नगरचा अंबिका भेळवाला भेळेत थोडी कचोरी कुस्करुन टाकतो! वा, काय फर्मास चव येते म्हणून सांगू!! साला आत्ताच्या आत्ता जावं असं वाटायला लागलंय!

(अंबिकाभेळप्रेमी)चतुरंग

सुचेल तसं's picture

8 Apr 2010 - 1:12 am | सुचेल तसं

अगदी अगदी!!! प्रभाकरवाल्याची पण भारी असते.......

विलासराव's picture

10 Sep 2010 - 6:23 pm | विलासराव

मस्त चटकदार झालेली दिसतेय भेळ.

नगरचा अंबिका भेळवाला : काय बोलु आता. चतुरंगजी चाललाच आहात तर आपलीही एक भेळ सांगा. मी आलोच.

खादाड_बोका's picture

8 Apr 2010 - 12:19 am | खादाड_बोका

भेळ...ईथे अमेरीकेत कुठे ??
8> 8> 8> 8>

मला तर स्वप्नातही भुक लागते....

सुचेल तसं's picture

8 Apr 2010 - 1:10 am | सुचेल तसं

बादलीभर पाणी सुटलं तोंडाला!!!!

माझ्याकडूनही एक टीपः भेळेत मटकी घातली कि अतिशय सुंदर लागते भेळ.....

Arun Powar's picture

10 Sep 2010 - 4:31 pm | Arun Powar

भेळेचे बरेच प्रकार करून पाहिलेत घरी, पण मला कोल्हापुरातल्या "राजाभाऊ भेळ"चीच चव जास्त आवडते.