आत्ताच पुण्याला अण्णांची ख्यालीखुशाली विचारण्याकरता फोन केला असता अण्णांना पुण्याच्या 'सह्याद्री' रुग्णालयात दाखल केले असल्याचे कळले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असेही समजले.
डॉक्टरांच्या प्रयत्नास यश येवो व हिंदुस्थानी अभिजात संगीताचे अध्वर्यू, अनभिषिक्त सम्राट, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या प्रकृतीस लवकरात लवकर आराम वाटो, हीच संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे विधात्याच्या चरणी प्रार्थना!
तात्या.
प्रतिक्रिया
19 Mar 2008 - 8:01 pm | बिपिन कार्यकर्ते
मी आत्ताच MSN वर ही बातमी वाचली. लगेच इथे आलो, खात्री वाटली की इथे पण त्या बद्दल काही कळेल. तसेच झाले.
तात्या, नक्की काय झाले आहे त्यांना ते कळेल का?
बिपिन.
19 Mar 2008 - 8:02 pm | प्राजु
आराम वाटेल. खूप लवकर ते पूर्ण बरे होतील.
इश्वर त्यांना लवकरात लवकर व्याधीमुक्त करो....
- (सर्वव्यापी)प्राजु
19 Mar 2008 - 8:05 pm | छोटा डॉन
आण्णांना लवकर बरे कर अशी "विठ्ठलाचरणी प्रार्थना" करतो ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
19 Mar 2008 - 8:11 pm | चतुरंग
त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळो हीच विठूचरणी प्रार्थना!
चतुरंग
19 Mar 2008 - 8:13 pm | मुक्तसुनीत
हेच म्हणतो. पंडीतजीना अनेकानेक शुभेच्छा.
19 Mar 2008 - 8:14 pm | सर्वसाक्षी
ईश्वरचरणी प्रार्थना
19 Mar 2008 - 8:16 pm | सुधीर कांदळकर
निसर्गाकडे व ३३ कोटी देवांकडे प्रार्थना. ते म्हणजे आमचा अमोल सांस्कृतिक ठेवा आहेत.
19 Mar 2008 - 8:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
19 Mar 2008 - 8:28 pm | हर्शल
स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
19 Mar 2008 - 8:47 pm | llपुण्याचे पेशवेll
उद्याचा सूर्योदय हा 'स्वरभास्करा'ला उत्तम आरोग्य देऊन रुग्णालयाच्या बाहेर काढणारा ठरावा. आणि दोन भास्करांची किरणांनी आणि स्वरांनी गाठ पडावी असी ईश्वरचरणी प्रार्थना.
पुण्याचे पेशवे
20 Mar 2008 - 10:54 am | धमाल मुलगा
हेच म्हणतो मीही!
आई जगद॑बे आमच्या स्वरभास्करास लवकरात लवकर खडखडीत बरे कर...
19 Mar 2008 - 8:51 pm | स्वाती राजेश
पंडित भीमसेन जोशी लवकरात लवकर बरे व्हावेत ही ईश्वर चरणी प्रार्थना!!!!!!!!!
20 Mar 2008 - 11:46 am | शरुबाबा
स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
20 Mar 2008 - 11:51 am | इनोबा म्हणे
स्वरभास्करांना लवकरात लवकर बरे वाटावे हिच पांडूरंगाकडे प्रार्थना!
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
20 Mar 2008 - 3:15 pm | विजय आचरेकर
स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
20 Mar 2008 - 3:17 pm | मनस्वी
स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी लवकरात लवकत ठणठणीत बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
20 Mar 2008 - 3:26 pm | विकास्_मी मराठी
िव्कास०१५४
स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना ! ! ! ! !
20 Mar 2008 - 11:11 pm | देवदत्त
पंडित भीमसेन जोशी लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना