चित्रपताच्या पोस्टरवरील पुरुष अभिनेता बहुतेक वेळा उजवीकडेच असतो. असे का?

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
27 Mar 2010 - 10:17 pm
गाभा: 

कोणत्याही चित्रपटाचे किंवा जाहिरातीचे वर्तमानपत्रातील छापील पोस्टर किंवा चित्रपटगृहावर लावलेले पोस्टर असो, एक गोष्ट निरिक्षण करून माझ्या लक्षात आली आहे ती म्हणजे जेव्हा पोस्टरवर मुख्य अभिनेता आणि अभिनेत्री ठळकपणे असतात, तेव्हा नेहेमी अभिनेता (हिरो) हा अभिनेत्रीच्या (हिरोईनच्या) उजवीकडेच असतो.उदाहरणादाखल खालील दिलेल्या चित्रपटांची पोस्टर्स पेपरमध्ये बघा: थोडा प्यार थोडा मॅजिक, लव्ह स्टोरी २०५०, कहो ना प्यार है, दे ताली

असे का असते? की येथेही (कळत किंवा नकळत) पुरुष हा स्त्रीपेक्षा उजवा (श्रेष्ठ) आहे असे दाखवायचा प्रयत्न (योग्य की अयोग्य तसेच कोण श्रेष्ठ ही चर्चा येथे अपेक्षीत नाही ) असतो?

पोस्टरवर चार पाच अभिनेते जरी असले तरी बहुतेक करून उजेवीकडून पहिला पुरुषच असतो. (दे ताली) एखाद्या कार्टून स्ट्रीप मध्ये ही बहुतेक वेळा असेच असते. काय असेल या मागची मानसिकता? आपल्याला ही निरिक्षणातून असेच काहिसे आढळले आहे का? की आणखी वेगळे? की माझे निरिक्षण चुकते आहे?

आपणांस काय वाटते? वेगवेगळ्या चित्रपटांची (मराठी, हिंदी, इंग्लीश) पोस्टर्स बघून आपण आपले अनुभव येथे मांडू या. एक वेगळा विरंगुळा होईल आणि एखादा निष्कर्षही निघेल. बहुमताने!

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

27 Mar 2010 - 10:45 pm | चिरोटा

बॉलिवूडचे बरेचसे चित्रपट पुरुषप्रधान असल्याने तसे असेल का?
काही स्त्रीप्रधान चित्रपटांच्या पोस्टर्स मध्ये हिरो हिरॉइच्या डावीकडे दिसतो.

मै तुलसी तेरे आंगन की.

प्राण जाये पर वचन ना जाये.(हा स्त्रीप्रधान चित्रपट होता का? )

रानी और जानी.
(हे अर्थात ७०च्या दशकातले चित्रपट आहेत).

मेहबूबा(१९८०).

P = NP

अक्षय पुर्णपात्रे's picture

28 Mar 2010 - 1:11 am | अक्षय पुर्णपात्रे



सुरेखा पुणेकर's picture

29 Mar 2010 - 12:27 am | सुरेखा पुणेकर

अवो पावनं....हिरोइनच्या उजवीकडं तुमच्या उजवीकडं नव्ह ;)

-- सुरेखा
कारभारी दमानं.....

मेघवेडा's picture

28 Mar 2010 - 3:40 am | मेघवेडा

याबद्दल काय म्हणणंय??? ;)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

चित्रगुप्त's picture

28 Mar 2010 - 9:39 am | चित्रगुप्त

लक्ष्मी वामांगी...
विष्णु च्या अवतारांचे चित्रण करताना लक्ष्मी त्याच्या डावीकडे दाखवायची वगैरे शिल्पकलेतील संकेत आहेत. पूजेसाठी पती-पत्नीने बसताना हाच संकेत वापरला जातो...
अश्या प्रतिमा/गोष्टी लहानपणापासून बघत आल्याचा परिणाम पोस्टर डिझाईन करताना नकळत होत असण्याची शक्यता आहे. शिवाय डिझाईन करताना उपलब्ध फोटो कसे आहेत, हा फार महत्वाचा भाग असतो....त्यामुळे मुद्दाम पुरुषास उजवीकडे दाखवले जात असेल, असे वाटत नाही....

या बाबतीत हॉलिवूड ची पोस्टरे (शिवाय चिनी, इटालियन, फ्रेंच इत्यादिंची सुद्धा) कशी असतात, हेही बघायला हवे, म्हणजे असे काही असलेच, तर ते जागतिक संदर्भातही लागू पडते आहे का, हे पडताळता येइल...

उजवा म्हणजे श्रेष्ठ ही धारणा बहुतेक लोक "उजव्ये" (डावखोरे च्या विरुद्ध या अर्थी) असल्याने, तसेच जेवणे वगैरे "श्रेष्ठ" क्रियांसाठी उजवा हात वापरणे, तर ढुंगण धुण्यासाठी डावा हात वापरणे, यातून आली असावी.

चित्रगुप्त's picture

28 Mar 2010 - 10:52 am | चित्रगुप्त






चित्रगुप्त's picture

28 Mar 2010 - 11:10 am | चित्रगुप्त

गुंडांपासून वगैरे रक्षण करताना, सिनेमातील 'नायक' उजव्या हाताने पिस्तुल, काठी, तलवार वगैरे चालवत डाव्या हातात 'नायकिणीला' धरून सुरक्षित ठिकाणी नेत असतात.....
खुद्द देवादिकही निवांत बसलेले असताना डाव्या हाताने रिकामपणचे उद्योग करत असलेले दिसतात, त्या दृष्टीनेही बाई डावीकडे बरी. उजवा हात भक्तांना आशिर्वाद देण्यात सतत गुंतलेला असतो ना......

अनुप्रिया's picture

28 Mar 2010 - 1:09 pm | अनुप्रिया

"खुद्द देवादिकही निवांत बसलेले असताना डाव्या हाताने रिकामपणचे उद्योग करत असलेले दिसतात, त्या दृष्टीनेही बाई डावीकडे बरी"

पत्नीला वामांगी म्हणतात हे कदाचित तुम्हाला माहित नसावे. वामांगी म्हणजे जी
डाव्या हाताला असते ती. डाव्या हातालाच का ? याच कारण असे की डावीकडे हृदय असते आणि जी हृदयात निवास करते ती पत्नी , तिचे स्थान डावीकडे.....अर्थात आजकाल त्याजगी निवास करणा-या एकापेक्षा जास्ती असू शकतात.
सिनेमा बद्दल काही भाष्य करायची मला इच्छा नाही

अनुराग's picture

18 Aug 2010 - 5:00 pm | अनुराग

छान !! आवडले.

अन्या दातार's picture

28 Mar 2010 - 8:53 pm | अन्या दातार

बहुदा यात स्त्रीदाक्षिण्य दाखवायचे असावे...... ;)

वल्लि's picture

29 Mar 2010 - 12:37 am | वल्लि

कधी पुरुष पोस्टर पहाणार्याच्या उजवीकडे असतो तर कधी पोस्टरमध्ल्या हिरवनिच्या उजवीकडे असतो . क्ष सो आपला एन्गल बदला. आयुश्यातला पहिला प्रतिसाद आहे माझा! दमलो लिहुन. मिपाकरान्ना नमस्कार!

- दुसरा वल्लि
(पहिला वल्ली दिर्घ आहे)
लवकरच नाव बदलुन घेण्याची ईच्छा असणारा. मदत हवीय.

धमाल मुलगा's picture

18 Aug 2010 - 6:17 pm | धमाल मुलगा

समजा पोश्टर उर्दु पध्दतीनं वाचलं/पाहिलं तर? :?

-(फर्डु) ध.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Aug 2010 - 6:20 pm | परिकथेतील राजकुमार

कसे काय बॉ तुमचे पोष्टर मधल्या हिरोकडे लक्ष जाते ?