आनंद ओवरी

सोम्यागोम्या's picture
सोम्यागोम्या in काथ्याकूट
27 Mar 2010 - 7:31 am
गाभा: 

कालच एक नाटक पाहिलं आनंद ओवरी ! कान्होबा म्हणजे (तुकारामांचे बंधु) त्यांच्या दृष्टीतून तुक्याचे हे दर्शन निराळेच वाटले. किशोर कदमांचा अभिनय फार जबरी आहे असं काही मी कौतुक करणार नाही पण एकच पात्र असूनही जो काही परिणाम कथेला साधायचा आहे तो अचूक साधला जातो.
मी काही नाट्य समीक्षक नाही. त्यामुळे फक्त लोकांच्या दृष्टीस पडावे म्हणून हा दुवा इथे देत आहे.

प्रतिक्रिया

सोम्यागोम्या's picture

27 Mar 2010 - 7:34 am | सोम्यागोम्या

यूनळीचा दुवा टाकायचा प्रयत्न करतोय. कोणी मार्ग दर्शन करेल काय?

Nile's picture

27 Mar 2010 - 7:44 am | Nile

तुम्हाला इतरांना खरडी करायची सुविधा नसेल म्हणुन इथेच सांगतो.

यु ट्युबवर उजवीकडे url आणि embed असेल, जर दुवा द्यायचा असेल तर पहिले कॉपी पेस्ट करा. इथे व्हीडीओ एम्बेड करायचा असेल तर दुसरे.

उदाहरणार्थः

नाटक पहावेसे वाटत आहे, ओळखीबद्दल धन्यवाद.

सोम्यागोम्या's picture

27 Mar 2010 - 9:40 am | सोम्यागोम्या

निले,
धन्यवाद भाऊ. थोडं शिकवा आम्हाला. जमत नाहीए भाऊ ! यूआरएल इथे टाकली तरी फक्त लिंक दिसते. व्हिडिओ दिसत नाही.

Nile's picture

27 Mar 2010 - 9:46 am | Nile

नो प्रॉब्लेम. तुमच्या खरडवहीत उत्तर दिले आहे.:) तुमची खरडवही इथे: http://www.misalpav.com/guestbook/9079

सोम्यागोम्या's picture

27 Mar 2010 - 6:55 pm | सोम्यागोम्या

निले,जमलेलं आहे त्वरित उत्तर दिल्याबद्दल आभार.

विसोबा खेचर's picture

28 Mar 2010 - 9:35 am | विसोबा खेचर

सवडीने पाहतो..

तात्या.