करायला अतिशय सोपा, सुटसुटीत व चविष्ट पदार्थ!
साहित्य :
उकडलेले छोले २ वाट्या (आदल्या रात्री भिजवून - दुसर्या दिवशी मिठाच्या पाण्यात कुकरमध्ये व्यवस्थित शिजवून घेणे)
१ मोठा कांदा - बारीक चिरून
२ टोमॅटो - बारीक चिरून
चिरलेली कोथिंबीर
फरसाण
बारीक तिखट शेव
तिखट बुंदी, तिखट दाणे (पर्यायी)
चाटमसाला
तिखट
लिंबाचा रस (पर्यायी)
हिरवी (पुदिन्याची) व चिंचेची चटणी
दही (पर्यायी)
पुदिना चटणी : पुदिन्याची पाने, कोथिंबीर, मीठ, साखर, मिरची (पर्यायी) एकत्र मिक्सरमधून काढणे.
चिंचेची चटणी : चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, तिखट एकत्र करावे व व्यवस्थित मिसळावे.
कृती : उकडलेल्या छोल्यांना प्लेटमध्ये घालावे. त्यावर वरील सर्व साहित्य एकेक करून घालत जावे. व्यवस्थित मिसळावे. ताबडतोब फडशा पाडावा.
इतर पर्याय : छोल्यांऐवजी हिरवे मूग, चवळी असे पर्यायही वापरता येतात.
सर्व तयारी केल्यास अतिशय झटपट होणारा, पोटभरीचा व रुचकर असा हा पदार्थ.
प्रतिक्रिया
28 Mar 2010 - 9:19 pm | पर्नल नेने मराठे
मस्त...
चुचु
28 Mar 2010 - 10:02 pm | दिपाली पाटिल
अगदी छान आणि सोप्पा वाटतोय...
दिपाली :)
28 Mar 2010 - 10:57 pm | नावातकायआहे
>> ताबडतोब फडशा पाडावा.
असहमत..
चकन्याला एक नंबर डिश ;)
चांगभल..
29 Mar 2010 - 2:22 pm | खादाड
चकन्याला एक नंबर डिश
सहमत :)
29 Mar 2010 - 6:19 pm | वाहीदा
खुप सपाटून भूक लागली ..
नंतर करून बघते
पण आधी कंटीनमध्ये जाऊन फडशा पाड्ते
रेसिपी छान !! भूक सपाटून लावली ईतकी छान
मस्त ! मस्त ! मस्त !
~ वाहीदा
17 Apr 2010 - 1:40 pm | झुम्बर
या रविवरि नक्कि करनार...............
कशि होतेय सन्गेनच फोतु सकत :)