कविता सुचे कुणाला ...

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
21 Mar 2008 - 2:53 am

आमची प्रेरणा शांता शेळकेयांची सप्रतिम रचना काटा रुते कुणाला आणि चतुरंगशेठने केलेले सुरेख विडंबन 'बाटा' रुते..

कविता सुचे कुणाला आक्रंदतात कोणी
मज स्फूट हे सुचावे हा कर्मभोग आहे !

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ?
मजला विडंबनाचा पण शाप हाच आहे !

काही लिहू पहाता होतो अनर्थ तेथे
प्रतिसाद सर्व येथे तिरपेच येत आहे !

हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना
की ह्यात गुंतलेला परकीय हस्त आहे ?

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

21 Mar 2008 - 3:02 am | बेसनलाडू

छान लयबद्ध झाले आहे. दुसरी आणि शेवटची द्विपदी भारी आहे.
(आस्वादक)बेसनलाडू

सर्किट's picture

21 Mar 2008 - 4:41 am | सर्किट (not verified)

मला मात्र तिसरी द्विपदी (सत्य असल्याने) अधिक आवडली.

-- (तिरपा) सर्किट

सुवर्णमयी's picture

21 Mar 2008 - 5:44 am | सुवर्णमयी

वा! मस्त विडंबन.

आजानुकर्ण's picture

21 Mar 2008 - 8:45 am | आजानुकर्ण

होळी सुरू व्हायच्या आधीच हसून हसून पोट दुखले.

काय आचार्य. धमाल केलीत.

(हसरा) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

21 Mar 2008 - 10:16 am | विसोबा खेचर

केशवा, तुझ्या प्रतिभेला पुन्हा एकदा सलाम!

विडंबन लै भारी...

आपला,
(जितेंद्र अभिषेकीप्रेमी) तात्या.

सहज's picture

21 Mar 2008 - 2:55 pm | सहज

सलाम!!!

इनोबा म्हणे's picture

21 Mar 2008 - 10:32 am | इनोबा म्हणे

सही रे! केशवा...

काही लिहू पहाता होतो अनर्थ तेथे
प्रतिसाद सर्व येथे तिरपेच येत आहे !

आवडले...

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Mar 2008 - 10:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाहाहाहा
मस्त विडंबन
आपल्या प्रतिभेला आमचाही सलाम...!!!

ॐकार's picture

21 Mar 2008 - 12:29 pm | ॐकार

काय भाऊ! गाडी लय जोरात!

अविनाश ओगले's picture

21 Mar 2008 - 1:06 pm | अविनाश ओगले

आवडले....

जितेंद्र शिंदे's picture

21 Mar 2008 - 3:25 pm | जितेंद्र शिंदे

कविता सुचे कुणाला आक्रंदतात कोणी
मज स्फूट हे सुचावे हा कर्मभोग आहे !

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ?
मजला विडंबनाचा पण शाप हाच आहे !

एकदम झकास वाटलं
लगे रहो...भाय..!

सुधीर कांदळकर's picture

21 Mar 2008 - 8:02 pm | सुधीर कांदळकर

मज्जा आली.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

सर्वसाक्षी's picture

21 Mar 2008 - 8:26 pm | सर्वसाक्षी

<हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना
की ह्यात गुंतलेला परकीय हस्त आहे ?>

पण विडंबन मात्र मस्त आहे

केशवसुमार's picture

22 Mar 2008 - 8:20 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
केशवसुमार

सृष्टीलावण्या's picture

23 Mar 2008 - 8:55 am | सृष्टीलावण्या

थोडेसे शब्द पाठव रे केशवकाकांच्या प्रतिभेला मुजरा करायला.

अनंत हस्ते कमलावराने, देता घेऊ किती दो कराने?

>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

प्रा सुरेश खेडकर's picture

23 Mar 2008 - 2:00 pm | प्रा सुरेश खेडकर

मस्त , आवडली. अभिनंदन.