कोडे: जोड-चुंबक आणि एकच धृव!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
27 Mar 2010 - 4:45 pm
गाभा: 

जर दोन चुंबकांना त्यांच्या दक्षिण ध्रुवाजवळ (म्हणजे चुंबकांच्या दक्षिण ध्रूव टोकांजवळ, पृथ्वी च्या दक्षिण धृवाजवळ नव्हे!) फेवीकॉलने जोडले आणि जोडलेले चुंबक दोऱ्याने मध्यभागी (जोडलेल्या भागावर दोरा बांधून) टांगले तर ते कुठे स्थिर होईल? कारण आता तर त्या जोड-चुंबकाच्या दोन्ही बाजूंना आता उत्तर ध्रुव असणार!

एरवी एका चुंबकाचे तुकडे केले तर त्या दोन्ही तुकड्यांवर पुन्हा दोन्ही धृव आपोआप तयार होतात. पण, येथे आपण दोन वेगवेगळ्या चुंबकांचे दोन्ही दक्षिण धृव (प्रतिकर्षण होत असतांनाही) एकत्र जोडले, तर मात्र त्या जोड चुंबकाच्या दोन्ही बाजूला उत्तर ध्रूव असणार.

मग जसे नेहेमी चुंबक सूची दक्षिणोत्तर स्थिर होते तसे हा आपला जोड-चुंबक कोणत्या दिशेला स्थिर व्हायला हवा?

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

27 Mar 2010 - 5:05 pm | नितिन थत्ते

हॅ हॅ हॅ. करून पहा आणि आम्हाला सांगा.

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

कारभारी's picture

27 Mar 2010 - 5:46 pm | कारभारी

हे जोड चु॑बक कोणत्या हि दिशेला स्थिर रहाणार नाही......

निमिष सोनार's picture

27 Mar 2010 - 10:03 pm | निमिष सोनार

असेच मलाही वाटते पण मग...
जर ते कोठेही स्थिर होणार नाही म्हणून ते सतत दोलायमान म्हणजे घड्याळाच्या लोलकासारखे सतत हलत राहील का?
तेही कोणतीही बाह्य डायनॅमीक एनर्जी न पुरवता?
पण मग असे कसे शक्य आहे? हे तर न्यूटनच्या नियमाविरुद्ध होईल की, एका उर्जेचे रूपांतर दुसर्‍या उर्जेत होते, उर्जा कायम राहाते, नष्ट किंवा निर्माण करता येत नाही.
... आणि जर ते स्थिर होईल असे मानले तर, ते नेमके कोणत्या दिशेला होईल?
दर वेळेस स्थिर होण्याची दिशा एकच असेल का वेगेवेगळी?

तेच तर आपल्याला शोधून काढायचे आहे!
चर्चा अशीच राहून मोलाची भर टाकावी ही, विनंती....
धन्यवाद!!

माझ्या कार्टून्स च्या ब्लॉग ला जरूर भेट द्या:
http://cartoonimish.blogspot.com

नितिन थत्ते's picture

27 Mar 2010 - 10:52 pm | नितिन थत्ते

अहो, तो साध्या दगडासारखा वागेल.

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

धनंजय's picture

29 Mar 2010 - 7:18 am | धनंजय

कुठल्याही लोखंडाच्या तुकड्यात अनेक सूक्ष्म चुंबके उलटपुलट वेडीवाकडी कशीही रचलेली असतात. तो साधा दगडासारखा वागतो, वाटेल तिथे स्थिर होतो, आणि मग स्थिर राहातो.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Mar 2010 - 5:55 pm | परिकथेतील राजकुमार

तेज्यायला चुंबक होय !!
मी काहीतरी भलतेच वाचुन घाईघाईत धागा उघडला.

असो...

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

आनंद घारे's picture

29 Mar 2010 - 9:26 am | आनंद घारे

चुंबकांचा आकार कसा आहे? तो सरळ रेषेत आहे की घोड्याच्या नालेसारखा आहे? ते कशा प्रकारे एकमेकांना जोडले आहेत? एकावर एक ठेवले आहेत की एकाच्या समोर एक आहेत? चुंबक ही त्रिमित वस्तू असल्यामुळे असे अनेक प्रश्न उठतात आणि त्यांची उत्तरे वेगवेगळी असतील.
तर मात्र त्या जोड चुंबकाच्या दोन्ही बाजूला उत्तर ध्रूव असणार
या वाक्यावरून जी स्थिती दिसते त्यात तो दगडासारखा कोणत्याही दिशेने स्थिर राहील. मात्र त्याला बांधलेली दोरी अचूकपणे मध्यावर असेल तरच असे होईल. ती मध्यापासून थोडी दूर असेल तर पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीमुळे दोन्ही बाजूंच्या उत्तर ध्रुवावरील आकर्षणामुळे निर्माण होणारे 'मोमेंट' (याला मराठी प्रतिशब्द काय?) समान नसल्यामुळे तो जोडचुंबक साध्या होकायंत्राप्रमाणेच उत्तरदक्षिण दिशेत स्थिर होईल, असे मला वटते.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

29 Mar 2010 - 8:14 pm | नितिन थत्ते

घारेसाहेबांच्या म्हणण्याशी सहमत.
मी सांगितलेले उत्तर हुबेहूब सारखे चुंबक चिकटवले आहेत असे समजून दिलेले होते. चुंबक सारखे नसतील तर वेगवेगळे परिणाम संभवतात.

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

मला अर्थातच वस्तुमानाने, आकाराने, वजनाने हुबेहुब सारखे आयताकृती (इंग्लशमध्ये "बार") चुंबक या प्र्योगासाठी अपेक्षीत आहेत.
आणि ते अगदि मोजून मापून मध्यभागीच दोर्‍याने टांगून ठेवले तर!
-निमिष सोनार

माझ्या कार्टून्स च्या ब्लॉग ला जरूर भेट द्या:
http://cartoonimish.blogspot.com

खटासि खट's picture

23 Nov 2012 - 12:59 pm | खटासि खट

चुंबकावर अ‍ॅक्स स्प्रे मारल्याने फरक पडतो का /

चेतनकुलकर्णी_85's picture

23 Nov 2012 - 4:31 pm | चेतनकुलकर्णी_85

मुळात हे कोडेच चुकीचे आहे :)
१.जेव्हा दोन समान चुंबकीय ध्रुव खूप जवळ आणले जातात तेव्हा दोन्ही चुंबक demagnetise होतात .
२.दोन चुम्बकातील force हा दोघांच्या अंतराच्या व्यस्त असतो त्यामुळे दोन चुंबक असे जोडणे शक्य नाही (बाय थेयरी )

ज्ञानराम's picture

23 Nov 2012 - 5:20 pm | ज्ञानराम

२.दोन चुम्बकातील force हा दोघांच्या अंतराच्या व्यस्त असतो त्यामुळे दोन चुंबक असे जोडणे शक्य नाही (बाय थेयरी )

चेतन यांच्याशी सहमत.

विजुभाऊ's picture

17 Aug 2022 - 10:33 am | विजुभाऊ

लेखात म्हंटले आहे की दोन्ही चुंबक एकत्र जोडायचे. काही काळास्तव बाह्य बल लावून ( खिळ्याने फिक्स करून किंवा फेवीक्विक ने चिकटवून. ) दोन्ही दक्षीण ध्रुव चिकटवायचे. त्यामुळे उरलेल्या दोन्ही बाजूंस उत्तर ध्रुव च रहातील
उ.ध्रु.------द ध्रु- द ध्रु.----------उ.ध्रु.

करुन पहायला हवे

आग्या१९९०'s picture

17 Aug 2022 - 11:01 am | आग्या१९९०

पूर्व पश्चिम दिशेला स्थिर होईल.दोन्हीकडे दक्षिण आणि उत्तर बल समान राहील.