From general" width="1000" height="1000" alt="" />
साहित्य :
ढोबळी मिरची ( हिरवी,पिवळी,लाल्, केशरी ) प्रत्येकी १ उभी चिरून
कान्दा १ उभा चिरून
तोफू १ पाकिट
नारळाचे शक्यतो दाट दूध ( हे टिन मधे ही मिळते)
थाई करी पेस्ट ( लाल किन्वा हिरवी मिळते). मी लाल वापरलेली आहे.
मीठ चवीप्रमाणे
ब्राउन साखर १ छोटा चमचा
तेल किन्वा तूप १ छोटा चमचा
भाज्यान्चा स्टोक १.५ पेले.
कृती :
पातेल्यामधे तेल किन्वा तूप तापवायला ठेवा.त्यामधे कान्दा गुलाबी रन्गावर परतून घ्या.
तो परतला गेला की त्यात भाज्यान्चा स्टोक घाला. त्याला १ उकळी आली की त्यामधे ढोबळी मिरची चे तुकडे घाला. हे तुकडे त्या स्टोक मधे शिजवून घ्या.साधारण पणे ७ ते ८ मिनिटे लागतात.त्यानन्तर त्यात तोफू चे तुकडे घाला.ते साधारण पणे ३ ते ४ मिनिटे उकळूद्या.
आता तुम्हाला जितक तिखट हव असेल त्याप्रमाणे थाई करी पेस्ट घाला. साधारण पणे २ चमचे पेस्टनी बर्यापैकी तिखट होत.मग चवी प्रमाणे मीठ आणि ब्राउन साखर घाला.
सगळ्यात शेवटी नारळाचे दूध मिसळा.नारळाच्या दूधाला १ उकळी आली की करी तय्यार !
प्रतिक्रिया
31 Mar 2010 - 2:03 am | अम्रुताविश्वेश
मी फोटो अपलोड करण्याचा प्रयत्न केला.पण काही तरी गडबड होतीए. :(