विज्ञान लेखक सर आर्थर क्‍लार्क यांचे निधन

सागर's picture
सागर in काथ्याकूट
19 Mar 2008 - 9:08 pm
गाभा: 

आत्ताच एक ब्रेकींग न्यूज पाहिली.

विज्ञान लेखक सर आर्थर क्‍लार्क यांचे निधन
स्त्रोत : http://www.esakal.com/esakal/03192008/TajyabatmyaInternational342E13C29C...
------------------------------------------------------------------
नवी दिल्ली - अवकाश आणि विज्ञान विषयांवर प्रदीर्घ काळ लेखन करणारे जागतिक किर्तीचे लेखक सर आर्थर सी. क्‍लार्क यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. कोलंबोमध्ये असलेल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांना पहाटेपासून श्‍वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. क्‍लार्क यांना देश-विदेशातील अनेक पुरस्कार मिळाले होते. विज्ञान आणि अवकाश याविषयांवरील त्यांची 100 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. उपग्रहाद्वारे संज्ञापनांची संकल्पना सर्वप्रथम क्‍लार्क यांनीच मांडली.
------------------------------------------------------------------
या महान लेखकाचे अखिल विज्ञान जगताने आणि सर्वच जगानेही ऋणी रहायला हवे असे माझे मत आहे.
आज जे डिश टीव्ही / टाटा स्काय यांचा उपग्रहांवरुन धुमाकूळ चालू आहे आणि आज उपग्रहाच्या माध्यमातून विज्ञानाची जी प्रगती होते आहे, त्या कल्पनेसाठीचे श्रेय सर आर्थर क्‍लार्क यांचेच आहे. एवढ्या महान लेखकाने आयुष्याची शेवटची वर्षे घालवण्यासाठी आपल्या शेजारीच श्रीलंकेची निवड केली होती. असे असूनही आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी वा लेखकांनी याचा किती लाभ घेतला हे माहित नाही...

सर आर्थर क्लार्क यांची अनेक गाजलेली तसेच मराठीतून अनुवादीत झालेली पुस्तके मी वाचलेली आहेत, जसे २००१: अ स्पेस ओडीसी
यांच्या जीवनाबद्दल विकीवर येथे माहिती मिळेल : http://en.wikipedia.org/wiki/Arthur_C._Clarke

अशा या महान विज्ञान लेखकाला भावपूर्ण श्रद्धांजली...
विज्ञानप्रेमी (सागर)

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

19 Mar 2008 - 9:45 pm | सुधीर कांदळकर

श्रद्धांजली.
माझ्याकडे यांची बरीच मूळ ई पुस्तके आहेत बरे का.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

सुधीरकाका,

सर क्लार्क यांची ई-पुस्तके असतील तर त्याचे दुवे द्या की. म्हणजे माझ्यासारख्या अनेक विज्ञानप्रेमींना ती डाऊनलोड करुन घेता येतील...
डाऊनलोडसाठी उपलब्ध नसतील तर कृपया माझ्या वैयक्तिक ई-पत्त्यावर पाठवावी ही विनंती
माझा ई-पत्ता : sagar0202@gmail.com

या बहुमोल माहितीबद्दल धन्यवाद
सागर

सर्किट's picture

19 Mar 2008 - 10:10 pm | सर्किट (not verified)

स्पेस ओडिसी २००१ मधला हॅल हा काल्पनिक महासंगणक अर्बाना, इलिनॉय येथील विद्यापीठात (माझी जुनी शाळा) बनवला गेला असा उल्लेख आहे.

त्यामुळे २००१ मध्ये तेथे एक मोठे संमेलन भरले होते. हॅल च्या किती कुवती (काल्पनिक) सध्या खर्‍या संगणकांनी आत्मसात केलेल्या आहेत, ह्या विषयावर चर्चा सत्र होते.

त्यात असे लक्षात आले, की सर क्लार्क ह्यांनी त्या कादंबरीच्या माध्यमातून संगणक संशोधनाचा मुळी आराखडाच तयार केला होता.

सर क्लार्क ह्यांना आदरांजली.

(त्यांच्या श्रीलंकेतील वास्तव्यात त्यांच्यावर अनेक खाजगी आरोप झाले, त्याबद्दल खरे खोटे माहिती नाही, आणि ही आदरांजली क्लार्क ह्या खाजगी व्यक्तीला नाही, तर त्यांच्या कलाकृतींना आहे.)

- (नतमस्तक) सर्किट

सागर's picture

20 Mar 2008 - 11:10 am | सागर

सर्कीटराव,

हे बाकी खरे आहे. क्लार्क यांच्या अनेक पुस्तकांतून वा कथांमधून त्यांची काळाच्या पुढची झेप किती प्रभावी होती हे लक्षात येते.
आजच्या संगणकीय युगातच आपण त्यांच्या कल्पनाशक्तीची दाद देत आहोत हे चांगले लक्षण आहे.
ओडीसी मालिकेतील शेवटच्या चौथ्या भागात, जे वर्णन आहे, पृथ्वीपासून अंतराळात स्पेस स्टेशनवर, चंद्रावर आणि दुसर्‍या ग्रहांवर मानवाची वस्ती.... हे जेव्हा प्रत्यक्षात उतरेल तेव्हा सर आर्थर क्लार्क यांचे पुतळे ....माफ करा...त्या काळच्या तंत्राप्रमाणे महाकाय थ्रीडी डिजिटल प्रतिमा उभारल्या गेल्या तर आश्चर्य वाटायला नको...

स्पेस ओडिसी २००१ मधला हॅल हा काल्पनिक महासंगणक अर्बाना, इलिनॉय येथील विद्यापीठात (माझी जुनी शाळा) बनवला गेला असा उल्लेख आहे.

अवांतरः सर्किटराव, तुमच्या जुन्या शाळेच्या आठवणींवर एखादा लेख किंवा येथेच थोड्या आठवणी लिहिल्या तर मजा येईन ...
(इतर ग्रहांवर जाऊन राहण्याचे स्वप्न पाहणारा)सागर

विसोबा खेचर's picture

20 Mar 2008 - 10:48 am | विसोबा खेचर

क्लार्कसाहेबांना आमचीही विनम्र आदरांजली...

तात्या.

धमाल मुलगा's picture

20 Mar 2008 - 11:05 am | धमाल मुलगा

सर आर्थर क्लार्क या॑ना आदरा॑जली.