नमस्कार लोक्स...
झाली का चहाची वेळ ? ही घ्या माझ्या कडुन चायटाईम स्नॅक्स ची भेट.
साहित्यः
१ वाटी बेसन
१ जुडी कोथिंबीर (मध्यम आकाराची) बारीक चिरुन
१ कांदा उभा आडवा चिरुन.
१ चमचा लाल तिखट
१ चमचा धणे पुड.
१ चमचा जीरे.
१/२ चमचा हळद.
२ चमचे तांदळाच पिठ.
२ चमचे हिरव वाटण (मिरची + कोथिंबीर + आल)
२ चमचे तेल.
चवी नुसार मीठ.
फोडणी साठी : १ चमचा तेल , १ चमचा राई/मोहरी
नारळ सजावटी साठी.
कृती:
सगळे जिन्नस एका भांड्यात एकत्र करुन घ्या.
पाणी न टाकता मिश्रण नीट एकजीव करुन घ्याव.
गार झाल्यावर वड्या पाडुन वरुन मोहरीची फोडाणी द्यावी.
नारळाने सजवुन गरमा गरम चहा सोबत लुत्फ घ्या :)
प्रतिक्रिया
1 Apr 2010 - 3:23 pm | प्रमोद्_पुणे
नेहेमीप्रमाणेच ज ब रा...१ नंबर..
1 Apr 2010 - 3:33 pm | अरुंधती
कृती छानच!
सुधारणा : १ जुडी मोथिंबीर (मध्यम आकाराची)
कृपया संपादित करावे. :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
1 Apr 2010 - 3:56 pm | गणपा
धन्यु :)
1 Apr 2010 - 3:40 pm | खादाड
ह्या वड्या नन्तर तळुन पण खूप छान लागतात !
बर्याच दिवसानी पा.क्रु.पाहुन छान वाटल ! :H
7 Apr 2010 - 1:03 pm | योगेश गाडगीळ
तोच विचार मी करत होतो.......मी तर कधी वाफवून घेउन खाल्ल्या नाहीत. तळूनच मस्त लागतात.........
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्|
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे||
1 Apr 2010 - 3:40 pm | प्रदीपा
....पण वड्या पाड्ल्यावर त्या जरा तेलावर दोन्ही बाजुनी खमन्ग शेकवल्या तर अजुन छान लागतात.
1 Apr 2010 - 3:48 pm | वेताळ
पण तुम्ही नेमक्या भारतातील जेवणाच्या टाईमिंगला दाखवल्या मुळे विशेष त्रास झाला नाही.
सलाम गणपाशेठ...
सलाम मुंबईकर ( सदर प्रतिसाद नितीन महाराज ह्याच्या सलाम मुंबईकर धाग्याला समर्पित आहे.वाचकानी नोंद घ्यावी.)
वेताळ
1 Apr 2010 - 4:40 pm | शार्दुल
मस्तच रे,,,, कोथिंबीरीच्या वड्या मीही करते पण कांदा न वापरता ,,,,,,,,,, यावेळेला तुझी रेसिपी नक्की करुन बघेन,,,,,,,
नेहा
1 Apr 2010 - 5:02 pm | पिंगू
नेहमीप्रमाणे जबरदस्त!!!!!!!
1 Apr 2010 - 5:42 pm | स्वाती दिनेश
वड्या मस्त दिसत आहेत.
मी कोथिंबिर वडी कांदा न घालता करते, आता एकदा तुझ्या रेशिपीने करुन बघेन.
स्वाती
1 Apr 2010 - 7:58 pm | रेवती
छान पाकृ व फोटू!
मीही कांदा कधी घातला नाही आता बदल म्हणून करीन.
आणि तू तीळ नाही का घालत? चांगले लागतात. बर्याच दिवसात नाही केल्या वड्या आता करते.
रेवती
2 Apr 2010 - 4:25 pm | भूंगा
लाल तिखटाऐवजी मिरी आणि सोबत लसूण-ओवा घातल्यानें डाळीचे संभाव्य त्रास कमी होतील.
भुंगा
5 Apr 2010 - 8:44 pm | खादाड_बोका
गणपासेठ.....कोथिंबीर वड्याची ( पुड्याची वडी विदर्भात) पाकक्रुती द्या की.
मला तर स्वप्नातही भुक लागते....
5 Apr 2010 - 9:03 pm | अविनाशकुलकर्णी
मस्त
5 Apr 2010 - 10:26 pm | पाषाणभेद
२ प्लेट कोथंबिर वडी पाठवून द्या गणपासेठ.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
6 Apr 2010 - 3:23 am | धनंजय
शंकरपाळ्याच्या आकाराच्या वड्यांचे असे कमळ करण्याची युक्ती बेष्ट!
उरलेले वेडेवाकडे त्रिकोणी तुकडे स्वयंपाकघरातच सफाचट करायचे!
6 Apr 2010 - 7:04 pm | वाहीदा
सोरी सोरी सर , कामाच्या गडबडीत थोडी उशीराच आले तुमच्या वर्गात ..
पण सर, कांदा घालून कोथिंबीर वड्यांची पाक्रु पहिल्यांदाच बघितली ...फ्रिज मध्ये ठेवली तर टिकेल का हो ही वडी ??
(आमची अम्मी तांदळाच्या पिठाबरोबर बेसनाचं पिठ पण घालायची अन आले -लसूण-ओवा देखील पण कांदा घातलेलं नाही बाई आठवत )
पाक्रु मात्र नेहमी प्रमाणेच लाजवाब !!
~ वाहीदा
7 Apr 2010 - 1:00 pm | गणपा
वाहीदा तै अहो माझ्या तावडितुन उरल्या तरच फ्रिज च्या वाट्याला येतील ना. हॅ हॅ हॅ :)
तरी सुद्धा २ दिवस राहुशकतील फ्रिज मध्ये असा अंदाज आहे.
अनायसे धागा वर आला आहेच तर सर्वांचे आभार मानुन घेतो.
सर्व वाचक / प्रतिसादकांचे येथे हजेरी लावल्या बद्दल मनःपुर्वक आभार.