या संज्ञेचा अर्थ काय?

युयुत्सु's picture
युयुत्सु in कलादालन
2 Apr 2010 - 12:17 pm

फोटॉग्राफित हायलाईट क्लिपींग अशी एक संज्ञा आहे. त्याचा अर्थ काय? कुणाला माहित असल्यास सांगावे ही विनंति.

तंत्र

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

2 Apr 2010 - 8:32 pm | राजेश घासकडवी

जेव्हा एखाद्या बिंदूकडून येणारा प्रकाश हा सेन्सरच्या क्षमतेच्या (समजा ० ते २५५) अलिकडे किंवा पलिकडे असतो तेव्हा त्या बिंदूची पिक्सेलच्या ब्राइटनेस वा डार्कनेस ची किंमत ० च्या खाली किंवा २५५ च्या वर जाऊ शकत नाही. त्यामुळे ती तितकीच दिसते. याचा परिणाम बघायचा असेल तर एखादा प्रकाशमान फोटो घेऊन ब्राइटनेस वाढवत जा. सर्वात अधिक प्रकाशित भाग शुद्ध पांढरे दिसायला लागतील. याचा अर्थ मूळ फोटोमध्ये ज्या ठिकाणी २२० ते २५५ असे फरक दिसले असते ते सगळे बिंदू २५५ दिसतात. त्यामुळे चित्रातल्या डिटेल्स कमी होतात.

याला उपाय म्हणजे मुळात फोटो घेताना सर्व बिंदू रेंजमध्ये असतील असं एक्स्पोजर सेटींग ठेवावं. बहुतेक स्वयंचलित कॅमेरे ते शक्य तोवर करतात. पण बऱ्याच वेळा प्रकाश कमी असेल तर चेहेरा स्पष्ट येण्यासाठी अधिक एक्स्पोजरही वापरतात. त्यामुळेच आकाश पांढरं दिसतं. त्यामुळे कधीकधी मुळात कमी एक्स्पोजरचा फोटो घेऊन जर तो अधिक ब्राइट केला तर चांगला येण्याची शक्यता असते. अर्थात असं करताना डार्क क्लिपिंग होण्याची शक्यता असते.

उदाहरण

राजेश

युयुत्सु's picture

3 Apr 2010 - 9:59 am | युयुत्सु

आता समजलं... धन्यवाद! ही लिंक मी बघितली होती पण तरीही नीट आकलन झाले नव्हते.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

मितभाषी's picture

3 Apr 2010 - 11:50 am | मितभाषी

माझ्याकडे वरील सोनीचा कॅमेरा आहे. त्यात श्टर स्पीड कसा बदलता येतो. कुणी माहीती देता का?

----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\

राजेश घासकडवी's picture

3 Apr 2010 - 12:39 pm | राजेश घासकडवी

या कॅमेराविषयी मी जे वरवर वाचलं त्यावरून हा वापरायला सोपा करण्यासाठी मॅन्यूअल सेटिंग्ज जवळपास काहीच ठेवलेली नाहीत. त्यात आय.एस. ओ.ची सेटिंग्ज बदलता येत असावीत असं दिसलं. तसं असेल तर त्याचा परिणाम शटर सेटिंग बदलल्याप्रमाणे होऊ शकेल. अर्थात कॅमेरा जर संपूर्णपणे स्वयंचलित असेल तर तो तेही बदल गणितात घेईल... दुसरा उपाय असा की त्यात वेगवेगळे मोड (आऊटडोअर, इनडोअर इ) ते बदलून कदाचित फरक पडेल. प्रयोग करून पहा.
राजेश

मितभाषी's picture

3 Apr 2010 - 2:19 pm | मितभाषी

धन्यवाद घासकडवीसाहेब,
मला अजुन बर्‍याच मुलभुत शंका आहेत. यात आयएसओ सेटिंग बदलता येतात. १०० ते ३२०० अशी रेंज आहे.
हे आयएसओ काय प्रकरन आहे.

तसेच यात इझी मोड म्हनुन एक सेटिन्ग आहे. त्यात फोटो काढले होते. ते अगदीच काळपट आले आहेत.

----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\

राजेश घासकडवी's picture

3 Apr 2010 - 3:18 pm | राजेश घासकडवी

पूर्वी जेव्हा फिल्म्स असायच्या तेव्हा त्यांची सेन्सिटिव्हीटी किती हे या आकड्यावरून कळायचं. अधिक आयएसओ, म्हणजे अधिक सेन्सिटीव्ह. १०० आयएसओ वर जे चित्र १ सेकंद एक्स्पोजरने येतं तेच चित्र १६०० आयएसओ वर १/१६ सेकंद एक्स्पोजरने येतं. (किंवा १/१६ इतकं लहान अॅपर्चर वापरता येतं) याचा फायदा म्हणजे फोटो काढताना कॅमेरा हलण्याची भीती कमी होते. अर्थात तोटा असा की ही फिल्म अधिक ग्रेनी असते. त्यामुळे फोटो कमी रेखीव येतात. हेच तत्त्व डिजिटल कॅमेरांनाही लागू पडतं. तेव्हा भरपूर सूर्यप्रकाशात कमीतकमी आयएसओ वापरून फोटो काढावेत. जेव्हा प्रकाश कमी असतो, तेव्हा आयएसओ वाढवून पहा. पुन्हा तुमच्या कॅमेऱ्याने एकाच वस्तूचे वेगवेगळ्या सेटिंगवर फोटो काढून बघा. तुम्हाला जास्त चांगला अंदाज येईल.

नितिन थत्ते's picture

3 Apr 2010 - 4:46 pm | नितिन थत्ते

कमी वेळ शटर ओपन ठेवण्याचा फायदा म्हणजे तेवढ्या वेळात ऑब्जेक्टही कमी हलते त्यामुळे शार्प फोटो येतो. जास्त शटर स्पीडसाठी फिल्म जास्त आय एस ओ ची लागते.

या चित्रात जेवढा आय एस ओ जास्त व एक्ष्पोजर कमी तेवढा बोलरचा हात जास्त स्पष्ट दिसेल.

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

बहुगुणी's picture

5 Apr 2010 - 6:33 am | बहुगुणी

इंटरनॅशनल स्टॅंडर्ड्स ऑर्गनायझेशन, ही आंतरराष्ट्रीय संस्था बर्‍याच प्रकारची मापनं/मानदंड ठरवते. कॅमेर्‍यांच्या बाबतीत ज्या संदर्भात ही प्रमाणे वापरली जातात, त्यापैकी फिल्म स्पीड बद्दल माहिती वर दिलेली आहेच. आधिक माहिती इथे मिळेल.