ह्या काथ्याकुटाची विभागणी मला वास्तवीक विनोद या भागात पण करायची होती. पण २६/११ म्हणले की आजही अस्वस्थता येते म्हणून टाळले...
मात्र आज (काल) अंतिम युक्तीवाद संपवताना कसाबचे वकील, अॅड पवार म्हणाले ते थोडक्यात खाली (दुव्यावर संपूर्ण वाचू शकता.)
लेखक मारुती चितमपल्ली यांच्या एका लघुकथेचा उल्लेख करीत आज पवार यांनी कसाबला माकडिणीच्या पिल्लाची, तर तपासयंत्रणेला लांडग्याची उपमा दिली. लांडगा ज्याप्रमाणे माकडिणीच्या पिल्लाला पकडण्यासाठी झाडाखाली घिरट्या घालतो आणि मग पिल्लू पडले की त्याला घेऊन पळ काढतो, तशी कसाबची अवस्था झाली आहे, असे पवार म्हणतात. न्यायालयाने दिलेल्या सहकार्याबद्दलही पवार यांनी आभार व्यक्त केले. तसेच युक्तिवादादरम्यान त्यांनी "मराठी असे माझी मायबोली' या ओळीही ऐकविल्या.
कसाब माकडीणीचे पिल्लू आहे का ते माहीत नाही, पण आपले सरकार (कसाबच्या बाबतीत) लांडगा आहे का?
प्रतिक्रिया
30 Mar 2010 - 5:47 am | रेवती
छे छे! लांडग्याची उपमा देण्याचे कारण वाटत नाही. हे असले हल्ले केल्यावर तपासही त्याचप्रमाणे कसून व्हायला हवा. आता हे सगळे त्या'बुवाच्या' विरुद्ध आहे त्याचा त्याला त्रास होतोय. होउ दे!
तरी यावेळेस तब्ब्येत जरा उतरल्यासारखी वाटतीये.
रेवती
30 Mar 2010 - 8:07 am | प्रभो
_/\_
30 Mar 2010 - 8:10 am | नितिन थत्ते
काय हे? आरोपीचे वकील न्यायालयीन युक्तिवादात काय म्हणाले हे किती सिरिअसली घ्यायचे?
छे..विकास यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती.
नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)
30 Mar 2010 - 11:25 am | कवटी
>>छे..विकास यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती.
सहमत.
दांड्यारहित विकास म्हणाला असतात तर एकदम फ़िट्ट बसले असते.
कवटी
30 Mar 2010 - 4:33 pm | युयुत्सु
+१
याशिवाय लोक हे लक्षात घेत नाहीत की पवार आरोपीचे वकील आहेत आणी न्यायप्रक्रिया पूर्ण होण्यासाठी त्याना नेमले गेले आहे. त्यांनी त्याना नेमून दिलेले काम केले.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
30 Mar 2010 - 4:33 pm | युयुत्सु
+१
याशिवाय लोक हे लक्षात घेत नाहीत की पवार आरोपीचे वकील आहेत आणी न्यायप्रक्रिया पूर्ण होण्यासाठी त्याना नेमले गेले आहे. त्यांनी त्याना नेमून दिलेले काम केले.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
30 Mar 2010 - 12:05 pm | सुधीर काळे
सरकारने आपल्या नागरि़कांशी सौजन्याने व परदेशी शत्रूंशी लांडग्यासारखेच वागले पाहिजे. म्हणजे असे करायला आपला शत्रू धजताच कामा नये. 'गुरु(?)' अफज़लला आपण पुन्हा एक विमान अपहरण होईपर्यंत जिवंत ठेवले आहे असेच मला वाटते.
ज्या दिवशी आपले सरकार असल्या लोकांसाठी लांडगा बनेल, त्यादिवशी मी दिवाळी-दसरा साजरा करेन. शेळी बनून 'बँsssss' करणे बस्स झाले!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
19 Sep 2010 - 3:48 pm | गांधीवादी
कसाब साहेब ह्या महान लोकशाहीत आपला हक्क बजावीत आहे.
कसाब उच्च न्यायालयात दाद मागणार
30 Mar 2010 - 4:16 pm | परिणिता
महाराष्ट्रिय्नन असुनहि एका अतिरेक्याचे वकिलपत्र घेता?अस करुच कस शकता तुम्हि?
30 Mar 2010 - 5:10 pm | ओंकार देशमुख
आपलं सरकार लांडगा असलं तरी ते आंध्यळ्यासारखं वागतय..
आणि माकडाचं पिल्लु..वरती मस्त बिर्याणि खात बसलय..
वेळ जातोय तो लांडग्याचाच ना??
ओंकार देशमुख
ओंकारचा ब्लोग-सारथी
29 Sep 2010 - 5:03 am | गांधीवादी
कारागृहरक्षकावर कसाबकडून हल्ला
यावर माननीय वाचकांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया :
On 29/09/2010 12:16 AM शिरीष said:
लोकशाही चा अतिरेक चाललाय इथे. सरकारला शहाबुद्दीन प्रकरणात तातडीने घटना दुरुस्ती आणि कायद्यात बदल करता येतो मग या राष्ट्रीय प्रश्नावर कायदा करून न थांबता (NON STOP) खटल्याची सुनावणी करणे का अशक्य आहे? सुनावणी करून ताबडतोब फाशी देवून टाकायला हवीय. शिवाय पुन्हा राष्ट्रपतींना दयेचा अर्ज वाचायला दहा-पाच वर्षे लागणारच ! त्यातून पुन्हा एखादे विमान किंवा जहाज ओलीस ठेवून कासाबची सुटका होणारच नाही याचा काय भरवसा? अत्यंत अकार्यक्षम सरकार आहे.
On 28/09/2010 08:23 PM Vinod said:
मी सरकारला दिलेल्या पैशातून (Tax etc ) इथून पुढे एक पै देखील त्या कसाब वर खर्च करायची नाही. माझ्या कष्टाच्या प्रत्येक पै चा वापर देश्साठीच व्हायला पाहिजे सर्व देशवासीयांनी एकत्र येउन कसाब वर पैसे कारचा करण्यापासून सरकारला रोखले पाहिजे.. माझ्या देशात खूप लोक गरीब आहेत... त्याचावर तो पैसा खर्च वाहयला पाहिजे......
On 28/09/2010 06:29 PM SHIVRAM VAIDYA said:
आता कसाबचे काँग्रेसी सासरे त्याची कारागृहात काही आबाळ झाली काय याची सी बी आय (काँग्रेस ब्युरो ऑफ इन्वेसटीगेशन) या मार्फत चौकशी करून त्याला पंचतारांकित सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आकाशपाताळ एक करतील. सासरे बुवा, खर्चाची शिणता करू नका, आम्ही करदाते कर कशाला झक मारायला भारत आहोत काय? असल्या अतिरेक्याना पोसण्यासाठीच तर!!!
On 28/09/2010 05:06 PM mayursawant said:
कसाब आणि अफझल गुरु हे सरकारचे आमरण पाहुणे आहेत! त्यांची अशीच बडदास्त ठेवली जाईल! हे सामान्य माणसा तू फक्त सहन कर! -- भारतमाता की जय!
On 28/09/2010 03:45 PM anand said:
अरे कशाला या कासाबला जिवंत ठेवता ? त्याला अटक करण्यापुर्वीही त्याने भारतीयांना मारले व अटक झ्हाल्यानातरही पोलिसांना मारतो आहे !!! हीच का आपली वीरता आहे ? एका फालतू गुन्हेगाराला 'अतिथी देवो भाव' सारखी त्रेअत्मेनेत दिल्याचे हे परिणाम आहेत. आता कसबच खेळ पुरे करा. खूप झले आता
29 Sep 2010 - 11:07 am | आंसमा शख्स
या कसाब सारख्या लोकांना फार महत्त्व आणि प्रसिद्धी देऊ नये. २०० वर्षांची शिक्षा द्यावी आणि काळ कोठडीत लोक विसरून गेलेल्या अवस्थेत सडू द्यावे. हीच खरी शिक्षा आहे. प्रसिद्धी देऊन त्यांचे महत्त्व का वाढवता?
29 Sep 2010 - 11:17 am | गांधीवादी
तो ६० वर्षे जरी जिवंत राहिला तरी तो पर्यंत १०X१० ची खोली का होईना भारत भूमीत अडवून राहणार, परत त्याला खायला प्यायला घालायला आपले मानवतावादी लोक पुढे सरावाणार, त्याला ताप आला, डोके दुखते म्हणाल्यावर सरकार चळाचळा कापणार. आणि त्याला संरक्षण द्यायला आपल्याच खिशातले ३१ कोटी दरवर्षी त्याच्यावर उधळणार. आणि देव न करो त्याल सोडविण्यासाठी पुन्हा एकदा कंदाहार होणार. आणि इथे १०-१२ वर्षे बिर्याणी वर ताव मारून तो परत त्याच्या भूमीत जाणार, आणि तिथून **********************************************
*********************************************
***********************************************
आणि परत त्याला आपण आपले शूरवीर गमावून पकडणार, परत तो उच्च न्यायालात अर्ज दाखल करणार.
परत ***************************
*****************************
*****************************
infinite loop.
29 Sep 2010 - 11:22 am | आंसमा शख्स
फाशीच असो, पण त्या घटनेही)(ही) फार महत्त्व आणि प्रसिद्धी देऊ नये इतकेच म्हणेन.
29 Sep 2010 - 1:25 pm | अनिल २७
हा लेख वाचला नाही.. पण शिर्षकाचा जोरदार निषेध !! कसाबची तुलना करताना समस्त माकड प्रजातीला बदनाम केल्याबद्दल 'मनेका ' फाऊंडेशन तर्फे धिक्कार !!