साहित्य :
जिलबी साठी -
२ वाट्या रवा
१ वाटी मैदा
२ चहाचे चमचे डाळीचे पीठ
२ चहाचे चमचे आम्बट ताक ( ताक आम्बट असणे महत्वाचे)
२.५ वाट्या उकळत पाणी
केशर चवीप्रमाणे
थोडस तेल ( मिश्रणावर घालायला )
तेल किन्वा साजूक तूप जिलब्या तळायला
पाका साठी -
३ वाट्या साखर
१.५ वाट्या पाणी
केशर
वेलची पूड
कृती -
ज्या दिवशी जिलबी करायची आहे त्याच्या आद्ल्या रात्री रवा,मैदा आणि डाळीचे पीठ चाळून घ्या. त्यामधे आम्बट ताक आणि उकळत पाणी घालून एकजीव करून घ्या. ( साधारण पणे भजी च्या पीठा इतपत सैल होइल).हे पीठ भिजवताना त्यात केशर घाला म्हणजे जिलब्याना रन्ग चान्गला येतो.
ह्या मिश्रणावर तेलाचा थर घालून रात्रभर भिजत ठेवा.
दूसर्या दिवशी सकाळी हे मिश्रण एकाच दिशेनी घोटून घ्या.
हे मिश्रण टोमेटो सौस च्या बाट्ली मधे भरुन गरम तेलामधे किन्वा साजूक तूपा मधे जिलब्या तळून घ्या.
पाकासाठी पाणी आणि साखर एकत्र उकळत ठेवा. उकळत आल्यावर त्यात केशर आणि वेलची पूड घाला. एकतारी पाक झाला की गैस बन्द करा.
तळलेल्या जिलब्या पाकामधे घाला.
जिलब्या तयार. :):)
सूचना -
मी जिलब्या साठी तळायला तेल वापरते. साजूक तूपामधे तळलेल्या जिलब्या जरा गार झाल्या की मऊ पडतात.
जिलब्या मन्द आचेवर तळाव्यात नाहितर त्या आतून कच्च्या राहण्याची शक्यता असते.
हि माझ्या सासूबाइन्ची खास पाकृ. :) मी मिपा ची अगदी नवी सदस्य असल्यामुळे ह्या वेळी छायाचित्र उपल्ब्ध होउ शकले नाही. पुढ्च्यावेळी नक्की देइन.
:)
प्रतिक्रिया
26 Mar 2010 - 2:55 am | इंटरनेटस्नेही
छान आहे. वाचुनच चव जीभेवर रेंगाळली!
26 Mar 2010 - 4:51 am | चित्रा
जिलबी मला आवडत नाही, विशेष, पण हे वाचून मात्र करावी असे वाटू लागले आहे. जिलब्या करवंटीला भोक पाडून घालतात ना? त्याबद्दलही कृपया मार्गदर्शन करावे.
26 Mar 2010 - 6:16 am | अम्रुताविश्वेश
करवन्टीला भोक पाडून पण जिलबी करतात. पण मी तो प्रयोग केलेला नाही. पण त्यात खूप व्याप आहे असे ऐकले आहे. :)
पण करवन्टी ऐवजी झिप लोक ची पिशवी वापरता येते. पिशवी चा शन्कू सारखा आकार करून ती वापरता येइल.( केक सजावटी करता जशी वापरतात तशी.)
अमृता. :)
26 Mar 2010 - 8:07 am | विसोबा खेचर
व्वा व्वा! सुंदर पाकृ..:)
येऊ द्यात अजूनही अश्याच काही पाकृ. फोटोही दिलात तर बरे होईल..
तात्या.
26 Mar 2010 - 11:52 am | स्वाती दिनेश
मस्तच की!
जिलब्या आवडल्या,:)
स्वाती
26 Mar 2010 - 12:20 pm | नितिन थत्ते
जिलबीची आठवण करून दिल्याबद्दल निषेध. :(
आता खालच्या दुकानात जायला लागणार....जिलबी खायला. :)
नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)
26 Mar 2010 - 12:23 pm | अरुंधती
जेवायची वेळ व अशी मस्त पा. कृ.
व्वा! :)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
17 Apr 2010 - 2:51 pm | स्वाती राजेश
जिलबी करण्यासाठी सॉस च्या बाटलीचा वापर करायचा, मस्त होतात...
17 Apr 2010 - 3:06 pm | भारद्वाज
काय मस्त होतात....जिलब्या की बाटल्या???? =))
पण जिलबी म्हटले की "ती" धाराची जाहिरात आवर्जुन आठवते...त्या छोटया पोराची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.